Thursday, February 4, 2010

एक बंदिस्त क्षण...

आज बरेच दिवसांनी एक दुपार जमुन आली. बाहेर पावसाळी, आत मस्त हिटर लावल्यामुळे बाळ शांत झोपलंय आणि बाहेरच्या खोलीत फ़ायरप्लेसच्या बाजुला वाफ़ाळता चहाचा कप आणि एक पुस्तक घेऊन मी...बसल्या बसल्या अचानक जाणवलं की हे असं मागे कधी केलं होतं आठवत नाही म्हणून मग या जाम्यानिम्याचा लगेच एक फ़ोटो काढुन जणू काही या क्षणालाच कॅमेर्‍यात बंदिस्त केलंय...

फ़ोटोग्राफ़ीसाठी केलेला हा उद्योग नव्हे..त्यामुळे फ़ोटो कसा आहे त्यापेक्षा ही दुपार, हा फ़ोटो पाहिला की नेहमी आठवेल हेच काय ते पाहिलंय...खरं पाहिलं तर किती साधे क्षण असतात जे आपल्याला सगळ्यात जास्त आनंद देऊन जातात..जगातलं कितीही महागडं फ़र्निचर घेऊन दिलं तरी मला एक ऊशी पाठीला लाऊन जमिनीवर बसून अर्धवट दुमडलेल्या पायावर पुस्तक ठेऊन ते वाचायला फ़ार आवडतं. कॉलेजलाइफ़मध्ये याच पोझिशनमध्ये मी जर्नल्सपण लिहायला बसे..टेबल-खुर्ची मिळाली की टेबलावर डोकं ठेऊन चक्क झोपा काढाव्याशाच वाटत...
आता इथेही उजवीकडे सोफ़ा लावल्यानंतर ही थोडी जागा ठेऊन जो कोपरा तयार झाला ना त्यात त्या ऊशीला टेकुन पुस्तक वाचणं म्हणजे अहाहा...डाव्या हातात कप घेऊन वाचणारा माझा चेहरा त्यात स्वतःलाच दिसायला लागतो....त्यात दुसर्‍या बाजुला फ़ायर प्लेस म्हणजे दुधात साखर. आणि चहा म्हणजे तर काय...ये हुई नं बात....बसं इतनाही काफ़ी है और मुड चेंज...

25 comments:

  1. mast ge ekdam .......ag me kittek diwasat pustak kay paper pan nahi vachala ofc aani ghari pillu no time at all .........sakali uthale ki aadhi ofc la palate karan mag ghari lavkar jata yete aani ghari gele ki full time leki = aste karan etaka vel ofc madhe aste mhanun hehehhe chalo ........sahi aahe tuza bandist kshan ............ -Ashwini

    ReplyDelete
  2. धन्यवाद अश्विनी...अगं खरं सांगु का मी पण सध्या फ़क्त मुलासाठी आणलेली लहान मुलांची पुस्तकंच वाचते...आणि हे दिसतंय नं तेही खरं तर एक अभ्यासाचं पुस्तक आहे...बरेच दिवसांपास्नं सुरू करायचं होतं..आता ते किती दिवस लावणार माहित नाही पण हा त्या पुस्तकाचा श्रीगणेशा झाल्याचाही क्षण आहे....:)

    ReplyDelete
  3. आम्ही इथे गाणं गुणगुणतोय.. दिल ढुंढता है.. फिर वहीं.. फुरसतके रात दिन...
    :)

    ReplyDelete
  4. सुख म्हणजे अगदी हेच ग ... मला तर बॅकग्राऊंडला मस्त जुनं हिंदी गाणं किंवा कुमार गंधर्व पण ऐकू येताहेत तुझा फोटो बघितल्यावर ! :)

    ReplyDelete
  5. chhanach..mala khup aavadla photo..lekhahi mastach jhalay..

    ReplyDelete
  6. महेन्द्रकाका...:) :) बडबडगीतांचा अतिरेक चाललाय घरात त्यामुळे एक दिवस चक्क चेंज म्हणून "आयुष्य हे चुलीवरल्या" या गाण्याला थोडं स्पीड कमी करुन त्याचं अंगाईगीत करायचा प्रयत्न केला..नाहीतर "आई आई ये इकडे" ने भंडावलंय सध्या...(मला नाही लेकाला कारण आई शब्द प्रत्येक गोष्टीच्या सुरुवातीला असतो आणि त्यामुळे गाण्याच्या फ़र्माईशीसाठीसुद्धा...)

    अरे हो कॉमेन्टबद्द्ल धन्यवाद आणि हे दिल ढुंढता है अगदी चपखल बसतंय..

    ReplyDelete
  7. गौरी धन्यवाद...साध्यासुध्या गोष्टींमध्ये खरंतर सुखाचा साठा दडलेला असतो...आणि हो या पार्श्वभुमीला गाणं तर हवंच..

    ReplyDelete
  8. धन्यवाद मुग्धा आवर्जुन लिहिल्याबद्द्ल....:)

    ReplyDelete
  9. क्षण बंदिस्त आहे म्हणण्यापेक्षा.. खूप कल्पक आहे असे म्हणणे जास्त योग्य आहे..
    कारण त्यातून बघ न किती जणांना किती फील झाल ते..
    कुणाला गंधर्वाचे गाणे ऐकू आले, तर कुणाला दिल धुंडता ही...
    त्यामुळे क्षण संपला आहे पण तो पुन्हा पुन्हा जिवंत होणारे.. म्हणून त्याला
    अमरत्व लाभले आहे असे म्हण... बंदिस्त होण्याचा क्षण म्हणण्यापेक्षा..

    लहान तोंडी मोठा घास असेल तर माफ कर...

    रूप तेरा मस्ताना.. फोटो मध्ये तू नसताना..
    तुला कुठे शोधावे सांग न...?

    ReplyDelete
  10. वा. वर्णन वाचून आणि फोटो बघून माझा पण मूड जमलाय एकदम. काहीतरी टंकून टाकतोच आता :-)

    ReplyDelete
  11. kharach sadhe sadhe shan astat te aaplyala kititari sukh deun jatat

    ReplyDelete
  12. असे काहीक क्षण घालावण्यासाठी मी चाललोय उदया मायदेशी... आणि बरोबर तुझी ही पोस्ट ...:) वा.. क्या टायमिंग है...!!!

    ReplyDelete
  13. ह्म्म्म्म्म अखिल तुझ्या प्रतिक्रिया नेहमी बोलक्या असतात आणि हो रे या क्षणानं प्रत्येकाला काही ना काही वेगळं आठवून दिलंय म्हणून त्याला कल्पक म्हणायला हरकत नाही...
    आणि आता मस्ताना बिस्ताना रुप माहित नाही बघुया एखाद्या दुसर्‍या कुठल्या क्षणासाठी माझच चेहाअ योग्य असेल तर दिसेल नं ...:)

    ReplyDelete
  14. हेरंब टंक टंक बाबा..काय रात्रीचा दिवस चालु आहे का तिथे जर्सीत??

    ReplyDelete
  15. धन्यवाद आनंद आणि विक्रम...

    ReplyDelete
  16. रोहन इतकं काही जळवायला नको..आमचे प्लान्स फ़िक्स झाले की आम्हीही येऊच रे मायदेशी...फ़क्त फ़िक्स करता करता कुठे काही फ़िसकटायला नको...जा मजा कर...

    ReplyDelete
  17. मस्तच गं....अगं मलाही परवा गौरा शाळेत गेल्यावर असचं झालं होतं...........बराच वेळ सुचेना काय करावे......मग जुनी (उमेदीच्या काळातली :) अमितबरोबरची) अनेक गाणी ऐकली.....ऑर्कूट बघ माझे बरलेय व्हिडिओनी काठोकाठ.........

    ReplyDelete
  18. खरंय मुलांनी आपलं विश्व एवढं व्यापलेलं असतं नं की थोडा वेळ जरी ती नसली की एकदम असं वाटतं की किती वेळ आहे आता आपल्याकडे नी काय....आणि अशावेळी गाणी आपल्याला सगळ्या मागच्या क्षणात फ़िरवुन आणतात हो की नाही??

    ReplyDelete
  19. अहाहा! आणखी काय हवं गं?

    इथेही अशी थंडी पडावी,
    शेकोटीची हलकी उब मिळावी,
    वाफाळता कप चहाचा सोबतीला,
    पुस्तकात माझीच प्रतिमा दिसावी

    ReplyDelete
  20. छान आहे हा निवांत क्षण! आणि सोबत चहा....त्यातून तो वाफाळता, आल्याचा, मलाई मार के असेल तर अहाहा!!! :-)

    -- अरुंधती
    Sing, Dance, Meditate, Celebrate!
    http://iravatik.blogspot.com/

    ReplyDelete
  21. स्वागत कांचन आणि तुम्हा लोकांना अशा पटापट कविता कशा काय सुचतात बॉ याचं मला नेहमीच नवल आहे...यावर्षी मुंबईत पण थंडी आहे थोडीफ़ार असं कळतंय...फ़क्त शेकोटी बाहेर पेटवावी लागेल..

    ReplyDelete
  22. अरूंधती वाफ़ाळत्या आणि आल्याच्या चहावाले बरेच असतात पण आज मला बर्‍याच दिवसांनी मलईवाल्या चहाची आठवण करून दिल्याबद्द्ल धन्यवाद...मागे कित्येक वर्ष चहात खास साय टाकुन मी घ्यायचे..इथल्या दुधाला मुळात दूध म्हणावं का? इथुन सुरुवात आहे..मलई-बिलई फ़ार दूर ....चला मला कुणीतरी मलईवाला चहा पिणारंही भेटलं म्हणायचं....

    ReplyDelete
  23. एकदम मोक्याची जागा पकडून निवांत बसलेली तू... ( आजकाल हा योग जरा दुर्मिळच झालाय ना? )सहीच.आखिलशी सहमत.:)

    ReplyDelete
  24. आजकाल हा योग जरा दुर्मिळच गं............

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.