खेकडेगिरी झाली आता हा नेटोपास म्हणजे काय प्रकार आहे बुवा? तर संधी सोडवा हे जे काही शाळेत आपण करायचो त्याप्रमाणे नेट + उपास असं म्हणजे "नेटोपास" की नेटुपास??. जाऊदे साध्या सरळ सोप्या शब्दात एक दिवस नेट बंद. बंद म्हणजे संपुर्ण बंद. जे जे काही नेट वापरुन आपण करतो ते सर्व एका दिवसासाठी बंद. थोडक्यात मायाजालात एक दिवसासाठी गुरफ़टायचं नाही.
आता हा जो रविवार गेला त्यादिवशी मी खास हा एक दिवसाचा नेटोपास केला होता. कारण असं काहीच नाही. तसं बरीच वर्षे म्हणजे अमेरिकेत आल्यापासुनचा जवळजवळ सगळाच काळ आपण मायाजालात पुरते गुरफ़टलोय हे लक्षात आलं होतं पण त्याला काही इलाज नाही असं वाटत होतं. म्हणजे अगदी मायदेशातले चित्रपट, बॅंकेचे व्यवहार, कामासाठी करावी लागणारी प्रवासाची रिझर्वेशन्स, जुन्या मित्र-मैत्रीणींबरोबर संपर्क सगळं कसं एका ब्राउजरवर गेलं की खतम... त्यामुळे आपण हळूहळू याचे व्यसनी होतोय हे मान्य केलं नव्हतं. शिवाय मुख्य म्हणजे त्याला काही पर्यायच नाही हेच मनात ठसलं होतं.रोज उठलं की आंघोळ करून देवाला पाया पडायच्या संस्कृतीतले आपण आजकाल पहिलं लॅपटॉप चालु करून बातम्या, मेल नाहीतर असेच काही उद्योग करतोय यात काही गैर आहे असंही वाटलं नव्हतं. अर्थात गैर आहे का हा दुसरा मुद्दा पण हेच काही जग नव्हे याची जाणीव आताशा जास्त होऊ लागलीय.
भांडणं करणं आणि रुसवे-फ़ुगवे हे नवरा-बायकोच्या आयुष्यातलं एक अविभाज्य अंग आहे हे मान्य पण आताशा बर्याच भांडणाच्या मुळाशी हे मायाजालात गुरफ़टणं कारणीभूत आहे असंही लक्षात आलं. शिवाय पुर्वी सारखं आता फ़क्त आपले आपण नसतो.आणखी एका जीवाला आपण या जगात आणलंय तर त्याचं दाणा-पाणी सोडूनही बर्याच गोष्टी आहेत ज्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि त्यासाठी मुळात आपण उपलब्ध असलं पाहिजे. बघावं तेव्हा आपण नेटवर खिळलोय हेही चांगलं नाही. म्हणून मग एक सुरुवात म्हणून हा प्रयोग खास रविवारी केला. एकतर सुट्टीचा वार म्हणजे तसं मागे कुठला वाघ लागला नाहीये. काही कामं थोडी निवांत केली तरी चालणारेत.
आता एक दिवसाचं मायाजालात गुरफ़टायचं नाही म्हणजे काय मग लॅपटॉपच कशाला चालु करा (आणि मोहात पडा एकतर वायरलेस कनेक्शन म्हणजे अस्तनीतला निखारा) म्हणून मग एक दिवस लॅपटॉपकडे पाहिलंच नाही.नेमकी खेकडेगिरीवर शनिवार-रविवारी वाचलेल्या प्रतिक्रिया असतील त्यांचाही मोह नको.मस्त सगळा वेळ घर, मुल आणि अशाच गोष्टींसाठी दिला. तरी नंतर दुपारनंतर कासावीस व्हायला झालं. काही नाही तर निदान आय-पॉडतरी चालु करुया असं वाटलं म्हणून मग तो मोह टाळण्यासाठी बर्याच दिवसांनी एकटी स्वतःसाठी वाचनालयात गेले.
अर्थात तिथेही नेटची सोय आहे पण आपल्याला तो विभाग माहितच नाही असं उगाच स्वतःलाच दाखवलं. खरं म्हणजे या भागात आल्यापासुन मी या वाचनालयाच्या फ़क्त बालविभागालाच जास्त भेट दिली आहे. आज तशीही एकटीच आले होते म्हणून जरा एक मोठ्यांच्या विभागाचाही रिव्ह्यु केला. खरंच खूप छान आहे यांचं कलेक्शन. C.D. section मध्ये भारतीय प्रवर्गात पं. रविशंकर आणि इतर क्लासिकल सी.डी पण आहेत शिवाय पुस्तकांबद्द्ल काय बोलावं. अगदी नवी पुस्तकं सुरुवातीलाच मांडून ठेवलीत. त्यातून एक पुस्तकही घेतलं.आणि तिथेच एका सोफ़्यावर बसून अर्धा-एक तास निवांत वाचत बसले. त्या पुस्तकाबद्द्ल पण जमलं तर लिहिन. सध्या फ़क्त नाव लिहिते my prison, my home काय योगायोग आहे. पण अर्थात याचा विषय वेगळा आहे. इथे होम हे तिच्या स्वदेशाबद्द्ल आहे. असो..मी खरंतर नाव वाचुन उचललंय आणि मग वाचायला बसले तेव्हा आवडलं म्हणून घेतलंय. आता किती सातत्याने वाचायला जमतंय देव जाणे. खरंतर कदाचित अजून बराच वेळ वाचत बसले असते पण घड्याळाकडे लक्ष गेलं तेव्हा म्हटलं लेकाची उठायची वेळ झाली असेल आणि बाबाला सुचनाही जास्त दिल्या नाहीयेत त्यापेक्षा गेलेलं बरं.
निघताना लक्षात आलं की छान सुर्यप्रकाश पडलाय त्यामुळे मग घरी आल्यावर पुन्हा लेकाला घेऊन बाहेर पडलो. बरेच दिवस झाले त्याला पावसाळी बुट घ्यायचे होते त्यानिमित्ताने बरीच सटरफ़टर खरेदी करून अंधार पडल्यावर घरी आलो.
रात्रीची जेवणं उरकून मुलगा झोपल्यावर पुन्हा तोच नेटचा भुंगा डोकं पोखरत होता पण यावेळी आय-पॉडवर पु.ल.ची "नवे ग्रहयोग" ऐकत बसले. तसंही जवळजवळ रोज रात्री मी पु.ल. ऐकते. झोपायच्या थोडा वेळ आधी थोडं हलकंही वाटतं आणि काहीवेळा दिवसभर काही ऐकणं झालं नसलं की मग मला हेच बरं वाटतं.
सरतेशेवटी सोमवारी उठल्यावर मात्र बास झालं चला सोडुया आता उपास असं म्हणत होते असं म्हणून एकदाची मेलबॉक्स उघडली आणि गुगलबाबांनी नेमकी साइन इन करता करता लगेच टिप दिली, If you have forgotten password for this email id, do you remember we can send it to *****@***.com?? Gosh!!! मी म्हटलं यालाही कळलं की काय काल एका माणसाचा नेटोपास होता म्हणून....
mala hi asach ek diwas netopas karayacha to pan agdi kadak. :-)
ReplyDeletetula jamala tyabaddal abhinanadan, pan internet la mi tari khup addict jhaloy he ya nimitaane janavala
मी हल्ली ठरवून शनिवार - रविवारी नेट बघत नाही. रोज काम आहे म्हणून किंवा काम नाही म्हणून ... जागेपणाचा बराचसा वेळ नेटला चिकटूनच जातो ना ... त्यामुळे शनिवार - रविवारी कितीही तलफ आली तरी नाही जायचं असं ठरवलंय!
ReplyDeleteह्याला काहीस virtual world म्हणतात..
ReplyDeleteत्यात आपण impatient होतो का माहित नाही
पण अस ब-याच जणांचे होते.. थोडक्यात 'सवयीच' वजन वाढत...
मग नेतोपास ची संकल्पना छानच..
मी हि अधून मधून अस करतो... पण मग impatient होवून...
mobile वर कुठला नवीन मेल, कॉमेंट आली आहे का ते चेक करत असतो...
बिल आले कि मग वाटते नियंत्रण करावे... mobile मेल cheking वर..
आजच नवीन बिलिंग cycle सुरु होणारे... एकही नवीन मेल mobile वर चेक केलेला नाही..
मोबिलोपास.... अस काहीस आपण म्हणू शकतो त्याला...
त्यात रविवार तर क्रिकेट tournament मधेच जातो..
पण घरी आल्यावर काय?
वैयक्तित जीवनात अशा गोष्टीना वेसण घालणारा साथीदार मिळत नाही
तोपर्यंत असला उपास टिकण कठीण आहे...
आणि आपल्याकडे...उपासाला खादीला चालणारे पदार्थही खूप असतात...
त्यामुळे नेतोपास बरोबर मोबिलोपास देखील केला तरच diet होवू शकते सवयीचे..
बाकी प्रतिक्रिया थोडी मोठी झाली पुन्हा..
त्याबद्दल माफी असावी...
एकूणच.. छान वर्णन...आहे... लिहिण्यासारखे खूप आहे.. पण प्रतिक्रियेत इतकेही लिहू नये कि वाचणारा प्रतिक्रिया वाचायला कंटाळेल...
carry on
यालाच म्हणतात एक उनाड दिवस... ;-)
ReplyDeleteमाझंही बरचंस असंच आहे...इथे तर राहवतचं नाही, पण घरी गेल्यावर केवळ पुतनीसोबत खेळणे आणि शांत झोप घेणे हे कार्यक्रम असतात.
नेतोपास लयच भारी शब्द हा हा
ReplyDeleteआपण खरच या नेटच्या कधी आहारी जातो हे समजत नाही माणसाला
कधी नेट बंद पडले तर अस्वस्थ होऊन जाते
तोह्द्क्यात काय तर नेटच्या व्यसनावर नेतोपास हा एक रामबाण उपाय आहे ;)
जीवनमूल्य
वा. एकदम (माझिया)मनातलं लिहिलं आहेस. हा म्हणजे कळतं पण वळत नाही वाला प्रकार आहे. आणि आंतरजालामध्ये गुरफटण्यामुळे होणारी भांडणं याला तर १००% मार्क..
ReplyDeleteमी पण म्हणतोय कि हा नेटोपास आता सुरु करावाच. सुरुवातीला १ दिवस नाही जमलं तरी १ तास तरी. आणि तो तास म्हणजे 2 AM to 3 AM :P
अजय अरे एकदा प्रयत्न करुन पहा. जमेलही...
ReplyDeleteगौरी तू शनिवार-रविवार दोन दिवस हा उपवास करतेस म्हणजे कमाल आहे..अभिनंदन...
ReplyDeleteअखिल माझ्या साथीदाराला काही मी नेटबाबत वेसण घालु शकले नाहीये...त्यामुळे खयाली पुलावासाठी हा विचार बरा आहे असं मी तरी म्हणेन...यावेळीतरी मी या उपासाला रोजासारखं कडकच केला म्हणून अगदी आय पॉड (टचवाला) सुरूच केला नाही..पण तुझा मोबिलोपासही प्रयत्न करुन बघ....good luck...
ReplyDeleteआणि प्रतिक्रिया वाचायला कसला रे कंटाळा...या ब्लॉगवरच्या कितीतरी नोंदी तुझ्यासारख्याची वाटही पाहात असशील...:)
अरे हो आनंद हे उनाड दिवसाचं लक्षातच आलं नाही....शांत झोप घेणे हा कार्यक्रमही बरेच रात्रीत केला नाहीये..अर्थात मूल लहान असलं की its given म्हणा....
ReplyDeleteविक्रम प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद...आपणही असा प्रयत्न करुन पहा म्हणजे मग या रामबाणाचा फ़ायदा कळेल...
ReplyDeleteहेरंब एकदा मुलाच्या छोट्या छोट्या developments मध्ये अडकलास की जमेल आपसूक...आणि तू २ ते ३ केलास तरी पावलास...कधी कधी तू तेव्हाही नेटाने नेटवर असतोस असं मला वाटतं....remember I am 3 hours behind...so it would still be just 12 here....
ReplyDeletehehehe me pan Saturday/Sunday agdi ofc madhun urgent kam asel tar ch connect hote pan te fakt kam karanya sahti no surfing ................ -ashwini
ReplyDeleteहम्म अश्चिनी तिथे जमवता तरी येईल. इथे भारतीय वृत्तपत्रं, बॅंक, मायदेशातला टिव्ही सगळ्यांनाच नेटाचा आधार आहे त्यामुळे नेट बंद तर हे सर्व बंद करावं लागतं म्हणून मग असा उपास करावा लागतो...ऑफ़िसच्या कामांना खरंतर एक दिवस सुट्टी द्यायला हवी पण आय.टी.त असलं की तेही ऍडिक्शनसारखं केलं जातं
ReplyDeleteअपर्णा, आपण एकाच बोटीतल्या.... तेव्हां या नेटच्या कायमच गळ्यात पडलेल्या का त्याने आपल्याला गिळंकृत करून टाकलेय.... खरेच एक दिवस असा हवाच आठवड्यातून... पण मेलं या स्नोमध्ये दुसरे काय बरे करावे.... हेहे.
ReplyDeleteपोस्ट मस्तच झालयं. आणि चक्क आरूषवीना लायब्ररी गाठलीस...:)
हो अगं नेटच्या गळ्यात पडलं की बाकी व्याधी विसरतो....आणि तू तर बर्फ़ात बुडशील आता...सांभाळ...
ReplyDeleteआणि हो अगं कसं का होईना पण आरुषशिवाय गेले खरे लायब्ररीत...मजा आली....हे हे....
'Netopaas' shabd sahiye....
ReplyDeleteKharay pan vyasanach laagate net che... Atta bagha na 11 divasanwar pariksha aaliye mazi pan Net surfing thmabavataach yet naahiye.....
हम्म मैथिली नशीब आमचं कॉलेजजीवन संपता संपता नेट आलं ते नाहीतर आम्ही गटांगळ्या खात तिथेच पडलो असतो नेटच्या व्यसनाला लागून...ही ही....
ReplyDeleteअपर्नाजी,
ReplyDeleteअप्रतिम कल्पना आहे ही नेटोपासाची. नेट मराठी शब्दकोष्यात एक नवीन शब्दाची भर पडली. आपल्या ब्लोगवर कॉमेटायला छान वाटल.
धन्यवाद रविन्द्रजी..अहो कसले शब्द?? या पोस्टला एक महिना झाला की संपलं त्यांचं आयुष्य..:)
ReplyDeleteपण आपल्या कॉमेन्ट्स वाचायला या ब्लॉगलाही आवडतं...:)
नेट उपवास संकल्पना मस्त कल्पना आहे. आणि त्या दोन शब्दांची संधी तर भन्नाट आहे. पण खरच असा उपवास पंचेन्द्रीयांसाठी गरजेचा आहे.
ReplyDeleteनेट उपवास संकल्पना मस्त कल्पना आहे. आणि त्या दोन शब्दांची संधी तर भन्नाट आहे. पण खरच असा उपवास पंचेन्द्रीयांसाठी गरजेचा आहे.
ReplyDeleteनेट उपवास संकल्पना मस्त कल्पना आहे. आणि त्या दोन शब्दांची संधी तर भन्नाट आहे. पण खरच असा उपवास पंचेन्द्रीयांसाठी गरजेचा आहे.
ReplyDeleteहम्म्म अनुजाताई बरेचसे उपास गरजेचेच आहे फ़क्त ते उपासाला चालणारे पदार्थ कुठले आपण नीट ठरवलं तर बरं...असो....आवर्जुन लिहिल्याबद्दल धन्यवाद...
ReplyDeleteमी सुदधा अधुन-मधुन करत असतो नेट-उपवास...गेल्या तीन महिन्यात तर खुप नेट -उपवास घडले आहेत मला...चांगला शब्द शोधुन काढलात...
ReplyDeleteखूप उपवास म्हणजे बरंच पुण्य जमा झालं असेल आतापर्यंत...घरच्यांची बोलणी तरी कमी झाली असतील नं देवेंद्र??
ReplyDeletemasatach ga aparNa. tuze sagale post kiti lively aahet. ekdam dil se
ReplyDeletetu mast lihites.
keep writing
हे हे तुमच्याकडे हरभर्याचं झाड आहे का सखी....आवर्जुन लिहिल्याबद्द्ल धन्यवाद...आणि ब्लॉगवर स्वागत.
ReplyDelete