गेले काही दिवस आम्ही ती जुनी एक जाहिरात आठवतोय ज्यात नवरा-बायको आपल्या मुलाला बोलायला शिकवत असतात आणि मग नवरा म्हणतो "झेकोस्लोव्हाकिया बोला" असं काहीतरी. निमित्त आहे अर्थातच चिरंजीवांची इतके दिवसाची हु, आछ आणि असं काहिबाही बोललेलं अचानक "दुदु" रुपाने भेटीला आलं.
"अरे हा बोलला!". माझं मत तो कामाचं बोलतो. म्हणजे अगदी सुरुवातीपासुन त्याला बेसिक म्हणजे "आई" "बाबा" असं त्याच्याबरोबर बोलुन आणि त्याला शिकवुन दाखवत होते. अर्थात मुलगे जरा उशीरा बोलतात हा जगमान्य सल्ला माहित असल्याने इतक्या लवकर आउटपुट मिळेल अशी अर्थातच अपेक्षा नव्हती. मध्येच कधीतरी त्यानं बाबाबाबा असं म्हणायला सुरुवातही केली होती. पण अर्थातच ते "बाबा" नव्हतं. म्हणजे एकतर तो बाबाकडे पाहुन तसं बोलत नव्हता आणि दोन बा म्हणुन थांबतही नव्हता त्यामुळे अर्थातच आम्ही काही तो बोलतो बिलतो असं काही जाहिर केलं नाही. आणि तसं मुलं आधी नुसतं ब्लॅबर करतातच ना हे थोडं तसचं. नंतर तर मी तो "आई", "बाबा" हा धोशही थोडा कमी केला आणि एकदम नॉर्मली त्याच्याशी बोलणं चालु ठेवलं. पण मागच्या महिन्यात जेव्हा बी.एम.एम.ला आम्ही गेलो होतो, तेव्हा स्ट्रोलरच्या कप-होल्डरला त्याचा दुधाचा सिपी कप ठेऊन मी त्याला इथे तिथे हिंडवत होते. बहुधा नेहमीची दुधाची वेळही टळून गेली होती. थोड्या वेळाने छोटे साहेब स्वतःच तो सिपी कप माझ्याकडे घेऊन आले आणि चक्क "दुदु"?? मी काय सॉलिड उडाले. कधी एकदा नवर्याला सांगते असं झालं.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे नाही की त्याला शिकवणारे सगळे शब्द सोडुन फ़क्त रोज दुदु घे असं म्हटलेलं दुदु त्याने सर्वप्रथम त्याने म्हटलं. मला पक्की खात्री आहे ही आजची पिढी बरोबर त्यांना काय हवं तेच पहिले करणार आणि ते बरोबर त्यांच्या फ़ायद्याचं असणार. पुढच्या शब्दाची अजुन वाट पाहातोय म्हणजे तसा एखादा शब्द तो म्हटल्यासारखं करतो झेकोस्लोव्हाकियासारखं. पण मी एखाद्या दिवशी जेवण द्यायचं विसरले तर वरण-भात किंवा खिचडी असं काही म्हणेल. आणि खरंच आई हा शब्दतर माझी आई इथे आल्यापास्नं घोकतेय पण हा ढिम्म दाद देत नाही तिला. बाबा कधीतरी आपल्या मागे म्हटल्यासारखं तरी करतो आजीसाठी पण कधीतरी "ताजी" पण आई?? अहं..अजिबात नाही. मी माझ्या आईला म्हटलं अगं सध्या त्याला सगळ्यात सहज आईच उपलब्ध आहे त्यामुळे त्याला काही गरज नाही आई म्हणण्याची. कदाचित सर्वात शेवटीच म्हणेल.
आजकाल मध्येच तो काही नाही बोलला तरी आम्हाला काहीतरी अर्थपुर्ण ऐकु येतं आणि मग आम्ही तिघं त्याबद्दल चर्चा करतो. त्यातल्या त्यात दे दे बर्यापैकी स्पष्ट वाटतं. म्हटलं ना कामाचं काय ते सर्व पहिलं. तो काय म्हणेल ते म्हणेल माझा नवरा मात्र अजुनही वाट पाहातोय त्याच्या "झेकोस्लोव्हाकिया"ची.
झेकोस्लोव्हाकिया...हाहाहा! किती कठीण शब्द गं. म्हणलेही कदाचित ऐकून ऐकून. पण मग ती दाद तुझ्या अहोंच्या चिकाटीला द्यावी लागेल.:)
ReplyDeleteबाकी हे बोबडे बोल आणि त्यांचा अर्थ लावण्याचा आपला प्रयत्न...मजा येते. ह्म्म्म, मुद्द्याचे दोन शब्द लेक बोलू लागलाच आहे. मस्त.
झेकोस्लोव्हाकिया फ़क्त त्या जाहिरातीवरुन घेतलेलं. बाकी काय वाट पाहायची काय काय बोलतो आणि नंतर शब्दसंचय वाढला की काय काय ऐकावं लागतंय ते?? आपण आवर्जुन लिहिलंत त्याबद्दल धन्यवाद.
ReplyDeleteमुलं नातवंडं बोलायला लागल्याचे जुने अनुभव जागे झाले. पण प्रत्येकाचे अनुभव निराळे आणि आनंदहि! छान लिहिलंय
ReplyDeleteबोबड्या बोलाबद्दल अभिनंदन.. आमचा बोबड्या बोलांचा आनंद फार काळ नाही टिकला.. स्वारी आता इतकी बक-बक करत असते की अरे बाबा जरा गप्प बसं म्हणायची वेळ येते :-)
ReplyDeleteyet to experience..;)
ReplyDeletepaN masta lihilay..
sahee.. masta lihilaye. amhi hi vaaT pahato ahot baLachya pahilya bolaNyachi. :-)
ReplyDeleteप्रभाकर, अनिकेत, मुग्धा आणि सर्किट सर्वांचे अभिप्रायाबद्दल मनापासुन आभार.
ReplyDelete