Friday, February 12, 2010

फ़ुलोरा..चांदोबा चांदोबा

वय वर्ष दोन चालु झालं की मुलांना आकाश दिसायला लागतं म्हणजे खर्‍या अर्थाने..वरून जाणारी विमानं आणि पक्षी पहिले दिसतात पण घरी जर आजी असेल तर ती रात्र झाली की नातवाला हमखास चांदोबा दाखवते आणि मग हा चांदोमामा पुढे संपुर्ण बालपणचा सवंगडी बनतो. आमच्याकडेही सध्या ही फ़ेज चालु आहे. त्यामुळे रात्री दूध प्यायचं नसलं किंवा झोपायला टंगळमंगळ झाली की आम्ही सरळ चांदोमामाला सांगतो आणि मग आमची बरीच कामंही होतात..फ़क्त सध्या जिथे आहोत तिथल्या हिवाळ्याचा एक मोठा प्रश्न म्हणजे इथे सारखं पावसाळी असतं आणि पाऊसही असतो. त्यामुळे आम्ही आपलं "चांदोबा चांदोबा कुठे रे गेला?"चा धोश लावतो..पण तरी तो असतो असं सांगुन ठेवलंय त्यामुळे आधी सांगितलेल्या प्रसंगी चांदोमामा खूप उपयोगी पडतो.

माझ्या लहानपणी हे गाणं आम्ही भावंडं रेडिओवर ऐकुन ऐकुन खूप म्हणायचो. त्यामुळे जसंच्या तसं लक्षात आहे. मला त्याची mp3 शोधायला खरं म्हणजे कंटाळा आला आहे. त्यात तिन्ही कडव्यांची चाल वेगवेगळी आहे त्यामुळे माझाही थोडा गोंधळ झाला आहेच पण पुन्हा रेकॉर्ड करायचा कंटाळा...फ़ॉर चेंज मी ते माझ्या बाळाला ऐकायला रेकॉर्ड केलं ते इथे उपलब्धही आहे. (पण आपल्या जबाबदारीवर ऐका ही तळटीप..)
अरे आणि हो हे गाणं आशा भोसले आणि वर्षा भोसले यांनी गायलंय हे माहित असेलचं पण ते ग.दि.माडगुळकरांनी लिहिलंय हे आताच मायाजालावर कळलं तर माझा आनंद अजुनच वाढलाय. त्यामुळे या महिन्यासाठी चांदोबाच गाणं सगळ्या बालदोस्तांसाठी आणि ज्यांनी हे त्यांच्या लहानपणी ऐकलं असेल त्या सगळ्यांसाठी....

चांदोबा चांदोबा भागलास का?
निंबोणीच्या झाडाखाली लपलास का?
निंबोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी

आई-बाबांवर रुसलास का?
असाच एकटा बसलास का?
आतातरी परतून जाशील का?
दूध अन शेवया खाशील का?

आई बिचारी रडत असेल
बाबांचा पारा चढत असेल
असाच बसून राहशील का?
बाबांची बोलणी खाशील का?

चांदोबा चांदोबा कुठे रे गेला?
दिसता दिसता गडप झाला
हाकेला ओ माझ्या देशील का?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का?

17 comments:

 1. आमच्या लेकाच्या युट्युबच्या प्लेलिस्ट मध्ये आहे हे. पण हे गाणं सुरु झालं कि मानच फिरवतो पठ्ठ्या.. बहुतेक अॅनिमेशनमुळे असेल. गाणं मस्त आहेच..

  त्याची युट्युब लिंक (Just in case)
  http://www.youtube.com/watch?v=y4oc_OEIfEo

  ReplyDelete
 2. अरे हेरंब, just in case काय? बरं केलंस दिलीस ते..मी नं जरा आळशी झालेय आजकाल. खरं सांगते...त्यामुळे जेवढं मला आठवतं (आणि जसं) या basis वर काही गोष्टी करते झालं...पण या लिंकच्या आजुबाजुला बाकी पण बर्‍याच गमती आहेत. त्याही दाखवेन आरुषला...
  आणि आदितेय लहान आहे म्हणून रे... जेव्हा तो प्रत्यक्ष चांदोमामाला पण पाहिल ना तेव्हा स्वतःच सांगेल ते गाणं लावायला....

  ReplyDelete
 3. मस्त आहे गाणं
  चांदोबा मला खूप आवडतो
  हे नक्षत्रांचे देणे मधलं श्रीरंग गोडबोलेंच गाणंही ऐक

  http://www.youtube.com/watch?v=SvmkzMemDPw

  ReplyDelete
 4. हो प्रसाद..."आता खेळा नाचा" म्हणून एक व्हिसीडी सेट आहे घरी त्यात पाहिलंय..फ़क्त रसिका जाम डोक्यात जाते असं आमचं दोघांचं म्हणणं आहे...:)

  ReplyDelete
 5. aparna, so sweet ...he song iekun ajun ek athavala bagh ,...Nimbonichya zadamage chandra zopla gg bayi ... pan jara farach senti aahe nahi ka

  ReplyDelete
 6. स्वागत श्रद्धा...अगं निंबोणीच्या झाडाखाली खरंच सेंटिच आहे...म्हणून चांदोबाची आठवण काढायची असली की मला हे गाणं जास्त बरं वाटतं.....अशीच भेट देत जा....

  ReplyDelete
 7. चांदोबा चांदोबा भागलास का?
  बिल्डींग च्या टेरेस मागे लपलास का?
  टेरेस ला पत्रे भारी..
  चांदण्यांची हि लपते स्वारी..
  डोकावून बघू कुठे दिसतोस का?

  या काळातील गाणे कदाचित असेच असावे नाही का?

  ReplyDelete
 8. अखिल अगदी बरोबर बोललास... प्रसादची लिंक पहा त्यात तसंच version आहे...

  ReplyDelete
 9. valentine sathi navin post postalay te vach..

  ReplyDelete
 10. शोमू बाळ असताना माझी आई बरेचदा हे गाणे म्हणत असे. खूप आठवण येतेय त्या क्षणांची...मन-डोळे भरून आले गं.

  ReplyDelete
 11. खरंय भाग्यश्रीताई...माझी काही काही अंगाईगीतं अशी माझ्या भाचीच्या नावावर आहेत आणि ती आरूषला चालणार नाहीत असं ती म्हणते...

  ReplyDelete
 12. माझपण एक वन ऑफ़ दी फ़ेवरीट गाण आहे हे...का माहीत नाही पण पोस्ट वाचता वाचताच ’सांग सांग भोलानाथ’ पण आठवल मला..

  ReplyDelete
 13. देवेंद्र, खरं तर मलाही कधीकधी असं होतं..एकदा ती लहान मुलांची गाणी सुरू झाली की एकापाठी एक बरीचशी आठवतात.....पाऊस न पडण्याचं एखादं गाणं इथल्या पावसाला पाहून म्हणावंसं वाटतंय....:)

  ReplyDelete
 14. आम्ही लहानपणी हे बडबडगीत असे म्हणायचो..

  चांदोबा चांदोबा भागलास का
  निंबोणीच्या झाडामागे लपलास का.

  निंबोणीचे झाड करवंदी
  मामाचा वाडा चिरेबंदी.

  मामाच्या वाड्यात जाऊया
  तुपरोटी खाऊ या

  तुपात पडली माशी
  चांदोबा राहीला उपाशी....

  ReplyDelete
 15. धन्यवाद बाबासाहेब आणि स्वागत...चांदोबाचं तुम्ही लिहिलंत ते तर अजरामर गीत आहे..
  पण रेकॉर्ड केलेल्या अनेक छान छान गीतांपैकी ब्लॉगपोस्टमधलं एक सुंदर अंगाईगीत आहे....

  ReplyDelete
 16. मला तर बाबासाहेबांनी वर दिलेलं गाणचं माहीत होतं. तेवढाच ऐकलं होतं लहानपणापासून. खरं गाणं तुमच्या पोस्ट वर वाचतोय आत्ता.

  ReplyDelete
 17. हा हा सिद्धार्थ..माझ्या लहानपणी रेडिओवर यायचं म्हणून माहित आहे..आजकाल रेडिओवर काय येतं आणि कुठच्या चॅनेलवर काही माहित नाही....

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.