म्हणजे काही नाही हो, अभ्यास हा इथे इतका पाचवीला पुजला आहे नं की अगदी एखाद्या डिपार्टमेंटल स्टोअरला गेलं तरी जो तो कुठच्याही आयलमध्ये आपल्याला हव्या त्या प्रॉडक्टच्या कप्प्यासमोर दोन्ही हातात प्रत्येकी एक, पार्टनर असेल त्याच्या हातातली दोन आणि मान वाकडी करुन समोरच्या फ़ळीवरची काही अशी बॉक्सेस वाचुन त्याचा आपल्याला हव्या त्या दृष्टीने अभ्यास केल्याशिवाय त्यातलं हवं ते एक बॉक्स आपल्या शॉपिंग कार्टमध्ये टाकुच शकत नाही...म्हणजे साधं सिरियलचं उदा. घेतलं तर त्यात आधी कुठला ब्रॅण्ड, मग होल ग्रेन की फ़ोर्टीफ़ाईड, त्यात प्रथिन जास्त की कार्ब कमीवालं हवं, लो सोडियम, कुठची व्हिटामिन्स, बरं हे सगळं सारखं असेल की मग बदामवाले, नुस्ते की मनुके घातलेले किती ते पर्याय..बरं सिरियलचं जाऊदे पण आपला रोजचा खाण्यातला ब्रेड घ्यायचा तर मायदेशात एक पाववाल्याकडचा आणि दुकानदार तो देईल तो हा अनुभव असणारे आम्ही एक अख्खा रो ब्रेडसाठी म्हटल्यावर कुठला आपल्याला आवडेल त्याचा अभ्यास करणं आलंच (इतकं करुन आजपर्यंत बटाटेवड्याशी लगीन लावावं तो पाव मिळत नाही ही खंत आहेच..असो..उगा खादाडी टॉपिक नको सारखे)...पुन्हा इतक्या तर्हा आहेतच तर मग बदल हवा म्हणून त्या आयलला गेलो की तेच आधी सांगितलं तसं हे वाच ते वाच त्यामुळेच म्हटलं तसं अभ्यास काही चुकत नाही...
साधारण दोन-तीन महिने एकच दुकान, बराचसा अभ्यास आणि जे काही ट्राय करु त्याप्रमाणे जर आपण मग आपल्याला हवं ते एका मिनिटांत फ़ळीवरुन काढुन घेऊ शकलो की समजायचं या विषयावरची आपली पी.एच.डी. झाली.या पी.एच.डी.मध्ये अभ्यासण्यासारखे बरेच विषय आय मीन आयल आहेत त्यामुळे हे काम तसं वाचताना वाटतं तितक्या लवकर पुर्ण होत नाही बरं..शिवाय नेमकं तुम्ही शॉर्टलिस्ट केलेलं प्रॉडक्ट आयुष्यातुन आपलं ते फ़ळीवरुन कायमचं उठलं की मग एक मिनी पी.एच.डी. करा आणि नवं काहीतरी शॉर्टलिस्ट करा...त्यामुळे अपग्रेड, आवडी-निवडी, बदल झालंच तर घरात बाळ नामक एक नवा प्राणी आला की मग त्यांचे प्रॉडक्ट या ना त्या कारणाने हे प्रॉड्क्ट पी.एच.डी. प्रोजेक्ट अखंड सुरु राहतं आणि त्याला ग्रॅण्ट वगैरे मिळाली नाही असंही कधी होत नाही.
बाहेर काही मागवायचं असेल अगदी गेलाबाजार कॉफ़ी तरी तेच...सुरुवातीला आधीच अगम्य नावाचे ते अनेक कॉफ़ी पर्याय, त्यातुन त्यातल्या त्यात काही निवडावं की ऑर्डर घेणारी विचारणार छोटी, मध्यम की मोठी, मग दुध कुठल्या प्रकारचं होल, फ़ॅट फ़्री की याच्या मधलं, साखर की शुगर फ़्री, आणखी काही हवं की "Thats all for today??"..तिला म्हणाव घसा सुकला एवढ्यातच, त्यापेक्षा कुठे आहे तुझं कॉफ़ीचं मशिन मीच बनवुन घेईन...पण चालायचं अजुन साताठ वेळा आलं की सराईतासारखं रांगेत उभे राहुन आपण आपला कप घेणारच....कारण काय?? अहो झाली नं पी.एच.डी.करुन या विषयातली सुद्धा...
आणखी एक म्हणजे या देशात आलो की आपण हळूहळू खायचे इथले पर्याय स्विकारलेले असतात आणि मग या ना त्या कारणाने वाढणारं वजन (इथे येऊन वजन कमी झालेलं माझ्या माहितीत तरी कुणी नाही..एखादा फ़ारच काळजीवाहु असेल तर एकवेळ त्याचं वाढणार नाही पण कमी??चान्सेस कमी...) तर हे वजन एकदा का दिसु लागलं की मग काही पाहायला नकोच...आणि त्यात इथल्या खायच्या वस्तुंवर त्यात काय आहे पासुन ते उष्मांक, कार्ब, प्रोटीन, व्हिटॅमिन सगळं इत्थंभूत छापलेलं असतं त्यामुळे नेटवर जायचं आणि आपल्याला कसं खाल्लं पाहिजे हे एकदा पाहिलं की झालं...मी ही पी.एच.डी. दोनदा केली आहे...एकदा माझं वजन बर्यापैकी वाढलंय हे मायदेश दौर्यात प्रत्येकाने सांगितल्यावर...(काय आहे इथे असल्यावर ते कळतच नाही.कारण इथं big and tall आसपास दिसत असतात म्हणजे आपण तुलनात्मक बारीकच..) मग परत आल्यावर मुख्य म्हणजे व्यायाम (भारतात कधी जिमचं तोंड नाव काही पाहिलं नव्हतं) आणि आहार मग फ़ॅट फ़्री, लो फ़ॅट, लो ग्लायसेमिक इंडेक्स्ड बापरे सगळं एकसो एक.....पण फ़ायदा झाला...वजनही कमी झालं आणि एक पी.एचडी पदरात पडली...पण हाय मुलाच्या वेळी पुन्हा आईने दिलेल्या सकस आहारामुळे अगदी पुर्वीइतकं नाही पण बर्यापैकी वजन वाढलंच...पण आधीची पी.एच.डी. होती. त्यामुळे पुन्हा तोच अभ्यास कामी आला. निव्वळ "वजन कमी करणे" या विषयावर पी.एच.डी. केलेल्या कित्येक व्यक्ती मला माहित आहेत...इतका जिव्हाळ्याचा विषय आहे हा.
आजार हाही एक जरा हळवा प्रकार आहे...कुठलाही छोटा-मोठा आजार किंवा आजारसदृष्य परिस्थिती आली की इथले डॉक्टर्स, नर्स तुम्हाला त्याची भरमसाट (आणि काहीवेळा नको इतकी) माहिती देतात. शिवाय नेट आहेच...पहिल्यांदी जेव्हा कोलेस्टेरॉलविषय ऐकलं तेव्हा पुन्हा एकदा नव्या पी.एच.डी.चं दान पदरात पडलं..आधीची वजनाविषयीच्या पुर्व पी.एच.डी.मध्ये सॅच्युरेटेड फ़ॅट्स आणि कंपनीची भर पडली आणि अगदी वारसाहक्काने आलेलं कोलेस्टेरॉल सांभाळायला काय काय केलं पाहिजे याच्या चर्चा घरच्यांशीसुद्धा करायला लागले..म्हणजे अगदी त्यांची डॉक्टर झाले म्हणा न...
त्यानंतरचा सांसारिक आयुष्यातला मोठा टप्पा म्हणजे मुल होणं...ही जरा नेव्हरएंडिग प्रकारातली पी.एच.डी. आहे. पण ते कळतं तरी आपण करत राहतो..एक म्हणजे आता मूल होणार कळलं की मग प्रत्येक महिन्यागणिक त्याची प्रगती याविषयी डॉक्टर, नर्स, इंश्युरन्स कंपनी झालंच तर हजारो प्रॉडक्ट्स आपल्या गळ्यात मारणार्या कंपन्या यांच्याकडून इतक्या काही माहितीचा मारा होतो की बास रे बास..आपण कधी त्यात अडकतो आणि ते सर्व वाचुन (थोडक्यात अभ्यास करुन) आपलं दोघांचं मिळून (जमलं तर) एक मत बनवतो आणि तर्क करतो ते कळतंच नाही.साधं व्हिटामीनच्या गोळ्या मग त्यात ते अमुक महिन्यांमधे ओमेगा थ्री घेतलं तर कसं चांगलं, आमच्याच कंपनीची गोळी कशी चांगली, झालंच तर लहान मुलांचं फ़र्निचर, कपडे त्याला लागणारे दुधाच्या फ़ॉर्मुल्याचे असंख्य प्रकार या सर्व माहितीचा भडीमार नऊ महिन्यात आपली या विषयावरची माहिती पी.एच.डीच्या पुढच्या लेव्हला नेऊन सोडते. आणि प्रत्यक्ष मूल घरात आल्यावर तर कहर असतो...आपली डबल डॉक्टरेट त्याच्या वर्षागणीक होत असते..आपणही नकळत आपल्या मागे असणार्या आपल्या मित्रमैत्रीणींना कधी सल्ले द्यायला लागतो कळतही नाही.
थोडक्यात सांगायचं तर दरवर्षी काही नं काही तरी नवीन आपल्या मागे येतं..कधी आजार, कधी वजन वाढतं, कधी फ़िरतीची नोकरी, कधी एखादी साप्ताहीक सुटी काही नं काही तरी आखणी करायची असते आणि आपण त्यात्यावेळी नकळत अभ्यास करुन नवनव्या पी.एच.डी. पदरात पाडत असतो...
शांत डोक्याने या घेतलेल्या पी.एच.डी आठवते,तेव्हा वाटतं शाळा-कॉलेजमध्ये असं एखादाच विषय घेऊन त्याचा सखोल अभ्यास करण्याचा पेशन्स दाखवला असता तर आपणही ते सुरुवातीला खरे पी.एच.डी.धारक म्हटले त्या रांगेत असतो नाही?? पण नकोच ते....आपल्या या हव्या तेव्हा घ्या आणि सोडा प्रकारातल्या पी.एच.डी.च बर्या माझ्यासारख्या आरंभशुराला...
मस्त आहे डॉ टिंबं :)
ReplyDeleteतुझी ती विमान प्रवासातली पीचडी का नाही घेतलीस या पोस्टमध्ये का अजून व्हायचीय?
ha ha mast zaliye post!
ReplyDeletehavya teva ghya, ani havya teva soda prakaratali PHD malasuddha lahu hotat.
हा हा प्रसाद....डॉ टिंबं
ReplyDeleteती विमानप्रवासातली पी.एच.डी. ह्म्म्म्म्म्म्म्म.....पुर्ण करायची इच्छा होत नाहीए म्हणून राहिली असेल..
मीनल, आजकाल हे माझ्यासारखे आरंभशुर पी.एच.डी.धारक भरपुर असणार याची खात्री आहे मला.
ReplyDeleteनक्कीच असतील असे अनेक लोक. मीही असाच एक PhD धारक आहे. :-)
ReplyDeleteहाहाहाहा.. एकूण एका शब्दाशी सहमत.. आयला मी पण एवढ्या मिनी आणि मेगा पीएचडया केल्या आहेत हे तुझा लेख वाचेपर्यंत लक्षातच आलं नव्हतं :)
ReplyDeleteसंकेत नवपीएचडीधारकांच्या दरबारात आपल स्वागत आहे....
ReplyDeleteहेरंब तू त्यात नक्की असशील याची खात्री आहे मला.....या वर्षीच्या आभारदिनाच्या(thanksgiving ani black friday re) खरेदीची PHD झाली असेल तर थिसीस पाठवून दे....
ReplyDeleteएक राहिलंच...लई उशीरानं बालदिनाच्या शुभेच्छा आरूषला!!:)
ReplyDeleteआणि बहुतेक तू राईट क्लिक दिसेबल केल्यानं तुझा फीड ब्लॉक होतो ब्लॉगरात...
अपर्णा,
ReplyDeleteआधीची कॉमेंट मला दुसर्या पोष्टीवर टाकायची होती..असो :)
PhD आवडल्या :D
खर आहे ग अश्या बरयाच वेगवेगळ्या पी एच ड्या आपण घेतच असतो...लेख मस्तच...
ReplyDeleteठांकु, बाबा दोन्ही कमेन्टसाठी...
ReplyDeleteदेवेंद्र, मला हा साक्षात्कार अमेरिकेत आल्यावर का व्हावा असा विचार करत होते..कदाचित इथे प्रवास आणि स्वतःचं सोडून इतर कौंटुंबिक व्यवधाने नसल्याने वेळ जरा जास्त मिळतो आणि मग डोक्याला असे उद्योग देत बसतो आपण असं वाटतंय....पण तू तुझ्या इतक्या व्यस्त कालावधीमध्ये या पी.एच.डी.ना वेळ कसा देतो तेही लिही की एकदा...:)
ReplyDeleteदेवेंद्र, मला हा साक्षात्कार अमेरिकेत आल्यावर का व्हावा असा विचार करत होते..कदाचित इथे प्रवास आणि स्वतःचं सोडून इतर कौंटुंबिक व्यवधाने नसल्याने वेळ जरा जास्त मिळतो आणि मग डोक्याला असे उद्योग देत बसतो आपण असं वाटतंय....पण तू तुझ्या इतक्या व्यस्त कालावधीमध्ये या पी.एच.डी.ना वेळ कसा देतो तेही लिही की एकदा...:)
ReplyDeleteएक राहिलंच बाबा..तू म्हणतोस तसं आहे का माहित नाही पण माझं आधी फ़ीड बर्नरचं खातं नव्हत आणि आता ते गुगलने घेतल्यावर फ़क्त मला या ब्लॉगचा पत्ता विचारल्यावरच बोंबा मारायला सुरुवात होते...कुछ तो करना पडेगा....सध्या तरी तू तुझ्या ब्लॉगरला लॉग इन करतोस त्यात तुला फ़ीड दिसत असेल असं वाटतंय नाहीतर म.ब्लॉ.वि. आहेच......पण तरी तू येतोस ब्लॉगवर यात मला समाधान आहे.....
ReplyDeleteMi suddha ak PHD dharak aahe hi post vachun samjale ;)
ReplyDeleteThnx :)
अभिनंदन विक्रम...
ReplyDelete