Sunday, March 21, 2010

भात्यातला नवा.....चाकू

शॉपिंगची आवड बायकांना जास्त असते हे म्हणणं साफ़ खोट ठरवतील (आणि खरं ते तसं आहेही....) असे अनेकजण माझ्या माहितीत आहेत..आणि त्यात सगळ्यात वरचा क्रमांक मी माझ्याच नवर्‍याचा लावेन...एकतर सारखं लॅपटॉप घेऊन बसणं...(नाही अज्जिबात रागाने लिहित नाही मी) आणि मग त्यात डिल्स टु बाय, इ(ईईईईई) बे सारखं निदान एक(?) पान सुरु असणं हे शॉपिंगचं पहिलं लक्षण नव्हे का? नव्वद टक्केवेळी दुकानात गेल्यावर सगळ्यात पहिले आम्ही पुरुषांच्याच विभागात वळतो आणि मग तिथे ट्रायल रुम ते आयल अशा फ़ेर्‍यांमध्ये उरला वेळ तर मग महिलाविभाग असंही होतं...एकदा जरा जास्त तीव्र निषेध झाल्यामुळे ना तेरा ना मेरा करत आमची पावलं गृहोपयोगी या सदरात मोडणार्‍या विभागात वळली आणि तिथेच कळलं आपल्या नवर्‍यातला कसाई कसा लगेच जागा होतो ते...
खरं तर आमचं लग्न व्हायच्या आधीच या पठ्ठ्याने खायची प्रत्येक प्रकारची वस्तू वेगळ्या चाकुने कापता येईल याची सोय आधीच केलीय...नाही विश्वास पटत?? हा फ़ोटो पहा....

टि.व्ही वरती आयुष्यभर टिकणार्‍या सुर्‍यांची जाहिरात करणारा तो बुटकेलेसा शेफ़ टोनी आणि त्याची ती मिरॅकल ब्लेड आठवतेय का? आधी तो एक चाकू घेऊन टॉमेटो कापून दाखवतो आणि तीच सुरी इतर तमाम वस्तू कापल्यातरी परत टॉमेटो कसा त्याच शिताफ़ीने कापते...त्यानंतर मग कांदे-बटाटे कापायचा दुसरा, फ़िले करायचा अजून एक, चॉपिंगसाठी वेगळा असं करत करत डझनभर चाकूंची चळत आपल्यापुढे उभी करतो आणि मग मानभावीप्रमाणे याची किंमत खरं तर तीन आकडी पण तुमच्यासाठी चाळीस लावले बघा...आत्ताच्या आत्ता फ़ोन करा हा कार्यक्रमही आमच्याकडे काही काही शनिवारी तसंही काय लावायचं इथे टिव्हीवर या सदराखाली चालु असायचा..मग एकदा मी सहज म्हटलं अरे तुझे काही चाकु अगदी त्याच्याकडच्यासारखेच वाटताहेत असं म्हटल्यावर अगं मी तोच सेट युएसमध्ये आल्यावर घेतला होता अशी लगेच कबुली दिली त्याने...आ वासुन मी पाहातच राहिले... अरे बायकापण इतक्या पटकन भूलत नसतील त्या जाहिरातीला..मग तरी ’सगळे टिकले नाहीत का?’ (या चाकुंना आयुष्यभराची गॅरेंटी असते असं म्हणतात) या प्रश्नावर ’त्यातले काही मग मी भारतात गेलो तेव्हा इथे-तिथे वाटले..मला लागतील तेवढेच मी ठेवले’...ही कबुली नं.२....काही नाही मी फ़क्त तो आधीचा आ मिटला....
आता इतके चाकू घरात आहेत तर गप्प बसायचं ना?? इतकं आहे तरी चिकन कापायला जास्त सोपं म्हणून एक सुरासदृष्य मोठा चाकूही घेतला..."मी कापतो. तुला माहित नाही हा किती उपयोगी पडेल ते..आणि शिकागो कटलरीचे चांगले असतात माहितेय का तुला?" "बरं बाबा घे"...आता इतकं करून थांबेल तर तो कसाई कसला?? एके दिवशी सु की दुर्दैवानं कोह्ल्स या आमच्या अतिलाडक्या डिपार्टमेंट स्टोअरचं २०% सवलतीचं कुपन दारात आलं. त्यामुळे नको असताना आम्ही शनिवार साजरा करायला तिथे गेलो...(तो वरचा निषेध प्रसंग तिथलाच आहे) तर गृहोपयोगी सदरात मी जरा खरंच उपयोगी म्हणजे तवे, वाडगे असं काही पाहात असताना तिथेच क्लियरन्स (?) मध्ये आमच्या कसायाला शिकागो कटलरी या जरा चांगल्या (आणि खरं तर महाग..यांचे चाकू इतरवेळी कपाटात कुलुपबंद असतात...) कंपनीच्या दोन चाकूंना त्यांनी सो कॉल्ड क्लियरंस भावात काढलं होतं ते नेमकंच दिसलं..

"अरे, पण आहेत नं इतके आधीच घरी??"..."नाही गं मऊ फ़ळं यातल्या लहान चाकुने काय मस्त कापली जातील माहितेय का? आपल्या आधीच्या मोठ्याला हे दोन छोटे भाऊ छान शोभतील, शिवाय २०% आहे नं आपल्याकडे??" "अरे मऊ फ़ळं मी दातांनीच कापीन ना" हे माझे उद्गार ऐकायला येणं शक्यच नव्हतं आमच्या ताफ़्यात हे दोन नवे शिलेदार दाखल झाले...
मध्ये मंदीमुळे काही काही चांगली दुकानं बंद झाली तेव्हा त्यांच्या चाकू विभागातलं काही आपल्याकडे (’आपण भारतात जाऊ तेव्हासाठी गं’--लाडाने तो) येईल का याचीही चाचपणी झाली पण माझ्या भाग्याने मंदीतही अशा लाडक्या सेट्सची किंमत तीन आकडीच्या खाली उतरली नव्हती म्हणून निव्वळ वाचलो. परत कधीही चाकूने बोट कापलं तर "इतके चाकू घेतलेत पण तू नेहमी चुकीचा चाकू वापरतेस" हे डाफ़रायचं किंवा "या गोष्टीसाठीचा वेगळा चाकू घ्यायला पाहिजे सांगतो तुला" अशी धमकी....
नव्या घरात आल्यावर हे सगळे चाकू ठेवायला मला जरा अडनीडं वाटू लागलं म्हणून मी म्हटलं की एक नुसता चाकू ठेवायचा लाकडी बॉक्स घ्यायला पाहिजे.खरं तर तू इतके चाकू घेतलेस पण तो बॉक्स बरा घेतला नाहीस कधी असंच म्हणायचं होतं पण तसं काही न म्हणता फ़क्त हे घेऊया म्हटलं म्हणजे आपल्याच हाताने पायावर चाकू आपलं धोंडा मारून घेतला..आता कुठल्याही दुकानाच्या चाकू विभागात आमच्या पायांचे तुकडे पडायला लागले...अरे चाकू नाहीत फ़क्त बॉक्स.. पण समदं ऐकायला पाहिजे नं या गड्याने....शेवटी एका मेसिजमधून चाकु सकट बॉक्स आमच्या स्वयंपाकघरात येऊन पडलाच...’अरे मग फ़ायदा काय??’ - करवादले मी....’अगं मागे मी भारतात नेलेले चाकू तसेही जुने झाले असणार आतापर्यंत तर यावेळी यातले चाकू नेऊ आणि मग हा बॉक्स आपल्यालाच...; -शांतपणे इति तो...

आता चाकूचा विषय कुठल्याही कारणाने बंद असं करुन मी गप्प झाले पण माहित नाही काय झालं पुन्हा एकदा १५% चं कुपन आलं, पुन्हा आम्ही त्याच त्या गृहोपयोगीमध्ये गेलो आणि यावेळी फ़ूड नेटवर्कचं नाव ल्यालेला चाकू दिमाखदारपणे क्लियरन्समध्ये त्याच त्या कसायाची वाट पाहात थांबला होता..यावेळी तर कार्टमध्ये फ़क्त माझेच नवे घेतलेले कपडे होते त्यामुळे केवळ नवर(?)दया या नव्या कॅटेगिरीखाली हा चाकू आमच्याघरी आला...हा मात्र शेवटचा...


आता बॉक्समधली जागा तर कधीच संपलीय पण ड्रॉवर्सही भरलेत..म्हणून या नव्या चाकूचे लाड त्याच्या मालकाला काय काय कापायची संधी देऊन मी मात्र पुन्हा तोच तो दुसरा लाकडी बॉक्स घ्यायची दुर्बुद्धी सुचू नये याची मनोमन प्रार्थना करतेय....आणि आमचा कसाई मात्र भात्यात कुठला नवा चाकू टाकता येईल का हे पाहात असेल...

43 comments:

 1. एवढे चाकु.
  भविष्यात चाकुचे म्युझीयम बनवण्याचा विचार आहे का?

  नविन चाकू संभाळून वापरा... दोन दिवसापुर्वीच एका नविन चाकूने कांद्याबरोबर मी माझे बोट कापुन घेतले आहे. मग आईने नविन चाकू परत ठेवुन दिला आणि जुनाच बाहेर काढला...

  ReplyDelete
 2. आयला.. सोलिड चाकू आहेत... ह्याने कित्ती काय-काय कापता येइल आणि कित्ती खादाडी करता येइल नाही ... !!!

  ReplyDelete
 3. मस्त झाल्ये हो पोस्ट, वाचताना तूफान मजा आली. अशा इम्पल्सिव खरेदीचा फटका मला नुकताच बसलाय. गेल्या रविवारी मोबाईल डेटा प्लॅन घेतला आणि इकडलं 3G माझ्या फोनवर चालत नाही बघून पुढच्या तीन तासांत आयफोन घेऊन टाकला. दोनच दिवसांपूर्वी ट्विनिंगचे चहा ऑनलाईन मागवले, लाकडी खोक्यासकट [:D] आता माझ्याकडे पुढच्या सहा महिन्यांच्या डिपडिप चहांची सोय नक्कीच होईल. आजच प्रयोग म्हणून यूएसबी टीवी ट्यूनर कार्ड आणलं.
  आमचाही नाईलाज असतो. नेट आणि टीव्ही या गोष्टी आमच्या मनात ढकलतात आणि मनातलं हातात आल्याशिवाय चैन पडत नाहीत. गोष्ट हातात आल्यावर मात्र "ऑसम" वाटतं [:D]

  ReplyDelete
 4. जामच सही झालयं गं पोस्ट....

  आमच्याकडे आम्ही दोघेही खरेदीच्या बाबत तसे बरेच काटेकोर आहोत.... हातात बरेचदा लिस्ट असतेच घ्यायच्या सामानाची, त्यापेक्षा जास्त आणि गरज नसलेल्या वस्तूंची चंगळ ६ महिन्यात एखाद्या वेळेस होत असावी....नाहितर नाहीच!!!
  ही सवय माझी आई आणि बहिण यांना आहे.....आमचे बाबा तर म्हणतात काही दिवसानी घरात ईतके सामान होइल की त्यातले काही उचलुन मी पण एखाद्या शोपीस सारखा उभा राहिन... :)

  बाकि ते चाकू सही आहेत हं!!!!रोहनला बघ, जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला खादाडी दिसतेय.....हेहे.... लगे रहो...

  ReplyDelete
 5. चाकुचे म्युजियम नक्कीच काढणार तुम्ही.... :)

  ReplyDelete
 6. दिपक, अरे कापणारा पाहिल ते....मी फ़क्त पोस्ट लिहिणार...चाकू आणण्याची परवानगी मी का दिली ते तुला कळलं नाही की काय?? आणणारा आणि कापणारा (बोट नाही कांदा आणि तत्सम) एकच आहे इथे....आणि मलाही असंच वाटतं आता काही दिवसांनी आम्ही चाकुंचं म्युझियमच काढणार....आणि तिकिटविक्रीसाठी मीच बसेन हा हा हा....

  ReplyDelete
 7. रोहन, तू येतोस का इथे?? चाकू आहेत फ़क्त कापून बनवायची देरी आहे...खायला मी आहेच रे...

  ReplyDelete
 8. नॅकोबा, बर्‍याच दिवसांनी येणं केलंत...:) तुम्हीही खरेदीत गुंतला होता वाटतं..माझं पहिलं वाक्य एकदम खरं आहे हे पटलं माझं मलाच...आणि ते ऑनलाइन च्याचं जरा तपासून घ्या...नाहीतर दर महिन्याला ते तुमच्या क्रेडिट कार्डावर बिल टाकून घ्या इतका प्याच महिन्याला म्हणून युगेनयुगे पाठवत राहतील आणि मग ते बॉक्स तुम्हाला आमच्याकडे पाठवावे लागतील...

  ReplyDelete
 9. तन्वी, तशी खरेदीच्या बाबतीत मीही काटेकोरच आहे गं..पण आपण जरा चांगलं ढळढळीत उदा. द्यायचं म्हणून ही पोस्ट तुला कशी वाटते??
  माझ्या एका मित्राने आम्ही घर सोडताना दिलेला सल्ला कम अनुभव सांगते..तो म्हणतो घेतलेली वस्तू जर बारा महिने आपल्याकडे लेबल न काढता तशीच पडून राहिली तर ती सरळ तशीच्या तशी डोनेशनमध्ये देऊन टाकणे हा एक नवा नियम त्यांनी सध्या केलाय..इथे बारा महिने लागली नाही म्हणजे फ़ोर सिझन्स झाले तरी गरज नाही..(आणि मग पुन्हा नवी तशीच आणायला निदान घरात जागा होईल..इति आम्ही दोघं...:)

  ReplyDelete
 10. आनंद, आता मात्र सिरियसली विचार करावा लागेल...दोन गिर्‍हाइकं इथेच दिसतात...लाइफ़ मेंबरशिप घेणार का??

  ReplyDelete
 11. चालेल, पण मेंबर्शिप फी म्हणुन बोट वगैरे कापुन नाही ना घ्यावं लागेल ;-)

  ReplyDelete
 12. हा हा हा....नाही बोट नाही पण आता वाटतं कांदे कापायला बसवावं....:)

  ReplyDelete
 13. आयला काय धारदार झालीये पोस्ट. प्रतिक्रिया टाकताना पण बोट कापलं जायची भीती वाटत्ये. मी मागे एकदा शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन बघितलं होतं त्याच्यानंतर एवढे चाकू एकदम एकत्र पहिल्यांदाच बघितले :P ..

  एवढे सगळे चाकू खरंच वापरता तुम्ही? ..शेजारी चांगलेच दबकून असतील ना ग? ;-)

  ReplyDelete
 14. हा हा हा हेरंब....या चाकुंचा कर्ता-करविता कोण आहे ते कळलंच असेल....वापरतो बर्‍यापैकी...आणि त्या चाकुंच्या धमकीला घाबरून माझं काय होत असेल असं नाही वाटलं का रे तुला?? शेजारी काय मीच पहिले दबकून असते...ब्लॉग तो वाचत नाही म्हणून लिहिलंय झालं....नाहीतर माझी काय बिशाद???

  ReplyDelete
 15. शी 'दबकून' काय. ते 'दबून' आणि 'वचकून' एकत्र होऊन चुकून 'दबकून' टंकलं गेलं.

  ReplyDelete
 16. आणि हे "शी 'दबकून' काय" तुझ्या कमेंटवर नाही माझ्याच कमेंटवर लिहिलं होतं. :-) तेवढ्यात तू रिप्लाय दिलास पण.

  आणि मी actually प्रतिक्रिया टाकताना अशी टाकणार होतो "एवढे सगळे चाकू खरंच वापरता तुम्ही?.. वापरता म्हणजे भाज्या-बिज्या चिरायला यअर्थी विचारतोय मी." हा हा :-)

  ReplyDelete
 17. कळलं मला....पण वापरतो...तसेही आम्ही भाज्या, चिकन, मासे असे तर्‍हेतर्‍हेचे प्रकार कापतो त्यासाठी इतके चाकू तर हवेतच ना???-------इति......????
  आणि त्यात आजकाल मी केक-बिक पण करते मग तेही कापायला नकोत का?? :)

  ReplyDelete
 18. छ्या कळलं नाही तुला.. मी म्हणत होतो की फक्त भाज्या-मासे-केक्स कापयालाच वापरता ना.. साप्ताहिक, मासिक भांडणांच्या वेळी नाही ना .. :D LOL

  ReplyDelete
 19. माझं उत्तर वाचं ना पहिलंवालं...मीच दबकून असते म्हणजे बघ...:) आणि कळतं रे मला पण...:)

  ReplyDelete
 20. वके वके.. पांढरं निशाण !!

  ReplyDelete
 21. अरे वा!
  काही प्रश्न उद्भवले:
  १. नवरोबा किचनमध्ये फिरकतो का?
  २. "चाकू पौर्णिमा" वगैरे करता का?
  ३. "दसर्‍याला" या सर्व चाकुंचीच पुजा होतच असेल?

  ... निव्वळ उत्सुकता!

  ReplyDelete
 22. चक्कूपुराण सहीच झालेय अपर्णा. दिनेश तुला किती प्रकारे मदत करायला उत्सुक आहे ते पाहायचे सोडून...:P. मग आज कुठल्या चाकूने काय कापायचा विचार आहे... ( बोटांना बक्ष दे चक्कूदी मलिका....)

  ReplyDelete
 23. हा हा हा..भुंगोबा प्रश्न सॉलिड आहेत.....२ आणि ३ करायला हवेत आणि खरं तर इतके चाकू त्याने घेतल्यावर मीच स्वयंपाकघरात फ़िरकायचं का त्याचा विचार करते.पण फ़िरकले तरी भीती आणि नाही तर त्याहुन जास्त...एकुण काय भय इथले संपत नाही.....:)

  ReplyDelete
 24. चक्कुदे मलिकला सांगते तुझा निरोप भा....भा.पो...बरं का??

  ReplyDelete
 25. सही. मी देखील माझ्या दोन्ही अमेरिका वारीच्या वेळी परत येताना ७ चाकू आणि १२ चाकूचा असे दोन सेट (लाकडी खोक्या सकट बरं) घेऊन आलो. ते न घेता माझा पाय निघतच नव्हता. आणि का कुणास ठाऊक ते घरात असल्यामुळे उगाच एक सुरक्षित भावना माझ्या मनात असते ;-) एक मोठा चॉपरसारखा चाकू खास बाबांना दिला. ते त्याचा चिकन-मटन कापण्यापासून ते बागेतली झाडे तोडण्यापर्यंत सढळ हस्ते वापर करतात.

  ReplyDelete
 26. सिद्धार्थ तुझी कॉमेन्ट वाचून माझा नवरा जास्तच खूश होईल बघ....पण एक आहे इथे छान कलेक्शन मिळतं आणि टिकतातही छान....

  ReplyDelete
 27. chaku ya vishyat PHD jhalyasarkhe vatat aahe...

  chaku chya photo kade pahun vat te.

  saglyan ni khalil pramane manogat vyakt kele aahe

  Mothe chaku = aamchi dakhal ghya , nahitar aamhi tumchi dakhal gheu.

  Madhyam aakarache chaku = Mothya chakun itkech aamhi pan dhardar aahot, pan tyancha aakar motha , mhanun sagle tikdech baghtat aadhi.

  chote chaku = aamchi condition option la padlelya subject sarkhi jhali aahe. saglyat shevti aamchya kade baghtat..

  ReplyDelete
 28. @आठवणी, इतकी मुद्देसुद प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूपच आभारी...एकदम चाकू कॉमेंट...:)

  ReplyDelete
 29. बापऽऽऽऽऽरे....!!!

  फोटो पाहूनच हवा निघाली माझी...! पोस्ट वाचून तर मी इथेच गचकेल...! ;-@

  - विशल्या! ;)

  ReplyDelete
 30. हा हा हा...विशाल..तू पण ना....नवा चाकू दुकानात पाहून माझं पण तसंच झालं होतं.

  ReplyDelete
 31. असं असूनही तू ते एवढे मोठाले, आणीदार चाकू घरी घेऊन आलीच... दमदार आहेस तू...! इकडे तू मुंबईच्या मराठी ब्लॉगर्स मीटला येणार आहेस वाट्टं.. तिकडे आणू नकोस फक्त त्यातला एखांदा चाकू...! लोकं धूम ठोकतील मेळाव्याला!!! ;)

  ReplyDelete
 32. नाहीरे...तू येणार आहेस का मीटसाठी??? घाबरु नकोस यावेळी खरेदी लिस्टवर कुठलाही चाकू नाहीये....

  ReplyDelete
 33. अह्म्म.. मी नही येणार.. औरंगाबाद पासून मुंबई लय लांब हाये! शिवाय इकडे अभ्यास पण करणं हायेच मला..! तुम्ही लोकं करा एन्जॉय!!

  ReplyDelete
 34. तुम्ही खरंच एक प्रदर्शन भरवा चाकू-सुर्‍यांचं. आपल्याकडे जहांगीर आर्ट गॅलरी आहे तशी इकडेही एखादी असेल. तिकिटही ठेवा. म्हणजे चाकू विकत घेण्यात जेवढे पैसे घातलेत तुम्ही त्यातले काहीतरी वसूल होतील... ;-)

  ReplyDelete
 35. तुम्ही खरंच एक प्रदर्शन भरवा चाकू-सुर्‍यांचं. आपल्याकडे जहांगीर आर्ट गॅलरी आहे तशी इकडेही एखादी असेल. तिकिटही ठेवा. म्हणजे चाकू विकत घेण्यात जेवढे पैसे घातलेत तुम्ही त्यातले काहीतरी वसूल होतील... ;-)

  ReplyDelete
 36. संकेत तुझ्या कल्पनेची आयडिया भार्री आहे....:) निदान चाकुमागे घालवलेले पैसे वसूल होतील....

  ReplyDelete
 37. Replies
  1. मंदार फेसबुकवरचा नवा चाकू पण इथे डकवला पाहिजे ;)

   Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.