Tuesday, September 22, 2009

मना तुझे मनोगत मला कधी कळेल का??

कुणी नुसतं "काय होतंय तुला?" विचारावं आणि बांध फ़ुटावा अशी मनाची अवस्था फ़ार विचित्र असते. नक्की काय बिनसलंय कळत नाही. असं कधीपासुन होतंय आठवत नाही. हे सगळं असंच चालु राहिल, असं नसतं पण आत्ता या क्षणी ते कळत नाही. असं वाटत की ही सगळं काही थांबल्याची जाणीव अशीच पाठी लागणार. आता यातुन सुटका नाही.
मग मात्र सारखा एकटेपण जाणवायला लागतं. गर्दीत असलं तरी हरवल्यासारखं. सवयीने रोजची कामं तीच तशीच म्हणून करतो आणि आजचा दिवस संपला म्हणून रात्री पाठ टेकतो. आजुबाजुच्या परिस्थितीत आपल्याला हवा तसा बदल घडवून आणण्यासाठी काय केलं पाहिजे याचा शोध घेतो आणि त्यातुन काही निष्पन्न होत नाही म्हणून अजुन अजुन मन उदास होतं.
हे सर्व दुष्टचक्र इतकं विचित्र की आपल्या मनात काय चाललंय याचा थांग आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीला, मित्राला कुण्णाकुण्णाला लागु देत नाही. वरवर सगळीकडे पुर्वीसारखंच वागत राहतो पण आतुन मात्र कुठेतरी काही तरी ढवळून निघालेलं असतं. यशाच्या व्याख्या शोधत राहातो आणि मग आपण कुठे कमी पडतोय त्याचाच शोध घेत राहातो. पाण्यात बुडणारा शेवटचा उपाय म्हणून सगळीकडे हात-पाय मारेल तसंही करुन पाहातो. नेहमीच त्यातुन वर यायला होईल असंच नाही पण प्रयत्न करत राहतो.
अरे आपल्या बाबतीत कसं असं घडतयं?? बाकीच्यांचं कसं व्यवस्थित चाललंय असं उगाच वाटतं. काही काही प्रश्न तर असे असतात की यावर आपण स्वतः काहीच उपाय करु शकत नाही हे माहितही असतं पण या सर्वांनी होणारा त्रागा काही संपत नाही.
अशावेळी ऐकलेली गाणी डोळ्यात पाणी आणतात, वाचन अंतर्मुख करतं आणि भावनांचा कल्लोळ अजुनच वाढतो. सगळं वरवरुन शांत आणि आतुन खूप खूप ढवळलेलं. अशावेळीच खरं तर मनाला सांभाळणं फ़ार गरजेच असतं. न कोसळता आहे त्या परिस्थितीचा सामना करत राहुन हेही दिवस जातील आणी यातुनही आपण काही नवं शिकुन बाहेर येऊ असा काहीसा विचार स्वतःच स्वतःला द्यायचा असतो. परिस्थितीनुसार य़शापय़शाचे मापदंड बदलणे आणि आपलं आपणच अशा कोंडीतुन बाहेर येणं हेच हाती असतं.
तरी चंचल मन पुन्हा पुन्हा त्याच त्याच विचारात जातं मग काय उरला एकच प्रश्न मना तुझे मनोगत मला कधी कळेल का??

16 comments:

  1. Ekdam sahi lihile aahe...ase manatle vichar lihine kharech khup avghad aste. Pan aapan matra hyala apvad aahat...

    ReplyDelete
  2. aprna,
    manachya swascha(crystal clear)bhav vichar khupach chan lihiles
    anuja

    ReplyDelete
  3. धन्यवाद अनुजा. तुझी पुन्हा एकदा प्रतिक्रिया पाहुन बरं वाटतंय. ती बहिणाबाईंची कविता आहे ना? तसं आपलं मन हे "उभ्या पिकातल्या ढोरासारखं" इथे तिथे भटकत असतं आणि कुठे काही पाहिलं की कधी कधी खट्टु होतं. अशा मनासाठी हा खास लेखप्रपंच.

    ReplyDelete
  4. मन मनास उमगत नाही.....:)
    छान मांडलस मनाचे मनोगत.

    ReplyDelete
  5. छन मांडलंय!
    अशा वेळेसाठीच थोरांनी सांगितले आहे की मनावर संस्कार करावेत,

    समर्थ म्हणतात,
    मना प्रार्थना तूजला एक आहे|
    रघूराज थक्कीत होउन पाहे|
    अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे|
    मना सज्जना राघवी वस्ती कीज़े||

    ReplyDelete
  6. खरंय निलेश. आपण अगदी योग्य सल्ला दिलात. प्रयत्न करेन तसे संस्कार करण्याचा. धन्यवाद.

    ReplyDelete
  7. मस्त लिहीलं आहेस......आपल्या जवळच्या माणसांकडून मिळणारे धक्के पचवताना हा अनूभव जास्त येतो....

    ReplyDelete
  8. खरयं तन्वी...जवळच्या माणसांचे धक्के तर मनाला जास्त कोलमडवतेय...

    ReplyDelete
  9. Khare khure aani atishy sopya shbdaat lihilys tu :) I ma going through same situation!

    ReplyDelete
  10. धन्यवाद दिपक...लवकरच त्या चिंता मिटतील अशी आशा करुया...

    ReplyDelete
  11. होतं अस कधि कधि, काय होतय विचारल तर सांगता पण येत नाही.

    ReplyDelete
  12. हेच तर आहे नं माझिया मनाचं रडगाणं....कळतही नाही आणि वळतही नाही....:)

    ReplyDelete
  13. Aparna faarch chan lekh aahe. post kelyanantar baryach divasani vachtoy pan comment kelyashivay rahavaat nahi.
    Mi pan sadhya ashyach avasthetun jaat aahe. Kadhi kadhi faarch aacharya vatata, ki aaplya manat, aayushyat yevdha chalu asta tyacha kuthe kahi farakch padat nahi (mhanje konala farak padavach asa nahi, pan at least konala tari janiv asavi asa vatata kadhi kadhi), mhanje tumche prashna, tumchi dukkha fakta tumchich astat aata tyala karmacha logic lavaycha ka ajun kay mala mahit nah. Pan kahi prashna ase astat ki te konala sangun, konala vicharun sutnaare nastat, aani manatali uttarra samjat nastat.. asha adhantari awasthet kay karaycha kharach samjat nahi.
    Anyways baki tumcha blog kharach chan aahe.

    ReplyDelete
  14. Aparna kharach chan lihila aahe. Post juni aahe pan, comment kelyashivay rahavat nahi.
    Mazi pan sadhya ashich awastha zali aahe. Tumchya aayushyat, manat je kahi hotay tyacha konala kahich farak padat nahi (mhanaje padaylach pahije asa nahi pan konala tari tyachi janiv asavi asa kuthetari vatata). Pan kahi prashna ase astat ki te konala vicharun, sangun sutnaare nastat.. aani manatali uttara pan samajat nastat.. asha adhantari awasthet kharach kay karaycha prashna padto.
    Anyways tuza blog chan aahe, vachun kharach jara nivantpana milala.

    ReplyDelete
  15. @charu.sahastra/numb already, ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार...
    माझ्या मनाचं मनोगत वाचून जर त्याने कुणाला थोडं फ़ार बरं वाटलं तर त्यात मला खरंच आनंद आहे..खरं म्हणजे तुमच्या प्रतिक्रियेच्या निमित्ताने मीच ही पोस्ट पुन्हा वाचली आणि वाटलं की अशा अवस्थेतून आपण सर्वच जण कधी न कधी जातो...तेच मांडण्याचा हा प्रयत्न....
    या ब्लॉगचं नाव नाहीतर मनावरूनच आहे नं? म्हणून इथे बरचसं मनातलंच असतं....:)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.