Wednesday, July 17, 2013

गाणी आणि आठवणी १४ - तू न जाने आसपास है खुदा


खरंय  न कधी डोळ्यापुढे आसवांच धुकं दाटलं की  थोडा वेळ मान खाली घालून विचार केला की  सगळ्यात पहिले काय जाणवतं? आहे ही  परिस्थिती बदलायची तर आपलं आपल्यालाच सज्ज व्हायला हवं. आपण फक्त हिम्मत धरून मार्गक्रमण करावं बाकी सगळं कर्ता करवित्याकडे सोडावं. तो असेलच कुठेतरी त्या एका forwarded मेलमधल्या गोष्टीत म्हटलंय तस I was carrying you म्हणणारा. 

असाच काही विचार करत असताना एक सुफिया सूर आणि त्याच्या साथीला एक मधाळ आणि प्रेमळ सूर कानावर पडतो 


धुंदला जाए जो मन कही इक पण को तू नजर झुका 
झुक जाए सर जहान वही मिलता है रब का रास्ता 


खर तर कुठल्याच प्रकारच्या गाण्याची मला अलर्जी वगैरे नाहीये पण राहत फ़तेह अलीबद्दलचा माझा अभ्यास अंमळ कमीच आहे. हे गाणं तर सुरुवातीला मला कैलाश खेरचं वाटलं होतं. कदाचीत त्याच्या आवाजात पण ऐकायला भावलं असतं म्हणूनही असेल. 

खुद पे डाल तू नजर, हालातों से हार कर कहां चल रे ? 

म्हटलं  तर रोखठोक सवाल. है कोई जवाब?

पण मग पुढचं, 

तो  खुद तेरे ख्वाबोंके रंग मे, तू अपने जहान को भी रंग दे 
के चलता हू मै तेरे संग मै 
हो शाम भी तो क्या जब होगा अंधेरा तब पायेगा दर मेरा 
उस दर पे फिर होगी तेरी सुबह 

हे अगदी हवंहवंसं स्वप्न किंवा आशा. 

हे आणि पुढचं 

मीट जाते है सबके निशान बस एक वो मिटता नही …. तू न जाने आसपास है खुदा 

शेवटची ओळ मला तृप्तीच्या क्षणाला नेते आणि एक ड्युएट ऐकणं सार्थकी लागतं. हे पूर्ण गाणं  ऐकून झाल्यावर आपण सुरात न्हाऊन निघालो असतोच पण आपलं मनही बरंच हलकं झालेलं असतं. 

मूळ गाणं इकडे आहे 

15 comments:

 1. Replies
  1. आभार कालिदास. आपलं ब्लॉगवर स्वागत.

   Delete
 2. Prastut geetache sunder rasgrahan kele aahes Aparna, loved it.maze aawadte gaane aahe he.:-) ...anjali

  ReplyDelete
  Replies
  1. माझेही आवडते गाणे आहे. आभार अंजली आणि ब्लॉगवर स्वागत

   Delete
 3. Sunder rasgrahan kele aahes Aparna,maze aawadte gaane aahe he! Loved it...:-) Anjali.

  ReplyDelete
 4. गाणं भारीच आहे आणि पोस्ट सुद्धा!
  पण हे गाणं लागलं की एक मार्मिक कमेंट द्याविशी वाटते.

  This song is brought to you by BMC, TMC & PMC... :D :P

  ReplyDelete
 5. पहिला परिच्छेद म्हणजे बिंगो...

  संग्रही नाही आहे हे गाणे पण ब्लॉग वाचून आठवले. डालो करतो.

  बाकी आजकल इस्माईलभाई चारमिनार में बैठ-बैठ के रेडिओमिर्चीपर गाने बहूत सूनते यारों ;-)

  ReplyDelete
  Replies

  1. सिद्धार्थ माझ्या संग्रही नाहीये पण एका online playlist वरून ऐकते.

   इस्माईलभाई, रेडीओ मिर्ची के गाने पे कब लिखेगा रे? या सिर्फ चारमिनार पे बैठके चाया पियेगा? वो भी खारी बिस्किटा डालके मसालेवली? :)

   Delete
 6. शब्द अन सूर दोन्हींचा मिलाफ खूप सुंदर आहे. आवडलं!

  ReplyDelete
  Replies
  1. ठांकू ठांकू श्रीताई :)

   Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.