Thursday, September 30, 2010

कामगार जीवनातील एक दिवस

ही दिनचर्या वाचण्यापूर्वी इथे अपेक्षित असलेला कामगार म्हणजे आधुनिक जगतात संगणक नामे यंत्रावर संपूर्णपणे किंवा दिवसाच्या कामाच्या तासातले निदान ८०% तास संगणकावर काम करतो अशी व्याख्या आहे याची कृ नो घ्या.


सकाळी सकाळी शक्यतो कंपनीच्या बसने हा कामगार कामावर आला की आधी वंदू तुज प्रमाणे संगणक सुरु करतो. उगाच चला म्हणून उंदीर मामांनाही हाय करतो आणि आजूबाजूच्या इतर कामगार मित्रांकडे नजर टाकतो...ओझरती नजर आपल्या साहेब या विशेष श्रेणीतल्या कामागाराकडेही गेलेली असते पण तो तसे अजिबात दाखवत नाही. त्या झलक नजरेमधून सर्वप्रथम साहेब आहेत का आणि असल्यास त्यांचा मूड या दोन्हीच्या निरीक्षणामधून आपला उर्वरित दिनक्रम आखायला त्याला मदत होते. आता मायबाप कंपनी सरकारच्या कृपेने त्याचा गणपती बाप्पा सुरु झालं असेल तर तो चेहऱ्यावर कामाने पछाडलेपणाचा एक भाव आणून आपली गरम,जी, थोबाड्पुस्तिका अशी अनेक मेल अकौंट उघडून त्यामध्ये ताझी खबर काय आहे त्यानुसार या..........हु म्हणून कामाला म्हणजेच त्या मेलना उत्तर, त्यातली काही तत्परतेने इतर कामगार आणि मित्रमंडळीच्या अकौंटला पाठवणे अशी अति महत्वाची काम करतो. मधेच त्याला आपल्याला एक आउट लूक किवा लोटस नोट नावाचा अकौंट पण आहे याची आठवण येते आणि तो तेही उघडतो...आदल्या दिवशी काय दिवे लावले आहेत त्यानुसार ही मेल बॉक्स भरलेली किवा ओसंडून वाहणारी अश्या कुठल्यातरी एका प्रकारची असते...
आता इतका पसारा निस्तरायचा म्हणजे पोटात ब्रेकफास्टचे दोन कण गेले पाहिजेत अस अर्थातच त्याच्या पोटातले उंदीरमामा सांगत असतात. त्यांनी नाही सांगितले तर त्याच्या संगणकावर सुरु करताच इतर कामगारजनाशी त्वरित संपर्क साधणारी तीच वेळ, दूत अशी software त्यांच्या खिडक्यामधून तोच संदेश त्याच्यापर्यंत पोहोचवण्याच काम करून दमल्या असतात...

तो हीच वेळ योग्य समजून उठतो तोवर आजूबाजूच्या कामगार खुर्च्याही सरकवण्याचे आणि सारेच कॅन्टीन नामे मुक्कामाच्या ठिकाणी निघाल्याचे सूर आसपास घुमतात आणि पाचेक मिनटात मजल्यावर नीरव शांतता पसरते. कॅन्टीन मधली रांग, काय घ्यायचं किवा नाही याबद्दलची चर्चा, आपल्याला हवं ते टेबल (याची व्याख्या कामगार ग्रुप प्रमाणे निराळी असते...ट्रेनी किवा नवीन लोक शक्यतो सकाळी सकाळी पाहत राहता येईल अशी हिरवळ जिथून दिसेल ती जागा पसंत करतात... काय आहे हिरवळ पाहिलेली डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली असते असे एकमत आहे) तर सांगायचा मुद्दा म्हणजे सकाळी साडेआठ नावाच्या सुमारास आलेला कामगार वर्ग अश्या प्रकारे साडेदहा वाजेपर्यंत पोटपूजा आणि वर उल्लेखलेली कामे (??) करून पुन्हा एकदा आपल्या खुर्चीवर स्थानापन्न होतो...

जेवणात जस मीठ महत्वाचं तसच रोजच्या कामात एक किवा दोन मिटींगा या हव्यातच...त्यातलीच एखादी असल्यामुळे कामाने त्रस्त बिचारा कामगार मग system वर लॉगिन करून काही पाहण्याचा विचार रद्द करून मिटिंग रूम मध्ये जातो...त्याला बोलायचं नसतच ऐकायच की नाही हेही तोच ठरवतो.. वायरलेस connection असेल तर त्याला ते न ऐकता आपण खूप बीजी असल्याचा आव आणता येतो नसेल तर शून्यात नजर लावून तो एक तास कशी बशी कळ काढतो... ते शून्यात नजर उगाच साहेबाला आपण कामाचा चिंतन करतोय अस भासवायला पण मनात मात्र इतक्यात आवडत्या क्यूबमधून आलेला संदेश नाही तर दुसर्या कंपनी मधल्या "तिने' किवा "त्याने" पाठवलेली मेल नाहीतर मग सकाळी हिरवळीवर दिसलेलं नव पाखरू असे अनेक थोर विचार मनात रुंजी घालत असतात...

हा मिटिंगचा अक्खा एक तास आणि वर आणखी अर्धा तास डोक्यावरून पाणी चाळीसेक मिंट दुसरी फुटकळ काम करणे नाहीतर mom उर्फ मीटिंगची मिंट बनवणे किवा पुन्हा पुन्हा वाचणे या कार्यात काढेपर्यंत जेवणाची वेळ होतेच..पुन्हा मग सकाळी सांगितलेली पिंगपिंगी, रांग (यावेळी जरा मोठी) हिरवळीची जागा हे सोपस्कार होतात आणि मग मात्र हक्काचा लंच टायमाचा तास बडवायला मंडळी जरा चक्कर मारायला बाहेर जातात...कुणी पान सुपारीवाल असेल तर त्याची सोय नाही तर चिंगम चॉकलेटसारख्या कारणाने पुन्हा एकदा इतर कंपनी मधली हिरवळ पाहणेही होते...झालंच तर किती काम आहे (??) या नावावाखाली साहेबाला किवा client ला शिव्या घालण्याचं पवित्र कार्यही याच वेळात होऊन जात.

हे होईस्तो दुपारचा एक वगैरे वाजलेला असतो. मग मात्र आपल्या कामगाराला परिस्थितीची जाणीव होते...बरीच कामाची मेल, इशू लॉग इ गोष्टी वाट पाहत असतात..तो मान खाली घालून मुकाट्याने कामाला सुरुवात (दुपारी बर का??) करतो...त्यातही जर दुपारी मिटिंग असेल तर मग तिथे जाऊन उघड्या डोळ्याने झोप काढणे याखेरीज अन्य काही करणे त्याच्या हातात नसतेच. मिटिंग मधून बाहेर आल्यावर आपल्या कामाच्या software मध्ये आतापर्यंत लॉगिन केले नसल्यास करून पाच सहा खिडक्या उघडून कामाची वातावरण निर्मिती करणे त्याला भाग पडते. अर्थात मध्ये मध्ये होणारी पिंगपिंगी....सवयीचा परिणाम म्हणून पुन्हा पुन्हा आपल्या कामाव्यतिरिक्त मेल पाहणे, बझ करणे, इथली डाक तिथे पाठवणे...भावी किवा सद्य पार्टनर (असला तर) त्यांच्याशी sms , फोन, chat यासाधनांपैकी उतरत्या भाजणीने संपर्कात राहणे हेही कामगाराला करावच लागत...पाळणाघरात मुल बिल असेल तर मग बघायलाच नको आणखी एक संपर्क जागेची वाढ.. असो तर अशी ही काम करून थकलेल्या जीवाला थोडा श्रमपरिहार हा हवाच....शिवाय भारतीय कॅन्टीन असेल तर मग पाहायलाच नको....समोसा, वडे, चहा-कॉफी असे संमिश्र वास सुटलेले असतील तर जागेवर बसण अशक्यच...सगळा ग्रुप तय्यार असेल तर पुन्हा एक कॅन्टीन चक्कर नाहीतर निदान स्वत:च्या जागेवर काहीतरी खायचा मागवून शेजारच्या कुबातल्या मित्र-मैत्रिणीबरोबर आजचा दिवस कसला बोअर आहे किवा तो अमक्या तमक्याचा मेल पाहिलास का? (खुपदा ही चर्चा एखाद्या fwd मेलबद्दल असते हे सांगणे न लगे)

शेवटी एकदाचे चार सवाचार वाजतात आणि निर्ढावलेला कामगार असेल तर तो साडे पाच किवा सहाची पहिली कंपनी बस असते त्याने सटकायच्या दृष्टीने काम आवव्राच्या तयारीला लागतो...जितका अनुभव जास्त तितके हे काम जास्त लवकर आणि डोक्याला फार ताप न देता होते....खुपदा तर बरेचसे काम आदल्या किवा त्याच दिवसाच्या मेलना चतुरपणे उत्तर दिले की होऊन जाते....हुशार लोक यालाच आपल्या डोक्यावरचा काम दुसर्याच्या डोक्यावर घालणे असही म्हणतात पण खर ते तसही नाही त्याला in order to achieve ठिस, why dont we do it ......way असा साज चढवून ते 'वी' म्हणजे 'समोरचा' इतकं केलं तरी गोड बोलून काम होतं....अगदी तसं शक्य नसेल तर to proceed further I need following information from you म्हणून एक जमेल तशी मोठी लिस्ट बनवून समोरच्याच्या गळ्यात मारली की दुसऱ्या दिवसापर्यंत आपण तसेही proceed होणार नसतो मग अर्थात घराकडे proceed व्ह्यायला आपण मोकळे होतो...आणि मुख्य अश्या एक दोन तरी मेल ची कॉपी साहेब नावाच्या प्राण्याच्या पोस्टबॉक्समध्ये पडेल याची खबरदारी घ्यावी. म्हणजे लेकरू किती काम करतय असा वाटून तोही आपल्या बाजूचा...आणखी एक मुद्दा म्हणजे अश्या मेल्स गाशा गुंडाळून झाल्यावरच पाठवाव्या म्हणजे समोरचा गाफील राहून उत्तर देईपर्यंत आपण त्या साडेपाचच्या बसने दोन-तीन सिग्नल्स तरी गाठलेले असतात आणि आणखी एक दिवस सत्कारणी लावून आपण पगाराच्या दिवसाची वाट पाहायला मोकळे झालेलो असतो...अर्थात नेहमीच इतका सरळ धोपट दिनक्रम मिळणार नसतो. कधी तरी तो डेड लाईन नावाचा राक्षस पुढे होऊन उभा ठाकतोच. आणि इतर वेळी 'काय काम करतो की नाही हा' असे वाटणारा आपला कामगार अंगात शंभर हत्तीच बळ आणून नाईट (आणि अर्थातच डे पण) मारून झटपट काम उरकून client च्या गळ्यात मारून टाकतो...हा एक दोन किडे त्यात राहतात पण पुढच्या काम मिळायची हीच बेगमी समजून साहेबही त्याला शक्यतो रागे भरत नाही...

काय आहे, कामं करण हा खरा कामगाराच्या हातचा मळ आहे पण उगाच वेळेच्या आधीच ते संपवण्याची पण गरज नसते. त्यामुळे 'वारा तशी पाठ' या न्यायाने काम होत राहतात....पण वरच्या दिनचर्येत सांगितलेली कामं रोजच्या रोज केलेलीच बरी अशा प्रकारात मोडतात. अनुभवाने हे प्रत्येक कामगाराला (त्यातल्यात त्यात IT मधल्या) कळत आणि मग कामाचं ओझं न राहता it was just another day म्हणून त्याच कामाच्या जागी पुन्हा एकदा येण्यास तो सज्ज होतो.

30 comments:

 1. :-) :-) :-)
  तू आमच्या ऑफिसात काम करते काय गं ...ः)))))))))))))

  ReplyDelete
 2. आनंद, तुझ वाक्य ऐकून मला पेस्तनजी काकांच्या "तू फेसरीडिंग करते का रे भौ??"ची आठवण झाली...
  हा हा हा .....मायदेशी असताना तिथेच होते असं वाटतंय.....:)

  ReplyDelete
 3. मी आयटी फ़िल्डमध्ये नसुनही बरयाच गोष्टी जुळत आहेत हयातल्या..लिहलपण मस्त आहेस... :)

  ReplyDelete
 4. हा हा हा... कसलं भारी... !!!

  मला आज आमच्या हापिसच्या आजूबाजूला तुझ्यासारखी दिसणारी एक मुलगी दिसली होती.. आत्ता कळलं ती तूच होतीस आणि माझा सगळा दिनक्रम उतरवून काढलास ;)

  ReplyDelete
 5. देवेन, म्हणजे "घरोघरी मातीच्या चुली" असं म्हणायला हरकत नाही....

  ReplyDelete
 6. हेरंब कसच कसच....:) तुझ्यापेक्षा माझा दिनक्रम तुला मध्ये मध्ये चांगला माहित होता असं मी म्हणेन ......
  या पोस्टरूपाने तो थोडा मार्गी लावला....पण तरी बरेच उल्लेख राहून गेलेत....:) काश मेरे पास वो आपके जैसी शैली होती....:)

  ReplyDelete
 7. तुम्ही आयटी वाले लोकं ( वर कॉमेंट दिलेले सगळॆ) काम ( फॉर अ चेंज ) कधी करता????
  हा हा हा..

  ReplyDelete
 8. हम्म महेंद्रकाका, एकतरी नॉन IT वाला असं म्हणणार याची खात्री होती मला...म्हणून तर मी शेवटचा परिच्छेद टाकलाय....सगळ्या कामाचं सार त्यात आहे......आम्ही इतके expert असतो की वेळ आली की कामाचा समदा सुपडा साफ होतो......तोवर business requirement घेत आणि आपसात त्यांची टिंगल टवाळी करण्यात वेळ मजेत जातो.....:)

  ReplyDelete
 9. अपर्णा, अगं ट्रेड शिक्रेट्स अशी चव्हाट्यावर नाही मांडायची ... सगळे आयटीवाले मान मोडून कामं करतात असा बाहेरच्या जगाचा समज आहे - तो तसाच राहू द्यावा :D

  ReplyDelete
 10. फ़ार बरिक-सारिक गोष्टी पकड्ल्या आहेस तु...फ़ारच छान :-)

  ReplyDelete
 11. आमच्या कड बी असच असत फ़कीस्त कॅन्टीन सोडल तर....कारण डेस्कच आमच कॅन्टीन आहे...पार्सल आणायच अन बसल्या जागीच हादडायच... अन आमच्या डेड लाइन असतात त्या दिवशी शिमगा,दिवाळी,दसरा सगळे सण एकाच वेळी होतात. :) :)

  मीटींग म्हणजे डोक्याला शॉट असतो..दुसर काही नाही..मला तर मीटींगला गेल की खुप पेंग येते ;) :)

  ReplyDelete
 12. गौरी, अगं लेकी बोले सुने लागे असाही प्रकार आहे या observation मध्ये......बघ मी सुरुवातीला लिहिलंय की प्रत्येक कामगार जो निदान ८०% काम संगणक वापरून करतोय...IT वाले काम करतात हे कुणाला सांगायची गरज नाहीच आहे मुळी...आपलं output दिसतंय...
  पण आठव आपल्याच आसपास असणारे HR, ADMIN किंवा इतर काही DEPT चे लोक....संगणकावर खेळ पण सुरु असतात....त्यांचं काय?? तेही आधुनिक कामगारच न??
  ....:)

  ReplyDelete
 13. आभारी प्रसाद आणि ब्लॉगवर स्वागत...या स्तुतीबद्दल आता त्या सिरीयल सारखं "थट्टी इयर्स का experience है यार" असं म्हणावसं वाटतंय...

  ReplyDelete
 14. योगेश, काम म्हणजे काम असत तुमचं आमचं शेम असतं असाच म्हणूया की...

  ReplyDelete
 15. ते ८०% वालं वाक्य वाचलंच नव्हतं बघ :)

  ReplyDelete
 16. मिटींग मध्ये उघड्या डोळ्यांनी झोपताना खूप कसरत करावी लागते बर .... :)

  ReplyDelete
 17. "तू फेसरीडिंग करते का रे भौ(आय क्नो भौ इथे बसत नाही पण राहू दे)??"

  ReplyDelete
 18. आम्हाला नाय बा मिटींगचा कंटाळा येत. थोडी कोपर्‍यातली जागा निवडली की पाच-दहा मिनिटांची डुलकी तरी काढता येते. ;-)

  ReplyDelete
 19. अहो इतकी कामं करून देखील ह्यातलं एक देखील Status Report मध्ये येणार नाही ह्याची पूर्ण काळजी घेतली जाते. इतकी कार्यक्षमता दाखवून बाकायदा Status Report भरणे म्हणजे खाऊ नाही.

  ReplyDelete
 20. चलता है गौरी. अगं अश्या विषयांवर लिहायचं म्हणजे पाठशाला के हेडमास्टर होना पडताच है............

  ReplyDelete
 21. सचिन, सारखं दुपारच्या मिटिंगना हजर राहिलं की सवय होते बघ...अरे हो ब्लॉगवर ऑफिशियली स्वागत....माहित आहे मला तू वाचतोस पण अस वाटतंय की आज प्रगट झालायस.....:)

  ReplyDelete
 22. भौ बाबा....(वाचायला काय वेगळच वाटतय बग) खर म्हणजे मी "IT वाले जेव्हा परतक्ष client कडे काम करतात तेव्हाचा दिवस" ही पोस्ट जर लिहीली तर....:) घाबरू नकोस मी तू, हेरंब आणि अर्थात मी (आणि असे आपल्यासारखे कुणी राहिले असतील तर) यांना अजिबात संकटात टाकणार नाही....तवा हेच आपलं फेस रीडिंग राहू देऊयात....

  ReplyDelete
 23. कांचन नशीबवान आहेस...अगं इथे गोलमेज परिषदा असल्यामुळे कोपरा कसा गाठावा या विवंचनेत आम्ही उघड्या डोळ्यानेच पेंगतो...चष्मा असणारे भाग्यवान...:)

  ReplyDelete
 24. सिद्धार्थ ते "अहो" सगळ्या जनतेला उद्देशून असावं अस दिसतंय.......मी आपली तू म्हणूनच बरी. एक साधी कामगार...:) ....असो...
  अरे ते status report च विसरलेच यार......बापरे त्यासाठीपण अनुभवी कामगारच हवेत...नवख्यांना तिथे पण कसरत..पण जमत हळू हळू...ते की म्हणतात न पाण्यात पडल की आपोआप पोहायला येत....:)

  तमाम वाचकांसाठी एक छोटी नोंद...
  ही पोस्ट महिना संपायला आल्यावर टाकलीय...याची नोंद जनतेने घेतली आहे का?? खाल्या मिठाला आपलं ते घेतल्या पगाराला जागून...त्यामुळे सगळ मनापासून लिहीलं गेलय....:)

  ReplyDelete
 25. हाहाहा... प्रत्येक वाक्य न्‌ वाक्य लागू होतं. IT मधले लोक अगदी हेच करतात. (म्हणजे मी हे करतो. बाकीच्यांबद्दल आपल्याला काही ठाऊक नाही बुवा. पण आळशीपणात किंवा पापांमध्ये दुसर्‍याला वाटेकरी केलं की त्याची तीव्रता कमी होते ना.. ;-) ) माझे सगळेच दिवस हे असेच जातात. पगाराच्या दिवसाची वाट पाहणं, चार-चार वेळा कँटीनच्या वार्‍या, दुपारी पेंगत काम करणं, संध्याकाळी लवकर घरी जायची तयारी करणं, सकाळी थोडं उशीरा येणं... आपले विचार जुळतात बुवा. After all, brilliant minds think alike... ;-)

  ReplyDelete
 26. संकेत सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत...
  मी बराच वेळ विचार करत होते की मी ही पोस्ट नक्की का लिहिली असेल....आता मला उत्तर मिळालं, " पापांमध्ये दुसर्‍याला वाटेकरी केलं की त्याची तीव्रता कमी होते", म्हणजे किती वाटेकरी मिळायचे ते....:) चक्क या ब्लॉगचे फॉलोअर्स पण वाढलेत....
  मी तर तसही मान्य केलच आहे की कामं कशी होतात ते....आपला अनुमोदन आलय त्याबद्दल आभारी...
  you are right Brilliant minds think alike...:D

  ReplyDelete
 27. कामाची एकाध्याला सवय असते ,काम संपले कि आपण आपले राजे असतो ,रिकामे जरी असलो तरी माझे काम मी पूर्ण केले आहे हि सागण्याची धमक असली पाहिजे माझ्या मते ते बॉसवर व कामकार्ण्यावर अवलंबून असते

  ReplyDelete
 28. मीटिंग, ब्रीफिंग, पिंग्स नेहमीचच :(
  ह्यातल्या खूप गोष्टी चेंज करायच्या असतील तर आमच्या ऑफीस रूपी जेल मध्ये ये.. हा हा हा
  शेवटी कामगारच आपण ;)

  ReplyDelete
 29. महेशकाका तुम्ही एकदम "पाते की बात" सांगितली...पण मायदेशाताला अनुभव असा आहे की साहेबाच्या पुढे पुढे नाचणारी लोक नाचत नाचत पुढे जातात...इमानी कामगार फक्त काम करत राहतो....आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी....

  ReplyDelete
 30. सुहास तुम्हा लोकांना तर अशा सवलती मिळणं कठीणच...शेवटी कामगार खरय...

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.