कालचाच नाही तर मागचे एक-दोन दिवस जरा जास्तच गडबडीचे होते..अरे मराठीब्लॉगज डॉट नेट पण करायला नाही मिळालं म्हणजे समजुन घ्या की राव..भटकंतीची लिहून ठेवलेली पोस्ट पण फ़ोटो कोलाजसाठी वाट पाहात फ़ोल्डरमध्ये पडून राहिली होती मग माझिया मनावर येऊन कसली कुरकुर करावी??
पण मग आपल्यासाठी एवढं खपून लिहिणार्या ब्लॉगर्सना वाचायला नको का? आणि वाचून आवडलं की त्यांना प्रतिक्रिया द्यायला नको का? म्हणून चक्क ctrl C आणि ctrl V ला साकडंच घातलं..भाग्यश्रीच्या पोस्टवरचं तन्वीच्या "सहीयत गं" मधला सही आणि आनंदच्या "भारीच" मधला च (माहित आहे मला हे जरा उलटच्या अ आ ई सारखं होतंय) आणि "आहेत" उचलले आणि केलं एकदाचं ctrl v झालं की नाही "सहीच आहेत?" त्याला पुढे चार पाच टिंब आणि एक माझावाला smiley दिला जोडून झालं आपलं माझ्या खर्याखुर्या प्रतिक्रियेसारखं...मग गेले हेरंबच्या पोस्टवर...बापरे त्या दारुवाली (आता तिचं हेच आडनाव होऊन जाऊदे) हं तर त्या दारूवालीचा एकदम ज्वलंत टॉपिक..म्हणजे प्रतिक्रिया नाय दिली तर हरकत नाय असा पन नाय...मग पुन्हा आनंदच्या प्रतिक्रियेबरोबर सूर जुळत होते मग घेतलं ctrl C आणि दिलं ठेऊन ctrl V..आणि खास माझं स्वतःचं +१..... आता तेवढं करता येतं की....पण प्रतिक्रिया मात्र मराठीत...चुरापावनेपण पाहिलं तर बर्याच दिवसांनी छान काहीतरी चुरून ठेवलं होतं..मग पुन्हा त्येच आपलं वरच्या मंडळीचं थोडं त्याच्याच पोस्टमधलं...ctrlcल केलं....आणि तयार झालं.."रिंग रॉंग रिंग रॉंग (रॉंग नंबरची रिंग ..... )हा हा हा.....एकदम धमाल ..............:)" नाही म्हणजे बाकी सगळं ठीक आहे पण एकदम धमाल?? काही अर्थ आहे का?? हे हे...पण राव मराठीत लिवलंय...आणि परतिकिया पण दिलीय वेळेत..(वेळेत ते एक महत्वाचं...) असो...
महेन्द्रकाकांच्या आणि रोहन यांच्या ब्लॉगवर गेलेच नाही...अजून एक-दोन तासात गेलं तरी चार-पाच पोस्ट्सचा कोटा राहिला असेल म्हणून एकदाच जाऊन घाऊकमध्ये वाचेन पण तरी अजुन काही टॉपिक आवडले...वाचले तर अजुन आवडले मग सोडला देवनागरी आणि ctrl C, ctrl V चा नाद आणि दिलं सरळ minglishmadhe.....
हे सर्व सांगायचं कारण?? काही नाही आता काय लिहू पेक्षा हे बरं वाटतंय...आणि मराठी टायपायचा स्पीड आलाय पण विषयांच काय?? संपले की काय?? आणि हो तुम्हाला पण असं कधी प्रतिक्रिया द्यावाश्या वाटल्या आणि त्याही हट्टाने मराठीत तर उचला ctrl C आणि वापरा ctrl V.....तुमचं माहित नाही पण माझ्यासारख्यांचा उत्साह भलताच वाढतो हं कॉमेन्ट्स मुळे आणि मग कदाचित आपोआप विषय सुचतात......
मस्त आहे ही पोस्ट.
ReplyDeleteपण ही कमेंट Ctrl+C, Ctrl+ Vनाही बरं का.
शिवाय खाली ते word verification साठी ते चालतही नाही.
हा हा हा...पंकज अरे त्या वर्ड व्हेरिफ़िकेशनच्या घोटाळ्यामुळे तुझी डेंटिस्टची पोस्ट एका चांगल्या minglish comment ला मुकली रे...कंटाळून नाद सोडला आणि वेळ तसाही कमीच होता.....त्यावर लिहायचं राहुनच गेलं बॉ.....आणि तू जरा कॉमेन्टसना उत्तरं पण देत जा ना...बरं वाटतं...हे हे...:)
ReplyDeleteहाहा हाहा हाहा.. प्रतिक्रिया या विषयावर पोस्ट. क्या बात है :-)
ReplyDeleteआले मना माझिया
दिली मी प्रतिक्रिया
म्हणून तर "उगीच" मध्ये टाकलंय या पोस्टला...डोक्यात राहिलं होतं ते प्रतिक्रिया द्यायचं म्हणून जास्त वेळ मनात नाही ठेवलं सरळ ब्लॉगवर उतरवलं....:)
ReplyDeleteहे हे..मस्तच..आवडला हा Ctrl+C and Ctrl+V
ReplyDeleteधन्यवाद सुहास....:)
ReplyDeletehehehe lai bhari ga .... s/w madhale copy/paste kahi angatun jat nahi ha ......... :)
ReplyDelete-Ashwini
Note: tuza aadhi cha post pan chan aahet but comments karan +c and +v la pan vel navata
he he ... pratikriya dyayala vel nasala mhanaje mi saral minglish madhye lihite ... aata lihiley tase :)
ReplyDeletegood to see you Ashwini..अगं s/w मध्ये जेवढी कामं ctrlC ctrlV ने होत असतील नं तेवढी बाकी कशानेच होत नाहीत....हा हा हा...
ReplyDeleteआणि तू वाचलीस नं पोस्ट मग झालं तर पावलं म्हणायचं....
ही ही गौरी...अगदी खरंय पुर्वी मला minglish लिहायचं म्हणजे कसंतरी वाटायचं म्हटलं इतकं मराठीत छान लिहिलेल्या ब्लॉगवर मराठीच लिहुया पण मग कायम राहून जाण्यापेक्षा minglish तर minglish... कॉमेन्टलं की बरं....धन्यवाद तू लिहून धीर वाढवतेस...:)
ReplyDeleteदेत तर असतो मी प्रतिक्रियांना उत्तर. अनुक्षरे’नी सांगितल्यापासून आवर्जून देतो आता. (कदाचित १-२ दिवस उशीर होत असेल)
ReplyDeleteबरं आहे मग....अरे पण मी तुला गौरीच्या ब्लॉगवरच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्रियेत तेवढं ते DSLR चं सांगितलंय ते विसरू नकोस हं.....हे हे हे....
ReplyDeleteहो ते वाचले. तिकडेच उत्तर पण लिहिले आहे :-)
ReplyDeleteअपर्णा, सहीच गं.... :) सगळे तुझ्याच पोस्टमधले ctlc आणि ctlv बरं का....:P
ReplyDeleteहाहा हाहा हाहा.. प्रतिक्रिया या विषयावर पोस्ट. क्या बात है :-)
ReplyDeleteआले मना माझिया
दिली मी प्रतिक्रिया
chyaamaari aamache pan Ctrl C aani ctrlV............kay sodate kay hummm!!!!!
तन्वी आणि भाग्यश्रीताई ctrl C, ctrl Vहे माझे कॉपीराईटस आहेत बरं का?? म्हणून तर मी पोस्ट लिहून ऑफ़िशियल करून ठेवलंय....
ReplyDeleteमस्तच जमलीय प्रतिक्रियांची पोस्ट.
ReplyDeleteमस्तच जमलीय प्रतिक्रियांची पोस्ट.
ReplyDeleteभारीच पोस्ट आहे :P (+1)
ReplyDeleteआयला आपण सगळे मिळून पायरसीला अधिकृत करून टाकणार बहुतेक ;-)
ReplyDeleteधन्यवाद अनुजाताई ....
ReplyDeleteधन्यवाद आनंद... मला ctrlC ctrlV साठी आपल्या कॉमेन्ट नाहीतर त्यातले शब्द बर्याचदा उपयोगी पडतात....
ReplyDeleteहेरंब तुला ते अंतु बरवामधलं वाक्य आठवतंय का? "आठ आणे खाल्ले की चौकडीचा मुगूट घालून रत्नागिरीच्या डिस्ट्रिक्ट जेलात घालतात आणि एक लाख खाल्ले की गांधी टोपी घालून पाठवतात असेंब्लीत " तसं आहे आपल्या ctrlC ctrlV चं...तिथे मोठमोठाले softwares लिहिताना होतात ना आपण नुस्तं प्रतिक्रियेत वापरलं तर हरकत नाय रे....
ReplyDeleteहेरंब बघ हिने प्रतिक्रियेत डायरेक्ट तुझ्या ’हरकत नाय’ लाच कॉपले रे.....
ReplyDeleteकॉपी आणि पेस्ट सगळ्यात बेस्ट
ReplyDeleteवेळेचीही बचत नि कसाही होत adjust ..
तुम्हाला सांगतो..
कॉपी आणि पेस्ट करत राहा कितीही..
काही केल्या संपत नाही नेटवरची शाई..
प्रतिक्रिया मिळत जाते.. नि सुरांचेही हि संगम होते..
समाधाना shivay दुसरे जगात मोठे सुख नसते..
अग अर्थातच आठवतंय. आता तू पुलंचाच दाखला दिलास म्हटल्यावर हा पामर काय बोलणार. करा कॉपी पेस्ट :-)
ReplyDeleteतन्वीची पहिली प्रतिक्रिया कुठेतरी वाचल्यासारखी वाटत्ये ;-)
ReplyDeleteअग कॉपू दे.. तिने आता "पुलंचाच दाखला दिलाय म्हटल्यावर हा पामर काय बोलणार."
(डबलकोट्स मधलं कॉपीपेस्ट करून चिकटवलं आहे हे काय सांगणे लगे?)
अखिल तुझी कविता मस्तच आहे....ते नेटवरची शाई प्रकरण मला जाम आवडलंय....:)
ReplyDeleteतन्वी, तू हेरंबला भडकवलंस तरी ’हरकत नाय’..हे हे ..तुझं "कॉपलं" सहीये........
ReplyDeleteहेरंब तुझी हरकत नाय हा बरा हाय....
हा फंडा मी कधी कधी वापरतो बर का ;)
ReplyDeleteमस्त लिहिले आहेस
जीवनमूल्य
खरंय विक्रम...आणि आपण सगळेच वापरतो, फ़क्त मी मान्यही केलं आणि त्यादिवशी खरं जरा त्या फ़ंड्याचा डोस जास्त झाला म्हणून बाहेर पडलं..
ReplyDeleteअपर्णा,
ReplyDeleteही अखिल प्रतिक्रिया ctrlC ctrlV चा वापर करत दिली
आभार:
‘अपर्णा,’: अपर्णा हा शब्द बर्याच ठिकाणी आहे, पण तो पुढच्या स्वल्पविरामासोबत फक्त भानसच्या प्रतिक्रियेत होता. तेव्हा हा त्यांच्याकडून साभार
‘ही’, ‘चा’: हे बर्याच ठिकाणी आहे. त्यामुळे सगळ्यांचेच आभार
‘अखिल’: हे नाव वास्तविक इंग्रजीमध्ये लिहिलं आहे, पण तू त्याला दिलेल्या उत्तरामध्ये ते मराठीत आहे. त्यामुळे इथे तुझे आभार.
‘प्रतिक्रिया’, ‘दिली’: हेरंबकडून साभार
‘ctrlC ctrlV’, ‘वापर’: परत तुझेच आभार
‘करत’: अखिलचे आभार
;-) ;-)
आभार,संकेत.....:)
ReplyDelete