कोई ये कैसे बताये के वो तनहा क्यों हैं..
वो जो अपना था, वो किसी और का क्यों हैं..
यही दुनिया है तो फ़िर ऐसि ये दुनिया क्यों हैं..
यही होता है तो आखिर यही होता क्यों हैं.....
भावनांचा कल्लोळ व्ह्यायचं एक वय असतं आणि त्या वयात ते सगळं नीट समजतही नसतं...अशा वेळी एक मित्र लागतो....या भावनांना वाट करून द्यायला आणि त्याच वेळी तो सारा कल्लोळ शांत करायला...माझा आणि माझ्या सारख्या अनेक मित्र मैत्रिणीचा त्याच्यापेक्षा वयाने बराच मोठा असलेला मित्र.....त्याला एकेरीने हाक मारायची सवलत आम्हाला त्याच्या गाण्यांनी दिली....लोक त्या गाण्यांना गझल म्हणतात आमच्यासाठी मात्र तो आणि त्याची गाणी म्हणजे एक मोठाच आधार ....भावनांना वाट करून द्यायला...त्या समजून घ्यायला...
तू अपने दिल की जवां धडकनों को गीन के बता
मेरी तरह तेरा दिल बेकरार है के नहीं........
हे ऐकलं की वाटतं आपल्यासारखंच कासावीस कुणीतरी होतंय...त्याच्या गाण्यातलं मार्दव, आवाजातला तलमपणा आपल्यालाही हळवं करतो...
"क्या गम है जिस को छिपा रहे हो", असं त्याने म्हटलं की आपण खोटं हसुन आणून साजरे केलेले क्षण आठवतात....आपल्याला मानसिक आधार द्यायला त्याची गाणी पुरेशी असतात म्हटलं तर वावगं ठरु नये..तसंही विश्वासाने सगळं सर्वांना सांगायलाच हवं का?
"जिंदगी धूप तुम घना छाया" आणि "जग ने छिना मुझसे मुझे जो भी लगा प्यारा" हे सांगायला तोच हवा.....
....त्यासाठी आपण प्रेमातच पडायला हवं असं नाही..त्या अडनिड्या वयात काय आवडेल आणि ते आपल्यापासुन हिरावेल काही निश्चित नसतं..पण त्या भावनेला या मित्राच्या शब्दाने दिलेला आधार मात्र सच्चा असतो....
पण मग अचानक " जानेवालों के लिए दिल नहीं तोडा करते...वक्त की शाख से लम्हें नहीं जोडा करते..." असं का बरं म्हटलं त्याने.....माहित नाही हे लम्हे जोडना वगैरे होतं का?? पण आजची बातमी वाचुन माझं मात्र एक फ़ार फ़ार जुना मित्र, नेहमी भावनिक बळ द्यायला ज्याचा आवाज ऐकायची सवय होती तो गेला..शरीराने...त्याच्या गाण्याचा आधार इथेच तसाच ठेऊन.......त्याच्यासाठी हळवं व्ह्यायलाही त्याचेच शब्द लागतात....डोळ्यांना धार लागलीय हे लिहितानाही...
"आखों मे जल रहा है क्यों बुझता नहीं धुआं...
उठता तो है घटासा पर बरसता नहीं धुआं......."
आजकाल माझ्या मुलांना खेळताना पाहताना त्याच्या सहधर्मचारिणीबरोबरचं एक गाणं कायम मनात वाजायचं...
"ये दौलत भी लेलो, ये शोहरत भी लेलो
भले छीनलो मुझसे मेरी जवानी
मगर मुझको लौटादो बचपन का सावन
वो कागज की कश्ती वो बारीश का पानी.........."
मित्रा, कसं काय जमतं रे तुला वयाच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे साथ द्यायला...खरंच सांगते, मला नाही वाटत माझ्या या मित्राला मी भूतकाळात संबोधणार आहे...कारण मला खात्री आहे त्याच्या गाण्यांनी जितका माझ्या भूतकाळाला आधार दिला, तितकाच तो माझ्या वर्तमानाला आहे आणि भविष्यालाही राहील.......आणि माझ्यासारखेच त्याचे अनेक मित्र-मैत्रीणी हे नक्कीच मान्य करतील.....
माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट तू ह्या पोस्टमध्ये उतरवली आहेस. खरंच "कागज की कश्ती" असो वा "फिर नजर से पिला दिजीये" किंवा "जण गण मन", प्रत्येक मूडसाठी जगजितकडे गाणे होते.
ReplyDeleteगाण्यामधले फार काही न् कळणाऱ्या मला गजलची ओळख जगजितमुळेच झाली आणि शेवटपर्यंत गजल म्हणजे जगजितच असेल.
>>>>आणि शेवटपर्यंत गजल म्हणजे जगजितच असेल.
ReplyDeleteअगदी अगदी!!!!
कालपासून तो धीरगंभीर आवाज कानात घुमतोय नुसता...
सख्खं कोणितरी हरवल्यासारखं का वाटतय ताचं उत्तर तुझ्या या पोस्टने मिळालं बघ!!!
अपर्णा...मी जास्त काही लिहिणार नाही.शब्दच नाहित खरे म्हणजे...पण एव्हढ मात्र सांगीन..खुप सुंदर लिहिले आहेस.
ReplyDeleteVery true... :) all those gazhals are integral part of our life. Even though no is our, just listening to them feels like someone is there...
ReplyDeleteत्यादिवशी स्टीव्ह जॉब्स आणि आता जगजित.... अगदी कोणीतरी जवळच गेल्यागत हळहळतोय!
ReplyDelete"हम कोई वक्त नहीं है हमदम, जब बुलाओगे चले आयेंगे" हे त्याने गायलेलं खरं व्हावं असं वाटतयं.......
जिस्म की बात नहीं थी, उनके रुह तक जाना था! लम्बी दूरी तय करनेमें वक्त तो लगता है!........
सिद्धार्थ, प्रत्येक मूडसाठी जगजीतकडे गाणं होतं हे अगदी खरय...बाकी त्याच्या गाण्यांमुळे जोडलेले आपण सर्व त्यामुळे ही पोस्ट आपल्या साऱ्यांच्या मनातली आहे...
ReplyDeleteतन्वी, आपला आणखी एक कॉमन मित्र ग म्हणून ही भावना..
ReplyDeleteमाऊ काल खूप जास्त बेचैन होते ग...हे लिहिलं आणि थोड स्वत:ला समजावलं..
ReplyDeleteKishore, I was thinking about the same when I was writing about him.....Thanks for your comment.it means a lot...
ReplyDeleteदिपू, अगदी मनातलं लिहिलंस बघ... स्टीव्ह काय किंवा जगजीत खरच कोण असतात ही माणसं आपली? पण जेव्हा ती जातात फार उदास व्ह्यायला होतं...
ReplyDeleteमलाही वाटतं की "जब बुलाओगे चाले आयेंगे" खर व्हावं पण आता ते गाण्यातच .....
'गजल'जीत सिंग, वुई विल मिस यु :((
ReplyDelete'गजल'जीत सिंग well said Heramb...We are going to miss him ...a lot....:(
ReplyDeleteNot "well said Heramb".. Say "well said Guljar" ..
ReplyDeleteThanks for correcting....लगता है अभी भी आंख में नमी सी है....आज फ़िर उनकी कमी सी है......:(
ReplyDeleteअपर्णा खूप सुंदर लिहिले आहेस....जगजीतसिंग जी ह्यांचा आवाज आपण कधीच विसरू शकत नाही..ते नसले तरीही त्यांचा आवाज हा शाश्वत आहे...चिरंजीवी..आणि सर्वांना तो नेहमीच साथ करेल!
ReplyDeleteअगदी खरंय गं श्रिया..
ReplyDelete>> त्यांचा आवाज हा शाश्वत आहे...चिरंजीवी..आणि सर्वांना तो नेहमीच साथ करेल +++++