आठवड्यातून दोनदा तरी थोड्या मोठ्या मुलांच्या गोष्टीच्या कार्यक्रमासाठी वाचनालयात जाणं होतं..लहान मुलांच्या भावविश्वात मोठ्यांनाही रममाण करणारे या वाचनालयातले पाचही जण मला आवडतात आणि त्यांची गोष्ट सांगण्याची हातोटी अक्षरशः भुरळ घालते. अगदी चुकवू नये असाच कार्यक्रम..
जवळ जवळ प्रत्येक गोष्टींच्या दिवशी मी या मुलाला लायब्ररीत पाहाते...लक्ष जावं असं कॅरेक्टर वाटायचं...वय असेल जास्तीत जास्त पाच-सहा वर्षे, अमेरिकन, गोल चेहर्यासारखाच गोल गोल काचांचा चष्मा, हिरव्या नाहीतर पिवळ्या रंगाची फ़्रेम... खूपदा त्या फ़्रेमचा रंग कपड्याशी मिळताजुळता असणारा..थोडी मान वर करून सोबतीला आलेल्या आजीशी बोलायची सवय...कायम पाठीला छोटीशी बॅकपॅक....कौतुकही वाटायचं की या इतक्याशा वयात आपलं ओझं आपणंच वाहातोय आणि कधी कधी त्याच्या आजीचं आश्चर्य ’कधीच कसं घेत नाही ही हे पाठुंगळीचं ओझं?’...आजी मागे बसलेली आणि नातू गोष्टीची मजा घेतोय...त्यातल्या प्राण्यांना पाहुन हसतोय, कधी पुढे काय होईल याचे आडाखे बांधताना मोठ्याने बोलतोय..त्याच्या थोड्या वेगळ्या चष्मा आणि बॅगमुळेच बहुतेक माझ्या लक्षात राहिला..पण त्यापलिकडे कधी काही वाटलं नाही...आणि खरं तर कार्यक्रम सुरु झाला की मुलांसाठी सांगितल्या जाणार्या गोष्टींमध्ये मी अजुनही तितकीच रमते...इथे तर अगदी पपेट वगैरे वापरून सगळेच गुंग झालेले असतात. त्यामुळे नंतर निघेस्तोवर लक्षातही येत नाही वेळ कसा गेला..
इतर वेळी धावत-पळत वेळ गाठणारे आम्ही काल कसे काय ते वेळेच्या आधी पोहोचलो आणि कार्यक्रम सुरु व्हायच्या आधीची धावपळ पाहात उगाच वेळ काढत खुर्चीवर बसलो. लोक येत होते, आपल्याला आवडतील तशा जागा घेत होते, मुलांना खाली जाजमावर बसवून मागे जात होते आणि आमचं लाडकं ध्यान आलं..आज हिरवा चष्मा आणि हिरवाच टी-शर्ट... असलं गोड दिसत होतं आणि नेहमीप्रमाणे आजीबरोबर चाललेल्या गप्पा..आज जरा निवांत होतो आम्ही म्हणून त्याच्याचकडे पाहात होते..सरळ चालत येत बसण्यासाठी हा मुलगा वळला आणि मी जे पाहिलं त्याने मला खरंच ’देव देव म्हणून कुठे असतो रे तो??’ असं जोरात किंचाळावंसं वाटलं....
त्याच्या बॅकपॅकमधुन बाहेर आलेल्या आणि शर्टच्या आतुन पोटाकडे जाणार्या नळ्या मला पहिल्यांदीच दिसल्या...आतापर्यंत अशा प्रकारे ऑक्सिजनची नळकांडी घेऊन फ़िरणारे बरेच वयस्कर मी अमेरिकेत नेहमी पाहाते आणि जगण्याकडे एकंदरित आशेने पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन मला भारावुन टाकतो. पण आज पहिल्यांदीच असं काही आजाराचं ओझं आपल्याच पाठीवर घेऊन फ़िरणार्या या पिलाला पाहून मात्र कोलमडले...साफ़ कोलमडले....आज कुठली गोष्ट सांगितली गेली काहीच कळत नव्हतं...काय झालं असेल त्याला? तात्पुरतं असेल ना? अनेक प्रश्नांनी भरलेलं डोकं....आणि एक खिन्न करणारा अनुत्तरित प्रश्न...देवा, तू खरंच आहेस का?????????
मनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....
Showing posts with label मन. Show all posts

Wednesday, March 24, 2010
Tuesday, September 22, 2009
मना तुझे मनोगत मला कधी कळेल का??
कुणी नुसतं "काय होतंय तुला?" विचारावं आणि बांध फ़ुटावा अशी मनाची अवस्था फ़ार विचित्र असते. नक्की काय बिनसलंय कळत नाही. असं कधीपासुन होतंय आठवत नाही. हे सगळं असंच चालु राहिल, असं नसतं पण आत्ता या क्षणी ते कळत नाही. असं वाटत की ही सगळं काही थांबल्याची जाणीव अशीच पाठी लागणार. आता यातुन सुटका नाही.
मग मात्र सारखा एकटेपण जाणवायला लागतं. गर्दीत असलं तरी हरवल्यासारखं. सवयीने रोजची कामं तीच तशीच म्हणून करतो आणि आजचा दिवस संपला म्हणून रात्री पाठ टेकतो. आजुबाजुच्या परिस्थितीत आपल्याला हवा तसा बदल घडवून आणण्यासाठी काय केलं पाहिजे याचा शोध घेतो आणि त्यातुन काही निष्पन्न होत नाही म्हणून अजुन अजुन मन उदास होतं.
हे सर्व दुष्टचक्र इतकं विचित्र की आपल्या मनात काय चाललंय याचा थांग आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीला, मित्राला कुण्णाकुण्णाला लागु देत नाही. वरवर सगळीकडे पुर्वीसारखंच वागत राहतो पण आतुन मात्र कुठेतरी काही तरी ढवळून निघालेलं असतं. यशाच्या व्याख्या शोधत राहातो आणि मग आपण कुठे कमी पडतोय त्याचाच शोध घेत राहातो. पाण्यात बुडणारा शेवटचा उपाय म्हणून सगळीकडे हात-पाय मारेल तसंही करुन पाहातो. नेहमीच त्यातुन वर यायला होईल असंच नाही पण प्रयत्न करत राहतो.
अरे आपल्या बाबतीत कसं असं घडतयं?? बाकीच्यांचं कसं व्यवस्थित चाललंय असं उगाच वाटतं. काही काही प्रश्न तर असे असतात की यावर आपण स्वतः काहीच उपाय करु शकत नाही हे माहितही असतं पण या सर्वांनी होणारा त्रागा काही संपत नाही.
अशावेळी ऐकलेली गाणी डोळ्यात पाणी आणतात, वाचन अंतर्मुख करतं आणि भावनांचा कल्लोळ अजुनच वाढतो. सगळं वरवरुन शांत आणि आतुन खूप खूप ढवळलेलं. अशावेळीच खरं तर मनाला सांभाळणं फ़ार गरजेच असतं. न कोसळता आहे त्या परिस्थितीचा सामना करत राहुन हेही दिवस जातील आणी यातुनही आपण काही नवं शिकुन बाहेर येऊ असा काहीसा विचार स्वतःच स्वतःला द्यायचा असतो. परिस्थितीनुसार य़शापय़शाचे मापदंड बदलणे आणि आपलं आपणच अशा कोंडीतुन बाहेर येणं हेच हाती असतं.
तरी चंचल मन पुन्हा पुन्हा त्याच त्याच विचारात जातं मग काय उरला एकच प्रश्न मना तुझे मनोगत मला कधी कळेल का??

Friday, May 8, 2009
पहिला मदर्स डे
हा येणारा १० मेचा मदर्स डे माझा पहिलाच असणार आहे. ज्याच्या मुळे तो येतोय ते माझं बाळ खरं तर त्याच्या पुढच्या आठवड्यात वर्षाचं होईल. म्हणजे आपल्या आईसाठी आपल्यामुळे आज काही खास आहे किंवा तिला खास वाटेल असं काही करुया असं त्याचं वयही नाही. पण तरी माझ्यासाठी मात्र हे खासच.
मनात उगाच वाटतं नाहीतरी मुलगे कुठे भावनाप्रधान असतात. कदाचित लहानपणात तसं नसेल. पण नसताही गेला हा दिवस खास. की असं होईल नव-यातर्फ़े काही सरप्राइज वगैरे मिळणार पण ती शक्यता फ़ार फ़ारच धूसर कारण आत्ताच माझा स्वतःचा वाढदिवस होऊन गेला पण तसं काही खास-बिस नाही...आपलं नेहमीप्रमाणे बाहेर जाऊन खाऊन येणे आणि आता मूल लहान असल्यामुळे शक्य तितक्या जवळच्या ठिकाणी. म्हणजे अगदीच गरज पडलीच तर पटकन घरी यायला बरं....ते जाउदे उगाच भरकटतेय मी...
मुलगी नसली तरी मला एक गोड भाची आहे तिला आठवण येईल का की आज माझ्यासाठी काही स्पेशल आहे ते?? ह्म्म्म्म....माहित नाही...उगाच हुरहुर ...
मागचा मदर्स डे उलट जास्त छान म्हणायचा..बाळंतपणाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी आईच माझ्याजवळ....
कदाचित काही म्हणजे काहीच होणार नाही. आम्ही नेहमीप्रमाणे रविवार म्हणजे जमेल तितकी घरची कामे आटपू, बाळाचे रुटिन आहेच....आणि जर तो दुपारी छान झोपलाच तर एखादा ऑनलाईन सिनेमा किंवा नाटक असं काही...नाहीतर मागच्या आठवड्यातले राहिलेले डि.व्ही.आर. मध्ये रेकॉर्ड केलेले कार्यक्रम पाहू...
श्या...काय होतय काहीच कळत नाही...पण मला वाटतं कदाचित माझं बाळ जेव्हा आई हाक मारायला शिकेल ना तोच मदर्स डे वेगळा वाटेल...बाकी हा म्हणजे फ़क्त मे महिन्याचा दुसरा रविवार. आणि इथे रविवार म्हणजे वेगळ्या प्रकारे कामाचाच एक वार....फ़क्त मानेवर बॉसचं जू नसलेला....
पण बाळा जर तू मोठ्ठा होऊन हा ब्लॉग वाचणार असशील तर फ़क्त तुझ्यासाठी हा जास्त काही मॅटर नसलेला धागा मी लिहीत आहे बरं....म्हणजे सांगायचं बरच आहे पण कळत नाही कसं ते....

Subscribe to:
Posts (Atom)