Wednesday, September 23, 2009

५००० +



ब्लॉग लिहिणारा लिहित राहतो. कुठेतरी कौतुक प्रत्येकाला हव असतं. काहींना त्याची सवय होते. माझ्या बाबतीत काय आहे याचा विचार मी काही दिवस करत होते. कधी कधी पटापट प्रतिक्रिया येत राहतात कधी लोक नुसतंच वाचुन जातात. मग कधीतरी काउन्टर टाकला. अर्थात सुरुवातीचं ब्लॉगींग म्हणजे आपल्याला लिहितं राहिलं पाहिजे याकडे जास्त लक्ष होतं म्हणून काउंटर टाकेपर्यंत एखादा महिना गेला असेल. पण नंतर सवय लागली प्रतिक्रियांना उत्तर द्यायला किंवा नवा ब्लॉग टाकायला आलं की आकडा पाहायचा. आणि आज योगायोगाने सहजच आले आणि खूप बरं वाटतंय ५००१ आकडा पाहायला.
मुद्दाम स्र्कीन शॉट घेऊन ठेवलाय. या ब्लॉगवर भेट देणार्या सर्वांचे त्यासाठी आभार मानण्यासाठी आजची ही पोस्ट. आणि हो जास्त धन्यवाद ज्यांनी आपल्या अमुल्य प्रतिक्रिया देऊन हा ब्लॉग जागता ठेवायची उमेद वाढवलीत त्यांचे.
सध्या बर्याच गोष्टींच गणित बिघडलय; कदाचित माझ्या आधीच्या पोस्टवरुन लक्षात आलं असेल. पण आज मात्र दिवस संपताना फ़ार छान वाटतय.असाच लोभ राहु द्या.



18 comments:

  1. अभिनंदन!अभिनंदन!!अभिनंदन!!!:)

    ReplyDelete
  2. अगदी खरे आहे... वाचकांचे मन:पूर्वक आभार मानायलाच हवेत. लिखाण कसे वाटते ते कळवले की विचाराला चालना मिळते आणि लिहायचा उत्साह देखील वाढतो...

    तुमचे अभिनंदन .. आम्हा वाचकांना असेच लिखाण पुढे सुद्धा वाचायला मिळू दया... :)

    ReplyDelete
  3. लवकरच पाचाचे पन्नास होऊ दे!
    शुभेच्छा

    ReplyDelete
  4. प्रतिक्रियांबद्द्ल सर्वांचेच खूप खूप धन्यवाद. पाचाचे पन्नास झाले तर चांगलंच आहे बघुया यापुढचा प्रवास कसा होतो ते?? आणि हो आपल्या वाचकांचे आभार मानण्याची ही एक चांगली संधी आहे...

    ReplyDelete
  5. hi,
    Tumhi kuthe rahata usa madhe?

    ReplyDelete
  6. लीना, मी फ़िलाडेल्फ़ियाच्या जवळ राहते. का हो???

    ReplyDelete
  7. me sudha usa madhe ahe.NY la.tumcha library cha lekh wachala.pan ithalya library madhe ase kahi karykram hot nahit.

    ReplyDelete
  8. अच्छा तिथे story time म्हणून काही आहे का पहा. काहीवेळा एखादं library circle असतं त्यातील एखाद्या ठिकाणचे programs जास्त छान असतात. मग लोकं दोन-पाच मैल प्रवास करुन तिथे जातात. तसं कुठे आहे का विचारुन पहा. अर्थात सध्या बर्याच ठिकाणी बजेट कमी झाल्यामुळे काही सुविधा बंदही असू शकतात. Good luck.

    ReplyDelete
  9. actully comments aani visits kami honyat maza sarakha vachaka chi bhar aste ektar comment lhinya sathi bilkul vel nasato pan bolg vachat asto aani navin post chi mana pasun vat baghat asto ........ maze ek ch sangane aahe bolg 10 asala tari vachak 1000 asu shakatat :) height mhanje Bhanas che me almost sagale lekh vachate pan no comment so sorry for not commenting :) and congrats for 5000 count

    ReplyDelete
  10. अश्विनी अगं तुला काही ** ???(इथे टि.व्हि.सारखं बीप बीप असेल असं समजुन घे) :) मी भानस ना आता कळवणार की ही कॉमेन्ट पाहा. अर्थात एक बरय की त्यांच्या पोस्टसना जास्ती करुन कॉमेन्ट्स असतात...
    jokes apart निदान तू हे स्वतः मान्य करतेयस हेही नसे थोडके. आणि अगदी प्रत्येक पोस्टला नाही पण अधुन मधुन कॉमेन्ट आली तरी बरं वाटतं. मध्ये माझे बरेच पोस्टस कॉमेन्टसविना होते त्यावेळी मी ते सर्व उडवायचा विचार करत होते. मग म्हटलं जाऊदे कुणीतरी निदान वाचतय आणि त्यांना कदाचित नाही आवडलं हे सांगायला बरं वाटत नसेल. असो. वेळात वेळ काढुन वाचताय हेही माहित झालय त्याचंही बरं वाटतंय....

    ReplyDelete
  11. अपर्णा
    आपुलकी ,प्रेम, जिव्हाळा, तिथे अपेक्षा, प्रतिक्रिया,प्रेरणा दोघांकडून येऊन मिळतात. आभार औपचारिक होतात.तुम्ही लिहिता आम्ही वाचतो ह्या हि पेक्षा एक अनोखे भाव विश्व आहे,अपर्णा,तन्वी,भानस,महेंद्र,ह्यांच्या गप्पा नवरा,मैत्रिणी ह्याच्यात नेहमीच होतात.काम काळ वेग हि गणिते सोडवायला मनाचे भाव असले कि, औपचारिकताच अधिक भाव न्रिर्माण करतात गणिते अवघड न वाटता,सोपी होतात फक्त योग्य तो वेळ द्यावा लागतो
    अनुजा

    ReplyDelete
  12. अपर्णा
    आपुलकी ,प्रेम, जिव्हाळा, तिथे अपेक्षा, प्रतिक्रिया,प्रेरणा दोघांकडून येऊन मिळतात. आभार औपचारिक होतात.तुम्ही लिहिता आम्ही वाचतो ह्या हि पेक्षा एक अनोखे भाव विश्व आहे,अपर्णा,तन्वी,भानस,महेंद्र,ह्यांच्या गप्पा नवरा,मैत्रिणी ह्याच्यात नेहमीच होतात.काम काळ वेग हि गणिते सोडवायला मनाचे भाव असले कि, औपचारिकताच अधिक भाव न्रिर्माण करतात गणिते अवघड न वाटता,सोपी होतात फक्त योग्य तो वेळ द्यावा लागतो
    अनुजा

    ReplyDelete
  13. अनुजा तुमची प्रतिक्रिया बरंच काही सांगुन जाणारी आहे. एक वेगळाच विचार. पण तरी मला वाटलं की असे बरेच जे या ब्लॉगवर येऊन जातात त्यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहावी म्हणुनही लिहिलं...मला ही प्रतिक्रिया वाचुन वाटतंय की तुम्ही पण एक छान ब्लॉग चालु करावा...:)

    ReplyDelete
  14. अभिनंदन मॅडम ...लिहीत रहा....सॉरी जवळपास ८/१० दिवसानी नेटवर आलेय त्यामुळे कमेंटायला उशीर झाला....बाकी काय...लगे रहो अपर्णाताय!!!!

    ReplyDelete
  15. अगं मला वाटलंच तन्वी. आणि ह्या ब्लॉगवर तुमी नाय कॉमेन्टायचं तर कुनी वो ???

    ReplyDelete
  16. अपर्णा
    माझ्या प्रतिक्रिया आवडतात,छान वाटले.लेखकांना समीक्षक असावा,वाचक असावेत.सध्या तरी हीच भूमिका बरी.असो, उद्या दसरा तुम्हा सगळ्यांना शुभेश्च्या.शाळेतले दगडी पाटीचे सरस्वती काढून केलेले पूजन,पाटी ला असलेल्या पिवळ्या लाकडाची चोव्कट,पिवळ्या झेंडू चा वास कसा लख: आठवतो.लिहीना तू पण वाट पाहते,
    अनुजा

    ReplyDelete
  17. या पोस्ट वर काय लिहावं हेच सुचत नव्हतं. अगदी फॉर्मली अभिनंदन लिहिण्याची पण इच्छा नव्हती. प्रतिक्रिया, मग ती कशिही जरी असली, तरी आवडते. जर वाईट असली, तर आपलं लिखाण सुधारण्याचा चान्स मिळतो, अन्यथा नविन लिहिण्यासाठी हुरुप येतो. सगळ्यांच्या इतक्या सुंदर प्रतिक्रिया वाचल्यावर छान वाटलं. म्हंटलं, आपल्याला जे काही म्हणायचंय ते सगळ्यांनी म्हणुन झालंय, म्हणुन आता नुसत अभिनंदन केलं तरिही हरकत नाही.. :) मनःपुर्वक अभिनंदन.. आणि पुढिल लेखनासाठी शुभेच्छा..

    ReplyDelete
  18. खरयं तुमचं. खरं तर ही पोस्ट प्रतिक्रियांसाठी नव्हती पण मला वाचकांची नोंद घ्यावीशी वाटली म्हणून.....असो...
    धन्यवाद आपण आवर्जुन लिहिलंत त्याबद्द्ल...

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.