Wednesday, February 24, 2010

विंटर ऑलिंपिकमध्ये हिंदी गाणी...

२०१० चं विंटर ऑलिंपिक सध्या कॅनडामधील व्हॅंकुव्हर इथे चालु आहे. अमेरिकेचे मेरिल डेव्हिस आणि चार्ली व्हाइट यांनी बॉलिवुडमधल्या काही गाण्यावर अप्रतिम आइस डॅन्स केला. त्यांचे कपडेही थोडेसे भारतीय पद्धतीचे वाटावे असे रंग, दागिने इ निवडलंय..त्यांना प्रेक्षकांची उभी राहुन प्रशंसा मिळाली आणि ऑलिंपिकमध्ये सिल्व्हर मेडल..आपल्याला माहित असलेल्या गाण्यावर एखादं पाश्चात्य आणि तेही बर्फ़ावरच्या स्केटिंगचा नाच कसं करतात हे पाहायचं तर हा व्हिडिओ नक्की पहा. मागच्या ऑस्करमध्ये गाजलेल्या ’जय हो’ या गाण्यावरही या जोडीने नृत्य केलंय..

हे खेळ आपले वाटो न वाटो पण गाणं आपलं असलं की पाहाताना छान वाटतं नाही??

13 comments:

 1. मस्त विडियो आहे. काल आला होता मला पण बघितला नाही.. आज तुझ्या ब्लॉगमुळे बघितला :).. मला 'कजरारे' सगळ्यात आवडलं.

  ReplyDelete
 2. मस्त,, मलापण "कजरारे" आवडला..खुप छान :)

  ReplyDelete
 3. Thx for sharing . Their other performances are simply terific

  ReplyDelete
 4. हेरंब, सुहास आणि हरेकृष्णजी, धन्यवाद.
  गेले काही रात्री रोज winter olympic पाहातोय. मला तसंही आइस स्केटिंग पाहायला फ़ार आवडतं..काय लीलया करतात ही लोकं आणि त्यात नेमकं हिंदी गाणी निवडल्यामुळे इथे पोस्टलं..कदाचित सगळ्यांनी पाहिलं नसेल म्हणून...खरं ही स्पर्धा आम्ही आहोत त्यापासुन फ़क्त पाच तास ड्राइव्ह आहे पण अर्थात शक्य नाही आहे जाणं पण tempting होतंय...

  ReplyDelete
 5. सह्ही आहे ना व्हिडियो? मला माझ्या मावस बहिणीने फॉरवर्ड केलेला....त्यांची वेशभूषा, कौशल्य, गाण्याच्या ठेक्यावर त्यांच्या मनोरम हालचाली आणि हसरे चेहरे, सगळंच आवडलं! कजरा रे तर लाजवाब!
  :-)

  अरुंधती
  --
  Sing, Dance, Meditate, Celebrate!
  http://iravatik.blogspot.com/

  ReplyDelete
 6. आईस स्केटींग बघायला खुप मजा येते, किती लिलया त्यांनी हे केलं आहे...
  विडियो शेअर केल्याबद्दल धन्यवाद!

  ReplyDelete
 7. धन्यवाद मनमौजी, इरावती आणि आनंद...

  ReplyDelete
 8. अपर्णा, मेरिल डेव्हिस आणि चार्ली व्हाइट ही जोडी माझी आवडती. हे नृत्य मी आधीच पाहिले होते तरिही पुन्हा तू टाकलेला व्हिडीओ पाहिला. मस्तच. मलाही कजरारेच आवडले. स्मोकी मॉउंटनला असेच एक इनडोअर आईस स्केटींगचे स्टेडियम आहे. तिथे क्लासेसही घेतात. आम्ही गेलो असतांना घेतला होता. असे काही सडकून आपटलो. खूप मजा आली. त्याला पाहिजे जातीचेच.... या दोघांची कमाल आहे.

  ReplyDelete
 9. Video ekadam sahi aahe. Majja vatali baghatana.Bollywood rocks!

  ReplyDelete
 10. @भाग्यश्रीताई, इथेही एका मॉलमध्ये इनडोअर आइसस्केटिंग आहे आणि त्यांचा क्लब...काही वर्षांनी तिघंही शिकु बहुधा..

  @सोनाली, बॉलिवुड रॉक हे अगदी खरंय़...

  ReplyDelete
 11. अप्रतिम, लाजवाब व्हिडिओ... :-)

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.