Tuesday, May 22, 2012

बर्फ़ाचा गुलाबी बहर...


एक तर म्हणायचं बर्फ़, मग त्याला ल्यायचा गुलाबी रंग आणि सांगायचं काय तर हा बघा बहर....बात कुछ जमीं नहीं??? अहं....तसं काही अजिबात नाही आहे, बरं का! उत्तर अमेरीकेत थंडीमध्ये देवदाराचा अपवाद सोडून पानगळीला आणि मध्येमध्ये येणार्‍या बर्फ़ाला पर्याय नाही तसंच ही थंडी गेलीय आणि तो बर्फ़ आता नसणार आहे याची खात्री हवी असेल तर या गुलाबी बर्फ़ालाही पर्याय नाहीच...
म्हणजे आकाशात गुलाबी ढग दाटून येतात....

हळूहळू सगळीच झाडं हिरवी होणारेत याची खात्री पटवणारा तो बर्फ़ जवळून पाहिला की मन प्रसन्न होतं....अगदी वसंतातल्या धुंद वातावरणासारखं....


या बर्फ़ाची मजा लुटण्यासाठी एक दिवस आम्ही खास या पार्किंग लॉटमध्ये येतो...इथे खेळायला वयाची अट नाही....ते आम्हा चौघांनाही एकत्र धमाल करायला बरंच पडतं....



नजरेत साठवून घ्यावी याची अनोखी रूपं...किती फ़ोटो काढले, किती वेळ इथे थांबलं तरी डोळे थकत नाहीत....


खाली पडलेला हा गुलाबी बर्फ़ इतका सुंदर दिसतो नं की दुसर्‍या दिवशी कचरा उचलणारा इथे येऊच नये अशी सोय निदान काही दिवस तरी करावी असं मलातरी वाटतं....



ता.क. मागच्या पोस्टमध्येही म्हटलंय की यंदा (काही अपवाद वगळता) पोस्ट्स थोड्या उशीराने लिहिल्या जाताहेत....म्हणजे मार्चच्या शेवटी ट्युबिंगला गेलो होतो ते फ़ोटो एप्रिलला, बाबा इथे होते तेव्हापासून ऋषांक बोलतोय ते अगदी काल-परवा, त्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट तब्बल एक वर्ष लेट...

कारण मागच्या वर्षी आईला याच पार्किंग लॉटमध्ये हा बहर पाहायला आणलं होतं तेव्हा काही असेच (म्हणजे माणसं नसलेल्या) या जागेचे फ़ोटो काढले होते..ही जागा ज्या कंपनीच्या आवारात आहे तिथल्या काही संबंधीतांनी ते पाहिले आणि त्यांना ही कल्पना इतकी आवडली की त्यातला एक फ़ोटो मागच्या वर्षीपासून त्यांच्या अंतर्गत जालावर (इंट्रानेटवर) कव्हर फ़ोटो म्हणून विराजमान आहे....

स्वतःच स्वतःचे कौतुक करायचे प्रसंग किती असतात आणि तेही मला फ़ोटोग्राफ़ी करण्यापेक्षा (स्वतःचे) फ़ोटो काढून घ्यायला जास्त आवडतात त्यामुळे थोडं स्वतःचं कौतुक करून घेतेच...:)

"तो" फ़ोटो आता त्यांना दिल्यामुळे इथे टाकत नाही....पण जाता जाता एक नक्की लिहावंसं वाटतं की पूर्वी आम्ही पूर्व किनारपट्टीला राहायचो तेव्हा चेरीजातीच्या फ़ुलांचा हा बहर पाहायला खास वॉशिंग्टन डिसीला जायचो. आता इथे या झाडांची आरास जागोजागी इतकी पाहायला मिळते की कुठेच जावं लागत नाही. दैनंदिन कामासाठीच्या फ़िरण्यात फ़ोर सिझन्सचे सगळे रंग मनसोक्त पाहता येतात.....

Welcome to Oregon Aparna... :)

12 comments:

  1. अहाहा! निसर्गाच्या सान्निध्यात बालपण बहरत म्हणतात...
    प्रसन्न वाटलं पोस्ट वाचून :)

    ReplyDelete
    Replies
    1. तसं असेल तर माझी मुलं मस्त मजा करताहेत गं पल्लवी आणि खरंच आहे ते...निसर्गाबरोबर जे शिक्षण मिळतं ते फ़ार सहजी शिकून होतं...:)

      आभार गं.. :)

      Delete
    2. आणि तूसुद्धा पुन्हा एकदा लहानपण अनुभवते आहेस :)

      Delete
    3. मला तसं पण इतरवेळी पण दंगा करायला आवडतोच..आता निमित्त मुलाचं...

      Delete
  2. फोटो छान आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सविता...जसे आपल्याकडे बहावा इ. बहरतात तसंच थोडंसं...:)

      Delete
  3. मस्त आहेत फोटो. आधी गुलाबी थंडी आणि मग गुलाबी बहर.

    ReplyDelete
    Replies
    1. आभार सिद्धार्थ...हा "गुलाबी" योगायोग लक्षातच आला नव्हता बघ...:)

      Delete
  4. तुम्हाला फोटोग्राफीचीही आवड दिसते.

    ReplyDelete
    Replies
    1. खर आवड आहे पेक्षा निमित्त आहे असं म्हणण जास्त बरोबर ठरेल .... :)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.