Wednesday, December 5, 2012

अलाश्काची गमत


हाय..हो मला नं कुणी दिसलं की पहिलं हाय कलायला आव्वतं..पन आज हाय केल्यावर नंतल शगलं शिलियश म्याटल आहे.
आई बोल्ली का तुमाला? ती आनि बाबा आमाला मोथ्या बोतीतून तिथे लांब घेऊन गेले होते अलाश्काला. त्यांना रिलॅक्स का कायतरी व्हायचं होतं आनि फ़िलायचं पन होतं. मला पन बाड इगल बगायचा होता पन तो आई-बाबाला दिशला तेवाच मी कालसीट मदे झोपलो होतो. पन तुमाला माहिते का तिथे खूप सालमन फ़िशी पन होते. तेच बाबाला बगायचे होते.
मग त्यांनी एक कुथलीतली जागा शोधली. खलं त्यांनी नाहीच शोदली कालन त्यांना कुनाला लस्ते विचालायला आव्वत नाई. आईने पाल्क लेंजलला विचालं आनि तिने त्यांना शांगितलं तिथे जा तल हे दोगे लगेच चला तिथे. तली नशीब मी तोपलयंत जागा जालो होतो ते. मग गालीतून उतलल्यावर आई, बाबा, दादा आनि मी माज्या स्तोलरमध्ये अशं निगालो.

बाबाला फ़िशी खूप आवलतात. म्हंजे पालायला पन. आईला आनि आमाला पन आवलतात पन ते खायला आनि आईला तर काहीच पालायला आवलत नाई. खलं म्हंजे मला तो काकाचा डॉगी आवलतो पन आई नुस्ती घाबलते आनि त्यात दादापन म्हनून आमी कदी कदी साशा आंटीकले तिची म्यावी बगायला जातो तल त्याला पन आई घाबलते. खलं तल तो मला ओलखतो. पन जाउदे. आई कुथे मला मासे पालायाला देनाल म्हनून आमी त्या पार्ल्कमदल्या ब्लिजवल उबं लाहून ते क्लॉस कलनाले सालमन बगत बसलो. बाबाने खूप फ़ोतो काडले. आमचे नाई फ़िशीचे. 
मग आई म्हनाली माझा आनि लुषांकचा पन काड नं एक फ़ोतो. त्याने काडला पन त्याला अजून सालमन बगायचे होते आनि आईला वॉक कलायचा होता. दादाला माज्या स्तोललमद्ये बसायचं होतं. मला काय कलायचं होतं ते आता मला आथवत नाई. पन सगल्यांना वेगंवेगं कायतली कलायचं होतं. म्हनून आई बाबाला म्हनाली मी जला तिथे जाऊन बगते बीचवल जाता येतं का? बीच म्हनजे नदीचा बीच...त्याला काय म्हनतात बलं हं किनाला तर तिथे..बाबाने लगेच तिला मला घेऊन जा म्हनून सांगितलं..आई म्हनते तो नेहमी अशी वाटनी कलत असतो. ही दोगं कदी मोथी होनाल काय माहित? 
मग आई आनि मी मस्त निगालो.तिथे खूप हिलवीहिलवी झाली होती आनि थोलं चालल्यावल पायल्या होत्या.तिथेच तो बीचपन दिसत होता. पन मी पलेल म्हनून आई मला म्हनाली  बाबू मी तुजे फ़ोतो काडते मग आपन पलत जाऊ. मी तरी उतलत होतो पन तिला मला हेल्प कलायची नव्हती मग आमी पलत आलो. येताना आमाला एक बुक दिशली. तिते लोकांनी तिते आले म्हनून नाव लिहिलं होतं. 

आईने आमची नावं पन तिथे लिहिली आनि आमी पुले परत त्या ब्लिजवल आलो तर बाबा आनि दादा (आनि हो माजा स्तोलल पन) गायब. आईला वातलं ते पाल्किंग लॉतला असतील म्हनून तिथे गेलो तल तिथे पन कुनीच नाय. आता आई म्हनाली आपन पलत तिथेच ब्र्लिजवर जाऊ. मध्ये लस्त्यात तिने एक दोन आदीपासून लोकं होती त्यांना पन विचाललं  पन कुनीच बाबाला पाहिला नव्हता. आई तली अशी हेल्प घेते बाबाने कुनाआच विचालं नशतं. अशं आम्ही कितीतली वेला ब्लिज आनि पाल्किंग लॉतला गेलो आनि मला आता भूकपन लागायला लागली. सगलं सामान गालीत आनि आईकले चावीपन नाई. 
त्या तिथे कुथलाच फ़ॉलेल्स्ट लेंजल पन नव्हता..आनि आई म्हनाली की सेलफ़ोनला लेंज पन नाई. बापले..मी खलं तर भूक लागली म्हनून पन ललायला लागलो आनि मला  बाबा आनि दादापन पाहिजे होते...मग आई तिथे नवीन लोकं आतमध्ये जात होते त्यांना पन म्हनाली की बाबा दिशला तल पलत पाथवा. तिने कुथेतली जाऊन ती फ़ोनची लेंज आनली (माजी आई इंजिनियल आहे नं.मग तिला लेंज नको का आनता यायला?) तल नेमकं बाबाने फ़ोन उचलला नाई. मग तिने त्याला सांगितलं तू इकलेच ये म्हून. पन किती वेल कोनीच आलं नाई. आता आईपन ललनार होती पन ते काम मीच केलं. 

मग आई म्हनाली आपन परत बीचकले जाऊ. तल त्या लस्त्यावल पन कोनीच दिशलं नाई म्हनून आईने जोलात हाका मालायला सुलुवात केली. मी पन ओलललो "बा.....बा....." "दा......दा..." मग लांबून दादाचा आवाज आला...मग आमी थांबलो तर ते कुथून तली वलून येत होते...आईने मला उचलून घेतलं कालन हाका मालुन मी दमलो होतो नं? आनि मग बाबा आनि दादा पन आमच्याकले आले...खलं म्हंजे बाबा आनि दादा हलवले होते आनि मग त्यांनी आमालाच आमी हलवलो म्हनून सांगितलं...

त्यादिवशी आई बाबाबलोबल अजिबात रागावली नाई. ती फ़क्त म्हनाली चल बोतीवर पलत जाऊया. आनि तो आमचा पहिलाच दिवस होता म्हनून मग त्यानंतल कदीच गाडी लेंट कलुन अलास्काच्या जंगलात फ़िलायचं नाई हे आईने बाबाला शांगितलं आनि बाबा पन हो म्हनाला.मला पन बलं वातलं कालन कालशीतमध्ये शालखं बसन्यापेक्षा बाबाकडे अप्पी बली पलते. 

मला माहिते आईला वातलं जल त्या जंगलात बेअल आला अशता तल? आनि आमी कशं बोलवलं असतं पोलिशाला पन...तिथे अजून थोल्या वेलाने कालोख जाला अशता तल? पन मी आईला शांगितलं मी होतो नं मोथ्याने हाक मालून बोलवायला? आदीच आईने हाक मालायला शांगितली असती तल मग मी आईच्या ब्लॉगवल कशा आलो अशतो? मागच्या वेली दादाने नंबल लावला तेवाच मी थलवलं होतं की मी पन एक गमत शांगायला येनाल आहे..तल ही माजी आनि दादाची गम्मत आहे...अलाश्काची गमत. 

24 comments:

  1. aawaraa...
    kahihi lihite kaa?

    dhad wachata hi nahi aala..

    ReplyDelete
    Replies
    1. नीरजा, ही तुमची पहिलीच कमेंट आहे म्हणजे हा ब्लॉग (कदाचीत) पहिल्यांदीच वाचत असाल असे समजून स्वागत.
      तुमच्यासारख्या प्रथम किंवा कधीकधीच हा ब्लॉग वाचणार्‍यांसाठी म्हणून ही कमेंट मी ठेवतेय म्हणजे गैरसमज नको.
      पोस्ट वाचता न आल्यास तो दोष आपला नाही..हे एक रोजनिशीतलं पान कुणी वाचलं नाही म्हणून फ़रक पडणार नाही. अशा प्रथम वाचकांसाठी खास उजवीकडे काही सजेशन्स आहेत. त्यातलं(ही) काही जमलं तर वाचा आणि तिथेही कमेंट द्या...

      आभार. :)

      Delete
  2. ए हा ऋषांकच आहे नं? कसला गोड.... :)

    ReplyDelete
    Replies
    1. हो गं श्रद्धा. आता गोड वाटतंय तेव्हा जाम टरकलो होतो. :)

      Delete
  3. ऋषांक आईच्या ब्लॉगवर तुझे मनापासून स्वागत!
    किती गोड तक्रारी आहेत रे तुझ्या ! ....
    बाबाने खूप फोतो काडले, आमचे नाई फिशीचे.>>> अरे अरे किती हा लेकरावर अंन्याय ग.
    हि दोगं कदी मोथी होनाल काय माहित >>>>> नाही रे ऋषांक आता आई बाबा मोथे नाही होनाल, तू मोथा होनाल पण ते दोगं छोतेच लहानाल.
    तिने कुथेतली जाऊन ती लेंज आनली >>>>>सही. and Award goes to my great momma!
    आई पण ललानाल होती ते काम पण मीच केलं. >>>>> कल्ल? मी कित्ती मदत कलतो माज्या मम्माला?
    सर्वात मस्त म्हणजे ....
    "खल म्हंजे बाबा अनि दादा हलवले होते आणि मग त्यांनी आमालाच आमी हलवले म्हनून सांगितले.">>>>>> हि मोथी मानसं खल का बोलत नाहित?

    ReplyDelete
    Replies
    1. अनघा मावशी....आईने इकले थोले फ़ोतो ताकलेत ते पाहिलेत का?
      बग नं ही मोथी मानसं खलं का बोलत नाहीत :)

      Delete
  4. आई पन नां... तली मी तिला शांगत होतो गूगलवर बाबाला आनि दादाला शोद मनून :D

    BTW ऋषांक बेटा, "फिशी पालायची" मनजे नक्की काय कलायचे हे बाबाला विचालून एकदा ली हां इकले... :D

    ReplyDelete
    Replies
    1. पन तिने मला आय पॅद दिला नाई नं? ती मला आय पॅद द्यायला नाईच म्हनते..मग कशं शोदनाल?

      Delete
  5. चांगले आहे पण फार वाचवत नाही. खरच. हेच तु त्याच्या आवाजात मुद्रीत करून पाठवू शकशील तर बघ ना. :) मज्जा येईल ऐकायला. :) तुझ्या आवाजात नको हा मुद्रीत करू प्लिज... ;)

    ReplyDelete
    Replies
    1. रोहन अरे तो कुठलं इतकं बोलणार...हे वदवून घेतलंय..त्याला विचारलं की तो फ़क्त जोराने बाबा आणि दादा अशा हाका मारून दाखवेल...एकदा प्रॅक्टिकल करू :)

      Delete
  6. हाहाहा... वेलाच झायो वाच्यता वाच्यता.. किटी गोल किटी गोल :)

    ReplyDelete
    Replies
    1. हेलम मामा....वेल्ल्लाच आहेस...ही ही ही....:)

      Delete
  7. मज्जा! कोन कोनाला शोधतयं हे न कलल्यामुले बलंच झालं नं ले! आनी असाही तू होतासच की आईला धीर द्यायला. किती गोड गोड!

    ReplyDelete
    Replies
    1. मावची तू दादाची पन गमत आहे ती वाचली का? पन तो एकताच हलवला होता...आम्ही नंतल दोगादोगांनी हलवायच्यं थलवलं म्हंजे कुनालाच एकतं वातायला नको..कशं वात्तं? :)

      Delete
  8. ha ha ha... successfully decoded.. too good Hrushank (i tried not to make any spell mistake!)

    ReplyDelete
    Replies
    1. successfully decoded...yuhuu....three cheeers for IT :)
      but Abhishek we write it as Rushank...oops :)

      Delete
  9. हा हा हा.. मस्त लिहीलं आहे. आधी पण कॉमेंट टाकली होती, पण प्रसिद्ध झालेली दिसत नाही, म्हणुन पुन्हा कॉमेंट टाकतोय.

    ReplyDelete
    Replies
    1. काका, आधीची कमेंट स्पॅममध्येही दिसली नाही म्हणजे ब्लॉगर गंडलं असेल.
      आता लिहिताना गम्मत वाटली पण तेव्हा जीव खालीवर झाला होता. :)

      Delete
  10. :D it took me a while but once I got hang of it, it was too good to read. :)

    ReplyDelete
    Replies
    1. आभार विद्या आणि ब्लॉगवर स्वागत.
      ते ऋषांकच्या शब्दात लिहिल्यामुळे वाचायला क्लिष्ट झालंय पण त्यामुळे प्रसंग थोडा निवळलाय हेही खरंच. :)

      Delete
  11. मस्त लिहिला आहेस. ऋषांककडून त्याच्याच भाषेत ऐकताना एकदमच मस्त वाटलं. चांगली वाटली आयडिया...त्याच्याच भाषेत वर्णन करण्याची!

    ReplyDelete
    Replies
    1. विक्स, अरे ते मी माझ्या शब्दात सांगितलं असतं तर अति गंभीर झालं असतं. त्या दडपणातून एकदा गेल्यावर पुन्हा जायची इच्छा नव्हती म्हणून मग थोडं हलकं करून सांगण्यासाठी ऋषांकची भाषा वापरली.
      तसंही तोही पहिल्यांदीच हरवला होता नं ;) आता आशा करतोय की अशा पोस्टा टाकायची वेळ न येवो...

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.