Monday, May 24, 2010

देवाच्या घरात....

खरं तर परत आल्यावर काय लिहु? हा प्रश्न नव्हता पण पहिलं काय लिहु हा जास्त मोठा प्रश्न होता..ठरवलं होतं की ब्लॉगमीटबद्दल लिहावं पण ती ब्लॉगविश्ववरची जुनीच बातमी असणार असा विचार केला आणि शिवाय चुकून पहिलंच वटवट्याच्या पोस्टवरची गरमागरम चर्चा वाचुन आता या विषयाचंच हे काय झालं असं काहीसं मनात आलं..त्यामुळे सगळे विचार सोडून मनाला आठवणींच्या चार आठवड्यात सोडून दिलं...


धोपट मानाने जे काही चार आठवड्यात करता येईल ते पुरेपुर करुन घेतलं..(सगळ्यात महत्त्वाचं मुलाला आईकडे भाचरांच्या जीवावर सोडून) आणि तेच ते सर्व कुणी कायम मुंबईकर असल्यावर करेल त्याच कॅटेगरीतलं...पण जास्त न ठरवता एक छानच गोष्ट झाली तिचाच उल्लेख नमनाला व्हायला हवा म्हणून ही छोटुकली पोस्ट...

तर जायचं होतं आमच्या अमेरिकेत ओळख झालेल्या एका मैत्रीणीकडे..ती आत्ताच उसातून परत मायदेशात आली. तिचं नंबर दोनचं लेकरु झालं त्याचवेळी आम्ही आमचं बस्तान ओरेगावात हलवल्याने भेटही झाली नव्हती आणि अगदी खरं कारण म्हणजे ही ब्रांद्र्यात सचिनची शेजारीण हे ओळख झाल्यादिवसापासुन माहित झालं होतं...आधी तिच्या लग्नाच्यावेळी मायदेश भेट नव्हती नाहीतर रिसेप्शनलाच क्रिकेटच्या देवाला पाहायचा योग होता..पण ते नाही तर आमच्यासाठी चला तिला भेटता लगे हातो साहित्य सहवासातील ती प्रसिद्ध इमारत आणि निदान ते दारही पाहु असं असणं साहजिकच होत म्हणा...

शेवटचा आठवडा आला तरी दोघांनाही वेळ मिळत नव्हता..शिवाय जायचं तर आरुषला घेऊनच त्यामुळे मुहुर्त शोधायला होत नव्हता.शेवटी परतीच्या अगदी दोन दिवस आधी म्हणजे गुरुवारी काय तो एकदाचा मुहुर्त मिळाला. नवरा आणि मुलगा एका ठिकाणाहुन आणि मी दुसर्‍या असं दुपारी पोहोचायचं ठरलं त्याप्रमाणे आमच्या मैत्रीणीबरोबर ठरवलंही..नशीब की तिलाही आयत्यावेळी आलेलं चालणार होतं. दोन वाजता उषःकालच्या खाली नावाच्या पाटीवर माझ्या मैत्रीणीच्या शेजारी आणि वरच्या मजल्यावर सचिनची आई आणि भाऊ अशी नावं पाहुन पत्ता मैत्रीणीचा शोधतेय हेही विसरले...असो.

लिफ़्टने वर गेले तर त्या मजल्यावर तिन्ही दरवाजे मिळून एकच घंटी पाहुन आमचा मागचा संवाद आठवला आणि माझी सरकारी ट्युबलाईट पेटली. मागेच तिच्या आई-बाबांनी शेजाऱचा फ़्लॅट घेऊन त्यांच्या घराला जोडला हे ती म्हणाली होती. अर्थात त्यावेळी माळ्यावर किती फ़्लॅट्स आणि मग हा घेतला तो कुणाचा असल्या चांभारचौकशा केल्या नव्हता. पण ही घंटा दाबताना साधारण कळलंच.

घरात आल्यावर जरा इतर गप्पा झाल्यावर मग काढलाच विषय तिच्या आईकडे आणि मग सारंच चित्र स्पष्ट झालं. त्यांच्या शेजारी राहणारा आपला क्रिकेटचा देव सचिन आता तिथे राहत नाही; त्यांचा फ़्लॅट जोडून आता हा एकच मोठा फ़्लॅट त्यांनी बनवला आहे. तिथे एक बेडरुम, बाथरुम आणि दुसर्‍या बेडरुममध्ये टि.व्ही. आणि म्युझिक रुम आणि बाकी घर जोडून मोठा दिवाणखाना असं आता या मजल्यावर देशपांड्यांचं एकच कुटुंब आहे.

खरं तर दाखवल्याशिवाय कुणाच्या घरातल्या खोल्या उगाच जाऊन पाहायचं माझ्यासारखंच कुणीही टाळेल पण त्यादिवशी बाथरुममध्ये जाताना सचिनच्या बाजुच्या प्रत्येक खोल्यांमध्ये उगाच डोकावुन यावसं वाटलं..याचं ठिकाणी त्याची बालपावलं चालता चालता, हळुहळु शाळेत जाता जाता क्रिकेटच्या मैदानात घट्ट झाली असतील असं वाटुन उगाच भरुन आलं...अरे हे घर पुर्वी कसं असेल याचीही उगाच टोचणी...अर्थात कुणी आपल्या लहानपणीच्या घराचं काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि सगळीकडेच भावुक का व्हायचं??...त्याचा भाऊ अद्यापही वरच्या माळ्यावर राहतो आणि इथेही तो येतो असंही बोलता-बोलता कळलं..गप्पा संपल्या वेळही वाढत होता तसं हळुहळु निघालो..

तिथुन निघताना बाहेरच्या प्रचंड गरमीतही साहित्य सहवासाच्या गेटबाहेर पडेपर्यंत जरा जास्तच गार वाटत होतं. संगमरवरी गाभार्‍यातुन बाहेर पडल्यासारखं.....

28 comments:

 1. OMG...तू सचिनच्या (जुन्या)घरी जावून आलीस...मला समजू शकत कि तू तिथ असे पर्यंत तुझ्या मनात काय भावना असतील...कारण आपण सर्व सचिन भक्त....अन आल्या आल्या पोस्ट टाकल्याबद्दल धन्स अपर्णा ...मेळावा तुझ्या नजरेतून पाहायला आवडेल तेंव्हा पोस्ट नक्की टाक त्या बद्दल.

  ReplyDelete
 2. आयला !!! सॉलिड ग.. क्या बात है !!! तुझी स्वदेश वारी अगदी अगदी सार्थकी लागली म्हणायची !!

  शेवट तर झक्कासच..

  >> संगमरवरी गाभार्‍यातून बाहेर पडल्यासारखं !!

  मस्तच..

  ReplyDelete
 3. अरे तू माझ्या देवाच्या घरी जाउन आलीस प्रत्यक्ष..वाह..खूप खूप लकी आहेस ग, ते कुरळ्या केसाच छोट बाळ त्या घरात नांदला होत आणि तू तिथे गेलीस..स्वत: अनुभवला ते, सुंदर...खरच संगमरवरी गाभारा :) :)

  ReplyDelete
 4. अपर्णा, हा अवर्णनीय आनंद नव~याने अनुभवला आहे. मात्र तेव्हां सचिन तिथे राहात होता.:) नचिकेत, विनोद, प्रविण व आचरेकर सर असे सगळेच गेले होते त्याच्या घरी. खरेच गं,तुझी मायदेश वारी सहीच झाली म्हणायची.

  ReplyDelete
 5. सहिये मॅडम... म्हणजे मस्त मजा करा आणि ’बरी’ झाली म्हणा ट्रीप.... ते काही नाही आरूषनेही कशी एंजॉय केली भारतवारी यावरही पोस्टा आता....

  >> संगमरवरी गाभार्‍यातून बाहेर पडल्यासारखं !!

  मस्तच.. +१

  ReplyDelete
 6. Mastach ga Aparna taai...!!! Lucky...!!!
  Khoop vaat pahat hote mi tuza post chi... :)

  ReplyDelete
 7. डेडली एकदम.
  भारतातून निघताना सचिनच्या घरी जाऊन येणं म्हणजे सॉलिडच.
  हेरंबला अनुमोदन...
  >> संगमरवरी गाभार्‍यातून बाहेर पडल्यासारखं !!
  हे एकदम ब्येस!

  ReplyDelete
 8. अपर्णा,
  खूप धमाल केलीस मायदेशच्या ट्रिपमध्ये. अनुभव छान लिहिला आहेस.

  ReplyDelete
 9. सागर, अरे कायम लक्षात राहिल अशीच जागा आहे ती...आणि हो आपण सारे सचिन भक्त हे शंभर टक्के खरं...धन्यवाद...

  ReplyDelete
 10. हेरंब यकदम सहीच बोला तुम तो...स्वदेश वारी अगदी अगदी सार्थकी लागली.......:)

  ReplyDelete
 11. ठांकु ठांकु सुहास...

  ReplyDelete
 12. भाग्यश्रीताई फ़ार काही कल्पना नसताना झाली म्हणून भेट नसली तरी महत्वाचं वाटतंय..नाहीतर माझं मुळात वर्तुळ माझ्यासारख्याच लोकांचं त्यामुळे मोठी लोकं दुरुनही पाहु असं नाही...पण तरी ही वारी नशिबी होती म्हणायची...

  ReplyDelete
 13. तन्वी, अगं आरुषची वारी कशी झाली ते त्यालाच विचारायला हवं..जमेल तितका वेळ त्याच्याबरोबर नसण्याचा प्रयत्न केला..(अगदी खादाडी प्रांतातही)

  ReplyDelete
 14. मैथिली धन्यवाद..अगं माझंही सगळं वाचायचं राहिलंय पण हे लिहिल्याशिवाय चैन पडत नव्हतं ना म्हणून लगेच टाकलं...:)

  ReplyDelete
 15. @The Prophet,
  डेडली सही शब्द आहे....खरंच डेडली...:) धन्यवाद...

  ReplyDelete
 16. ठांकु गं सोनाली...सुट्टी म्हणजे तसंही धमाल-मस्ती असंच हवं ना??

  ReplyDelete
 17. मस्तंच. एकदम लकी आहेस..

  >> संगमरवरी गाभार्‍यातून बाहेर पडल्यासारखं !!

  मस्तच.. +१

  ReplyDelete
 18. मस्तच! उष:कालमधला सचिन! माझी आत्ते राहते दुसऱ्या मजल्यावर. मी माझ्या दहावीच्या परीक्षेनंतर (१९९४) सुट्टीत गेलो होतो राहायला तिच्याकडे. त्यावेळी सचिन तिकडेच राहत होता. त्यावेळी बऱ्याचदा पाहिलं त्याला. खाली साहित्य सहवास मधल्या मुलांसोबत बॅडमिंटन खेळायचा. एकदा तर समोरच जिन्यात भेटला, पण काय बोलाव हेच मला सुचेना. :( अजूनही तिच्याकडे गेलो की तो प्रसंग आठवतो. :)

  ReplyDelete
 19. आनंद, खरंय तुझं लकी आहे मी...:)

  ReplyDelete
 20. @सी.रा.वाळके, ब्लॉगवर स्वागत...तुम्ही तर त्यालाच पाहिलंय आणि तेही त्याच्याच घराच्या आसपास म्हणजे तर काय कायमच स्मरणात...:)

  ReplyDelete
 21. मस्तच ग ... नशीबवान आहेस!

  ReplyDelete
 22. अवो तुमी पार भरून पावला की!!! सर्वात अविस्मरणीय झाली म्हणायची मायदेश वारी....

  ReplyDelete
 23. अगदी अगदी योगेश....
  आणि आज अगदी धुमकेतुसारख्या कमेंट्स दिल्यात...सही आहे...धन्यु त्यासाठी...

  ReplyDelete
 24. अपर्णा....सुट्टी वरुन आत्ताच आलोय.....त्यामुळे धुमकेतू कमेंट आल्या...:)

  ReplyDelete
 25. आलं लक्षात माझ्या ते योगेश....आता मस्तपैकी पोस्ट येऊदेत...

  ReplyDelete
 26. वारकरी आषाढी कार्तिकीची पंढरपूर वारी करून गावी परत आले की वारीला न गेलेली माणसे त्यांच्या पाया पडून वारीचे पुण्य पदरात पाडून घेतात, तसे आपण भेटू तेंव्हा मी तुझे पाय धरणार आहे.

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.