Thursday, May 3, 2012

दिल्ली बिल्ली...

म्हंजे झालं असं की आधीच लई वंगाळ वंगाळ बोल्नं ते आपलं शिव्या का काय हाय म्हंतांन्सी म्हूनशान सम्दी बोलुन राहिले व्हते..त्यात परवा रातीला कुनीतरी आनी बोल्लं की बग पन मग तुमी लोकं संत्र्याचा रस कवा बी पिनार न्हाय..आता ह्ये शिव्या अनं संत्र्याचा रस काय समंदं....आप्लं काय बी डोच्कं चालेना बगा म्हूनशान एगदाचं ते नेटफ़िक्ल्क्ष लावलं आनं दिल्लीची काय ती बिल्ली हाय ती पायला घेतलीच....

ते आदी नेटफ़िक्ल्क्षला कुटलं हिंदी पिच्चर आलं नं का की लगेच बगुन टाकायचं बगा..त्ये ब्येनं लई लब्बाड हायती...काय काय सांगतील...नवीन नवीन पालिसी काढतील अन मग मोडून बी टाकतील..आपन फ़ुकट पैकं कशाला जास्त द्या....त्ये पन एक कारन व्हतं बरं का बगायचं...
 
लावलं तर अक्खी श्टोरी म्हंजे काय ते चार आन्याची... न्हाय चला रुप्याची कोंबडी अवं चार आने ग्येले न्हवं का जुन्या बाजारात आपलं ते मोडीत..म्हंजे त्येच ते...ग्येले ते चार आने आनं रायले ते आठ आने पन न्हाई डायरेक्ट रुपाया आता त्यो पन राहतो का जातो द्येव जाने...हां तर कुटं होतो आपनं...रायले ते आपलं त्येच्या बा...फ़ुल्या फ़ुल्या फ़ुल्या....आसं व्हतं बगा ते पिच्चर पाह्यला म्हून न्हाई समदी हवाच आशी हाय आजकाल....हां तर रुपायाची कोंबडी अनं पाच रुपायाचा मसाला....बरं तो पन कसा तर रंग लावलेली ती तंदुरी कोंबडी अस्ते नं आक्षी तिच्यावानी..नुस्तंच रुपडं...चव समदी सारखीच...

श्टोरी काय वो तीच ती..तीन मित्र त्येला कशापाय नेहमी लागतात काय ठावं न्हाय पन लागतात..बरं लागतात तर घे मुडद्या..पन काय त्ये शिव्या शिव्या म्हटलं तर काय वरायटी हाय का नाय...त्येच ते नेहमीचं ..त त..आपलं फ़ फ़.....म्हंजे आता बाईच्या जातीला आलं म्हुन काय शिव्या ठावं न्हाय व्हयं....म्हंजे बाप्यांना ठावं नस्तील त्येच्यापरीस बाईला शिव्यांची माहिती...कशी म्हंता..अवं ऐकाया तर आम्हालाच लागतात का न्हाय?? सांगा..म्हंजे त्ये तुमी मोट्या सालंत जावा नायतर त्ये काय ते विंजिनियर व्हायच्या कालिजात...ती पाच आट पोरांच्या संगतीत हुब्या दोनेक पोरी त्या पोरांच्या टक्कुर्‍यात तरी असतात का? त्यांचं लक्ष त्ये जुनियर का काय म्हंता त्या पोरींवर आन मग त्ये एकडाव सुरु झाले की भेंडी खेळापरीस शिव्याच शिव्या देऊन राहिले की ऐकनार कोन म्हंते मी??? तर आता आलं ना ध्येनात समद्या शिव्या ऐकायचा मक्ता घेऊन पन मूग आपलं त्ये शिव्या गिळून बसल्येल्या पोरी हे पिच्चर बगनार त्यान्ला वरायटी नको??
 
बरं नको तर नको...त्ये एक कोन ते हिरो कसलं ते काळा डोळा घेऊन समदं पिच्चर फ़िरनार त्येला बगायचं तरी कसं...थोडं काय मोटं कारन नको का डोळा फ़ोडून फ़िरतोय काय? गाडीमध्ये बंदुका घेऊन फ़िरतो काय?? मसाला न्हाइ तर काय?? राहिलं तर त्ये एक संत्र....त्ये हाय तसं नामी पन रातीला पिच्चर पाहिलं नं सक्कालपतुर डोस्क्यातनं पार रस ग्येला बगा..

न्हाइ म्हंजे बगुच नका असा काय नाय....ते शेवटी तरी एक त्ये आमचं लाडकं मिथुनदा श्टाइल डान्स क्येलाय..पन म्हंते हाय नं त्यो जित्ता...उस ग्वाड लागला सारखं मिथुनदा आवडला तर त्याच्यासारकंच आपलं पाय नाचवायचं...बरं त्ये पन बगितलं पन मग त्ये श्टोरीचं काय...त्ये हिरं काय नं डाकु पन येका जागी बसुन...त्यांच्याकडे पन आक्षी म्हटलं तसं वरायटी नाय...का असं म्हनुया नं त्ये लै वंगाळ वाटायची काय ते म्हंता तुमी डेफ़िन्येशन का काय त्ये बदलली आक्शी....रातीला पिच्चर पायला अन वाटलं आता सकाळधरनं शिव्याच येतील का काय तोंडात न्हाय तर डोस्क्यात तरी..पन काय बी नाय....तसं बी माझ्या डोस्क्यात जी पन लोकं पिच्चरचं काय बी घालाया गेलेत, त्येंचंच डोस्कं गरगरलं...तर ह्ये तसं काय म्हनत्यात ते नार्मलच की.....:)

जाऊ दे...उगा आप्लं ह्ये लिवलं...काय त्ये म्हनायचं...खोदा पाड आनि निकली दिल्लीची बिल्ली.... :)

फ़ोटो साभार: मायाजाल

16 comments:

 1. हाहाहाहा.. अगो बाये.. यवडा बी वंगाळ न्हाय तो.. च्यामारी मला तर लय म्हंजी कैच्याकै लय आवडला..

  ReplyDelete
  Replies
  1. व्हय रे....नाय आवडला आसं कुटं म्हटलं म्या बी...त्ये थोडं आमीरने काय त्ये जास्ती अपेक्षा वाडवल्या म्हूनशान आप्लं ते थोडं आपेक्षाभंगागत जालं बग...:)

   Delete
 2. मला पण आवडला ग्ग ..
  डीके बोस पण आवडलं

  ReplyDelete
  Replies
  1. अवनी मी तर आमिरच्या भाच्याकरता पाहायला घेतलेला..(आणि मी आधी आय हेट लव्ह स्टोरी पाहिलाय... ;) )

   Delete
 3. खरं बोस डी के ऐकलंय का? ते या पिच्चरमध्ये टाकलं नाही. सेन्सॉर झालं.

  ReplyDelete
  Replies
  1. पंकजराव त्ये गान्याच्या पोश्टा शेपरेट असतात बगा... :D
   आनं यातलं तसं बगलं तर "तेरे सिवा" जास्त बरंय की.....आमी क्वोन सेंसॉर करनार?? ...मायबाप प्रेक्षकांनी बगुन सोडलाय की पिच्चर...आमचा नंबर लासचा आसल बग पिच्चर बगण्यामदे....:)

   Delete
 4. एकदम परिणाम झालेला दिसतोय हो सिनेमाचा तुझ्यावर :-) निदान भाषिक तरी :-)

  ReplyDelete
  Replies
  1. सविताताय आवो त्ये म्हनलं थोडं त्ये शिवराळ लिवलंच (चुकून) तर आपली रांगडी म्हराटीच बरी की....
   पन तुमची लय आटवन आली होती बगा शीर्षक द्येताना..म्हनलं दिल्ली लिवलं तर दिल्लीवालं वाचतील आन तोंडात श्येन घातलीत की आमच्या... :) :)

   Delete
 5. बायो सिनेमा चांगला आहे गो !
  पण संत्र्याच्या रस ( ज्युस बरं ) मी प्यायचा सोडुन दिला हा मुव्ही बघितल्यापासुन... ;)

  ReplyDelete
  Replies
  1. दिपक आरं त्ये लिवून टाकेपर्यंत आमच्या डोस्क्यातनं ज्युस ग्येला बी..पन तुमी आजुन पित नाय म्हंजे क्येवडा हो परिनाम हा....दिल्लीच्या बिल्लीचा... :)

   Delete
 6. सिनेमाची लईच तारीफ झालीये.. आता बघावाच लागेल :D

  ReplyDelete
  Replies
  1. काय सांगतोस काय आनंदा तू...आरं तिच्या मंजे अजून तू बगलाच नाय??? बग बाबा तू पन बगुनशान घ्येच...:)

   Delete
 7. पिक्चर तर झक्कास आहेच!
  टपरीतल्या तिखट तर्रीवाल्या मिसळी सारखा..... रात्री 'गाळण' लागणार माहिती असतं पण व्हू केअर्स :D
  त्यात सुद्धा मी सांगेन हिंदी वर्जन बघ!
  दिल्लीतल्या शिव्यांचा ठसका हिंदी मध्ये अजून मस्त

  ...आणि शेवटचं "तेरे सिवा" ऐकलंस का (तेच ते तह वाल)??

  ...आणि पूर्णा जगन्नाथन...देवा रे...सोड... इमोशनल होणार मी !!!!

  ReplyDelete
  Replies
  1. हा हा नील...ब्येस्ट......तर्रीवाली मिसळ....हो पण तर्रीला कथेचं तेल थोडं कमी असं माझं मत...मसाला मात्र भरपूर...:)

   मला आता नीट आठवत नाही आहे मी कुठलं वर्जन पाहिलं ते.We watched whatever is on Netflix...got to check....पोस्ट पण रात्री पिक्चर पाहिल्यावर सकाळी (काम कमी होतं बहुतेक) म्हणून लिहिली....एकंदरित मला चित्रपट फ़ार आठवणीत राहात नाहीत...म्हणून मी काही वेळा त्यावर लिहिते म्हणजे तसे तरी लक्षात राहावेत....असो..:)
   आणि हो अरे त्या धांगडधिंग्यातही "तेरे सिवा" मला आवडलं होतं...तुझ्या "त्या" पोस्टवर तेवढ्यासाठीच आले होते...तू ते "आय हेट लव्ह स्टोरी"वालं दुसरं "तह"वालं गाणं ऐकलंस का??
   बरं इमो संपलं असेल तुझं तर "बिन तेरे" ऐक नाही तर पुन्हा "दिल्ली बिल्ली" बघ...काय पटतंय का....:)

   Delete
 8. का बोलू अब मैं? Out Of Syllabus पोस्ट आहे ही, पण ATKT ची सोय असल्याने चिंता नाही ;-)

  चित्रपट बघितल्यावर पुन्हा स्पेशल कमेंट करेनच :D

  ReplyDelete
  Replies
  1. हा हा...अरे च्यामारीकेत राहून माझा पण सिलॅबस बदललाय बघ...पाहिलास तर कळव....:)

   Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.