दिवस - ४ मार्च २०१०
वेळ - दुपारी १२
स्थळ - माझा लॅपटॉप आणि मेल बॉक्स
मूड - थोडासा वैतागलेला...मराठी दिनाला एका दीनवाण्या ब्लॉगरने मेलमार्फ़त पिडायला सुरुवात केलीय..त्याला चांगल्या शब्दात सांगितलं बाबा मला काढ या धाग्यातून तर उत्तर तर नाहीच...दोनेक दिवसांनी पुन्हा काहीतरी ट ला ट लावलेलं मेल...अरे कुणी नोकरी दिली रे याला आय.टी.त..साधं बी.सी.सी. नाही का करु शकत...आता आज याच धाग्यावर कुणीतरी अजुन एक आपल्या ब्लॉगची जाहिरात करतोय.याच त्राग्यावर नेमकं उत्तर म्हणून एक पोस्ट वाचली..चला आपल्यासारखेच पिडीत आहेत ब्लॉगजगतात आणि याचसाठी केला होता का ब्लॉगचा अट्टाहास असं ज्याच्यामुळे वाटलं त्या पिडणार्याच्या ब्लॉगवर जायचं का या पोस्टवरच रिप्लाय द्यायची असाच एकंदरित त्रासलेला मूड..पण यापैकी काहीच न करता हाती आलेलं काम करण्यासाठी म्हणून परत एकदा मेल चेक केली आणि काय???
अहो चक्क कौशल इनामदारांची कॉमेन्ट...खरंच...विश्वास बसत नव्हता म्हणून पोस्टवर पण जाऊन पाहिलं...ग्रेट यार...एक कोण कुठली ब्लॉगर तिच्या मराठी अस्मिता अनुभवाबद्दल दोन ओळी काय खरडतेय आणि माहित नाही कुठून कसं त्याने वाचलं पण तिच्यासाठी दोन शब्द त्यालाही लिहावेसे वाटले बॉस आलं ना यात सारं..एका सच्च्या दिलाच्या मराठी माणसाबद्दल म्या पामराने काय बोलावं??
बास...गेला पळून तो आधीचा त्रागा...मारो गोली उस टॉपिक को.....
आता तर हा ब्लॉग आणि मी आमचं एकचं गाणं..
"आज मैं उपर...आसमान नीचे...आज मैं आगे...जमाने के ब्लॉग है पीछे..."
सहीच.. झक्कास..
ReplyDeleteआणि तसंही "जमाने के ब्लॉग्स है पीछे" हे खरंच आहे. किती फॉलोअर्स आहेत बघ ना.. :)
आयला हे तर लक्षातच आलं नव्हतं..अरे तसंही कविता करायला (आणि खरंतर जास्त वाचायला पण) येत नाही नं म्हणून पेटलीच नाही....हो ते सगळे फ़ॉलोअर्स आहेत म्हणून टिकलेय आतापर्यंत नाहीतर :)
ReplyDeleteअसो..आज मात्र जरा विमान वरती आहे...ही ही....
हे होणारच होता कारण ती पोस्ट अगदी मनापासून लिहली होतीस तू आणि मस्तच होती. त्यामुळे कौशलची पोचपावती हे सोने पे सुहागाच झाल :)
ReplyDeleteअपर्णा
ReplyDeleteमस्तंच झालं होतं ते पोस्ट!! अभिनंदन!!!
Congrats MaM bharich ki ekdam !!!!!!!!!! mag party de aata heheheh -Ashwini
ReplyDeleteसहीच....... :). अपर्णा, अभिनंदन!दुपारी फोनवरचा खुशीने चहकणारा आवाज तुझा ओसंडून वाहणारा आनंद पोचवून गेला होताच. कौशलचे कौतुक आहेच. ग्रेट.
ReplyDeleteमस्तच.... कौशलची कमेंट .... क्या बात है. . .अभिनंदन!!!!
ReplyDeleteकौशलची प्रतिक्रिया मिळाली अजुन काय हव आता तुमच्या ब्लॉगला...खुप खुप अभिनंदन....!!!
ReplyDeleteक्या बात...क्या बात...क्या बात....
सुहास,महेंद्रकाका, अश्विनी, श्रीताई, मनमौजी,देवेंद्र आपल्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद..आणि खरं तर कौशलचं कौतुक आहे की छोटीशी गोष्ट असते पण त्याने खूप फ़रक पडतो हे बहुतेक त्यालाही वाटलं असेल......
ReplyDeleteआणि महेंद्रकाका तुम्हाला सेम पिंच तुमच्या ब्लॉगवर पण आज कॉमेन्ट आहे त्याची...पाहिली मी (त्याबद्दल अर्थात हेरंबचे आभार कारण त्याने मला सांगितलं...)
अश्विनी सगळ्यांनी पार्टीसाठी इथेच या...तशीही इथे कुणी येणारं नसतंच..तेवढंच घर भरेल...:)
अरे वा! अभिनंदन!
ReplyDeleteवा: एवढा मोठा माणूस नुसता ब्लॉग वाचतच नाही तर प्रतिक्रिया पण देतो, म्हणजे धन्य वाटले असेल. हार्दिक अभिनंदन!
ReplyDeleteसही..............अपर्णा मनापासून अभिनंदन, आणि कौशलचे कौतूक आहेच. त्याच्या ब्लॉगवर दिलेल्या प्रतिक्रीयांना देखील तो रिप्लाय करतो......
ReplyDelete@आनंद, निरंजन आणि तन्वी धन्यवाद..मी खरंच काल दिवसभर हवेत होते...
ReplyDelete