Friday, June 15, 2012

वाह! क्या चीज है.....


चीज या खाद्यपदार्थाशी माझी पहिली ओळख जरी "पिझ्झा" या माध्यमाद्वारे झाली असली नं तरी खरं चीज भेटलं ते देश सोडल्यावरच...मजा म्हणजे अगदी सुरूवातीला मला चीज हा प्रकार चवीला आवडला नव्हता...तसं खरं म्हणजे मला मनापासून पिझा आवडत नाही असं म्हटलं तर माझ्यासाठी थोडेफ़ार निषेधाचे फ़लक येतील. पण त्याचं कारण चीज नसून माझ्या शरीराच्या आम्लतेला आमंत्रण देणारा तो लाल सॉस हे आहे...असो हे विषयांतर कम तेल हो हो चीजच्या पोस्टेतलं तेल....प्रोसेस्ड चीजवर कसं थोडं तरंगतं तेवढंच पुरे....:)

तर इकडे चीज म्हणजे नुस्तं चीज खाणं म्हणतेय मी....माझं एक प्रोजेक्ट होतं लॉंग आयलंडला. तिकडे ज्या हॉटेलमध्ये आम्ही सगळे कंसलट्न्ट राहायचो त्यांच्या लॉंजमध्ये संध्याकाळी वरती एका छोटेखानी बारमध्ये चीज आणि क्रॅकर कॉंप्लिमेंटरी असायची. लोकांनी वाईनवर खर्च करावा म्हणून केलेली युक्ती असू शकेल..पण एकतर माझं वाईन आणि तत्सम प्रकाराशी काहीच नातं नसल्याने आणि चीजचंही विशेष आकर्षण नसल्याने मी तिथे नुस्तीच ज्युस घेऊन टवाळक्या करत असे....साध्या भाषेत ज्याला पी एम नसला की "पी एमची मारणे" आणि असला की मूग गिळून त्याच्या "हो ला हो म्हणणे" नावाचा एक सभ्य प्रकार जगातले यच्चयाव्त आय टी कामगार करतात तसे...:)

त्या प्रोजेक्टची सगळीच टीम खायच्या बाबतीत भन्नाट होती..ब्रेकफ़ास्टला सगळीजणं साडे सातला भेटत ते तासभर अड्डा तिथेच...कामाची वेळ अर्थात कधीच चुकवली नाही. एखाद्याची सकाळची मिटिंग लवकर असली की तो त्यादिवशी फ़क्त पळे...त्यां सर्वांनी मला ते छोटे छोटे टुथपिकला लावून ठेवलेले चीजचे तुकडे खायला शिकवले असं म्हणायला हवं आणि मी त्यांना नंतर डीनरला एक भारतीय पद्धतीचं खूप छान रेस्टॉरंट होतं त्यांच्याकडचे बरेच प्रकार खायला शिकवले..हे म्हणजे खाणार्‍याने खात जावे, शिकवणार्‍याने खायला शिकवीत जावे आणि खाता खाता एक दिवस खाद्यप्रकारांची अदलाबदल व्हावी तसं चीज माझ्याही खाद्य आयुष्यात आलं...
त्या प्रोजेक्टमध्ये माझं वाढलेलं वजन हा माझ्यासाठी नंतर एक वेगळाच चर्चेचा विषय होता पण तेवढं एक सोडलं तरी चीज मनात जाऊन बसलं..मग एका वेगळ्या कारणामुळे पुन्हा बरंच चीज खाल्लं...आणि तसंही कंट्रोल्ड खाणं जमायला लागलं की हे छोटे छोटे तुकडे खाऊन काहीच जाडं व्हायला होत नाही हेही कळलं...आताही कुठे चीज सॅंपल्स असले की आम्ही दोघं ते आवर्जून खाऊन पाहातो आणि अर्थात एखादं आमच्याही घरात येतंच....
परवा असंच एका डिपार्टमेंटल स्टोअरला असंच एक चीज टेस्टींग होतं, तिथे तीन-चार प्रकारची चीज चाखली पण बाजी मारली ती स्मोक्ड फ़्लेवरने....हे आहे त्यावेळी घेतलेल्या स्मोक्ड गुडा (smoked Gouda) चं फ़ोटोसेशन......
तू "चीज" बडी है मस्त मस्त....

आणि आता फ़ोटो काढताना जरा समोर पहा बरं

Say cheese....:)

छोटे छोटे चीजचे तुकडे आणि सोबतीला क्रॅकर्स आणि ज्युस....यम्मी स्नॅक सगळ्यांसाठीच....



बाकी चीजमध्ये असलेल्या कॅल्शियम इ. चे गूण गाऊन पोस्ट टेक्निकल करण्यापेक्षा मी तर म्हणेन "वाह! क्या चीज है".
Enjoy !!!!



15 comments:

  1. पिझ्झा आणि चीझ हे माझं सर्वस्व आहे त्यामुळे या पोस्टला सुपर्लाईक !!

    ReplyDelete
    Replies
    1. तुझ्या कमेंटमुळे नकळत मी एक संपुर्ण शाकाहारी खादाडीवर लिहिलंय हे अचानक लक्षात आलं...:)
      सुपरलाइकसाठी सुपर आभार....:)
      येणार आहेस का चीज खायला??मोठा ब्लॉक आहे (आणि अजून तरी फ़्रीजमध्ये आहे...)

      Delete
  2. Say Cheeeeeese! superduper like Aparna!

    ReplyDelete
    Replies
    1. चीजक्लब मध्ये सुपरडुपर भेलकम, अनघे...:)

      Delete
  3. मस्त पोस्ट!!!
    काय छान पोझ दिल्यात...एकदम चीझी!!:)

    ReplyDelete
    Replies
    1. आभार पल्लवी..
      अगं तुझ्या ’चीझी" शब्दावरून आठवलं...अमेरिकन स्लॅंगमध्ये याचा अर्थ चीझने लडबडलेला असा नाहीये...खरं तर "चीझी" शब्द चांगल्या अर्थाने वापरला जात नाही....आहे नं गम्मत... ;)

      Delete
    2. खरच? भारतात नेमक उलट आहे म्हणायचं ;)

      Delete
    3. हा हा..पल्लवी च्यामारिकेच्या उ उ उल्टामध्ये आणखी एकाची भर.....;)

      Delete
  4. वाह अपर्णा, मजा आ गया. सहीच क्या 'चीज' हैं. बाकी मी ही तुझ्यासारखीच पिझ्झा मनापासून न आवडणारी आहे. पण चीज, ये 'चीज' लाजवाब हैं.

    ReplyDelete
    Replies
    1. ये ’चीज’ लाजवाब है....अगदी अगदी...
      आभार्स....:)

      Delete
  5. पिझ्झा हल्ली हल्ली आवडू लागलाय पण ओव्हर ऑल अपून का पिझ्झा नॉलेज लिमीटेड है ;-) त्यातल्या त्यात च्यामारिकेत टॅको-बेलमध्ये बरेचदा खालेल्ला चीज पिझ्झा हा एकच अपवाद. 'नुसतं' चीज हा प्रकार अजुन ही "नसेल तर बरे" ह्या पठडीतच.

    बाकी स्मोक्ड फ्लेवरचे 3D फोटो एकदम सही आले आहेत ;-) चुकुन सफरचंदाची फोड समजून एकाच वेळी सगळा तुकडा गट्टम् करशील आणि "वाह क्या चीज है" बरोबर "चीज अ डे कीप्स कॅलरीज अवे" असे म्हणत फिरशील :D

    ReplyDelete
    Replies
    1. पिझ्झावरचे सर्व प्रश्न रा.रा...हेरंबराव ओकांकडे सुपूर्त करुया का?? मला नव्या यॉर्कातला ब्येस्ट पिझा त्याने खायला दिलाय म्हणून म्हणतेय मी....(इच्छुकांनी जुनी एक खादाडी पोस्ट पानं उलटून वाचून खातरजमा करून घ्यावी..;) )


      अरे चीज कॅलरीजना अवेच ठेवतं...म्हणजे चीज खाऊन पोट भरलं की बाकीच्या क्यालर्‍या ठेवायला जागाच नसते नं...म्हणून तुझी नवीन म्हण खरीच आहे....;)

      चीज खायला तुला खास ओरेगावला यावं लागेल....:)

      Delete
  6. Replies
    1. बाबा, इटलीत राहून चीजची वैर घेऊ नये असं म्हणतात..खरं खोटं बाबाच जाणे...;)
      मला तर वाटलं होतं चीज आवडतं म्हणून तू ते काय Chosen One म्हणतात तसा इटलीत राहातोस... :)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.