Showing posts with label अनुदिनी. Show all posts
Showing posts with label अनुदिनी. Show all posts

Monday, June 1, 2020

Dear Diary: I cannot hear, read, write, cry, and BREATHE

Dear Diary: I cannot hear, read, write, cry, and BREATHE

Am I a diary person? only sometimes. Honestly, I do not want to write diaries. Especially for those disturbed moments when you feel like how can I let go and move on. I do not want to remember the days/months/week when I am thinking what it is that I can do to stop the spread. 

I had a gone thru a long reader's block for a while since almost 2017 and just earlier this year went over it when I completed "The Alchemist". As I decide to read more and keep it going, I had added Trevor Noah's Autobiography "Born A Crime" on my Libby apps hold and there was a long hold that the app could not give me its estimated arrival. Just around when the Memorial day long weekend was around the corner, I see the book on my shelf and I am in a way happy that I finally have it. I started reading it and I am going through sleepless nights over how life was in South Africa even in late 80s. This kid is almost 10 years younger to me and still he suffered being a person of mixed race. I am upset but I know I will finish the book. I will keep the courage. 

All through April and May its all about the spread of this virus. These days all I can think about is the COVID 19 and any day evening is about starting local news so I am all caught up on what happened during day only in my area, blinding myself from the world, I see this video. I shout out "अरे हा मरेल रे!!! ते तीन पोलीस पाठ का दाखवताहेत?" "Oh shoot this person is going to die!!! Why the other 3 cops showing their back?" I could not read or hear what the reporter is saying, I almost know it all. Few days back I saw similar incidence on news when the guy is hiding behind the car and his life is all wasted cause someone thought he is the bad guy with weapon, and as my mind goes few years back I remember asking one of the consultants working with me from mid-west, is your area safe for you to go out as a person of color? In my mind, I suffocate with all the thoughts and I still feel I cannot cry either. I am angry and anxious. I really really cannot BREATHE.

As I remember I was thinking about the covid news and now I am shattered with someone loosing a life over discrimination, over racism.

Growing up I have seen discriminations of different kinds from where I belong, to a point I felt immune to such questions, now is not the time to rethink about those but yes I do think about a few. I see it sometimes around me even now for being a woman, or sometimes just being brown woman and then woman with little power when she work managing projects working with different color/gender team and I can clearly see in someone’s eyes or body language that they are thinking "oh, she is brown".

When I see the cops murdering someone at their wish, deep in my heart, I feel for what is going to happen. 

I have two boys and they would be considered as brown kids in schools/colleges and eventually to the real world where they belong. I am not sure when should be the right time for me to tell them that as much as I never probably have to explain you what a caste mean, now you are at a place, you should always remember that you are "not WHITE". Am I thinking straight? Well I am not thinking I guess and that's why it is not a good idea to write this diary. 

Its Friday and then the first official arrest happens. What changed between Monday and Friday I do not know. I am not interested in knowing anything around law and order and how it supposed to work when damage is already done. A life is lost over a twenty dollar bill. How do we get it back?

There would be protests everywhere I know but I never expected them to turn it into violence. I would not want looters to go out their destroying the already shattered economy. 

Saturday morning, I am trying to catch up with families in India during weekend, making sure my mom and dad still have the patience and strength to live without my sister visiting them or the maid helping them. Its strange how there is a constant something to deal with and you still feel you really are not doing anything for anybody. 

Here comes Saturday afternoon and I talked to my friend in Seattle and then first time after the Minneapolis issue, I talk to someone about it who is a dynamic white woman herself and saying things which means so much to clarify my own doubts and her own concerns. It’s a woman to woman mature discussion. 

How can this get fixed? We both know we cannot do anything but we should support, silently. We cursed how administrations could not still do a better root cause and help change mindsets and prejudice. Training officials is so essential and how it is still missing almost every such case.

Portland downtown, the Rose city is under curfew. The Protesters are closer to the building I used to work just a year ago. We do not know when can we feel rosy again. But I can certainly say the scar is always going to be there. I am sad and low. Its night time again and I do not have the courage to read remaining of "Born A Crime". I would still have a sleepless night. 

Dear diary, I cannot hear, read, write, cry or BREATHE. I don’t think I can think of any of the troubled soul resting in peace. It’s just insane to start a June with not summer on the mind but sorrow and distress to look forward to. 

-Aparna June 1st 2020.

#AparnA #FollowMe #WalkWithUs #BlackLivesMatter #AllLIvesMatter

Saturday, November 30, 2019

छोटी छोटी बातें

आज एक बातमी वाचली, नऊ वर्षांपूर्वी एका दहा वर्षांच्या मुलाने अमेरिकतेल्या एका समुद्रकिनाऱ्यावरून एका बाटलीत, एक छोटासा संदेश आणि पत्ता लिहून ती बाटली समुद्रात फेकली. नऊ वर्षांनंतर ती फ्रान्सच्या एका किनाऱ्यावर एका माणसाला मिळाली आणि त्याने पत्रद्वारा संपर्क साधला. आता त्या मुलाचे वय एकोणीस वर्षे आहे. हे पत्र मिळाल्यावर तो मुलगा मानाने पुन्हा दहा वर्षांचा झाला. ते पत्रही तसं भाबडंच होतं. 

माझीही मुलं आता नऊ आणि अकरा वर्षांची आहेत. त्यांच्याशी बोलताना काही वेळा त्यांच्या अपेक्षा किती छोट्या आहेत किंवा एखाद्या प्रसंगात ते कसा वेगळा विचार करतात हे समजतं आणि नकळत हळवं व्हायला होतं. 

परवा आरुषला त्याच्या सेकंड डिग्री ब्लॅक बेल्टच्या प्रॅक्टिससाठी सोडताना विचारलं, " आता ही शेवटची प्रॅक्टिस. उद्या टेस्ट, मग तायक्वांडो संपलं. तुला काय हवं?"  तो निरागसपणे म्हणाला, " आई, उद्या मला स्नॅकसाठी चिप्स देशील?" मी त्याच्यासाठी एखादी सरप्राईज पार्टी करू किंवा त्याला निदान बाहेर जेवायला नेऊ, असा विचार करत होते आणि हा मुलगा माझ्याकडे फक्त चिप्स मागत होता. 

आजकाल काहीवेळा रुषांक आपल्या दादाच्या "दादा"गिरीला कंटाळून असेल एक लहान भावंडं असलं तर बरं असं म्हणतो. त्याच्या बोलण्यात त्याला "भाऊ" हवाय असं दिसतंय. एकदा आम्ही दोघेच असताना मी हा विषय त्याच्याकडे काढला.  तो म्हणाला, "आपल्याला अजून बेबी मिळू शकतात का?" मी हो म्हटलं, पण त्याला सांगितलं की  तुला भाऊच मिळेल असं काही नाही. दोन मुलगे घरात आहेत म्हणजे खरं तर मुलगीच होईल किंवा आवडेल. 

तो थोडा विचारात पडला आणि म्हणाला, " मग आपल्याला आर्या आणि झिनी (या आमच्या एका मित्राच्या जुळ्या मुली) चे कपडे, खेळणी वगैरे घ्यावे लागतील." त्याला आजवर त्याच्या दादाचे, क्वचित इतर ओळखीच्या मोठ्या मुलांचे कपडे मिळतात. (नवेही मिळतात) त्यामुळे आता ही नवी मुलगी वाढवतानाच सोपं उत्तर त्याच्याकडे तयार आहे. मला त्याच्या या चिमुकल्या दृष्टीचं फार कौतुक वाटतं. 

मला वाटतं, आपण मुलांच्या मोठेपणाची तजवीज, त्यासाठीची तयारी वगैरे करणं बरोबर आहे. पण काही वेळा फक्त छोट्या छोट्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. त्यांच्याबरोबरच्या अशा संवादातली मजा काही और आहे. 

#AparnA #FollowMe


Saturday, July 27, 2019

पाववाला

आम्ही लहान असताना माझी आई आम्हाला बाहेरचं खाणं शक्यतो द्यायची नाही. ऐपतीचा भाग तर होताच पण त्यापेक्षा त्यामागची स्वच्छता वगैरे बाबी पण होत्या. त्यामुळे पावदेखील मी फार कमीवेळा खाल्ला आहे. शक्यतो शनिवार किंवा रविवारच्या दुपारी डोक्यावर काळसर रंगाची ट्रँक घेऊन एक पाववाला यायचा. तो आमच्या चाळीत एका ठिकाणी बस्तान मांडल्यासारखं करून ती उघडली की त्यातले पाव, खारी, नानकटाई इत्यादींचा संमीश्र वास दरवळून जिव्हा खवळून उठे. 

आईला मस्का मारून तिची मर्जी असेल तर मग आम्हाला त्याच्याकडून खरेदी करायला मिळे. मला आठवतं दाताने अजीबात तोडता येणार नाही असा कडक पाव आणि दुसरा अतिशय लुसलुशीत पाव यापैकी एक नगाप्रमाणे त्या दुपारच्या चहासाठी आम्ही घेत असू आणि त्याबरोबर पुढच्या दिवसासाठी खारी किंवा नानकटाई यापैकी काहीतरी वजनावर घेतलं जाई. त्याची ती ट्रँक दोन माळ्याची असे. वरती खारी आणि आतमध्ये नानकटाई तर पाव त्याच्या सायकलच्या मागच्या कॅरियरला लावलेल्या पिवळ्या जाड प्लास्टिकटाईपच्या पिशवीत असत. हे सगळं घेऊन तो वर आलेला असे. जवळजवळ सर्वच बिऱ्हाडं काही न काही खरेदी करत हे त्याला माहित होतं. सर्वांचं झाली की मग तो ती ट्रँक बंद करे आणि मग ते सगळे वासही लुप्त होत. 
मग आम्ही चाळीतून ब्लॉकमध्ये आलो आणि हा पाववाला प्रकार बंद झाला आणि मग सरळ दुकानांमध्ये बेकरीवाल्याने विकायला ठेवलेले पाव, खारी वगैरे अधूनमधून घरी यायला लागली. 

अमेरिकेत आल्यावर जेव्हा केव्हा मी वडा बनवला होता तेव्हा सर्वात जास्त्त मी आपला भारतात मिळणार पाव मिस केला. अर्थात नंतर त्याचीही सवय झाली पण केव्हातरी बेकिंगचा किडा डोक्यात आला आणि आता मुलांना थोडं हेल्थी किंवा घरगुती खाऊ घालण्याच्या निमित्ताने मी आपल्या पद्धतीचा पावही घरी बनवून पाहिला. अर्थात हे खूळ फार दिवस टिकलं नाही पण जेवढे पाव बनवले तेव्हा तो वास  घेताना पाववाला नक्कीच आठवला. 
  
मागच्या विकांताला एक छोटी यर्ट ट्रिप केली. यर्ट म्हणजे छोटा पण मजबूत तंबू त्यात थोड्या बेसिक गोष्टी जसं बंक बेड, साधी गादी आणि मायक्रोवेव्ह व छोटासा फ्रिज असलेलं घर. मग बाहेर ग्रील करण्यासाठी जागा आणि बसायला लाकडी बाक. थोडं बरं कॅम्पिंग म्हणजे अगदी साध्या तंबूत राहायला नको. 

आम्ही राहिलो तिथे सहा यर्ट होते. आमच्या बाजूचा कुटुंब रात्री उशिरा आलं. त्यामुळे तेव्हा फक्त हाय हलो झालं आणि मग कॅम्पफायर आमचं आम्ही करून झोपलो ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठवल्यावर पुन्हा त्यांना पाहिलं. आम्ही घरूनच न्याहारीच्या वस्तू नेल्या होत्या म्हणजे काही बनवायला नको. त्या दुसऱ्या कुटुंबाचं काहीतरी कुकिंग सुरु होत. थोड्या वेळाने बाजूचं एक यर्ट  रिकामी झालं होतं ते स्वच्छ करायला एक माणूस आला. त्याचं काम होत आलं तसं आमच्या शेजारच्या कुटुंबातल्या माणसाने त्याला तुला ब्रेकफास्ट हवा का म्हणून विचारलं. त्या माणसाने नाही म्हटलं. 

मला आमच्या शेजारच्या माणसाचं त्याला आठवणी अन्न द्यायला हवं हा विचार खूप आवडला. मग मी त्याला तसं म्हटलं. त्यावेळी माझ्याबरोबर माझा धाकटा मुलगा पण होता. मग त्याने माझ्या मुलाला विचारलं की मी फ्रेंच टोस्ट बनवला आहे, तुला हवा आहे का? मुलाने हो म्हटलं. त्यावेळी तो सहज म्हणाला की हा पाव मी स्वतः बनवला आहे. हे सांगताना तो इतका उत्तेजित झाला होता की मला ते जाणवलं.  मी एका बेकरीत काम करतो. पहाटे २ ते ८. हा तिथला फेमस सिनामन ब्रेड आहे. माझ्या मुलाला त्याची चव खूप आवडली आणि त्याने ते त्या माणसाला सांगितलं. हे ऐकल्यावर तर तो अजूनच खुश झाला. मग त्याने आम्हाला त्या बेकरीचा साधारण पत्तादेखील सांगितला. 
त्याला पाहून का कोणजाणे मला आमचा पाववाला आठवला. तो पण त्याचे ब्रेड बनवून मग विकायला आणत असे. आम्ही आवडीने पाव घेताना त्याचा चेहरा असा फुलायचा. मला अशी साधी माणसं भेटली की फार आनंद होतो. तसं पाहायला गेलं तर पहाटे दोन वाजता कामावर जायला लागणं हे काही मजेचं वाटत नाही पण त्याला ते येतं  ते तो किती आवडीने करतोय आणि त्याबद्दल अभिमानाने इतरांना सांगू शकतो हे मला भावलं. 
आता पुढच्या वेळी कधी सिनमन ब्रेड घेतला की मला हा पाववाला नक्की आठवेल. 

#AparnA #Followme


Wednesday, March 21, 2018

माझा आवडता पाळीव प्राणी

मुलं रविवारच्या मराठी शाळेला जाऊ लागली त्याचं हे तिसरं वर्ष.सुरुवातीच्या वर्षांत गृहपाठ होता पण तसा आपल्या भाषेत लल्लू-पंजू लिखाण. धाकट्याचा अजून तसा झेपणेबल आहे पण मोठ्यांचा अभ्यास म्हणजे भारतातल्या शाळेच्या तोडीला येईल (आणि त्यामुळे तो या शाळेला रामराम म्हणेल) या पातळीचा.
तर हा अभ्यास करताना ते वरचं कंसातलं वाक्य सार्थक होऊ नये म्हणून या मुलांच्याच भाषेत सांगायचं तर "फन" यावी असं काही शोधावं असं "माझिया मनाने" घेतलं. घेतलं म्हणजे त्यादिवशी  झालेल्या अभ्यास चर्चेत अचानक लक्षात आलं. 
आजकाल त्यांना माहिती लिहा या प्रश्नातर्गत सहा-सात वाक्ये लिहायची असतात. इथे लिहायचं म्हटलं की आमच्या कपाळावर आठी, डोक्यात कंटाळा वगैरे जंत्री झालेली असते आणि त्याच्याशी भाषेचा संबंध नाही. हाच अभ्यास संगणकावर असेल की बाह्या सरसावल्याचं. तर ते असो.
परवाचा विषय होता "माझा आवडता पाळीव प्राणी". आता मुदलात अभ्यास करायचा नसेल तर या वयातला मुलगा पहिलं जे येईल ते ठोकून देणार त्याप्रमाणे एक चिरकलेला सूर कानावर आला,
"आई, मला  पाळीव प्राणी आवडत नाही. त्यामुळे मी त्याच्यावर काही लिहिणार नाही."
आई: अरे पण तुलाच नाही का वाढदिवसाला मासा बक्षीस मिळाला म्हणून मोठ्या हौसेने तेव्हापासून आपल्याकडे फिश टॅंक आहे. प्राणी आवडत नाही काय? 
आरुष: तो प्राणी नाही आहे. प्राणी म्हणजे कुत्रा वगैरे. 
आई: पाळीव प्राण्यामध्ये मासा येतो. इंग्लीशमध्ये पेट आहे त्याचा अर्थ. आता मासा पण आवडत नाही का? मग का बरं मागच्या महिन्यात चार मासे मेले तेव्हा भोकाड पसरलं होतं?
आरुष: हा म्हणूनच. 
हे म्हणजे मीच हातात कोलीत दिल्यासारखं. आता त्या माशाच्या आठवणीने पुन्हा भोकाड वगैरेंच्या भानगडीत तो अभ्यास राहून जायला नको म्हणून मी विषय बदलणे भाग होतं. तेव्हा हा "फन"चा विचार माझ्या डोक्यात आला. आणि सहज म्हटलं तुला नाही आवडत प्राणी न? मग का नाही आवडत त्यावर लिही. आता समोर गोंधळ. म्हणजे इथे व्यक्तीस्वातंत्र्याच्या देशात आम्ही विषय दिला मग तुम्ही त्यावर काही लिहाच असा काही रूल नसावा असं मला वाटलं म्हणून मी त्या झेंड्याला मनात सलाम करून थोडी गंमत करावी म्हणून त्याला चल मी मदत करते आणि खालील माहिती फायनल केली. 

                                   माझा आवडता प्राणी 

मला प्राणी आवडत नाहीत. प्राण्यांमुळे आई-बाबांना सगळ्यात म्हणजे त्यांना विकत आणायला खूप पैसे द्यावे लागतात.  ते आजारी पडले की आणखी खर्च येतो. प्राण्यांचे केस वगैरे घरात पडले तर खूप साफसफाई पण करावी लागते. घरातल्या माणसांना ऍलर्जी होते आणि मग त्यांना पण डॉक्टरांचा खर्च येतो. आजकाल तर प्राण्यांना ऑरगॅनिक वगैरे महागडी जेवणं देऊन तिथेही खूप पैसे द्यावे लागतात. अशा प्रकारे खूप कामं वाढतात. म्हणून पाळीव प्राणी मला आवडत नाही. 

खरं तर हा निबंध अशा प्रकारे खूप वाढवता आला असता पण लिहिणारी व्यक्ती सात-आठ वाक्यांच्या पुढे आईला जाऊ देईना आणि शिवाय हसूही आवरेना म्हणून आम्ही शेवटी थांबलो. 



नंतर काही वेळाने "लिहा रे, लिहा रे" जा बराच वेळ गजर करून झाल्यावर स्वारी खरंच हा निबंध लिहिणार होती. पण आईने बरीच पटवापटवी करून शेवटी एका इमॅजिनरी मांजरीला हाताशी धरून तो गृहपाठ सार्थकी लावला. 

   


Thursday, April 6, 2017

ऐ मौत होगा तुझे भी फक्र अभी Thanks to the anonymous Organ Donor

मागच्या वर्षी जूनमध्ये खेळताना दुखावलेला गुढघा घेऊन नवरा घरी आला आणि हे प्रकरण कितपत त्रास देणार आहे याचा मी अंदाज घेत राहिले. तसं वरवर पाहताना तो ठीक होता पण आतले स्नायू पुन्हा नीट करणं भाग होतं. यथावकाश ती सर्जरी प्लॅन झाली.

मायाजालाच्या रूपाने जास्तीची माहिती घेऊन जेव्हा आम्ही शेवटी ऑपेरेशन रूममध्ये गेलो तेव्हा त्याच्यासाठी रोपण म्हणून स्वतःचा लिगामेंट किंवा एखाद्या डोनरचा लिगामेंट असे दोन पर्याय होते.

स्वतःचा लिगामेंट घेणे म्हणजे दुसऱ्या मांडीवरती जखम. आमच्यासाठी अशा परक्या देशात फारशी सपोर्ट सिस्टीम नसताना ही जास्तीची जखम महाग पडेल का असा विचार करून  आणि अर्थात आमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने आम्ही लगेच रोपण करायचा पर्याय निवडला. त्या अनामिक शक्तीवर विश्वास ठेवून मी एकीकडे काम करत राहिले आणि दुसरीकडे डॉक्टर त्यांचं काम करत राहिले. 

मला काहीवेळा या फ्री कंट्रीमध्ये तुम्हाला जरा जास्तच लवकर फ्रीडम देतात असं वाटतं. विशेष करून आजाराच्या बाबतीत. सगळी इन्शुरन्स नावाच्या मोठ्या आम्हा सध्या माणसांच्या आवाक्यात नसलेल्या राक्षसाची कृपा. तर आमचा पेंशट जागा झाल्यावर चला आता घरला जा अशी एकंदरीत तयारी दिसली आणि डिस्चार्ज पेपर देताना मला नर्सने एक लिफाफा दिला. 

कुणाचा तरी इहलोकाचा प्रवास संपला होता पण त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची शेवटची इच्छा म्हणा किंवा कदाचित स्वतःहून ऑर्गन डोनेशन केलं होतं. त्या कागदावर एका संस्थेच्या नावावर आपण आभार प्रदर्शनाचं कार्ड पाठवावं याची सोय केली होती. खरं हा भला आत्मा कोण आणि आम्ही हे दान स्वीकारणारे कोण हे आम्हा दोन कुटुंबाना कधीच कळणार नाही. पण हे आभार मला त्या कुटुंबालाच नाही तर माझ्यातर्फे आणखी काही जणांपर्यंत पोहोचवायचे आहेत. म्हणून हा पोस्ट प्रपंच. 

अवयवदानाविषयी समाज जागृत व्हावा म्हणून एक फिल्म निर्माण केली आहे; तिचं नाव आहे "फिर जिंदगी". यु ट्यूबवर संपूर्ण फिल्म उपलब्ध आहे. या लिंकवर ती नक्की पहा. मी ही फिल्म आई-बाबांबरोबर पहिली आणि नकळत बाबा म्हणून गेले की त्यांना देहदान करायची इच्छा आहे. मी चमकून आईकडे पाहिलं पण तिची यासाठी तयारी दिसली नाही. तर याबाबतीत कायद्याने कागदपत्र केली तरच ते निदान भारतात तरी शक्य आहे असं मला कळलं. बाबांचं माहित नाही पण माझं ऑर्गन डोनेशन मी माझं पहिलं ड्रायवर लायसन्स आलं तेव्हापासून करून ठेवलं आहे. आता नवऱ्यानेही त्याच्या लायसन्सला ते जोडलं आहे.

या चित्रपटाच्या आणि आमच्या अनुभवाने मला तरी याचा चित्रपटात एक वाक्य आहे ते पुन्हा इथे  टाकावंसं वाटतं ते म्हणजे हे असं एक दान आहे, मरणालादेखील अभिमान वाटेल. "ऐ मौत होगा तुझे भी फक्र अभी" चित्रपट नक्की पहा आणि या विषयाचा विचार करा.

मला आज या पोस्टच्या निमित्ताने त्या अनोळखी आत्म्याचे जाहीर आभार मानायचे आहेत. #AparnA

Wednesday, March 8, 2017

ती आणि मी

जसजसं वय वाढतंय तसतसं काम करायची शक्ती वाढावी म्हणून जमेल तसं जिममध्ये जायचा मी प्रयत्न करत असते. जेव्हा सकाळी कामावर लवकर उठून जावं लागे तेव्हा घरची जबाबदारी बाबावर टाकून अगदी सहा वाजतादेखील मी तिथे दाखल झाली आहे. अशावेळी जायचा मुख्य फायदा म्हणजे जवळजवळ कुणीच आलेलं नसतं. आपली गाण्याची प्लेलिस्ट मोठ्याने लावली तरी डोळे मोठे करणारं कुणी नसणार असतं. किंवा शांततेनं दिवसाची सुरुवातही करता येते.

माझ्या वेळेत थोडंफार इथं तिथं होई. पण बरेचदा माझं आटपेस्तो एक तीन चार जणींचा ग्रुप धावून परत लॉकर रूममध्ये मला भेटे. माझी त्यांची ओळख हाय हलोच्या पुढेही गेली. पाश्चात्य देशात लॉकररूममध्ये दिगम्बर अवस्थेत या ग्रुपला पाहताना मला खर तर आता नजर मेल्यामुळे म्हणा किंवा इतका व्यायाम केल्यावर थोडा वेळ असाही काढला म्हणून काय त्यात याची सवय झाली असल्यामुळे म्हणा काही गैर किंवा लाजिरवाणं वगैरे वाटत नाही. उलट आपल्या शरीराला इतकं आपलंसं म्हणून सहज वावरणाऱ्या या बायका मला  योग्य वाटतात.
माझ्याशी त्यांच्यातली एक नेहमी बोले. नेहमीचंच रुटीन बोलणं पण तिने मला तिथे त्या पाचेक मिनिटात एकटं पडू दिलं नाही. आम्ही सर्व त्या क्षणापुरता एकमेकींच्या मैत्रिणी होत असू. या मैत्रीला आणि आम्हाला नावाची गरज नसे.

मागच्या वर्षी मी मध्ये एक वेगळं जिम सुरु केलं होतं. तिथला योगाभ्यास मला आवडत असे फक्त हे जिम थोडं महाग होत आणि नंतर कॉस्ट कटिंगच्या आमच्या दिवसात आम्ही पुन्हा जुन्या जिमवर सेट झालो. तर तिथे एका योग करताना मला "ती" दिसली. साधारण ५५ च्या आसपास वय असेल पण शरीरयष्टी कमनीय आणि योग करतानाचा फिटनेसही अगदी बरोबर. आम्ही हसलो पण तिने नक्की मला ओळखलं का हे मला माहीत नव्हतं. तसंही येत जात कितीतरी अनोळखी व्यक्ती सहजगत्या हाय करून जातात म्हणा.

मग माझं ते जिम सुटलं आणि सकाळी जिमला जायची वेळी मी थोडी उशिरा केली म्हणजे मुलांबरोबर वेळ मिळेल. त्या दिवशी मी थोडी लवकर आणि "ती" थोडी उशिरा असा एक योगायोग आला. मग मी तिला त्या जुन्या जीबद्दल विचारून माझा जुना प्रश्न निकालात काढला. तिने मला तिथेही ओळखलं होत आणि तिनेही काटकसर करायच्या दिवसात ते जिम सोडून दिलं होतं. आज त्यांचा मोठा ग्रुप नव्हता आणि लॉकर रूममध्ये आम्ही दोघीच होतो.

तिला बोलताना दिगंबरावस्थेत जास्त मोकळं वाटत असावं त्यामुळे बोलता बोलता ती माझ्या जवळ आली आणि माझे डोळे एकदम उघडले. तिचे दोन्ही स्तन रोपण केलेले होते. जगाचं आणि बरेचदा स्त्रीचं सुद्धा ज्या अवयवामुळे जास्त लक्ष वेधलं असतं तिला ते नव्हतंच. ते स्वीकारून तिने ज्या उमेदीने बाकीच्या शरीराच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं होतं त्याला मी मनातल्या मनात सलाम केला.

याआधी या संपूर्ण गृपबद्दल वाटणारा अभिमान आज काकणभर जास्त वाढला. अशा कितीतरी स्त्रिया ब्रेस्ट कॅन्सरशी सामना करत असतील आणि तरी आपलं रोजचं रुटीन टिकवत असतील. त्यांनी शरीर झाकलं की आपण त्यांना नॉर्मलच समजून त्यांच्याशी वागतो, तुलना करतो. कधीतरी आपण कपड्याआतली त्यांची वेदना पहिली तर त्यांचे हसरे चेहरे आपल्याला बरंच काही शिकवून जातील.


आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त  "ती" आणि अशा अनेक स्त्रियांना माझे कोटी कोटी प्रणाम.
 

Wednesday, July 20, 2016

गुडबाय मॉसी पॅनकेक

मॉसी पॅनकेक हा माझी दोन्ही मुलं ज्या पाळणाघरात गेली, तिथे मागच्या मोठ्या यार्डात असणारा त्यांचा पेट ससुल्या. या पाळणाघरात महिन्याभराच्या बाळापासून पाच वर्षाच्या आतली येणारी मुलं त्यांचे वाढीचे टप्पे पूर्ण करून प्रिस्कूलमध्ये गेली की मग खऱ्या शाळेत केजीच्या वर्गात जायला तयार होईपर्यंत इकडे असतात. माझ्या धाकट्याचं इथलं हे शेवटचं वर्ष म्हणजे खरं सांगायचं तर ऑगस्टमध्ये आम्ही या सुंदर फॅसिलीटीलाच गुडबाय म्हणणार .मागे जानेवारीमध्ये ज्या फ्रोझन दिवसांचा उल्लेख झाला तेव्हा विंटर ब्रेकसाठी पाळणाघर बंद होतं आणि ती थंडी सहन न झाल्यामुळे मॉसी गेला. 

त्याच्यावर प्रेम करणाऱ्या छोट्या छोट्या मुलांना हे सत्य पचवण्यासाठी आधार देणाऱ्या आमच्या शिक्षकांची ही पोस्ट असं म्हटलं तर जास्त योग्य ठरेल. रोज त्यांच्याकडून येणाऱ्या इमेलमध्ये मी ही इमेल वाचली आणि हेलावून गेले. त्यांची परवानगी घेऊन आणि त्यांनीच दिलेले फोटो वापरून, त्यांनी केलेल्या डॉक्युमेंटेशनचा हा मराठी अनुवाद. यातलं माझा मुलगा ऋषांक हे नाव वगळता नावं आणि काही तपशील वगळला आहे. ही कहाणी शिक्षकांच्या शब्दात. 

८ जाने. २०१६
आमचा शाळेचा लाडका पेट मॉसी पॅनकेक मागच्या आठवड्यातली भयानक थंडी सहन करू शकला नाही. आज आम्ही मुलांना ही बातमी सांगितली आणि त्यांना काय झालं असेल त्याबद्दल चर्चा करायला वेळ दिला. आम्ही हा संवाद वर्गात असुरू केला आणि त्यांना काही सांगितले पण मुख्य करून आम्ही त्यांना काय म्हणायचं आहे ते ऐकलं. हा तो संवाद. 

शिक्षिका -  आम्हाला आज तुमच्याशी मॉसी पॅनकेकबद्दल काहीतरी बोलायचं आहे. 
बबलु -      तो मेला.  
ऋषांक -    तो मेला? 
शिक्षिका-    आपण  बाहेर त्याच्या घरी जाऊ या आणि त्याच्याबद्दल बोलुया. 
इला -        आपण आपली जर्नल्स घेऊन जायला हवं. 
रसेल-        मला वाटतं मॉसी पॅनकेक पिंजरा तोडून फेन्सवरून उडी मारून पळाला. 
चार्ली -       मग आपण त्याला शोधलं पाहिजे. 
शिक्षिका-    मुलानो आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की मॉसी पॅनकेक पळाला नाहीये. मुख्याध्यापिका बाईंनी त्याला पाहिलं आणि तो जिवंत नव्हता. 
इला-         तुला कसं माहित?
शिक्षिका-    तो त्याचे डोळे उघडत नव्हता, तो आता उड्या मारत नव्हता आणि तो काही खात-पीत नव्हता. 
रॉन-         तो खात नव्हता. 
सोनिका-    तो खात आणि पीत नव्हता. 
ऋषांक -   तो पुन्हा जिवंत होऊ शकेल का?
शिक्षिका-  जेव्हा कुणी मरून जातं आणि  खाणं बंद करतं, जेव्हा ते श्वास घेणं बंद करतात आणि हालचाल करत नाहीत, तेव्हा ते परत जिवंत होत नाहीत. 

त्यानंतर मुलांना आम्ही मॉसीचं रिकामी घर पाहायला बाहेर घेऊन गेलो. 

अनु -     तो कुठे गेला? तो हलत का नव्हता? तो मरून गेला होता का?
लॉय  -    जेव्हा तो श्वास घेत नव्हता तेव्हा तो कसा दिसत होता?
चार्ली -    मला मॉसीची काळजी वाटतेय. मला त्याची आठवण येतेय.
इला -     त्याला थंडी आवडत नाही. 
लॉय -    आपल्या बाईं कशा त्याला काढायला गेल्या?
रॉन -     मॉसी कुठे आहे? तो इथे का नाहीये?
ऋषांक -  मला वाटतं मॉसीला बर्फामुळे खूप थंडी वाजली. मला माहीत आहे थंडीमध्ये बर्फामुळे बनीजना खूप थंडी वाजते, ते बाहेर पडू शकत नाहीत आणि म्हणून ते मरून जातात. 
किरण -  मग आपण जसे गरम कपडे घालून बंडल अप करतो तसं ते का करत नाहीत?
एल्विन -  मला वाटतं मॉसी अंगावर बर्फ पडल्यामुळे मरून गेला. 
केंट -    मला वाटतं मॉसीच्या अंगावर तो राक्षस आला जो तुम्हाला श्वास घ्यायला देत नाही आणि तुमचं हृदय बंद पडतं. 
ऋषांक -  मला मॉसी परत जिवंत व्हायला हवा आहे. 

बाहेरून परत आल्यावर मुलांना त्यांच्या जर्नलमध्ये  मॉसीबद्दल काही न काही लिहायचे होते. कुणीतरी मॉसीसाठी चित्ररूपी गुडनाईट गाणं लिहिलं, कुणी तो जिवंत,आजारी आणि मरून गेलेला असा त्याचा जीवनप्रवास रेखाटला तर कुणी त्याला मुलं पाहायला जायची तेव्हा त्यांचा घोळका आणि त्यांच्याबरोबर एखादं मोठं माणूस  चित्र रेखाटलं. याचं एक प्रेझेंटेशन त्यादिवशीच्या इ-मेलने आम्हाला आलं. 






त्यादिवशी ऋषांक घरी आला आणि मी त्याच्याशी मॉसीबद्दल बोलले तेव्हा तो अगदीच भावूक झाला नाही असं नाही, पण त्याने ते स्वीकारलं होतं. मॉसी परत आला तर त्याला नक्की आवडलं असतं पण तो येणार नाही हे त्याला माहीत होतं. त्याने त्याच्या  मॉसीच्या आठवणी त्याला जमतील त्या भाषेत म्हणजे रेखाटनात त्याने व्यक्त केल्या, आपले शिक्षक,मित्र यांच्याबरोबर त्या आठवणी जागवल्या आणि त्यामुळे त्याचं मन मोकळं झालं होतं. 


इथे दिलेलं प्रत्येक चित्र कुठली आठवण सांगतं हे त्याला पक्क आठवतं आणि ते त्याने मला अगदी काल हा ड्राफ्ट पूर्ण करायचा म्हणून ही चित्र पुन्हा पाहताना त्याबद्दल सांगितलं देखील. मी आजवर कुठच्याही कारणाने जसजसे काही संपर्क गमवले त्यावेळी त्याबद्दलच्या जुन्या आठवणींमध्ये मी जास्त गुरफटले किंवा त्यातून बाहेर यायला मला जरा जास्तच वेळ लागला.  मॉसी  पॅनकेकच्या या घटनेकडे त्रयस्थ नजरेने पाहताना इतक्या लहान वयात त्यांच्या छोट्या मित्राला कायमचा निरोप देऊ शकण्याचं या मुलांचं धैर्य बघून त्यांचा एक प्रकारे हेवाच वाटतो.

Friday, May 27, 2016

एकमेका सहाय्य करू

आमची फार्मविलेची पोस्ट लिहिली त्यानंतर पुलाखालून बरचं पाणी वाहिलं. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या प्रकारे शेती करून पाहिली. प्रगती आहे पण तरी मागची काही वर्षे सीएसए शेयर घ्यावा असा विचार होता त्याला शेवटी यंदा मुहूर्त मिळाला. ज्यांना ठाऊक नाही त्यांच्यासाठी सीएसए म्हणजे community supported agriculture. एखाद्या लोकल शेतकऱ्याला आपल्या वाट्याचे पैसे देऊन त्याच्या शेतीतले पीक विकत घेता येतं. किती मोठे शेत आहे त्याप्रमाणे किती लोक  भाग घेऊ शकतात त्याचाहिशेब असतो. एकदा का शेतकऱ्याला आपलं पीक विकलं जायची पक्की खात्री झाली की त्याचाही शेतावर बारा-चौदा तास राबायचा उत्साह वाढत असेल आणि ताजी भाजी मिळायची खात्री असल्यामुळे ग्राहक पण खूश असा हा मामला. 

मागे एकदा शेजारणीने जवळच्या क्रेस्ट फार्मकडे असा CSA शेयर असतो याची कल्पना दिली होती. त्यांच्या मेलिंग लिस्टवरून त्यांचा शेयर उपलब्ध आहे ही मेल आल्यावर लगेच फोन करून माहिती काढली आणि चेक पोस्टाने पाठवायच्या ऐवजी स्वत:च जायचा  विचार केला. अर्थात या कामालाही आज जाते, उद्या नक्की होत होतं आणि बहुतेक पोस्टानेच चेक पाठवायला लागणार होता. तेवढ्यात परवा थोडा वेळ मिळाला आणि एक चक्कर शेतावर मारली. 

माझं फोनवर बोलणं झालं होतं जॉन बरोबर त्यामुळे तिथे तोच असेल असा मी विचार केला होता. पण खरं तर मला एक घर आणि त्यामागची शेती, तिथला कम्पोस्ट खताचा भाग आला तरी कुणी दिसत नव्हतं. तिथे उजवीकडे काही रोपं दिसत कुंपणापलीकडे एक स्त्री काम करत होती तिला मी हा चेक कोणाला देऊ म्हणून विचारायला गेले आणि माझी ओळख झाली एमी बरोबर. एमी या वर्षी CSA ची ही शेती करणार होती. म्हणजे तिनं ओळख करून दिली त्याप्रमाणे "I am the farmer this year". 

माझ्याकडे वेळ आहे का विचारून तिने मला तिची शेती दाखवायची तयारी दाखवली.मला नाही म्हणावसं वाटलं नाही. शेतावरच्या पहिल्या भाज्या घ्यायला २ जूनला यायचं आहें. आमच्याकडे तसं अजून गरम नाही झालय पण एमीच्या शेतावरच्या ग्रीन हाउस मध्ये गाजर बऱ्यापैकी झाले होते. आणखी काही रोप बऱ्यापैकी मोठी झाली होती. मी सहज विचारल्यावर कळलं की एमी फेब्रुवारीतल्या थंडीपासून या रोपांसाठी करतेय. मग बाहेरची शेती पाहीली. त्यातही कांदे,केल,टोमेटो,बटाटा,मुळा, काकडी, कोबी अशी भरपूर विविधता होती. एक सोरेल नावाची मला माहित नसलेली पालेभाजी दाखवताना ती लावायचं कारण म्हणजे तिची एक ग्राहक रशियन आहे आणि रशियन जेवणात ती भाजी वापरली जाते असं एमी म्हणाली.  कोथिंबीर लावता का हे त्याच विषयावरून विचारून घेतलं तेव्हा माझ्यासाठी नक्की लावेन असंही ती म्हणाली. 

आमचा संवाद  असाच सुरु राहिला असता पण मला निघायचं होतं. ती स्वतः कामात होतीच. जाता जाता शुक्रवारी शेतात स्वयंसेवक म्हणून काम करता येईल ही माहिती पुरवायला ती विसरली नाही. 

ही पोस्ट लिहिताना, ही शेतातलं धान्य खरेदी करून शेतकऱ्याला त्याचा माल विकायची आधी विकायची खात्री द्यायची पद्धत पाहता नकळत माझ्या मनात आपले शेतकरी आलेच. कदाचित प्रत्येक प्रकारच्या शेतीला हा फॉर्मुला लागू होणार नाही पण असा प्रयोग करून पाहायला हरकत नसावी. माझ्यासारख्या लोकांनी तंत्रज्ञ म्हणून ढीग काम केलं तरी आमची पोटं भरायला शेतकऱ्याने शेतात राबलं नाही तर सगळं व्यर्थ आहे, ही जाणीव जेव्हा तीव्र होईल तेव्हा तरी असे "एकमेका सहाय्य करू" सेतू उभे राहावेत. तूर्तास, त्या दिवशी निघता निघता आमच्या शेतकरणीने दिलेला ताजा मुळ्याचा गड्डा आणि थोडी फुलं :)          



Monday, December 28, 2015

गाणी आणि आठवणी २०- Carol of the Bells

माझं शालेय जीवन वसईमध्ये गेल्यामुळे ख्रिसमस काही माझ्यासाठी अमेरिका किंवा कुठल्याही देशामुळे माहित व्हावा अशातली बाब नाही. माझ्या शाळेतल्या असंख्य मैत्रीणी आणि माझ्याच नाही तर माझ्या ताईच्या देखील मैत्रिणीही ख्रिश्चन असल्यामुळे या सगळ्यांकडे जर २५ तारखेला गेलो नाही तर मोठाच अपराध असे. त्यांचे केक आणि काही बेकिंग गुडीज सोडले तर बाकी सगळं पदार्थाचं आपण दिवाळीत फ़राळाचं करतो त्यातलेच असत. आम्हाला शाळेला १० दिवस सुट्टी असे. त्यामुळे या सगळ्यांच्या घरी जाणे, त्यांनी केलेले गोठे पाहणे वगैरेमध्ये कॅलेंडर कधी बदललं कळतही नसे. त्यांच्याकडे सँटा येतो असं काहीसं ऐकून होते. याच्याशी मात्र आमचा फार परिचय नव्हता. तो २४ तारखेच्या रात्री प्रत्येक मुलाला काही तरी भेटवस्तू, खेळणी देत असतो इतकी ऐकीव माहिती फक्त.

अर्थात ख्रिसमस माहित असला, थोडाफार सांता ठाऊक असला तरी ख्रिसमस कॅरोल, हे प्रकरण मला फारसं माहित नव्हतं. त्यासाठी मात्र देशाची सीमा ओलांडावी लागली. आमचे पहिले काही ख्रिसमस, इकडच्या थंडीशी जुळवून घेण्यात गेले तरी एके वर्षी म्हणजे नक्की सांगायचं तर आरुष पोटात असताना डिसेंबरमध्ये फ्लोरिडाच्या डिस्नेला गेलो होतो, तेव्हा या सणाचा सामुहिक उत्साह पहिल्यांदीच दिसला. डिस्नेमध्ये काय संपूर्ण डिसेंबर ख्रिसमस साजरा केला जातो. आपण जशी लहानपणी "दिन दिन दिवाळी","विठूचा गजर हरिनामाचा" म्हणतो तशी इथल्या लोकांच्या तोंडावर लहानपणापासून "रूडॉल्फ द रेड नोज", "वी विश यु अ मेरी क्रिसमस", "द ट्वेल्व्ह डेज ऑफ क्रिसमस", वगैरे कॅरोल्स रूळलेली असतात.
संगीताला भाषा नसते असं म्हणतात; इथे तर मला कळणारी भाषा होती त्यामुळे तिकडे डिस्नेला सर्व लोकांना स्पीकरवर लावलेल्या या क्रिसमस कॅरोल्स बरोबर सोबतीने गाताना पाहून मला फार उत्सुकता निर्माण झाली. पुन्हा केव्हातरी या कॅरोलचा शोध घेऊ असा मी तेव्हापासून विचार करत होते. मुलं इकडच्या पाळणाघरात जायला लागली तशी क्रिसमस कॅरोल्स काय, हळूहळू, या हॉलिडे टाईमनेच आमच्या घरात प्रवेश केलाच.
तरीदेखील सायबेरीयन ट्रान्स मी नक्की केव्हा ऐकलं सांगता येणार नाही. 

मला ट्रान्स म्युझिक फार कळतं किंवा नोटेशन्स वगैरे फॉलो करता येतात असं नाही. अगदी या पोस्टपुरता सांगायचं तर मला यातल्या सुरावटींवर  लिहिताही  येणार नाही. पियानो मंद्र  सप्तकात सुरु होऊन बाजूला व्हायोलिन आपल्याला डोलायला लावते, त्या डोलण्यात क्षणभर झुलावं, तोच अतिप्रचंड वेगाने धबधबा कोसळावा तसे सगळ्याच वाद्यांचे सूर तुम्हाला अचंबित करतात. सगळा ऑर्केस्ट्रा तुमच्यासमोर एक नाट्य सादर करतो. या नाट्याचं कथानक आपलं आपणच लिहायचं, एकट्यानेच या मैफिलीचा आस्वाद घ्यायचा आणि त्यात स्वतःला इतकं झोकून द्यायचं की मनातला कल्लोळ, गोंधळ ही सुरावट संपताना शांत व्हावी.
गेली कित्येक वर्षे डिसेंबरच्या उत्तर अमेरिकेतल्या थंडीत, मन कोसो मैल दूर माझ्या आप्तस्वकीयांच्या बरोबर असतं तेव्हा तेव्हा मी हे गाणं ऐकते. यु-ट्यूब वगैरे नव्हतं तेव्हा इकडच्या हॉलिडे रेडिओवर ते हमखास वाजे. यात मध्ये मध्ये वाजणाऱ्या घंटा जशी सुरावट बदलतात त्याबरोबर  मनातल्या कथानकात अधिक-उणे होतं. शेवटाला त्यांची लय संथ होत जाते जाते आणि आपण शांत होतो. 

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला वेगवेगळ्या किनारी असतात. त्यात काही सुखाच्या भरजरी तर काही दु:खाची काजळी ल्यालेल्या. माझ्याही आयुष्यातली अशी एक काळी किनार दुर्दैवाने ख्रिसमसशी संबधीत. जीवलग मित्र-मैत्रिणीकडेही त्या घटनेचा उल्लेख करणं मी टाळते. पण तरी ती घटना मी किंवा माझे कुटुंबीय विसरूच शकणार नाहीत. आमच्या सर्वांच्याच आयुष्यातले संदर्भ बदलले, त्या एका प्रसंगामुळे. जर नियती वगैरे कुणी कुठे असेल तर ती एक तर झूठ आहे किंवा ती फार क्रूर आहे. हा तो कोणी सँटा वगैरे आहे तो लहान मुलांना खेळणी देत असेल पण आमच्याकडच्या एका छोट्या बबडूकडून तोच काहीतरी घेऊन गेला, असे सगळे तिरपागडे विचार मनात घेऊन सुन्न बसलेलो आम्ही, एका तपाहून अधिक काळ उलटून गेला तरी नियतीला ते परत द्यायला जमलं नाही, जमणारही नाही हे आम्हाला माहित आहे. 

मी फोन करते, आई म्हणते "तुला आजचा दिवस माहित आहेच." मी हुंदका दाबून "हम्म" करून प्रत्यक्ष उल्लेख न करता आम्ही काही बाही बोलत राहतो. कठीण असतं नं काहीवेळा "मूव्ह ऑन" होणं. माझ्यासाठी तर आणखी कठीण कारण आता गेले काही वर्षे माझ्या मुलांचा सँटा व्ह्यायची जबाबदारी आम्हा दोघांची आहे. अगदी मनापासून सांगते, मी त्या ख्रिसमस नतंर जेवढा सँटा या प्राण्याचा दुस्वास दरवर्षी केला, तेवढा मला त्याबद्दल ऐकीव माहिती होती, तेव्हा तो माझ्यालेखी तसा अस्तिवातही नव्हता. अर्थात हे सगळं घडतं त्याच्याशी कुठल्याही सँटा, देव या संकल्पनाना जोडणं हा मूर्खपणा आहे न कळण्याइतकी मी दुधखुळी नाहीये.पण सध्या जोवर ही मुलं विश्वास ठेवताहेत तोवर माझ्यासाठी हा सँटा बनण्याचा आतापर्यंतचा कठीण जॉब मला  करावा लागेल. मनातली आंदोलनं कमी होतील  का ते माहित नाही,  आनंद तरीही दाखवावा लागेल. अशा कठीण दिवसांमध्ये साथीला असेल ट्रान्स सायबेरीयनची ही धून.    


ही पोस्ट खरं यावेळचा सँटा जॉब करत असतानाच लिहायला घेतली आणि ब्लॉगवर टाकेपर्यंत नाताळ संपलाच आहे. २०१५ चा आढावा वगैरे घेऊन याच वर्षात पोस्ट होईल याची  काही शाश्वती वाटत नाही तेव्हा भेटूया २०१६ मध्ये. शुभेच्छा :)