Tuesday, November 2, 2010

दिन दिन दिवाळी

अरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला) असतो नुसता. देवळं वगैरे आहेत पण आमच्या फिलीची मजा नाही. अर्थात इथल्या माउंट हूडची मजा काही और आहे हे मात्र खरं. लॉंग ड्राईव्हवर जाताना उजवीकडे हा असा माउंट हूड आणि रेडिओवर 'रिमझिम गिरे सावन'.. वा क्या बात है. सोबत कांद्याची भजी मिळाली की झालीच मग खरीखुरी दिवाळी. असो.




काय म्हणता वाचल्यासारखं वाटतंय?? हो म्हणजे वटवटराव आपलं तोंड बंद ठेवणार नाहीत हे माहित होतं मला, पण इतकं सांगुन सवरुनही शेवटी फ़राळाचं ताट आणि एक छोटासा संदेश विसरलाच म्हणून मग पुन्हा एकदा स्वतःकडे श्रेय लाटून मीही सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतेच कशी...आणि त्याने म्हटल्याप्रमाणे नमनाचं तेल वाहायला लागायच्या आतच पळते....:)

यावर्षीचा फ़राळ आईने अगदी मला वेळेवर पोहोचेल असा पाठवला. त्यामुळे मी स्वतः काहीही करणार नाहीये हे सु.वा.सांगणे नको...तसंही सासरहूनही फ़राळ निघालाय आणि तोही पोहोचेलच..
 
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

19 comments:

  1. Faral baghun tondala pani sutale :)
    Tula pan diwalichya shubhechha

    Aaj dhanatrayodashi aahe - Ghari jaun pantya lavaychya aahet aajpasun :))

    ReplyDelete
  2. पोस्ट वाचायाच्या आधीच फराळ दिसला...लवकर पाठव :)

    तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा :)

    ReplyDelete
  3. दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा !!

    ReplyDelete
  4. ही दिपावली तुम्हाला सुख समृध्दीची जावो हीच शुभेच्छा.

    ReplyDelete
  5. अपर्णा... तुला, दिनेश आणि माझ्या-शमीच्या लाडक्या आरुषला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... मस्त खाऊ पोचलाय मज्जा आहे तुझी.. (खरेतर तर त्यांची)

    हेरंबने भारीच लिहिली आहे पोस्ट... :)

    ReplyDelete
  6. आपणास आपले कुटुंबिय यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

    ReplyDelete
  7. संदेश विसरलो? काहीही हां उगाच.. मी तुला सांगितलं होतं की मला दुप्पट फराळ मिळाला नाही तर मी संदेश देणार नाही..

    तू फराळ दिला नाहीस मी संदेश दिला नाही ;)

    हेहे.. दिवाळीच्या भर्पूर भर्पूर शुभेच्छा !!!

    ReplyDelete
  8. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  9. सर्वांचेच आभार आणि पुन्हा एकदा शुभेच्छा...

    ReplyDelete
  10. दिवाळीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा !

    ReplyDelete
  11. आमच्या शुभेच्छा थोड्या उशिरानं!!! :D:D...
    तुझ्या ब्लॉगचा फीड येत नाही! काहीतरी कर गं!!

    ReplyDelete
  12. धन्यवाद शार्दुल आणि बाबा....
    बाबा, तुला अस वाटत का की आळशी ब्लॉगचे updates पण उशीरा जातात....रच्याक हे मी कसं तपासू ते पण सांग न भौ...")

    ReplyDelete
  13. माझ्या शुभेच्छा खूपच उशीराने. पण हरकत नाही. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुला, तुझ्या घरच्यांना, तुझ्या नातेवईकांना, तुझ्या मित्रमैत्रिणींना आणि तुझ्या हितचिंतकांना. :-)

    आणि उशिरा शुभेच्छा देण्याचं कारण विद्याधरने सांगितलं तेच आहे. इमेल सब्स्क्रिप्शन नाही तुझ्या ब्लॉगवर आणि गूगल रीडरमध्ये अपडेट्स दिसत नाहीत तुझ्या ब्लॉगचे. कुछ करो दया कुछ करो...

    ReplyDelete
  14. धन्यवाद संकेत....अरे तसही दिवाळी देव दिवाळी पर्यंत असतेच की.....
    पण तुमी ते बोल्ताव त्यावर आता काय तरी कराव लागल बगा....म्हंजी आमची ती लाईन न्हव पर रस्ता शोधाव लागल....तोस्तर तुमी आमच्या भक्तगनात हायसं तर ब्लोग्गर मध्ये जाऊनशान या की इकड वाचयला.....

    ReplyDelete
  15. उशीर झालाय, पण तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळीची व्हॅलिडीटी असते असं समजून, तुलाही अनेक अनेक शुभेच्छा!!
    (BTW,डिश काय मस्त आहे गं..)

    ReplyDelete
  16. मीनल आभारी...डिश म्हणजे ती पानासारखी डिझाईन आवडली असेल तर ते श्रेय इथे वसंतात पानगळती जोरात असते तेव्हा अश्या काही वस्तू मिळतात...माझ्या एका मैत्रिणीने मी मागे घर नवीन असताना बोलावलं होत तेव्हा आणल्या होत्या....आणि आतला खाऊ म्हणशील तर सगळा आईने पाठवला होता...त्यामुळे श्रेय या दोघीपैकी एकीला (किंवा दोघींना) दिलेलं बर...
    मी म्हणजे फक्त वापरायच्या वेळी निमित्त केवळ...

    ReplyDelete
  17. तुळशीच्या लग्नापर्यंत व्हॅलिडीटीचा मी सुद्धा उपयोग करून घेतो... दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा...
    मीनलला फराळ सोडून प्लेटही दिसली, सहीये ब्वा!

    ReplyDelete
  18. आनंद, मीनलला दिसलेली प्लेट पहातोयस पण तुला सगळ्यात कंसातला तू दिसला का?? :)

    ReplyDelete
  19. बाबा आणि संकेत जर तुम्ही अजून हा प्रतिक्रिया धागा वाचत असाल तर ते इ मेल सबस्क्रीप्शन सुरु केलय..गुगलबाबांचा काही गुंता झाला होता..

    see you then...:)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.