नवीन वर्ष ओरेगावात उजाडलं तेव्हा आम्ही सुशेगात कुणाच्या तरी दर्याकिनाऱ्याच्या (भाड्याच्या) बंगल्यात मित्रमंडळींसोबत थंडीतला सुर्याचा थोडाफार उबारा अनुभवत होतो. तसं पाहिलं तर एकदा का सप्टेंबरचा पहिला आठवडा गेला की जून किंवा जुलैपर्यंत अनऑफिशियली इकडे हिवाळाच आणि तोही संततधार पावसाचा चिल्ड विंटर. पण नेमकं कोस्टल वेदर सनी असण्याचा फायदा आम्हाला घेता आला.
दृष्ट लागणारे सुर्यास्त पाहून १ तारखेला रात्री घरी पोहोचलो आणि रविवारी जिमला जायला दरवाजा उघडला तोच बर्फाची चादर. तसंही सुट्टीवरून आल्याआल्या बाहेर जायचा फार उत्साह होताच असंही नाही आणि हे निमित्त मिळालं.
त्यानंतर सोमवारी शाळा बंद आणि मंगळवारी निसरडे रस्ते म्हणून शाळा उशीराने उघडणे वगैरे प्रकारात २०१६ अगदी वाजत गाजत आलं असं म्हणायला हरकत नाही. मागच्या आठवड्यात आमच्या पूर्वीच्या मुक्कामी "जोनास" येउन गेला त्यापुढे इकडे खरं तर अगदीच फुटकळ बर्फ म्हणायचा पण यावेळी जरा विंटर ब्रेकमुळे मुरलेला निवांतपणा असल्यामुळे असेल थोडा निसर्गाचा आनंद जास्तच लुटला. दोन दिवस आमचाही गाव फ्रोजन होता त्यातली काही क्षणचित्रे.
या अशा हवामानाला चहाची जोड तर हवीच. याच सुट्टीत आपुलकीने घरी येऊन गेलेल्या मैत्रीची आठवण या कपमध्ये मावेल का बरं :)
थंडगार पोस्ट...मज्जा आली...
ReplyDeleteआभार शिनु :)
Deleteजास्त थंड होईल म्हणून चहा पण ठेवला आहे ;)