Friday, July 8, 2011

वाळूच्या नंदनवनी...

फिरायची आवड दोघांनाही....मिळत नाही तो वेळ....सारखं कामं एके कामं करून कुठे जायचं याच प्लान्निंग पण करता येऊ नये असं झालं की खरं तर आणखी खट्टू व्हायला होतं... पण एखादा दिवस असाही यावा, जास्त नाही फक्त राहायची सोय करावी आणि मग ठरवूया काय पहायचं ते....तसच निघालो यावेळच्या उसातल्या स्वातंत्र्यदिनी उसाटायला..बरोबर दोन छोटी मुलं आणि आईला पण गाडी (कधीकधी ) लागते म्हणून फार लांब नाही फार जवळ नाही...pacific कोस्टात...स्पेसीफिकली सांगायचं तर ओरेगावच्या दक्षिण किनारी...(आयला उसात भटकंती केल्यापासून दिशा, मैल एकंदरीत भूगोल आणि इतर बरेच गोल गोल असलेले विषय पण हातासरशी वेगळे व्हायला लागलेत..)

'फ्लोरेंस" दक्षिण किनारपट्टीतला नितांत सुंदर गाव....तसं पाहायला गेलं तर सगळ्या pacific नॉर्थ वेस्टला निसर्गाने भरभरून दिलेलं सौंदर्य आहे...आता पर्यंत ज्या ज्या वेळी इथे भटकलोय प्रत्येकवेळी नवा मोती हाताला लागतो...हा अथांग किनारा आणि त्याच्या प्रत्येक गावी दिसणारं प्रशांत महासागराचं लोभसवाणं रूप..अहाहा....बाकी काही नाही पण इथल्या निसर्गाच्या जाम प्रेमात आहे मी...माझ्या उसातल्या आतापर्यंतच्या वास्तव्यातलं सगळ्यात सुंदर राज्य हेच आहे....निसर्गाने खूप दिलंय आणि तुलनेने नवी वस्ती असल्याने ते बऱ्यापैकी जपलंही गेलं आहे...कुठे जायचं तर कुठेही हे उत्तर जास्त समर्पक ठरेल इतकी विविधता आहे...
यावेळी फ्लोरेंसला यायचं मुख्य कारण शांतपणे घराबाहेर कुठेतरी आराम करणे हे असलं तरी कुठल्याही नव्या जागी गेल्यवर तिथली स्पेशालिटी काय आहे म्हणून थोडा फार शोध होतोच..तसच हॉटेलच्या रूममधल्या माहिती पुस्तिका पाहिल्यावर sand दुनेस च प्रकरण हाताशी लागलं..हॉटेलपासून फार लांबही जायचं नव्हतं म्हणून सकाळी आरामात निघालो आणि पोराटोरांना घेऊन फिरण्याजोगी बगीराईड होती ती करायचं ठरलं...बगी कसली मोठा बगोबाच होता तो आणि त्याचे टायर चक्क विमानाचे होते..आणि तिथे आणखी बरीच ATV मध्ये मोडणारी वाहने दिसत होती...आता उत्कंठा वाढू लागली...

आमच्या चालक कम गाईड बॉबने स्वागताचे दोन शब्द बोलून थोडीफार माहिती दिली..ती ऐकताना समोर गाडीने वळण घेतल आणि हळू हळू वाळू दिसायला लागली...पुढे काय बर असेल....

अबब केवढी ही वाळू....आणि त्यावरून झपाझप जाणारी आमची बगी...

बॉबने सांगितल्याप्रमाणे ही वाळू ग्लेशियर वितळले तेव्हा त्याबरोबर आलीय आणि जगातली (अमरिकेत असं वाचलं तरी चालेल कदाचित...कारण जग या शब्दाची अमेरिकेतली व्याख्या थोडी वेगळी आहे न..) सगळ्यात बारीक वाळू हीच आहे...
त्याच्या मते लाखो वर्षे सूर्य, वारा आणि ओरेगावातला स्पेशल पाऊस यांचा परिणाम म्हणून इतकी बारीक वाळू इतर कुठेही आढळत नाही...
प्रशांत महासागराला समांतर साधारण चाळीसेक मैल पसरलेले हे वाळूचे डोंगर काही काही ठिकाणी समुद्रसपाटीपासून  साडे चारशे ते पाचशे फुटापर्यंत उंच आहेत...त्याने आमची गाडी अशा काही डोंगरावरून घसरवली तेव्हा आम्हाला पण ते जाणवलच...आरुषने तर भोकाड पसरून मला शाळेत (वाचा पाळणाघरात ) जायचं म्हणून सांगितल...(भीक नको पण कुत्रा आवर ते हेच का असं त्यावेळी पण माझ्या मनात चमकून गेलं) 


या पूर्ण परिसरात वरच्या फोटोमध्ये दिसतात तशी बरीच तळी आहेत (किती ते आता विसरलेय) आणि समुद्राच्या इतक्या जवळ असूनही यातलं पाणी गोड आहे....(कारण तेच ग्लेशियरच पाणी अशी बॉबची टिपण्णी) 




आता हे असं वाळूचं नंदनवन मिळाल्यावर लोकांनी खेळ मांडला नाही तर नवलच नाही का? वरचा फोटो सरळ आहे ती गाडी वर चढतेय फक्त...




या आणि अशा प्रकारच्या खेळांचा थरार अनुभवायचा असेल तर जायलाच हवे...


आणि जर स्वतः चालवणार नसलं तर ही वरच्या फोटोमधली पिवळी गड्डी आहेच...आमच्या बगोबापेक्षा ही जास्त जोरात जाते त्यामुळे आणखी थरार...
हाच आमचा बगोबा..टायर पाहिलेत किती मोठ्ठाले आहेत ते.....


आणि हा वरचा फोटो म्हणजे ग्रांड फिनाले का काय म्हणता येईल ते..ही बगोबा ट्रीप झाल्यानंतर याच भागच आम्ही विमानातून दर्शन घेतलं...त्यात दिसतंय मैलोन मैल पसरलेलं वाळूचं नंदनवन आणि त्यात धमाल मस्ती करणारी माणसांची बेटं...

24 comments:

  1. जबरदस्त.. क्लास मजा आली असणार... सुपर

    ReplyDelete
  2. मस्तच आहे हे. किती लांब आहे घरापासून? ATV म्हणजे धमालच असते. आपल्याकडे अजून हे प्रकार फारशे सुरू झालेले नाहीत. मी माल्टा आणि मेक्सिको मध्ये ह्यावर धमाल केलेली आहे... :D

    ReplyDelete
  3. जबरी. एकदम सही. सुट्टी सत्कारणी.

    ReplyDelete
  4. सहीच.. जामच धमाल केलीत.. मस्त आलेत फोटू..

    ReplyDelete
  5. छानच! आरुषला पाळणाघर ही सुरक्षित जागा वाटली. :) फोटो सहीच! इथेही अगदी रोडवर सर्रास गोल्फकार्ट व डर्टकार घेऊन लोक फिरत असतात.

    ReplyDelete
  6. मस्त ! अशी मध्येच तळी बघायला कसं वाटलं असेल ! आणि तेही गोड पाण्याचं !
    छान आहेत फोटो. :)

    ReplyDelete
  7. मस्तच...खूप धमाल केलेली दिसतेय....
    आरुषला पाळणाघर ही सुरक्षित जागा वाटली. :) +१

    ReplyDelete
  8. इथली वस्ती किती जुनी आहे?

    ReplyDelete
  9. आनंद यावेळी एकदम हटके मजा आली.....आणखी फोटो टाकायला हवेत...बघूया पुन्हा कधी तरी या भ्रमंतीवर कधाचित लिहेन..

    ReplyDelete
  10. रोहन आमच्या घरापासून तीनेक तास लागतात..ATV adventures खरचं मस्त असतात.तू केलीत म्हटल्यावर आणखी सांगायला नकोच...त्यात ही राईड आम्ही सर्व एकत्र करू शकलो म्हणून आणखी मजा आली...

    ReplyDelete
  11. सिद्धार्थ सुट्टी सत्कारणी अगदी अगदी....

    ReplyDelete
  12. हाबार्स देवकाका आणि हो ब्लॉगवर स्वागत...

    ReplyDelete
  13. ठांकू ठांकू हेरंबा....मस्त मजा केलीय...

    ReplyDelete
  14. श्री ताई भा पो...:)
    वाळवंटात भटक्यांची कमी नसणार ग..इथली लोक तशी पण या बाबतीत हौशी...

    ReplyDelete
  15. हो ग अनघा...या तळ्यामध्ये काही शूरवीर आपल्या ATV घेऊन पडतात पण आणि मग आणखी धमाल..एक गाडी आम्ही पण पहिली अशी तरंगताना ..:D

    ReplyDelete
  16. शरयू प्रतिक्रियेबद्दल आभारी..
    मी राहते ते गावच साधारण चाळीसेक वर्षांपूर्वी वसवलय..हा सगळा भाग आधी उंच पाईन आणि डोंगर असं सदाहरितमध्ये मोडणारा आहे..आणि मग जमेल तसे रस्ते खणून काही गाव निर्माण केलीत..अजूनही मध्ये मध्ये मैलोन मेल एक पण घर नाही असंही भाग असतो...लोकवस्ती खूप तुरळक आहे त्यामुळे जास्त पडझड नाही...मी तुलनात्मक म्हणजे अमेरिकेच्या पश्चिम टोकाच्या तुलनेने म्हटलय..:)

    ReplyDelete
  17. निशा खूप खूप आभार..

    ReplyDelete
  18. Photo khup chhan Aahet Aparna ! Ata tar lavkarach plan karate tuzyala kade yenyacha

    Vijaya

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी नक्की विजया. तू कधी येतेस याची वाट आम्ही पण पाहतो आहोत. खास ब्लॉगवर कमेंट दिलीस त्याबद्दल डब्बल आभार :)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.