Friday, June 28, 2013

बुरख्यातली झाडं

नेहमीच्या पार्किंग लॉटमध्ये हिरवाई आली की छान वाटतं. आज मात्र गाडीने ते वळण घेतलं तर पहिलंच झाड जरा वेगळं दिसलं. अरे हे काय याला चक्क बुरखा घातलाय?
गाडीतून खाली उतरल्यावर पाहिलं तर आमच्या नेहमीच्या हिरवाईला नटवायच्या ऐवजी लपवलं होतं. हारीने सगळी झाडं बुरख्यात.मग एकदम त्यादिवशी एन पी आरवरची बातमी आठवली. सविस्तर वृत्त मायाजालावर आहेच पण ब्लॉगवर थोडक्यात सांगायचं तर गावच्या एका मॉलच्या पार्किंग लॉटमध्ये हजारोंच्या संख्येने मधमाशा मेलेल्या आढळल्या. त्याचं कारण काय असावं याचं रूट कॉज केल्यावर असं लक्षात आलं की हा मॉल मेंटेन करणाऱ्या एका कम्पनीने जंतुनाशक फवारणीकेल्यामुळे या मधमाशा मरण पावल्या होत्य. आता तात्पुरता उपाय म्हणून या झाडांना जाळी लावून बंद केलं आहे.हे ऐकलेल्या बातमीचं प्रत्यक्ष पुरावा पाहताना जितका मला इथल्या लोकांच्या सतर्कतेचं आणि इतकी त्वरित उपाययोजना करणाऱ्या सिस्टिमच कौतुक वाटलं, तितकंच वाईट वाटलं ते दुसऱ्या एका वेगळ्या गोष्टीबद्दल. याच सिस्टिमने वर्षानुवर्षे अशीच फवारणी केलेली, जैवीक शास्त्रात नको ते बदल घडवून लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी करणारी फळं, भाज्या, मांस याच लोकांना खायला घातलीत पण त्यासाठी मात्र ज्या बलाढ्य कंपन्या जबाबदार आहेत त्याबद्दल मात्र कुणीही आवाज उठवला तरी अशी प्रतिबंधात्मक योजना अजूनतरी ऐकिवात नाही. याबद्दल पुन्हा केव्हातरी..सध्या माणसांची नाही तर निदान मधमाशांची काळजी घेतल्याचं कौतुक करुयात.

8 comments:

 1. (टू बी ऑर नॉट टू बी च्या धर्तीवर) स्तुत्य की अस्तुत्य हा प्रश्न आहेच!

  ReplyDelete
  Replies
  1. एकदम सौ टका अभिषेक :)

   Delete
 2. भारतात अस काही होईल?

  ReplyDelete
  Replies
  1. तुझ्यासाठी एक नवीन पोस्ट लिहितेय पल्लवी :)

   Delete
  2. अगं माझ्याही मनात हाच प्रश्न! भारतात असं कधी होईल? तुझा ’संदिग्ध’ लेखदेखील वाचतेय गं.

   Delete
  3. "पर्यावरण" हा माझ्यासाठी जरा जास्त जिव्हाळ्याचा विषय आहे.शेवटचा परिच्छेद वाचलास तर कळेल तुला नेहमीच इकडे कळकळ असतेच असं नाही. संदिग्ध योगायोगाने लिहिली गेलीय :)
   आभार गं कांचन :)

   Delete
 3. सगळंच अजब आणि गजब आहे.

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.