नंतरच्या एका आठवड्यात परत छान स्वच्छ सुर्यप्रकाश होता म्हणून बाहेर पडलो तर त्यांनी आपलं अस्तित्व दाखवायचं ठरवलंच होतं बहुधा म्हणून यावेळी चक्क थोडे मोठे दिसले...तरी ह्म्म्म...कदाचित हे बल्ब्ज सनी डेजमुळे कन्फ़्युज झाले असतील असं म्हणत होते आणि आता लायब्ररीमध्ये पाहाते तो काय चक्क फ़ुलांसहित....आता काय म्हणणार??
बरं ते राहुदे हे सगळीकडेच आता डॅफ़ोडिल्स आणि बहुधा ट्युलिप्सनी वर यायचं ठरवलंय तर काय मान्य करायलाच हवं ना? की its early spring this time in northwest...मी जिथे काही वर्ष राहिले तिथलं वातावरण मी आता तिथे नसताना पार बिघडलंय तर जिथे मी आलेय तिथं सृष्टीत नवचैतन्य एकदम संचारलय असा माझ्या सोयिस्करपणे अर्थ लावलाय...:)
असो...नेहमी असं नसतं इथंही असं इथले जाणकार म्हणताहेत... पण ते काही का असेना वसंताची चाहुल लागलीय हे नक्की..
ही चेरीची फ़ुलं फ़ुलायला लागली की शेंबडं पोरही मान्य करील त्यामुळे राहावत नाही आहे....
अमेरिकेतल्या वास्तव्यात बहुधा पहिल्यांदाच इतका सुखद हिवाळा मी अनुभवलाय....आणि आता तर ऋतुराज वसंताचंही आगमन झालंय म्हणजे सोने पे सुहागा...
तर माझ्या मिडवेस्ट आणि नॉर्थइस्टमधल्या दोस्तांनो, येईल येईल तुमच्याकडेही आता काही आठवड्यात नक्कीच अवतरेल
तोवर माझ्या ब्लॉगवर फ़ुललेली फ़ुलं आणि चेरी पाहुन आपलं समाधान करुन घ्या...
वॉव. आला पण स्प्रिंग तिथे? इथ theoretically येऊ घातलाय. प्रत्यक्षात कधी येतो ते त्याचं त्यालाच माहित. आणि एकदम बरोबर बोललीस. वाचलातच तुम्ही. यंदाचा हिवाळा भयानक होता इथे. उठसुठ स्नो.
ReplyDeleteअर्थात नाही म्हणायला हा विकेंड तसं सनी आहे म्हणा. होप असंच चालू राहील.
सुरेख फुलली आहे ग चेरी. लेखही आवडला. स्प्रिंगच्या आगमनाच्या शुभेच्छा.
ReplyDeleteकसले सुंदर दिसतेय गं...आहाहा............
ReplyDeleteजळवा आम्हाला...:(( किती लकी रे तुम्ही लोक.... स्प्रिंग चक्क कोंबाकोंबातून फुटलाही तिथे. ब्लूमला होते ना तेव्हां माझ्या बागेतले ट्युलिप्सची पाती वर आली की मन आनंदून जाई.जिकडेतिकडे उत्साह, काड्या झालेली झाडे किती आणि कुठून कुठून फुटू अशी असोशीने भराभरा हिरवी होत. ऑफिशियली स्प्रिंग आलाच आहे जवळ पण इथे कधी येतोय कोण जाणे. स्नोचा धुमाकूळ चालूच आहे. अपवाद या विकेंडचा. तुझ्या या पोस्टने मस्त वाटले.
ReplyDeleteहेरंब वॉव काय?? जुना झालाय तो पण मैंने आप लोगों की हालत देखके इस पोस्ट को थोडा रोक्या...नाहीतर जळून जळून खाक झाला असता तिथे तुम्ही
ReplyDeleteक्रान्ति, ब्लॉगवर स्वागत..चेरीचा बहर पाहायला एक-दोनदा वॉशिग्टन डीसी ला गेलो होतो त्यापुढे ही चेरी अगदी लल्लुपंजु आहे पण चेरी आली की मग मान्य करावंच लागतं की फ़ायनली थंडी संपतेय म्हणून कौतुक..
ReplyDeleteतन्वी आभार.
ReplyDeleteभाग्यश्रीताई या पोस्टला मी कधी लिहिलंय हे सांगितलं तर रडशील..कारण तेव्हा तुम्ही इतक्या कहर बर्फ़ात होतात ना? पण असो...इथंही वसंताचं हे लवकरच आगमन नेहमीचं नाही बरं का?? काय आहे यावर्षी मी आलेय ना ही ही...पण आता काही आठवड्यात तुमच्याकडेपण यील गं....
ReplyDeleteछान पोस्ट! स्प्रिंगच्या शुभेच्छा! :-)
ReplyDelete-- अरुंधती
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/
धन्यवाद अरूंधती..
ReplyDeleteवाह..मस्तच. अजुन फोटोस टाकायाचेस ना. खूप सुंदर आहेत. Enjoyyyyy
ReplyDelete:) धन्यवाद सुहास..खरंतर ब्लॉगस्पॉटच्या पोस्टमध्ये पिकासामधुन स्लाइड शो कसा टाकायचा ते शोधतेय मी..पोस्टपेक्षा फ़ोटोच जास्त दिसले असते..:)
ReplyDeleteव्वा!!!! सुंदर. . . .वसंताच्या शुभेच्छा!!!!
ReplyDeleteपीकासा मध्ये आहे तो ऑप्षन... Embeded a Slide Show mhanun. Right-hand sidela
ReplyDeleteधन्यवाद मनमौजी...
ReplyDeleteमजा आहे, नाहीतर इथे आता उन्हाळा सुरु झाला आहे... :(
ReplyDeleteआनंद, हैद्राबादला उन्हाळा सोडूनही कुठला ऋतु असतो का ते माहित नाही मला...हे हे....
ReplyDeleteसुहास पाहाते मी...मला मिळाला होता तो विजेट देत होता त्यामुळे पोस्टमध्ये वापरता येत नव्हता...
ReplyDeletecherry phulalee kee many karavech lagate! mast post .
ReplyDeleteDC la janar aahot amhee nehameepramaNe yandahee..
होय ग सोनाली..आणि तू तर तशीही जवळच आहेस डिसीच्या मग तुम्ही तर जायलाच हवं...आमच्या वाट्याचं पण जाऊन घ्या...
ReplyDelete