हिवाळा आला की थंडी आणि सोबतीला लवकर काळोख पडणारे दिवस येणार हे नेहमीचंच. यावर्षी त्याला जोड मिळाली जरा लवकर पडलेल्या बर्फाची. आणि अशा थंडीत येणाऱ्या नाताळच्या पार्श्वभूमीवर बच्चेकंपनीच्या मनोरंजनासाठी डाऊनटाऊनच्या जवळ असणाऱ्या विंटर वंडरलँडला जायचा प्लान ठरला.
खर म्हणजे मागची दोन वर्षे जायचं होतं, पण प्रत्येक वर्षी काही न काही निमित्त होऊन आमची तयारी होईपर्यंत वंडरलँड पुन्हा नॉर्थ पोलला गेलेली असे. यावेळी मात्र आम्ही अगदी रिमांइडर वगैरे लावून वेळेत गेलो. स्वागताला मिट्ट काळोखातून चमकणारा "विंटर वंडरलँड" लिहिलेला दिव्यांचा फलक आणि प्रत्येकाला कॅन्डी केन देणारा स्वयंसेवक.
त्यानंतर जसं जसं पुढे गेलो तसं एक वेगळंच विश्व दिव्यांच्या माळांनी आमच्यापुढे उभं राहिलं. काळोखात धावणारी सांताची गाडी काय आणि दुधाचे हंडे ओतणाऱ्या बायका काय.
आमच्या या छोट्या सफरीमधली काही क्षणचित्रे
छान आहे गं ही वंडरलॅंड! स्नोफ्लेक्सची नक्षी, इतर देखावे खाळोखात अगदी छान खुलून दिसतायंत. एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखं वाट असणारच. अशा ठिकाणी लहान मुलांसोबत आपणही मूल होऊन जातो गं. या वर्षी ख्रिसमसला छान एन्जॉय केलेलं दिसतंय तुम्ही सर्वांनी.
ReplyDelete
Deleteआभार गं कांचन. खरय की आपल्याला वेगळ्या राज्यात गेल्यासारखं वाटतय. आम्ही डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात इथे गेलो होतो. क्रिसमसच्या वेळी नेमकं जाणं होत नाही हा मागच्या काही वर्षांचा अनुभव म्हणून यंदा वेळेत जाऊन आलो. फक्त ब्लॉगवर टाकायला उशीर झाला (नेहमीप्रमाणे) :)
अपर्णा, काही फोटो लाइव असल्यासारखे चमकत आहेत. कोणत्या कॅमेरा ने काढलेस फोटो?
ReplyDeleteपुष्कर सर्वप्रथम आभार :)
Deleteमी माझ्या Samsung Galaxy S3 ने काढलेले हे फोटो माझ्या जीमेलला जेव्हा उपलब्ध होतात तिथेच एक पर्याय आहे bling म्हणून मला वाटतं की गुगलची सुविधा असावी. तरी मी आळस करून सगळे फोटो enhance केले नाहीत पण हे वापरता येतं का ते पहा. माझे यंदाच्या बर्फातले फोटो आहेत त्याला बर्फ पडतोय असा पण एक पर्याय आहे. काही वेळा फोटो अपलोड होतानाच गुगल स्वतःदेखील असे enhancements करून देते असंही मी एक दोनवेळा पाहिलं आहे. तुला आणखी काही माहिती हवी असल्यास कळव
छान ऑप्शन आहे. मी करेन ट्राय. आणि हो, नव्या वर्षाच्या शुभेच्छा. :-)
Deleteनक्की वापरून पहा. तुलादेखील नवीन वर्षाच्या शुभेच्छा :)
Deleteलख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया!!! ;-)
ReplyDeleteमस्तच... एकदम कूल!!!
खरं हे शीर्षक पण चाललं असतं नाही सिद्धार्थ ??
Delete