Friday, July 20, 2012

छोटीसी आशा


माझ्यासाठी अमुल्य असणार्‍या पोस्ट वाचणार्‍या, त्यावर आवर्जून लिहिणार्‍या ब्लॉगवाचकांसाठी एक खूप छान बातमी आहे...तसं तर मागच्या एका अपरिहार्य पोस्टच्या तळटीपेत थोडा उल्लेख आला आहे पण या आठवड्यापासून ती नियमीत कामावर येऊ लागलीय अर्थात तिच्या आणखी काही हॉस्पिटल व्हिजिट्स असतील ते दिवस सोडून....
त्याआधी पाळणाघराच्या वार्षिक प्रेझेंटेशनच्या वेळी भेटून मी तिला माझ्या मागच्या पोस्टबद्दल आणि सगळ्या वाचकांनी तिच्यासाठी चिंतलेल्या शुभेच्छांबद्दल सांगितलं. "My Cancer is gone, however I have a few more radiation visits untill August" हे सांगताना तिचा उजळलेला चेहरा आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रार्थनांबद्दल ऐकताना तिच्या डोळ्यात तरळलेलं पाणी..
छोटीच गोष्ट पण तरी स्पष्ट सांगायचं तर टोशा परत आलीय..मुळात छोट्या चणीची आणि अजून सगळे केस परत आले नसल्यामुळे टोपीत छोटीसीच दिसणारी तिची मूर्ती डोळ्यातून "छोटीसी आशा" नक्की दाखवते. माझे केस परत येताहेत हे सांगताना खट्याळ असणारं तिचं सध्याचं हसू मला सुखावून जातं...
माझं दडपण माझ्याबरोबर तिच्यासाठी जगताना ज्या वाचकांनी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष लिहून/वाचून तिच्यासाठी प्रार्थना केली त्यांना ही एक सुखद बातमी देताना आभार प्रदर्शनाचं तिचंच एक पत्र....या ब्लॉगच्या सर्वच वाचकांसाठी.....तिला अर्थातच सर्वांच्याच ऋणात राहायचंय आणि मला तुम्हा सर्वांच्या....कदाचीत ती पोस्ट मी त्यादिवशी लिहिली नसती तर ते साचलेलं बाहेर न आल्यामुळे झालेला त्रास जास्त झाला असता...कुठेतरी ते व्यक्त होणं जरूरी तसंच आता सगळं ठीक होतंय तर हेही... नाही का?


21 comments:

 1. खुप खुप अभिनंदन
  तुझंही आणि तिचही :)
  हारकर जितने वालेको बाजिगर केहते है ;)
  हो ना?

  ReplyDelete
  Replies
  1. खरंय नं प्रिया हरूनही जगता यायला हवं..हेच शिकतेय सध्या...:)

   आभार गं....

   Delete
 2. एक चांगली बातमी :-)

  ReplyDelete
  Replies
  1. माझ्यासाठी ही सगळ्यात बेस्ट बातमी आहे..

   आभार सविता...:)

   Delete
 3. Are wa kharach chhan batmi sangitlis. Khup bara watla sakali sakali sarwat pahile he wachun. Chala, ashich happy healthy rahude ti. Gr8.

  ReplyDelete
  Replies
  1. खरंय अपूर्व...तिला आता चांगलं आरोग्य लाभो हीच अपेक्षा...:)

   Delete
 4. Replies
  1. आभार मंदार. तू वर लिंक दिल्यात त्या पोस्टा वाचल्या असतील अशी अपेक्षा...:)

   Delete
 5. Mastach ga aparna,

  मस्तच गं अपर्णा. टोशाच्या जगण्यातला दुर्दम्य आशावादच तिला बळ देईल बघ लढायला. आपल्या शुभेच्छा आहेतच सोबतीला.
  आणि हो, तुझेही खूप कौतुकच गं..... दुसऱ्याच्या वेदनेनं डोळा पाणी तारारणारे खूप कमी असतात.
  श्रद्धा

  ReplyDelete
  Replies
  1. श्रद्धा, आभार...
   अगं म्हणजे रक्ताचीच नाती आपल्याला हळवं करतात असं नाही...इथेही बंध तर जुळले आहेतच न? त्यामुळे हे असं वाटणं तसं स्वाभाविकच....आता ती पूर्ण बरी होवो हीच एक इच्छा...

   Delete
 6. मस्त ! तिला सांग...अभिनंदन !!! :)

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.