इंजिनियरिंगमधल्या कुठल्या तरी मान्सुनमध्ये "सीखो ना नैनो की भाषा" ऐकलं...तसंही आधी "अबके सावन" आणि अशा गाण्यांनी शुभाजींची गायकी आवडायला लागली होतीच...पण हे गाणं त्याच्या व्हिडिओसकट आवडलं...खरं तर कुठलंही अशा अर्थाचं गाणं करायला गेलं तर खूप जास्त शृंगारिक होऊ शकतं. पण यातल्या नायक नायिकेचा तात्पुरता विरह अगदी नेमक्या प्रसंगात दाखवण्याचं कसब खूपच छान साधलं गेलंय या व्हिडिओमध्ये आणि सोबतीला अतिशय सुंदर सुरावटींमधुन येणारा शुभाजींचे आर्त सूर....
सगळं जग जेव्हा मेच्या सुट्टीत हापुसचा आनंद घेत असतं तेव्हा मुंबै (आणि आपल्या इथल्या बर्याच) युनिव्हर्सिटीची मुलं "जास्त आंबे खाऊ नकोस..झोप येईल" असलं काही घरच्यांचं ऐकत बिचारी अभ्यास करत असतात आणि मग नंतर मग लगेच पुढच्या महिन्यात जेव्हा तेच जग छत्री, रेनकोट, पावसाळी चप्पल,साडीचे ओचे, ड्रेसच्या ओढण्या आणि पॅंटवर उडणारा चिखल सांभाळात शाळा-कॉलेज,ऑफ़िस कुठेकुठे म्हणून जगरहाटीत धावत असतात तेव्हा तीच आधी सांगितलेली गरीब बिचारी मुलं आपली वार्षिक सुट्टी आपल्या मर्जीप्रमाणे घालवत असतात त्यावेळी ऐकलंलं आणि अनेक वेळा पाहिलं गेलेलं हे गीत आहे...त्यामुळे कधीही ऐकलं की मला ती सुट्टी, बाहेर भरुन आलेलं आभाळ आणि हातात गरम भुट्टा नाहीतर उकडलेल्या शेंगा, चहा, भजी किंवा वेगवेगळी गरमागरम खाणी असलेली मी आठवते....कसे येणार ते दिवस परत? एकदा कॉलेजजीवन संपलं की संपल...पण...असो...
आज इथे असंच आभाळ भरुन आलंय आणि माझ्याच ऑरकुटमधल्या फ़ेवरिट व्हिडीओ पाहताना पुन्हा एकदा वार्षिक सुट्ट्यांचे ते दिवस आठवताहेत...खरंच गाण्यांबरोबर किती आठवणी निगडीत असतात ना? माझ्यासाठी तर अशी अतोनात गाणी आणि काही काही आल्बमसुद्धा काही जागा, प्रसंग यासाठी लक्षात आहेत...
पाऊस आणि गाणी हा तर एक अविस्मरणीय धागा आहे...नैनो की भाषा मध्येही सुरूवात पहाटेपासून आहे पण पाऊस येतोच...आणि पाऊस आपल्याबरोबर अनेक आठवणी घेऊन येतो...कधी त्या डोळे ओलावुन जातात तर कधी त्या आठवणींमधला मिस्किलपणा पुन्हा एकदा चेहेर्यावर येतो...
आणि मग नेमकं जर याच गाण्यानंतर "अबके सावन" लागलं तर..पावसाळ्यातला दुग्धशर्करा योग म्हणतात तो हाच...असं झालंय ही बहुधा आता त्या चॅनेलचं नाव आठवत नाही पण तिथे कायम गाणी असायची आणि मग पसंद आपकी स्टाइलमध्ये पावसात ही गाणी आगेमागेही लागायची...त्याचा आनंद फ़क्त एका विमानप्रवासाच्या वेळी शोभाजी प्रत्यक्षच भेटल्या त्याशी होऊ शकतो....खरंच या आवाजात आणि व्यक्तिमत्वात काहीतरी वेगळं आहे..नाहीतर जी काही दोन मिन्टं एअरपोर्टवर भेटलो होतो ते असं अनिवारपणे आठवावं आणि त्यांचीच गाणी ऐकली जावीत...ऑरा या शब्दाचा खरा अर्थ अशा काही व्यक्ति भेटल्या की अचानक समजतो नाही???
गाणी आणि आठवणी आपल्यापैकी बर्याच जणांचा आवडीचा छंद असणार हे नक्की....अशाच काही आठवणी अधुनमधुन या ब्लॉगवर घेऊन यायचा विचार आहे...
फ़ोटो मायाजालावरून साभार...

काय???? तू शुभ मुदगलांना प्रत्यक्ष भेटलीयेस? जबरदस्त !!! सहीच ..
ReplyDeleteबाकी पोस्ट मस्तच.. अजून आठवणी येउदेत.
अरे हो..पावसामुळे आठवडाभर उशीराने मिळालेलं विमान एक रात्र न आल्यामुळे पूर्ण रात्र मुंबईच्या विमानतळावर काढल्यावर पहाटे शुभाजी त्यांची तिकिटं रद्द करायला निघाल्या कारण या प्रकरणाने त्यांचा युरोपमधला कार्यक्रम रद्द झाला होता. त्यावेळी संतप्त लोकं, शुभाजींची सेक्रेटरी यांची विमानकंपनीच्या लोकांबरोबर बाचाबाची या सगळ्या गदारोळात घडलेली चांगली घटना म्हणजे त्यांच्याशी भेट आणि तीन-चार मिनिटं गप्पा...नेहमीच लक्षात राहिल हा वेगळाच योगायोग...
ReplyDeleteमस्त..दोन्ही गाणी माझी आवडती. पोस्ट झकास नेहमीसारखाच .. :)
ReplyDeleteधन्यवाद सुहास...ही दोन्ही टि.व्ही.च्या जमान्यात एकापाठी एक लागली की काय वाटायचं ते आता यु ट्युबच्या प्लेलिस्ट मधुन वाटणं कठिण आहे म्हणून आठवण...:)
ReplyDelete’अब के सावन’ चॅनल व्ही वर बरेचदा लागायचं, त्यावेळी प्रायवेट अल्बम्सच्या गाण्याच्या विडीओज मध्ये सुध्दा एक स्टोरी असायची...
ReplyDeleteअरे हो चॅनेल व्ही मी विसरलेच होते...आणि मलाही ते गाण्याच्या व्हिडिओमधली स्टोरी फ़ार आवडायची...आजकाल तसं होतं का नीट लक्षात येत नाही...पण तेव्हा एक प्रायव्हेट आल्बम्सचा जमाना आला होता त्या लाटेत असे छान छान व्हिडिओ येऊन गेले...
ReplyDeletewhy cant I comment ?
ReplyDelete- Shraddha
aare zakkaas mala khandala ani lonavala chi athavan jhali gg
ReplyDeleteधन्यवाद श्रद्धा...आठवलं नं खंडाळा आणि लोणावळा?? काही काही गाणी आणि ठिकाणं पक्की मनात बसलेली असतात...
ReplyDeleteही दोन्ही गाणी जबर्या आहेत. . . "सीखो ना" हे गाणं तर मूड बनवतं. . .शुभाजी ना प्रत्यक्ष भेटलाय!!! लकी आहात. . .पोस्ट मस्त जमली आहे.
ReplyDeletebai mala hi gani aawadatat he tumhala kay vegale sangu...tumhi ti pahilich aahet majhya album madhe...pan aata lek gatoy g hi gani....tula khar sangu tyatale sukh mhanaje...aahaahaa..............
ReplyDeleteमनमौजी, अगदी मनातलं बोललात "सीखो ना" हे गाणं मूड बनवतं....
ReplyDeleteअरे व्वा तन्वी लेक गातोय म्हणजे ऐकायला हवं....
ReplyDeleteAll time favourite आहेत ही गाणी. 'अब के सावन...' गाण लागलं की तर नाचावसंच वाटत. आठवणींच राज्य खरचं खुप सुंदर असतं. मस्त लिहील आहे.
ReplyDeleteसोनाली
सोनाली ’अब के सावन’ चा व्हिडिओ एका जागी बसून पूर्ण पाहिलाच नाहीये कधी कारण एखादी गिरकी तरी घ्यावीशी वाटतेच आणि पावले आपोआप थिरकतात...गाण्यांच्या आठवणी काढायच्या ठरवलं तर आसपासचं जग विसरायलाच होतं...
ReplyDeleteही पोस्ट वाचल्यावर पुन्हा दोन्ही गाणी ऐकली.
ReplyDeleteएकदम मूडच बदलून गेला. मस्त, ताजतवानं वाटतय.
अपर्णा, क्या बात हैं! सकाळी सकाळी सहीच मूड बनवलास. ही दोन्ही गाणी आवडती आहेतच आणि मला तू टाकलेला फोटोही खूप आवडला.... अबके सावन गुणगुणत त्या पावसात मस्त भिजावसं वाटतयं.... त्या तिनचार मिनीटांच्या भेटीची गोडी अजूनही टिकून आहे हे जाणवतयं. सहीच. चला आता पुन्हा एकदा ऐकते....
ReplyDeleteत्यांच्या एका SPIC MACAY च्या मैफिलीसाठी मला स्वर-मिश्रणाची संधी मिळाली होती. खरंच खूप कसलेला आवाज आहे त्यांचा.
ReplyDeleteतुमचा लेख वाचून फिरून एकदा पावसाची खूप आठवण यायला लागलिये...
अनिकेत धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत...खरंच ही गाणी मूड बनवतात...
ReplyDeleteभाग्यश्रीताई, तुझ्या इथल्या भयंकर थंडीत तर तुला अजून जास्त गाण्यांची गरज आहे...त्यांच्या भेटीचं अप्रुप आहेच...आणि त्यावेळी अमेरिकेचा विसा नव्हता म्हणून तिथं आले नाही असं त्या म्हणल्या आणि मग अर्थात नंतर त्या आल्या पण नेमका त्यांच्या कार्यक्रम न्यु-जर्सीत जरा जास्त लांबही होता आणि त्या दिवशी काही कारणाने जमलं नाही त्याची रुखरूख जाणवते...
ReplyDeleteशशांक, तुमचा तर मला हेवाच वाटतो....एक वेगळाच आवाज आहे...त्यांची पिया तोरा कैसा अभिमान सारख्या गाण्यांना जो घनगंभीर सूर लागतो त्याने पावसाचं एक वेगळं रुप दिसतं....ब्लॉगवर स्वागत...या दोन गाण्यांच्या निमित्ताने या ब्लॉगवर दोन नवीन वाचक आले त्यामुळे जास्त छान वाटतंय....
ReplyDeleteअबके सावन आठवलं आणि शहारून निघालो आणि लगोलग आवडत्या गाण्याच्या धुनींनी मनात गर्दी केली. फार मस्तं वाटलं.
ReplyDeleteसुंदर लेख! आवडती गाणी, पाऊस आणि मनाचा मुक्त संवाद.... व्वा! क्या बात है! :-)
ReplyDeleteअरुंधती
--
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/
@JaguarNacब्लॉगवर स्वागत..अजुन एक नवा वाचक या गाण्याच्या निमित्ताने क्या बात है? ’अब के सावन’ खरंच तसंच आहे....आणि व्हिडिओ पाहता पाहता कधी स्वतःच नाचायच्या बेतात येतो कळतच नाही
ReplyDeleteअरुंधती..मला ही पोस्ट लिहिताना माहित नव्हतं की माझ्यासारखीच ही गाणी बर्याच जणांच्या मनात घर करुन बसलीत आणि मग प्रतिक्रियेतून ती बाहेर येतील पण आता सगळी मंडळी मिळून गाण्यांच्या आठवणी सांगतोय असं झालंय...
ReplyDeleteMazihi atishay awadati ani gaani ani tu lihila ahes tasach engineering chi exam zaleli ani mag sutti madhe pawasat mothyanda TV var channel on karun hi gani parat parat parat eikat man udya marayacha....
ReplyDeleteKhup chan chan gaani aleli teva, yayachi. Tyaweli Lucky Ali cha ek ala hota "Gori teri aankhe kahe". Zakaasach, athavani ekadam tajya houn tapatap padayala lagalya :-)
KD खरंच रे तेव्हा छान छान गाणी यायची असं मलाही वाटतं...आवर्जुन लिहिल्याबद्दल आभार...
ReplyDelete