लेकाला सारखं इथल्या लायब्ररीत नेताना लक्षात आलं कळत नकळत नर्सरी राइम्सकडे तो जास्त ओढला जातोय. खाता-पिता तिथल्या कविता साभिनय म्हटल्या की स्वारी खुश असते. म्हणजे त्यात काही वैट नाहीये. तेही शैक्षणिक आहे पण नकळत आपण आपल्या गाण्यांना विसरतोय की त्याच मार्केटिंग कमी पडतय असं होऊ नये म्हणून शेवटी आज बरेच दिवसांनी "फ़ुलोरा" हातात घेतलंय. ’मी माझा’ मुळे चारोळी प्रसिद्ध झाल्या असं बर्याच जणांना वाटतं पण मी म्हणते खोटं आहे. त्या आधीच फ़ेमस होत्या. लहान मुलांची कितीतरी गाणी म्हणजे चारोळ्याच आहेत.
बघा ना छोट्यांना चारोळी आणि ज्यात खूप अभिनय करता येईल असं काही तर हवं नाही का? मी तर माझ्या पद्धतीने खूप सारी गाणी रिमिक्स पध्दतीने म्हणते. म्हणजे जी ओळ त्याला आवडत असेल ती वेगवेगळ्या चालीत आणि आवाजात म्हणजे तेवढाच तोंडाचा आ जास्त वेळा होतो आणि दोन घास जास्त पोटात जातात :)
असो. तशी गाणी अशी शोधली की सापडत नाहीत. पुन्हा बालवर्गात जावं लागणार असं दिसतंय. तसही माझं शालेय शिक्षण मराठीत झाल्यामुळे किंडरगार्टन सध्या चालु आहेच. दुसरीकडे बालवर्गपण रिपिट करते. म्हणजे मग कुठेच कमी पडायला नको. असो. एक-दोन छोट्या इथे देतेय. वय वर्ष एकसाठी चारोळीच बेश्ट.
१. मनिमाऊ मनिमाऊ
नेहमीच तुला हवा खाऊ
उठता-बसता गुरुगुरु
म्याव म्याव सदा सुरु
२. गरगर फ़िरुनी दमला भोवरा
मनात म्हणाला थांबु का जरा
पण एका पायावर उभं कसं राह्यचं
सारखं डोकं खाली जायचं.
आणि आपलं ऑल टाइम हिट...हॉल ऑफ़ फ़ेममध्ये कध्धीच गेलेलं
३. ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाउस आला मोठा
he pustak kuthe milate i mean publisher etc kalel ka?
ReplyDeletemam jara sangal ka he pustak kuthe milel te ????
ReplyDeleteअश्विनी आणि अनामिक इतके दिवस फ़ुलोरा बाळराजांनी एका विविक्षित ठिकाणी लपवला होता. सापडला एकदाचा. तसदीबद्द्ल क्षमस्व...
ReplyDelete"गीतपुष्पांचा फ़ुलोरा" संपादक सुनिल नाटेकर, गार्गीज प्रकाशन. किंमत - रु. १६०.
माझ्या बाबांनी बोरिवलीत "शब्द" म्हणून एक पुस्तकांचं दुकान आहे तिथुन घेतला.
आणि हो या पोस्टमधल्या चारोळ्या या पुस्तकातील नाही आहेत. पण या लेबलवाल्या इतर पोस्ट्समध्ये त्यातील कविता दिल्या आहेत. धन्यवाद!!
Thx Aparna ag Anamik mich aahe hahahha tuza baryach post la mich "Anonymous" mhanun comment takali aahe :)
ReplyDeleteहम्म्म्म्म्म्म्म्म्म मला वाटल होतंच फ़क्त तू confirm केलंस.... कशी वाटली आयडिया अनामिकांना शोधण्याची :)
ReplyDeleteया ब्लॉगवर तुझं आता अगदी मनापासून स्वागत आणि प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
आणि हो मिळालं का पुस्तक??
ReplyDeleteshodhay chi idea mast aahe :) ag ag nav etc lihun ghetale aahe pan ajun gele nahi ghayala
ReplyDeleteme Punyat aste aani ekade Swine Flu ne dhumakul ghatala aahe so baher paday chi himmat hot nahi fakt ofc aani ghar etkech firate :)