Tuesday, October 4, 2011

भोर


बाजूच्या बिल्डींगमध्ये तळाला राहणाऱ्या एका जोडप्याकडे एक काळाभोर कुत्रा आहे...काळाभोर म्हणजे इतका भोर की एक पांढरा केस निघाला तरी पैसा वापस...म्हणायला आम्ही त्या जोडप्याशी तोंडभरून हसतो. त्या दिवशी चक्क दोघं (फॉर चेंज कुत्र्याविना) रोज गार्डनमध्ये गेलो होतो तिथं  हातात हात घालून दिसले. 'मध्ये मध्ये कुत्र्याशिवाय पण फिरत जा ...एकत्र , हातात हात घालून छान दिसता' असं सांगावसं पण वाटलं होतं पण  तेव्हा सरळ  "मौसम" (पिक्चर नाही..आपल वेदर) या  विषयावर  चर्चा  केली..आणि त्यात त्याने आजचा (म्हणजे  ते भेटले तो ) शेवटचा चांगला दिवस म्हणून बातमीपण दिली त्यामुळे गुलाब पाहून बाहेर पडलो होतो तो चांगला झालेला मूड पण अंधारला...
अंधाराला तो असा की आता ही पोस्ट लिहेपर्यंत अंधारूनच आहे...(मनात नाही बाहेर...खर खर...) त्याचे दुष्परिणाम आजकाल लगेच सर्दी आणि खोकल्याच्या रूपाने बाहेरही पडतात...पण तरी आज जरा हिय्या करून थोड बर वाटावं म्हणून जिममधल्या यंत्रांना व्यायाम द्यायचं ठरवत होते...आधी इतकी मोठी दरी झालीय की एक एक गात्र जागं करेपर्यंत बराच वेळ गेला...शेवटी एकदाचे शूज बाहेर काढले तोच तो काळभोर..त्याला नुस्त "भोर" म्हटलं तर बर...
खिडकीतून खाली पाहिलं तर भोर मोकाट दिसला...आणि त्याच्या दोन मिंट मागे मालक  हातात पट्टा घेऊन....भोरला मी जाम टरकून आहे आणि हे त्याच्या मालकाला स्वच्छ सांगितलंही आहे..आणि त्याला मान देऊन मी कधी काळी दिसले तर तो भोरला लगेच पट्ट्यात टाकतोही..(आणि मनात या भागूबाईला भरपूर हसतही असेल..हसो...हसतील त्याचे दात दिसतील..)
खर म्हणजे ऑफिशीयली  आमच्याकडे कुत्रा पट्टा काढून फिरवायला बंदी आहे पण कधी कधी काही लोक अशी कुत्र्याच्या आसपास असताना सोडतात त्यांना...(आणि आमच्यासारख्यांना टरकवतात ) 
आता  भोर समोर आहे तरी यावेळी खाली उतरा, पळापळी..त्याच्या मालकाला त्याला बांधायला लावा इतकी सगळी डोकेफोडी करण्यापेक्षा मी सरळ पुन्हा सगळ्या गात्रांना स्लीप मोडमध्ये टाकून (खर ती आधीच गेली होती वाटतं)  तो वेळ एक ब्लॉग पोस्ट टायपून वेळेचा सदुपयोग करतेय...काही नाही तर थोडा बोटांचा व्यायाम...:)

19 comments:

  1. भोरच्या भीतीने ब-याच कॅलरी खर्च झाल्या .. म्हणजे व्यायाम झाल्यात जमा म्हणायचा :-)

    ReplyDelete
  2. अपर्णा, असाच बोटांचा व्यायाम वरचेवर कर ग ... आणि फोटू टाक ना त्या भोराचा :)

    ReplyDelete
  3. चला बोटांना तरी व्यायाम मिळाला ... :)

    ReplyDelete
  4. चला बोटांना तरी व्यायाम मिळाला ... :)

    ReplyDelete
  5. You have an awesome blog! I'm going to enjoy reading it.

    India is a land of many festivals, known global for its traditions, rituals, fairs and festivals. A few snaps dont belong to India, there's much more to India than this...!!!.
    visit here for India

    ReplyDelete
  6. भीतीच्या कॅलरी खरच मोजायला हव्यात सविता....ते म्हणतात न आठवड्यातून निदान तीन दिवस व्यायाम करा तितका तर होतोच....
    भोराचा घोर...कस वाटतय...:)

    ReplyDelete
  7. हा हा गौरी ..लुक हु इज टाकिंग ...

    अग त्याच्या फोटुच लक्षात आलं होतं पण त्ये ब्येन आक्षी घोड्यावानी पळतं बग सोडलं की...तरी पण बघते कधी खिडकीतून जमलं तर काढीन...
    stay tuned..:)

    ReplyDelete
  8. पटलं न देवेन...अपुन को व्यायाम से मतबल ....:)

    ReplyDelete
  9. Thanks unlucky..(what a name...:( )

    welcome n keep reading...(no advertising next time...:D)

    ReplyDelete
  10. No advt. next time until you pay $20 :) असं म्हण हवं तर ;)

    ReplyDelete
  11. हा हा हा आनंद
    well said...lets make it 100...:)

    ReplyDelete
  12. झक्कास...

    मला आधी ते पुण्याजवळचं भोर वाटलं ;)

    ReplyDelete
  13. आभारी हेरंब माझ्या पुण्याबद्दलच्या ज्ञानात भर(चुकून भोर लिहिणार होते...) घातल्याबद्दल..

    ReplyDelete
  14. बोटाला व्यायाम झाला! असाच वरचेवर करत रहा.. :)

    ReplyDelete
  15. काका नक्की प्रयत्न करेन..आभारी..:)

    ReplyDelete
  16. थोडक्यात काय तर काळी मांजर असो वा काळा कुत्रा, कुठलाही काळा प्राणी आडवा गेला की कामे होत नाहीत... :D

    ReplyDelete
  17. सिद्धू, जाम हसतेय मी तुझी कमेंट वाचून...धन्य तुझं निरीक्षण...:D :D

    ReplyDelete
  18. Replies
    1. आहे की नाही मज्जा पल्लवी? आजकाल माझी मुलं आम्ही कुत्रा पाळावा म्हनून पटवायचा प्रयत्न करताहेत त्यावर पण कधी लिहिलं पाहिजे :)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.