Sunday, January 10, 2010

बापरे ९०० आत्महत्या???

आधी शेतकरी आणि आता विद्यार्थी, आपल्या देशातल्या सध्या सगळ्या वर्तमानपत्रात आणि मराठी ब्लॉगवर प्रत्येक जण याच विषयावर बोलतात म्हटल्यावर एन.पी.आर.च्या विकेन्ड एडिशनवरही आत्महत्या आणि त्याही एकदम नऊशे असं ऐकल्यावर मी तर गळपटलेच...पण जीवितहानी नाही म्हटल्यावर जीवात जीव आला आणि मग पूर्ण ऐकलंही...
आपण सोशल नेटवर्किंगच्या कुठल्याही साईट्स वर आहात?? म्हणजे फ़ेसबुक, लिन्कडेन नाहीतर ट्विटर इ.इ...सारखी तुमची फ़ेसबुकवरची भरलेली भिंत किंवा ट्विटरवरच्या वीटवीटला जीव विटलाय?? अगदी मायाजालावर आत्महत्या करावीशी वाटते?? आहे इथे तुमच्या मदतीसाठी खास एक साइट आहे ज्यांना तुम्ही कळवायचं की जीव (म्हणजे मायाजालावर हो) द्यायचा आहे की ते तुमचं प्रोफ़ाइल चित्र, पासवर्ड इ. बदलून टाकतील. तुमची आतापर्यंतची सगळी ट्विटट्विट पुसून टाकतील तसंच तुम्ही ज्यांची चिवचिव ऐकून कंटाळला आहात त्यांच्या नेटवर्कमधून तुम्हाला काढून टाकतील आणि तुमची कटकट जे ऐकत असतील त्यांनाही गुडबाय..आणि हे सर्व तुम्ही त्यांना थोडी माहिती पुरवलीत की अगदी तुमच्या समोर (आय मीन तुमच्या स्क्रीनवर).


नेदरलॅंडमध्ये स्थित काही कलाकार, डिझाइनर्स आणि अर्थातच प्रोगामर्स यांच्या सुपीक डोक्यात आलेली ही कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली आहे या सुसाईड मशिनच्या साईटच्या रूपाने. त्यामुळे लोकं आपल्या खर्याखुर्या सोशल लाइफ़ मध्ये परत जातील असंही त्यांना वाटतं. आतापर्यंत आत्महत्या केलेल्यांपैकी २५ टक्के लोकांचं खरं सोशल लाइफ़ सुधारल्याचंही ते म्हणतात..
आपुल्या डोळा आपला मायाजालावरचा मृत्यु उर्फ़ आत्महत्या करायची असेल तर या साईटवर सगळी माहिती मिळेल..त्यांचा मागच्या आठवड्यापर्यंत ९०० आत्महत्या, ५८,००० हून जास्त मैत्रीची कनेक्शन्स कट आणि जवळजवळ २,३१,०० ट्विट्स काढणे असा जबरदस्त स्कोअर पाहून फ़ेसबुकने मात्र सध्या त्यांना थोडं पेचात पकडलयं त्यामुळे त्यांच्याशी आता ते कसं काय डिल करतात त्याबद्दल साईटवरच माहिती मिळेल...
मग फ़ुकटात मरायला तयार का?? फ़क्त एकदा हो म्हटलं म्हणजे क्लिकलं की पुन्हा नो करायला साइटचा मालकही काही करू शकत नाही ही आपली तळटीप...

10 comments:

  1. Sahi aahe ho bai.....ag kititari jan tayar aahet ase jiv dyayala.........

    ReplyDelete
  2. आजकाल सगळीकडेच जीव खूप स्वस्त झाला आहे :(

    ReplyDelete
  3. यावरुन केट विंस्लॆट, जिम कॅरीचा इटर्नल सनशाइन ऑफ स्पॉट्लेस माइंड सिनेमा आठवला....

    ReplyDelete
  4. तुझं म्हणणं खरंय तन्वी..बर्याच दिवसांनी दिसलीस...

    ReplyDelete
  5. विक्रम, आपल्या देशात तर जीव जरा जास्तच स्वस्त झालाय..प्रकरण येतात आणि त्यावर काहीही न होता ती मिटवली जातात...काय बोलणार??

    ReplyDelete
  6. आनंद प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...तसे जिम कॅरीचे पिक्चर्स साधारण माहित असतात पण हा आता पाहावा लागेल किंवा नव~याला विचारावं लागेल.......

    ReplyDelete
  7. सोशल नेटवर्किंगचं खूळ जरा जास्तच वाढलंय अलीकडे. आणि आता तर ते खूळ न राहता गरज बनली आहे कित्येकांची. बाप रे.. पण त्यासाठी आत्महत्या (वेबवर का होईना)? आत्महत्या हा शब्द जरी ऐकला नुसता तरी खूप उदास व्हायला होतं.

    ReplyDelete
  8. हेरंब बरोबर आहे..लिन्कडेनचं उत्तम उदाहरण आहे....आत्महत्या कारण मग काही लोकांना त्यातही नकोसे लोकं भेटत असावे किंवा नकोसं होत असावं.....

    ReplyDelete
  9. "काल शेतकरी, आज विद्यार्थी आणि उद्या सॉफ्टवेअर इंजीनिअर, तरीही गर्जा महाराष्ट्र माझा !"

    माझं हे वाक्य काही वर्षात खरं होईन... :-)

    -अजय

    ReplyDelete
  10. हम्म्म अजय तुझं म्हणणंही खरं होईल की काय असंच वाटतंय..मागे अनिकेतची एक पोस्ट वाचली होती ना याबद्दल?? शिवाय त्या नोकरीतून मीही गेलेय....वर जाता जाता वाचलेय...

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.