माफ़ करा दुसर्या कुणाचा लेख माझ्या ब्लॉगवर टाकतेय(क्रेडिट देऊन) पण काय सांगु आता "महिला दिना"साठी यापेक्षा छान काही वाचणं असूच शकत नाही...माझं नशीब यावेळी पहिल्यांदीच मी शनिवारी रात्री ऐवजी सोमवारी सकाळी तंबी वाचलं...आणि योग्य लेख योग्य दिवशी वाचायचा योग आला...हे हे हे... ही लिंक आणि खाली मूळ लेख...एकदम लोटपोट आहे....महिला दिनाच्या शुभेच्छा....
************
सकाळचे आठ वाजले तरी किचनमध्ये खुडबूड नाही, भांडय़ांचे आवाज नाहीत, नळ सोडल्याचा धो-धो जलप्रपाती स्वर नाही आणि आज रविवारसुद्धा नाही. तरी, सारं कसं शांत शांत? असा प्रश्न बंडूला मनातल्या मनात आणि पांघरुणातल्या पांघरुणात पडला होता. प्रश्न पडला आणि लगेचच दुसऱ्याच क्षणी डोक्यात प्रकाशही पडला. आज ८ मार्च! महिला दिन! आज बंडूनं सुट्टी काढली होती आणि आज तो स्नेहलता होणार होता. म्हणजे रोज त्याची बायको स्नेहलता जे करते, ते सगळं आज त्याला करायचं होतं. कुठल्या नाजूक क्षणी आपण हे स्नेहलताला कबूल करून बसलो, असं त्याला वाटलं, परंतु ते वाटून घ्यायलाही त्याच्याकडे वेळ नव्हता. पांघरूण अक्षरश: फेकून देऊन तो ताडकन उठला, तर स्नेहलता छान घोरत होती आणि उठल्या उठल्या बंडूला पहिलं काम काय करावं लागलं असेल, तर स्वत:चं फेकून दिलेलं पांघरूण उचलून घेऊन त्याची त्याला नीट घडी करावी लागली. मग तो ठरल्याप्रमाणं ‘स्नेहलता’ झाला. दार उघडून वृत्तपत्रं घेतली, दुधाची पिशवी घेतली आणि मग दिवसातला पहिला फटका बसला. कचरेवाला येऊन गेला होता आणि घरातलं डस्टबिन भरून वाहत होतं. मग पायात चप्पल चढवून हाती डस्टबिन धरून झोपाळलेल्या अवतारात तो बाहेर पडला. गेटवरच्या वॉचमनला म्हणाला, ‘ये किधर डालनेका?’ वॉचमन दयाळू नजरेनं म्हणाला, ‘वो चौक में है नं कचरापट्टी उसमे डालनेका!’वॉचमनच्या दयाळू नजरेचा फायदा घेत बंडूनं घोडं दामटवलं, ‘हमको मालूम नही, तुम फेकके आव ना.’ हे ऐकल्यावर वॉचमनच्या डोळ्यातले दयाळू भाव लगेचच रजेवर गेले. ‘अरे साहब, सेक्रेटरी चिल्लाते है, दुसरा कुछ काम किया तो, हम गेट नही छोड सकता.’ मग झक्कत बंडू गेला त्या चौकापर्यंत आणि मनातल्या मनात म्हणाला, ‘अब तुमको शिळा भात कभी नही देंगे. फेक देंगे. मगर तुमको नही देंगे.’ परत आला तर स्नेहलता वृत्तपत्र वाचत छान ऐटीत सोफ्यावर पाय पसरून बसलेली होती. ती छान शृंगारिक आवाजात म्हणाली, ‘चहा कुठंय?’ पण त्याला त्या आवाजातला शृंगार जाणवला नाही. कारण दूध तापवायचं होतं, चहा ठेवायचा होता. चि. गिरीश आणि भविष्यातली चिसौकां अलका हे दोघेही दुधाचे रिकामे मग टेबलावर आदळत आ वासून संकटासारखे बसलेले होते. स्नेहलतानं पुन्हा एकदा चहाची मागणी नोंदवली आणि कारटय़ांनी ‘मग संगीताचा’ ऱ्हिदम वाढवला, तेव्हा गॅसवर दूध ठेवता ठेवता बंडू स्वत:च्याही नकळत करवादला, ‘अरे, मला काय चार चार हात आहेत का?’ स्नेहलताचं हे नेहमीचं वाक्य आपण बोलून गेलो, याचं आश्चर्य करत बसायलाही त्याला वेळ नव्हता. कारण दुधाची रिकामी पिशवी धुऊन भिंतीला चिकटवून ठेवून होईस्तोवर आणि चहा-साखरेचे डबे काढून होईस्तोवर पातेल्यातल्या दुधानं भवतालाची ओढ अनावर होऊन पातेल्याची हद्द ओलांडली होती. मग विझलेला गॅस पुन्हा पेटवून आधी चहा ठेवावा की दुधाचे लोट आवरावेत, अशा संभ्रमात बंडू पडला. तोवर ‘मग संगीताचा’ ठेका द्रुत लयीत सुरू झाला होता!
* * *
‘आपली दोन्ही मुलं किती शहाणी आणि समजूतदार आहेत’ या भ्रमातून बंडूला बाहेर यावं लागलं. चि. गिरीशला स्वत:चे सॉक्स कुठे असतात, हे माहिती नव्हतं, बुटांना पॉलिश कशी करावी, हेही ठाऊक नव्हतं आणि टाय बांधायची तर सवयच नव्हती. ‘चिसौकां’ अलका त्यामानानं बरी, पण त्यामानानंच! कारण माझी पोनीटेल घालून दे, असा तिनं हट्ट धरला आणि मग ती ‘डोक्याच्या मध्यावर येत नाहीये’ अशी तक्रार करत अर्धा तास घालवला. शाळेची बस आली आणि ड्रायव्हर पें.. पें.. करत साद घालू लागला, तेव्हा बंडू तिचा टिफिन भरत होता आणि टिफिनमध्ये वेफर्स भरता भरता अजीजीनं ‘आईला नको सांगूस’ म्हणत होता. वृत्तपत्रात डोकं खुपसूनही सगळं लक्ष बंडूकडे असणाऱ्या स्नेहलतानं या ‘चिटिंग’ची मनात नोंद केली. कारण कराराप्रमाणे प्रत्येक चिटिंगला पेनल्टी होती. दोन्ही निरागस भुते बसच्या डब्यात बसून शाळेकडे रवाना झाली आणि बंडू चहाचा कप हाती धरून सोफ्यावर बसला. त्यानं वृत्तपत्र हाती घेऊन वाचायला सुरुवात केली- न केली तोच स्नेहलता मोठ्ठय़ानं आळस देत म्हणाली, ‘बसताय कुठं? आठ वाजले आहेत. मला जेऊन दहा वाजता बाहेर पडायचं आहे, टिफिन घेऊन. नवऱ्यानं बनविलेले टिफिन घेऊन आज आम्ही मैत्रिणी रिसॉर्टमध्ये जाणार आहोत’, हे ऐकताक्षणी बंडूनं राज ठाकरे, शरद पवार, नितीन गडकरी यांना सोफ्यावर फेकलं आणि उठून उभा राहिला. ‘सांगा राणीसरकार, आपल्याला काय हवंय टिफिनमध्ये?’ त्यावर सकाळच्याच शृंगारिक रसात स्नेहलता म्हणाली, ‘राजा, अरे अजून मेथीची भाजी निवडायची आहे, कुकर लावायचा, कणीक तिंबायची आहे आणि आठ वाजलेतसुद्धा. आधी माझे कपडे शोधून दे, मला आंघोळीला जायचं आहे!’ आणि बंडूसमोर धर्मसंकट उभं राहिलं. ‘हिचा पेटिकोट, ब्लाऊज.. कुठं बरं असतो घरात?’ मेरी याददाश्त खो गयी है, मुझे कुछ याद नही आ रहा है, मै कौन हू? मै कहाँ हू?’ हा हिंदी चित्रपटातला डायलॉग ‘डेली यूज’साठी किती उपयुक्त आहे, हे त्याला आज कळलं. मेथी निवडताना बंडूने चुकून अनेकदा पानं फेकून दिली आणि काडय़ा ठेवल्या. काडय़ांमधून पाने आणि पानांमधून काडय़ा वेगळ्या करण्यातच त्याचा बराच वेळ गेला. मेथीची डाळ-भाजी करण्यासाठी रात्रीच मुगाची डाळ भिजत घालावी लागते, हे त्याला सकाळी कळलं. त्यामुळं कुकरमध्ये वरण, भात आणि मुगाची डाळ असे तीन डबे बसवताना त्याची दमछाक झाली. आणि मुगाची डाळ मऊ शिजल्यामुळं मेथीच्या भाजीऐवजी मेथीचं वरण जन्माला आलं. पाणी कमी घातलं की कणीक फार घट्ट भिजते आणि पाणी जास्त झालं तर कणीक सैल होऊन पोळ्या लाटण्याला जुमानत नाहीत, हे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ बंडूला नव्यानं कळलं, तरी वळलं नाहीच. पोळ्या लाटून झाल्यावर त्याला, जगात ज्याने कोणी वर्तुळाचा शोध लावला त्याचा आणि पोळ्यांचा आकार गोलच असावा, हे ज्याने कोणी ठरवलं असेल त्याचाही भयंकर राग आला. आंघोळ करून, नवी साडी नेसून केस मोकळे सोडलेली स्नेहलता सुंदर दिसत होती. परंतु तिने जेव्हा हातातला ओला टॉवेल बेडवर नुसता भिरकावला आणि ‘वाढ चटकन. वरण-भात खाते आणि भाजी-पोळी डब्यात नेते’, असं म्हटलं तेव्हा बंडूला स्त्रीचं सौंदर्य किती क्षणिक असतं, याचा साक्षात्कार झाला!
त्या दिवशी दुपारी विविध आकारांच्या पोळ्या आणि मेथीचं वरण खाता खाता बंडूनं विरंगुळा म्हणून चक्क ‘अगले जनम मुझे बिटियाही किजो’ आणि ‘अनुबंध’ या कौटुंबिक मालिका पाहिल्या. रात्रीच्या स्वैपाकाचा खडतर प्रवास आणि मुलांना झोपविण्याचा जागतिक विक्रम पार पाडता पाडता बंडूची स्थिती ‘मुझे अपनी शरण मे ले लो राम’ अशी झाली.
कशीबशी रात्र झाली, संपली. पुन्हा नवी सकाळ आली.
सकाळी भांडी घासणारी मावशी आली ती बडबड करतच, ‘पातेल्यांच्या तळाला जळून चिकटलेली भाजी, तव्याला पोळ्यांचं करपलेलं, कुकरमध्ये भात सांडलेला. मी जोशीबाईंना म्हटलं, मी नाही घासणार तुमची भांडी..’ हे ऐकून बंडू हबकला. त्याला सिंकमध्ये ठेवलेली रात्रीच्या स्वैपाकाची भांडी आठवली. ‘आज भांडी नाहीत घासायला’, म्हणत त्यानं मावशींना परत पाठवलं आणि सिंककडे गेला. भांडय़ांचा आवाज ऐकून स्नेहलता आतून म्हणाली, ‘काय करतो आहेस?’ तर बंडू म्हणाला, ‘काल एकादशी झाली, आज द्वादशी साजरी करतो आहे!’
शुभेच्छा अपर्णा. मग आज तुझे "हे" पण असाच काही करतायत की नाही?
ReplyDeleteनसतील तर तंबी दे...हे हे हे
हा हा हा...सुहास..ह्यांनी काल याचा अर्धा पार्ट केलाय एक ऍपेटायझर बनवुन...ज्यात दोन वेगवेगळ्या रेसिप्या वाचल्या गेल्याने एक नवीच पण मस्त रेसिपी जन्माला घातली गेली...
ReplyDeletesahi ch ga ....mast aahe lekh maza kadun miss zala par zala tu parat post la te :)
ReplyDeletemaza gharacha bandu tar sagale baherun ghevun yeil karan bandu la kahich yet nahi hehehehe
अश्विनी(I hope thats you...) हा हा हा...अगं सगळेच बंडु सगळंच करू शकत नाहीत...आमच्याकडे मुलाला झोपवायची वेळ आली की सपशेल शरणागती पत्करलेली असते..एकदा तर साहेब स्वतः घोरतात आणि पोरगं स्वतःशीच बोलतंय असंही दृष्य़ होतं....
ReplyDeleteमी ही पोस्ट टाकताना विचार करत होते टाकू की नको?? पण असं वाटलं की कुणी राहिलं असेल वाचायचं तर निदान त्यांना थोडी मजा येईल...चल माझं एक गिर्हाइक झाल्याबद्दल धन्यवाद...
अपर्णा आम्हाला पुढच्या ८ मेला स्नेहलता च्या ऐवजी 'अपर्णा'ची कहाणी वाचायची आहे तयारीला लाग
ReplyDeleteएखाद्या नाजूक क्षणी तुही असेच एक वाचन घेऊन ठेव ;) आणि आम्हाला पुढच्या वर्षी खरीखुरी कहाणी वाचू दे
जीवनमूल्य
विक्रम अपर्णाने या वर्षी ही कहाणी वाचुन दाखवली आहे..पुढच्या वर्षी त्यामुळे काही प्रगती झाली तर नक्की लिहेन...पण हे असं हलकंफ़ुलकं लिहिणं एकंदरित "माझिया मना"ला झेपत नाही रे....त्यामुळे तसं लिहिलं तरी ते कसं होईल काय माहित....
ReplyDeleteआणि ८ मेला काय असतं रे?? जागतिक पुरूष दिन वगैरे नाही ना??
अपर्णा, एवढा मस्त लेख वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद! दिवसाची सुरुवात तर छान झाली! :-)
ReplyDeleteअरुंधती
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/
हा हा हा.. येडाच हाय बंडू. मी असतो तर म्हणालो असतो असं काही ठरलंच नव्हतं. Bandu (Men) will always be Bandu (Men) :P
ReplyDeleteLoL...Sunder Lekh aahe...!
ReplyDeleteKharach Lotpot!!!!! maja aa gaya.
ReplyDeletesahi ga olakhles mala te .......me nav lihayche viasar te anek da aata me ya pudhe nav lihile nahi tari chalel :) -Ashwini
ReplyDeleteअपर्णा
ReplyDeleteगलतीसे मिस्टेक हो गया ;)
८ मार्च ऐवजी ८ मे झाल हा हा
बाकी 'माझिया मना'ने मनापासून ठरवलं तर असाच काय यापेक्षाही चांगल जमेल प्रयत्न कर फक्त
आभार अरुंधती, क्रान्ति, आशिष..आशिष स्वागत या ब्लॉगवरचे माझे लेख पण आवडतील अशी आशा...:)
ReplyDeleteबंडू.. आपलं हेरंब तुला असं काही घडलं तर काय होईल या विचाराने घाम नाही ना फ़ुटला??
विक्रम गलती से मिश्टेक ठीक है इस बार मुआफ़ किया...:)
अश्विनी तू खरं तर तुझ्यासाठी एक अकॉन्ट बनवुन त्या नावाने लिवलंस तर तुला पण बरं होईल म्हणजे ते कोड-बिड टाकायला नको आणि नाव वेगळं नाही लिवलं तरी कळेल...तसंही मला तुझं अक्षर ओळखता येतं म्हणा पण तरी....
sahi aahe!!
ReplyDeleteस्वागत आणि धन्यवाद शब्दांकित...
ReplyDeleteअपर्णा, काल नचिकेतलाही वाचून दाखवला...... मस्त हसलो दोघे.... मग हळूच म्हणाला, " बरे झाले आपला चि.शोमू कॉलेजात गेलाय आणि तू बरीच कोऑपरेटिव्ह आहेस... म्हणजे मी तुला मस्त जेवण खिलवू शकतो गं... पण बाकी सगळा उल्हासच आहे.... " :) मजा आली गं.
ReplyDeleteश्रीताई, आमच्याकडेही असे लेख मी लगेच वाचुन दाखवते आणि हा तर महिला दिनालाच वाचुन दाखवला. अर्थात योगायोगाने आदल्याच दिवशी मला त्याने चिकन चिली खिलवली होती, ती रिपीट करू का असंतरी म्हणाला....
ReplyDelete