अगदी लहानपणापासुन सोबत करणारी गाणी खरं तर कायमच आपल्या लहानग्यांबरोबर असतात पण तरी जसं वय वर्षे दोन हा टप्पा पूर्ण होतो तसं झोपताना गाण्यांच्या ऐवजी गोष्टी किंवा मस्ती जास्त जवळची वाटते. पहिली दोन वर्षे आपल्या खांद्यावर, मांडीवर झोपताना शांत असणारं आपलं बाळ आता मोठं झालं हेच खरं...त्यामुळे फ़ुलोर्यातलं हे शेवटचं पुष्प. यानंतर कदाचित एखादं फ़ार जवळचं गाणं या ब्लॉगवर येईलही पण हा पुष्पगुच्छ घट्ट बांधुन ठेवायची वेळ आली आहे..गेले दोन दिवस गोष्टींवर झोपणारं माझं बाळ आता मोठं होतंय; त्यामुळे मागच्या वर्षभर जसं महिनाकाठी एक गाणं आमचं लाडकं असायचं तसं नसेल. त्यामुळे आता इथंच थांबलेलं बरं.
जाता जाता या महिन्यातलं नसलं तरी मोठं होता होता आमचं पिलु 'जय जय बापा' करताना असं काही मागणं मागत असेल का? असं वाटलं म्हणून हेच गाणं निवडलंय....
देवबाप्पा देवबाप्पा नवसाला पाव
खाऊचे झाड माझ्या अंगणात लाव
झाडाला येऊ दे आईस्क्रिमचे तुरे
गोळ्यांच्या कळ्या अन चॉकलेटची फ़ुले
बिस्किटांच्या पानाला साखर पन लाव
झाडाला येऊ दे लाडू अन करंजी
रोज रोज खायला मिळेल मग ताजी
मधुनच येऊ दे बटर अन पाव
आईजवळ करणार नाही मी हट्ट
खाऊन खाऊन होईन मी खूप खूप लठ्ठ
झाडावर असू दे माझेच नाव
आरुष, दोन वर्षांचा झाला...आता " तिसरं आणि विसरं " सुरू झालं...नवनवीन गमतीजमती सुरू होतीलचं...:D.हे गाणे खूप दिवसांनी वाचतेयं. किती गमतीशीर यमक जुळवलेयं नं.अगदी पिलांसाठी खासंखासच.
ReplyDeleteMi pahilyandach aikale he gaane....
ReplyDeletechaan aahe... :)
भाग्यश्रीताई, " तिसरं आणि विसरं " हा हा हा....सॉलिड लॉजिक आहे...गमतीजमती तर आहेतच सुरु....:)
ReplyDeleteमैथिली हे कुठल्या सिडीत आहे का माहित नाही गं..पण मराठी माध्यमात शिकल्याने अशी जास्तीची गाणी माहित आहेत...:) पावसातल्या खेळाच्या तासाला पण असली गाणी कुणी कुणी म्हणायचं त्यामुळे तसा साठा आहे...
ReplyDeleteछान आहे गाणं.... अगदी त्या वयातल्या कल्पनारंजनाला साजेसं!
ReplyDeleteहो अरुंधती...अगदी त्या वयाला साजेसं बरोबर लिहिलंत...:)
ReplyDeleteछानच आहे गाणं. मला माहित नव्हतं.
ReplyDeleteखरंच गौरी?? पण छान आहे नं हे गाणं....लहानग्यांच्या तोंडात तर एकदम परफ़ेक्ट....
ReplyDeleteमस्त आहे ग गाणं. मला माहित नव्हतं हे..
ReplyDeleteपण हे काय? फुलोर्यातलं शेवटचं पुष्प? :( .. असो..
आणि श्रीताईचं हे "तिसरं आणि विसरं" सही आहे.. हा हा
काय बोलतोस तुला माहित नव्हतं???ऑफ़िशियली शेवटचं कारण आजकाल आरुषला झोपताना गाणी लागत नाहीत ना?? (आणि नेमकं मी एक संस्कारगीताचं पुस्तक पण आणलं आत्ताच...:( )
ReplyDeleteपण मध्येच एखादं लाडकं गाणं जास्त रेंगाळलं की टाकेन ब्लॉगवर..
हे मस्त गाणं आहे एकदम...
ReplyDeleteमी मराठी माध्यमाचा असूनही आज पहिल्यांदाच ऐकतोय असं वाटतंय...
@बाबा, तसंही हे खूप कॉमन गाणं नाहीये पण मी आधी ऐकलंय आणि आवडलंय म्हणून पोस्टलंय...
ReplyDeleteमी सुदधा आधी एकल नाही पण आहे छान...
ReplyDeleteधन्यवाद देवेंद्र..
ReplyDeleteनमस्कार.. मी हे गाणं खूप दिवसांपासून शोधत होतो. अगदी लहानपणी माझ्या काकुने माझ्या बहिणीला शिकवला होतं. तिला या गाण्यासाठी बक्षीसही मिळालं. ही सुमारे 20 वर्षांपूर्वीची गोष्ट. आता माझ्या बहिणीला आणि काकुलाही हे गाणं आठवत नाही. मी त्यावेळी ऐकलेलं गाणं आणि तुम्ही पोस्ट केलेल्या गाण्यात कदाचित थोडा फरक आहे. मला नेमकं आठवत नाही. मी लहानपणी शिकलेलो आणखी एक गाणं. डॉक्टर होणार डॉक्टर होणार डॉक्टर होणारं.. लहान मुलांना इंजेक्शन मी कधी न देणारं... छोट्या बाळाला ताप जरी आला... औषध छे छे औषध छे छे.. शरबत देणारं.... यापुढचं नाही आठवत. तुम्हाला माहीती असेल तर जरूर पोस्ट करा....
ReplyDeleteआभार मनोज आणि ब्लॉगवर स्वागत.
Deleteही पोस्ट तुम्ही वाचली तर लक्षात आलं असेल की फुलोरा मधली ही सगळ्यात शेवटची पोस्ट. गम्मत म्हणजे आता माझी दोन्ही मुलं गाण्यापेक्षा गोष्टी ऐकून झोपताहेत पण तरी इतरवेळी गम्मत गाणी म्हणत असतो आम्ही. तुम्ही वर लिहिलेलं गाणं मिळालं तर नक्की टाकेन. या नंतर मी गाणी आणि आठवणी या लेबल मध्ये मोठ्यांची गाणी आठवली आहेत तीही नक्की पहा :)
पुन्हा एकदा विस्तृत प्रतिक्रियेसाठी अनेक आभार. आपल्या भावंडांच्या आठवणी गाण्याशी निगडीत असतील तर पुन्हा ते आठवताना कसं वाटत :)