आजकाल काय होतं कळत नाही पण बहुधा हा इथल्या थंडी, पाऊस आणि बहुदा जरा जास्तच लवकर आलेल्या बर्फ़ाचा परिणाम असावा असं वाटतं पण सारखं चायनीज खायला हवंय आणि तेही आपलं भारतीय चायनीज असंच..ते इथे तसंही मिळणार नाहीच. अर्थातच आपल्या चवीचं चायनीज खायला मी मुंबईत आले की आवर्जुन कुठे न कुठे जाते. अगदी पहिल्यांदी मी चायनीज खाल्लं होतं ते दादरला चायना गार्डनमध्ये आणि खरं सांगते एकतर त्यांचं सूप पिऊनच माझं पोट भरलं होतं आणि त्यात अमेरिकन चॉप्सी हे प्रकरण मला अजिबात झेपलं नव्हतं...नशीब एक राइस पण मागवला होता. पण तरीही नंतर कधीतरी ती गोडी लागलीच..आणि इतकं झालं तरीही कधीही जिप्सीच्या आत जाऊन चायनीज खाल्लं नव्हतं..मी आणि माझी मैत्रीण नेहमी जिप्सी कॉर्नरमध्येच काहीतरी चटरमटर खाऊन आपल्या बाहेर यायचो.नाहीतर नेब्युलामध्येही जायचो.पण जिप्सीच्या आत कधीच गेलो नाही.
यावेळी मात्र जिप्सीच्या आत जायचा योग होता. एक म्हणजे आम्ही थोडं द्राविडी प्राणायाम करुन आलो होतो...झालं काय की थोडं मुंबईदर्शन करावं म्हणून सिद्धीविनायकापासुन सुरुवात करुन मग वरळी, गेटवे असं फ़िरलो आणि संध्याकाळ झाली तेव्हा मला अचानकपणे दिल्ली दरबार कुठं ते आठवेचना. बरं मे महिना म्हणजे घामाच्या धारा वाहायला लागल्या होत्या..कुणाला विचारायचं नाही हा एक अलिखित नियम करुन बसलेला माझा नवरा सरळ एक कुलकॅब करुन दादरला जाऊया आणि मस्तपैकी खाऊया म्हटल्यामुळे माझ्याकडे काही पर्याय नव्हता. मी फ़क्त कुलकॅबवाला भैय्या आहे हे पाहिल्यावर आधी एसी सुरु आहे नं इतकं विचारुन घेतलं...मजा म्हणजे त्या कुलकॅबने गाडी वळवली आणि दिल्ली दरबारचा बोर्ड मला दिसला..म्हणजे जिसे ढुंढा गली गली प्रकरणासारखंच होतं पण आता काही उतरणं शक्य नव्हतं...
मग आलो ते सरळ जिप्सी आणि आत थंड हवेत बसायचं म्हणून आपसुकच आत गेलो.आमच्या मुलाला तिथे काय तेजी आली होती कळत नाही पण लेकाने आम्हाला वैताग आणण्याचे सगळे प्रकार त्यादिवशी करुन झाले. पण आमचा वेटर मात्र फ़ारच चांगला होता. ज्या टेबलवर आम्ही बसलो होतो योगायोगाने ते आत्ताच निर्वतलेले माझे लाडके चंद्रलेखाचे मोहन वाघ यांच्या आठवणीसाठी होतं. आम्ही आधी सुप मागवायचं ठरवलं पण नेमकं गुरुवार होता आणि मी शाकाहारी होते त्यामुळे त्याने आणि मी वेगवेगळी सुपं डिशेस मागवली. वेटरने आमची गडबड ओळखली बहुधा म्हणून त्याने आम्हाला मुख्य जेवण मागवताना हाफ़ डिश (म्हणजे हाफ़ राइस इ.) पण मागवता येईल हे सुचवलं...आणि एकदम मला मी कुठून आलेय (काय गं अलिबागहून आलीस का? मधलं) असं झालं..म्हणजे याआधी हे इतकं सराइत होतं नं तरी मी आता अगदी विसरुनच गेले होते की असे हाफ़ ऑप्शन्सपण असतात म्हणून.
असो..एकदा ती चायनीज चव तोंडाला लागली की समोर आलेलं खाणं कसं चटाचट संपतं हे काही वेगळं सांगायला नको.आत्ता नुस्ते फ़ोटो पाहिले तरी जीव जातोय मग म्हटलं की एकट्यानेच कशाला हा छळ सहन करा? ब्लॉगवरही टाकुया. त्यादिवशी लक्षात आलं की जिप्सीचं चायनीज छान आहे आणि मुख्य त्यांचं (किंवा त्यादिवशीच्या आमच्या वाढपीचं) अगत्य भारी आहे. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही खाण्याचे पर्यायही आहेत. माझ्या नवर्याने मेन्यु पाहून अर्थातच मी भारतात आल्यावर तरी कुठलेच वार पाळणार नाही असं जाहिर केलं पण मी मात्र गुरुवार पाळला. एकदम केव्हातरी लेकाला डायव्हर्जन थिअरम (हम्म इस बात पे थोडा डिटेल डालना चाहिए पण आज फ़क्त खा खा होतेय सो...फ़िस कभी) म्हणून फ़ोटो काढताना लक्षात आलं त्यावेळी काढलेले फ़ोटो आहेत त्यावरुन आठवतेय की आम्ही काय काय खाल्लं होतं..सुपाचे तर फ़ोटोही दिसत नाहीत.
पण खरं सांगु का जसं आवडत्या व्यक्तीच्या फ़क्त आठवणीवर जगणं कठीण आहे, तसंच आवडत्या खादाडीच्या फ़क्त आठवणींवर जगणंही खूप कठीण आहे..सध्या प्रत्यक्ष अनुभवतेय. त्यामुळे या चटकदार पोस्टचा शेवट वेगळ्या अर्थाने जीवाला चटका लावतोय...

च्यामेरिकेत चायनीज .. बापरे.. आम्ही चुकून पहिल्या दिवशी खाल्लं होतं.. नंतर कळालं इंडियन चायनीज बेस्ट इन दे वर्ल्ड ;)
ReplyDeleteफोटोंबद्दल तिव्र निषेध!
जिप्सी माझ पण फेवरीट...भन्नाट खादाडी केली आहेस. मी जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा वेजच होतो..४ वर्ष नॉनवेज सोडला होत मध्ये, म्हणून असा म्हणतोय ;) पण तिथल जेवण आवडला मनापासून. आता नॉनवेज खादाडी करूच. सकाळी सकाळी अशी भरलेली डिश बघून भूक लागली बघ....नि..षे..ध :)
ReplyDeleteअजून तरी जिप्सीत जाण्याचा योग आला नाहीये.
ReplyDeleteफोटो पाहून लवकरच योग जुळवून आणले पाहिजेत अस दिसतय.
चायनीज साठी चायना टाउन की काहीतरी नाव असलेले एक हॉटेल आहे फझुलभायच्या शेजारी तेपण छान आहे. भुक लागली सकाळी सकाळी इतकं सगळं बघुन.. निषेध..
ReplyDeleteजिप्सी सही आहे यार !! मलाही बरेच दिवस झाले तिथे खादाडी करुन! चायनिज गार्डन तर आमची हक्काचे जागा !! अजुन एक सांगतो, माहिमला सारस्वत कॉलिनीच्या इथे पॉल्स चायनिज आहे ! रात्री अपरात्री उशीर झाला जेवायला कि अगदी दीड - दोन वाजताही तिथे चायनिझ मिळते... हे सर्व मित्रांबरोबर शेअर करुन वर्ष होत आलयं !! तुझ्या पोस्टवर कमेंट टाकतोय पण खरं तर त्या सगळ्या मित्रांची आठवण येतेय..... :)
ReplyDeleteकिती हा छळ करशील तू... एकतर अजून मी धड ना इकडे धड ना तिकडे अशी आणि त्यातून तुझ्या जिप्सीच्या आठवणी.. भरीत भर फोटूही... णिशेध.
ReplyDeleteबाकी मी जवळच असते ना तुझ्या तर तुला लगेच चायनीज खिलवले असते गं... इतक्या लांबून कसं जमावं ते... जाऊ दे. तुला एक फोटू धाडते... :P
जिप्सी... हम्म्म... कभी हम भी पडीक हुवा करते थे... :)
सकाळी सकाळी हे एवढे भारी फोटू दाखवल्याबद्दल ढी षे ण (चायनीज भाषेतला णी शे ढ ;) )
ReplyDeleteआमच्या घराजवळच एक 'चायना स्पाईस' नावाचं हॉटेल आहे. आजचं डिनर तिथेच ;)
ऊं शाब्जी हमकू नाक्ये के गाडीवाला न्येपाली चायनीश पोशंद हे :)
ReplyDeleteछशिटला फाईव्ह स्पाईस मध्ये आमचा कंपू जमतो अधूनमधून, तिकडे दलाल स्ट्रीट जवळ नोकरीला होतो तेव्हा ऑफीसवाल्यांना मी चटक लावलेली, क्वान्टिटि पण बरी देतात भरपेट दाबून खायचं अगदी :)
हा हा हा आनंद....खरं तर च्यामारीकेतल्या चायनीजची पण सवय झाली पण आठवण येते ती आपल्या चायनीजचीच ...आणि नेमक चाईनीज खायचं वेदर इथ सारखंच येत....:(
ReplyDeleteतुला काय तू पटकन तिथे जाऊन आतापर्यंत हाणून आला असशील....आम्ही आहोत नुसते फोटू पाहत....
Indian Chinese is best in the world.
सुहास जिप्सीच्या नॉनवेजसाठी मलाही पुढच्या वेळी जावं लागेल...
ReplyDeleteसचिन जोडीने जायला चांगली जागा आहे ती....:)
ReplyDeleteमहेंद्रकाका चायना टाउन माहित नाही...तुम्हीच घेऊन जा एकदा....चायनीज खायला माझ्यापेक्षा माझा नवरा कधीही तयार असतो....
ReplyDeleteतुम्ही मध्ये एक आरुषचा video असलेली पोस्ट पाहिलेली दिसत नाही...म्हणून मी पण नि षे ध...
दीपक, खादाडीची आठवण आली की सगळी लोक बरोबर गोळा होतात हे पाहतेय...तुझ पॉल्स चायनिज आपण पुढच्या वेळी नक्की जाऊया....
ReplyDeleteश्रीताई तू पुन्हा ब्लॉगवर दिसतेस हे पाहून बर वाटतंय.....आता लवकरच तू आमचा छळ करशील तेव्हा आम्ही निषेधाच्या खलित्यांचे काय करायचे ते पण सांग....
ReplyDeleteहेरंब, आम्ही नव्या जर्सीत एक "नान किंग" म्हणून होत, त्याच्याकडे एकदम आपल्या चवीचं चायनीज खायचो..तुझ्याजवळ तो असेल तर ट्राय कर...नक्की आवडेल...माझ्या एका गुज्जू मित्राने सुचवला होता म्हणजे त्यांचे शाकाहारी पर्याय पण असतील...
ReplyDeleteअरे प्रसाद तुला काय वाटल मी आधी कधी जिप्सिमध्ये का नाही गेले?? आपुनको भी नाकेका चायनीज गाडी अच्छा लगता था और परवडता भी......पर तब सारे screw tight थे न...आजकल वक़्त के साथ थोडे ढिले हो रहे है लगता है
ReplyDeleteWTC ला एका client कडे जायचो न तिथे लंचला आमची सगळी टीम आणि client कडचा manager पण सगळे मिळून गाडीवर खायचो......जास्त तेलकट असता म्हणून जास्त टेस्टी पण...:) आणि हो माणूस बघून ताट भरतात तिथे.....कुणी उपाशी राहायला नको....
जिप्सी सही आहे यार ,सुदर हॉटेल मोहन वाघच तर ठरलेले हॉटेल ,जिभेचे सर्व( चोचले) पुरविणारे हॉटेल, श्रमाचा थकवा निघून जातो हे तर कळत नाही नंतर शिवाजी मंदिर जवळच आहे,आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद महेशकाका...दादरचा तो परिसर माझ्याही मनाच्या कप्प्यात कायम असतो...मोहन वाघांचं जिप्सी लाडकं होतं हे तुमच्यामुळे समजलं ..
ReplyDeleteChinese food?? काय बोलू?
ReplyDeleteबोलेन तितके कमिच.
पण Indian Chinese मला अजिबात खाता येत नाही. Authentic Chinese,ते ही China मधे खाल्ल्यावर कुणाचे ही तेच होईल.
मीनल (ताई), ब्लॉगवर स्वागत....
ReplyDeleteमी चायनामधलं चायनीज खाल्लं नाहीये त्यामुळे भारतीय चायनीज रुळलंय बाबा जीभेवर..
आमच्या ओळखीच्यातला एक शाकाहारी अमेरिकेत येऊन चिकन खायला शिकला त्यामुळे त्याला भारतीय पद्धतीचं मसालेदार चिकन आवडत नाही याची आठवण झाली मला तुमची कमेन्ट वाचुन...
जीव वेडापिसा झाला.
ReplyDeleteउगाच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि आता दाताखाली जीभ आली.
आता मनातील उसळेल्या आठवणीच्या धगधगत्या यज्ञ कुंडाला पोस्ट ची समिधा देऊन तृप्त करतो. अर्थात हे आता जर्मनी आणि इटली च्या फुटबॉल सामन्यानंतर शक्य होणार
कारण माझ्यात व माझ्या पत्नीत द्विपक्षीय करार झाला आहे. फुटबॉल मध्ये तिच्या देशाला तर क्रिकेट मध्ये तिने माझ्या देशाला पाठिंबा देणे
तेव्हा वचनपूर्ती करणे आले.
हा हा हा निनाद...:)
Deleteजर्मनी आणि इटली दोघांनाही शुभेच्छा...मी सध्या फ़क्त आणि फ़क्त विंम्बल्डनमय आहे...:)
अवांतर -- आमच्याकडे एकंदरीत खेळ डिपार्टमेंट बेटर हाफ़ चांगल्या प्रकारे सांभाळतो...मी उगाच तिथे ढवळाढवळ करत नाही.....बरं झालं आठवलं आज मला त्याच्या बेसबॉल मॅचमुळे मुलांना पाळणाघरातून आणावं लागणार आहे आणि अर्थातच आम्ही तिघं (म्हणजे मी आणि मुलं) त्याला गेमसाठी चिअर अप करणार आहोत...अर्थातच त्यातलं ओ की ठो कळत नसलं तरी....(मुलांना वयामुळे आणि मला असंच रस नसल्याने काहीच कळत नाहीये) त्यामुळे टोटल गेसवर्कवर हे काम करायचंय....हे हे.....:)
Enjoy....and keep reading/writing :)