अगदी लहानपणापासुन सोबत करणारी गाणी खरं तर कायमच आपल्या लहानग्यांबरोबर असतात पण तरी जसं वय वर्षे दोन हा टप्पा पूर्ण होतो तसं झोपताना गाण्यांच्या ऐवजी गोष्टी किंवा मस्ती जास्त जवळची वाटते. पहिली दोन वर्षे आपल्या खांद्यावर, मांडीवर झोपताना शांत असणारं आपलं बाळ आता मोठं झालं हेच खरं...त्यामुळे फ़ुलोर्यातलं हे शेवटचं पुष्प. यानंतर कदाचित एखादं फ़ार जवळचं गाणं या ब्लॉगवर येईलही पण हा पुष्पगुच्छ घट्ट बांधुन ठेवायची वेळ आली आहे..गेले दोन दिवस गोष्टींवर झोपणारं माझं बाळ आता मोठं होतंय; त्यामुळे मागच्या वर्षभर जसं महिनाकाठी एक गाणं आमचं लाडकं असायचं तसं नसेल. त्यामुळे आता इथंच थांबलेलं बरं.
जाता जाता या महिन्यातलं नसलं तरी मोठं होता होता आमचं पिलु 'जय जय बापा' करताना असं काही मागणं मागत असेल का? असं वाटलं म्हणून हेच गाणं निवडलंय....
देवबाप्पा देवबाप्पा नवसाला पाव
खाऊचे झाड माझ्या अंगणात लाव
झाडाला येऊ दे आईस्क्रिमचे तुरे
गोळ्यांच्या कळ्या अन चॉकलेटची फ़ुले
बिस्किटांच्या पानाला साखर पन लाव
झाडाला येऊ दे लाडू अन करंजी
रोज रोज खायला मिळेल मग ताजी
मधुनच येऊ दे बटर अन पाव
आईजवळ करणार नाही मी हट्ट
खाऊन खाऊन होईन मी खूप खूप लठ्ठ
झाडावर असू दे माझेच नाव
मनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....
Showing posts with label फ़ुलोरा. Show all posts
Showing posts with label फ़ुलोरा. Show all posts
Monday, May 31, 2010
Friday, April 9, 2010
फ़ुलोरा झुकझुक झुकझुक...
या गाण्यामागे प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी असतील..आपल्या आई-वडिलांनी आपल्याला शिकवताना त्यांच्याही..तशाच माझ्याही कारण पळती झाडे पाहात मामाकडे जायचे दिवाळी आणि मे असे दोन सुट्ट्यांचे माझे लाडके महिने होते...या वर्षी त्याची मजा माझा लेकही चाखील...तसंही घोडा मैदान फ़ार दूर नाहीये...पण आम्ही तयारी कधीची केलीय..फ़क्त काळ बदलला तसं आमचं बछडं झुकझुक गाडीच्या ऐवजी घुंघुं विमानाने (निदान मला तरी चार + पंधरा तास हाच आवाज येणारे असं वाटतं..) जाणार...काश मुझे कविताए आती...नाहीतर "घरघर विमान करी, बेल्ट बांधा म्हणे सुंदरी, ढगात गिरकी घेऊया मामाच्या गावाला जाऊ या"...(हम्म्म कळतंय जुळलंय...) असं या गाण्याचंही काही वेगळं करुन मांडता आलं असतं..
पण तसं नकोच..कारण तसंही सुट्टीकी याद में हे गाणं मी आजकाल त्याला (कदाचित स्वतःसाठी) म्हणते...आणि हा चक्क या गाण्यावर झोपीही जातो..म्हणजे इतकं मी छान आळवू शकते असला काहीही गैरसमज व्हायच्या आधी मी मायाजालावर चेक केलंय..हे गाणं भैरवीतलं आहे..(म्हणजे नॉर्मल आहे तर ..माझं गाणं आणि काय???) आणखी एक ग.दि.माडगुळकरांचं माझं आवडतं आणि गायिका अर्थातच आशा भोसले आणि संगीत आहे वसंत पवार यांचं हे गाणं यावेळच्या फ़ुलोरात..आणि सुट्टीमध्ये गाणी म्हणायची का हे ठरवलं नाही म्हणून पुढच्या महिन्यात एकंदरितच विराम असू शकेल....
झुकझुक झुकझुक अगीन गाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया
मामाचा गाव मोठा
सोन्या चांदीच्या पेठा
शोभा पाहु्नी घेऊया मामाच्या गावाला जाऊया
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया मामाच्या गावाला जाऊया
मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामन खाऊया मामाच्या गावाला जाऊया
मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी घेऊया मामाच्या गावाला जाऊया

Wednesday, March 10, 2010
फ़ुलोरा...कोणास ठाऊक कसा..
लहान मुलं भेदरली की सशासारखी दिसतात आणि खेळत असली तरी पिंटुकल्या सशासारखीच..तशी सशासारखी भित्री भागुबाई तर असतातच म्हणा आणि त्यातुन आई नावाचं कवच सगळ्याच भितीपासून आपलं संरक्षण करेल असा एक आत्मविश्वास असतो या वयात. असे हे आपले पिंटुकले ससे, मनावर दगड ठेऊन आपण त्यांना पाळणाघर, शिशुवर्ग इ.मध्ये पाठवतो..अशा पिंटुकल्यांसाठीच हे गाणं आहे हे, आज ही पोस्ट लिहिताना अचानक उमगलं..नाहीतर लहान असताना या गाण्यावर नाच चांगला व्हायचा म्हणून बर्याचदा निवडलं जायचं..
आमचा ससुल्या आता धीटपणे पाळणाघरात राहतो म्हणून तो परत आला की त्याच्यासाठी हे गाणं म्हणते शिवाय आता येऊ घातलेल्या इस्टरच्या मुहुर्तावर बाजारात सगळीकडे ससुले दिसू लागलेत म्हणून या महिन्यात जमतील तितक्या ससुल्याच्या आठवणी काढल्या जातील.....
कधीतरी मोठा झाल्यावर तोही ही गाणी गाऊन दाखवेल या आशेने आजकालची गाणी असतात...पण अर्थात एकतर परदेश त्यामुळे नाही तरी सारखं सारखं पु.ल. ऐकते त्यावेळी वाटतं त्या शंकर्यासारखं मेरी जिंदगी में मुहब्बत का सारखं काहीतरी बरळेल आणि त्यावेळी कदाचित ती पण गम्मतच वाटेल असो...सध्या तरी आपणंच गाणी म्हणणं हेच सुरू आहे...हे गाणं कुणी लिहिलंय ते माहित नाही आणि चाल शाळेतल्या कुठल्याही कवितेसारखीच..मायाजालावर व्हिडीओपण आहे...
कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा
सशाने हलविले कान घेतली सुंदर तान
दिग्दर्शक म्हणाला वाह वाह
ससा म्हणाला चहा हवा.
कोणास ठाऊक कसा पण सर्कशीत गेला ससा
सशाने मारली उडी भरभर चढला शिडी
विदुषक म्हणाला छान छान
ससा म्हणाल काढ पान.
कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा
सशाने म्हटले पाढे घडघड वाचले धडे
गुरुजी म्हणाले शाबास
ससा म्हणाला करा पास.

Wednesday, August 19, 2009
फ़ुलोरा अ आ ई!
गेले काही दिवस हे पुस्तक हरवले होते अर्थात घरातल्या घरात; पण शोधायला मुहुर्त सापडत नव्हता. अखेर मागच्या पोस्टवर अश्विनीने तंबी दिल्यावर नेमकं सापडलं एकदाचं. आज सकाळच्या डाकेनं आलेल्या इ-पत्रात नेमकं बाळं आणि कुत्रा यातलं साम्य दाखवलं होतं आणि हे बडबडगीत आजचं वाचलं जाणं असा योगायोग आहे की म्हटलं लिहुचया आता ब्लॉगवर ही छोटी आठवण.
लहान मुलांना लिहावाचायला कधी शिकवतात (म्हणजे प्रत्यक्ष शाळेआधी) माहित नाही. पण इथल्या वाचनालयात मुलांना अंक ओळख चालु केली आहे. आता इथे आई आल्यानंतर तीसुद्धा घरी A - Z चे ब्लॉक्स कधीतरी वेळ काढायला म्हणून वाचुन घेते. बरोबरीने आताच अ आ ई पण सुरु करावी का??
राहिली गोष्ट पाळीव प्राण्यांची या अमेरिकन लोकांचं कुत्र्या-मांजरांचं प्रेम जरा जास्त आहेच ना! तशी ती लोकं अगदी सख्ख्या मुलासारखं त्यांच्याशी बोलताना, त्यांच्यावर ओरडताना मी खूपदा पाहिलंय. म्हणजे पुष्कळ्वेळा मी आरुषला घरात चल म्हणून ओरडायला आणि शेजारचा रायन त्याच्या रॉक्सीवर खेकसताना एकदमच दिसतो....पण मी म्हणणार नाही हं की मुलं म्हणजे जणू पाळीव प्राणी कधी कधी मोह होतोही विशेष करुन या वयात जेव्हा ती सारखं सारखं आपल्या पायाशी घुटमळत असतात आणि आपल्या बर्याच गोष्टी ऐकतात पण तरी त्यांना थेट पाळीव प्राणी ...ही...ही...ही.....
ती सकाळची मेल आणि कविता खाली दिली आहे.
Life really boils down to 2 questions....
1. Should I get a dog??

OR........
2. should I have children??

मोत्या शीक रे अ आ ई
सांगूं कितीतरी बाई ॥
दादा आई म्हणताती,
अ आ इ ई कठिण किती
तुजला कधी न येईल ती;
म्हणु दे कोणी काही
शीक रे अ आ ई.
यू यू ये ये जवळ कसा,
गुपचूप येथे बैस असा,
ऐक, ध्यान दे, शीक तसा;
धडा पहिला घेई
शीक रे अ आ ई.
म्हणता तुजला येत नसे,
शिकविन तुज येईल तसे,
अ आ इ ई भुंक कसे;
कां रे भुंकत नाहीं?

Friday, August 7, 2009
फ़ुलोरा... छोट्यांसाठी पण चारोळीच
लेकाला सारखं इथल्या लायब्ररीत नेताना लक्षात आलं कळत नकळत नर्सरी राइम्सकडे तो जास्त ओढला जातोय. खाता-पिता तिथल्या कविता साभिनय म्हटल्या की स्वारी खुश असते. म्हणजे त्यात काही वैट नाहीये. तेही शैक्षणिक आहे पण नकळत आपण आपल्या गाण्यांना विसरतोय की त्याच मार्केटिंग कमी पडतय असं होऊ नये म्हणून शेवटी आज बरेच दिवसांनी "फ़ुलोरा" हातात घेतलंय. ’मी माझा’ मुळे चारोळी प्रसिद्ध झाल्या असं बर्याच जणांना वाटतं पण मी म्हणते खोटं आहे. त्या आधीच फ़ेमस होत्या. लहान मुलांची कितीतरी गाणी म्हणजे चारोळ्याच आहेत.
बघा ना छोट्यांना चारोळी आणि ज्यात खूप अभिनय करता येईल असं काही तर हवं नाही का? मी तर माझ्या पद्धतीने खूप सारी गाणी रिमिक्स पध्दतीने म्हणते. म्हणजे जी ओळ त्याला आवडत असेल ती वेगवेगळ्या चालीत आणि आवाजात म्हणजे तेवढाच तोंडाचा आ जास्त वेळा होतो आणि दोन घास जास्त पोटात जातात :)
असो. तशी गाणी अशी शोधली की सापडत नाहीत. पुन्हा बालवर्गात जावं लागणार असं दिसतंय. तसही माझं शालेय शिक्षण मराठीत झाल्यामुळे किंडरगार्टन सध्या चालु आहेच. दुसरीकडे बालवर्गपण रिपिट करते. म्हणजे मग कुठेच कमी पडायला नको. असो. एक-दोन छोट्या इथे देतेय. वय वर्ष एकसाठी चारोळीच बेश्ट.
१. मनिमाऊ मनिमाऊ
नेहमीच तुला हवा खाऊ
उठता-बसता गुरुगुरु
म्याव म्याव सदा सुरु
२. गरगर फ़िरुनी दमला भोवरा
मनात म्हणाला थांबु का जरा
पण एका पायावर उभं कसं राह्यचं
सारखं डोकं खाली जायचं.
आणि आपलं ऑल टाइम हिट...हॉल ऑफ़ फ़ेममध्ये कध्धीच गेलेलं
३. ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाउस आला मोठा

Subscribe to:
Posts (Atom)