Tuesday, June 12, 2012

इट्स ओके......ऑर मे बी इट्स नॉट.....बट हु केअर्स....


कसं असतं नं लहान असताना आपल्याला एक खास मैत्रीण असते...मग तिला आणखी एक मैत्रीण मिळते...काही वेळा आपण तिघी मैत्रीणी होतो आणि काहीवेळा ती तिसरी आवडली नाही की मग आपल्या "खास"शी भांडण तरी होतं नाहीतर तिला सरळच सांगितलं जातं..."एक तर ती किंवा मी".....आणि हे ती किंवा मी ला किती अर्थ असतो देव जाणे...पण होतं असंही..पुन्हा मैत्री आपला मार्ग क्रमू लागते......हसणं, खेळणं, खिदळणं आणि हो भांडणंही....कट्टी आणि बट्टी...दोघी जणु काही मैत्रीणीच...

आता मोठं झाल्यावर मात्र असं "एक तर ती किंवा मी" असं नाही होत....मुळात आता इथे एकवालीचा संदर्भच नसतो...आता असतो तो सरळ एक ग्रुप किंवा दुसरा ग्रुप...या दोन ग्रुपमध्ये आपली स्वतःची वन ऑन वन मैत्री कुठेतरी चाचपडत राहते....कट्टीही नाही आणि बट्टीही नाही......मधलंच काहीतरी....बोलताना सगळं काही आलबेल असल्यासारखं दाखवलं तरी मुठीतून बरंच काही निसटल्याची जाणीव दोन्हीकडे......

कळपप्रिय प्राण्याला कळप तर हवाच पण तरी त्यात दोन वेगळे कळप असले की मग कुणाला कुठे ठेवायचं याचा एक नवाच गुंता....स्वतः मात्र कुठेतरी एकांत शोधावा असं अशावेळी माझं मला माझ्यासाठी वाटतं....नकोच ते नवे कळप..सगळीकडे नुस्तं हाय हॅलो आणि वर्तमानात बोलून या ओळखींना कुठला भूतकाळ न ठेवता कुठल्या भविष्याचीही चिंता नको असं काहीसं करता यायला हवं नाही?? मुख्य परक्या देशात आणि लौकिक अर्थाने परक्यांबरोबर तरी.....

प्रत्यक्षात हे नेहमी जमणार आहे असंही नाही....तसं करायचंच ठरवलं, तर होतो आपला धोब्याचा कुत्रा..ना इधर का ना उधर का....सगळीकडे दुरून डोंगर साजरे लुक मिळवून त्या ग्रुपमध्ये तेवढ्यापुरता असायची तयारी असेल तर हा स्टॅंड पण काही वाईट नाही...

नाहीतर आधी एका ग्रुपचा घट्ट भाग व्हायचं....काही कारणाने दुसरं आणखी चांगलं (म्हणजे नक्की काय हे मला खरं तर कळत नाहीच) किंवा वेगळं किंवा क्लिक होणारं काही मिळालं की मात्र तिथे बस्तान हलवायचं यापेक्षा हे काय वाईट...

फ़ार विचार केला तर काहीच कळत नाही...म्हणजे एका ग्रुपमधून सरळ दुसर्‍यात जायचं हे बरोबर की साफ़ चूक???एक बरंय की सध्या स्वतःचं आयुष्य स्वतःच्याच कुटुंबाभोवती इतकं फ़िरतयं की घरची चार डोकी सोडली तर कुठल्याच ग्रुप-बिपची तशी गरज नाहीये...

पण इकडे-तिकडे मात्र हा अमक्या ग्रुपमधला तमक्यात गेला वगैरे ऐकते आणि उगाच वाटतं, नसेल झेपलं तिला इथलं काहीतरी, नसेल आवडलं या ग्रुपमधल्यांचं काहीतरी आणि मिळाला असेल मधल्या मध्ये दुसरा जास्त क्लिक होणारा ग्रुप आणि हे सगळं समजावून  सांगण्याइतका पेशंसही नसेल उरला...जे काय असेल ते.......बदलला ग्रुप...

आज इतकं भारी का होतंय.....आई ग्ग....माहित नाही...मागे ठेऊन आले होते काही मैत्रीचे कळप आणि त्यातले काही भरकटताहेत...ही बहुदा त्या आठवणींमुळे उडालेली एक खपली....केवळ तेवढ्यासाठी सध्या कुठल्याच कळपाचा भाग नसल्याचं समाधान आणि काय??? 

Is it OK?? Or may be its not.....But who cares??? Isn't that the attitude anyway.....

16 comments:

  1. Oh god... Just quit that damn G+ and come back to FB. That's all MeLord...

    ReplyDelete
    Replies
    1. Ha ha ha ...HEO, This was about real world buddy...I feel equally odd in virtual world anyway but this was not about G or F....:)

      Delete
  2. Attitude keeps u alive. Its better sometime to show that u can carry it.

    Take care.

    ReplyDelete
    Replies
    1. Looks like the attitude works sometimes ....:)

      Thanks...

      Delete
  3. कळपप्रिय प्राण्याला कळप तर हवाच पण तरी त्यात दोन कळप असले की मग कुणाला कुठे ठेवायचं याचा एक नावच गुंता स्वतः मात्र कुठेतरी एकांत शोधावा अस अशावेळी माझ मला माझ्यासाठी वाटतं....कित्ती खर आहे..
    Finally Attitude Matters :)

    ReplyDelete
    Replies
    1. पल्लवी काही वर्षांच्या अनुभवानंतर आलेला "चलता है" अ‍ॅट्यिटूड आहे..बाकी काही ढासू नाही...
      पण एक आहे कामाला येतो बरेचदा...:)

      Delete
  4. What HeO said is PRESENT TENSE but the root cause for all such confusion is Google killed 'our dear' BUZZ... That was the only group in recent past.

    *** कैच्याकै प्रतिक्रिया समाप्त ***

    कळपाबद्दल बोलायचेच झाले तर फिकर्रर्रर्र नक्को गो. आपून का ब्लॉगर का ग्रूप होना. चार मिनारा के निच्चे चार चाया, चार बिस्कूटा लेके बैठनेका और चिंधीचोरा कामा करनेका.

    ReplyDelete
    Replies
    1. Root Cause Analysis तो कोई आपसे सिखे बॉस...:) अरे हो रे पण एक ते बझबद्दल दुःख मात्र आपलं सार्वत्रिक नाही...काय मिळवलं google ne देव जाणे..
      **** असो कैच्याकै प्रतिक्रिया समाप्त माझी पण.....****

      सलिम फ़ेकु सारे चाया और बिस्कुटा के पैसे देनेवाला है तो चारमिनारावाले चिंधी चोरा कामा तो करना पडेगा नं इस्मैल भाय....
      अरे कालच मी सलिमला म्हटलं की मला आता एक "अंग्रेज"चा डोस घ्यायला पाहिजे...नाहीतर मी हैद्राबादी विसरेन....:)

      Delete
  5. ह्म्म्म... !! :( आपण या विषयावर अनेकवेळा बोललोय... तेव्हां... छोड दो यार! अगं जे आपल्यासाठी नव्हतेच ते सोडून गेल्याचं दु:ख आपण कशाला करावं... काय?? :)

    ReplyDelete
    Replies
    1. श्रीताई मजा म्हणजे exactly या विषयावर आपण बोललोच नाहीये..हे दुसर्‍या एका मैत्रीणीच्या बाबतीतलं ऐकुन केलेलं आत्मपरिक्षण समज..

      असो...इतकं भारी वाटतंय का?? की तळटीप टाकू.....हे कुठल्याही ब्लॉग वाचक, न वाचक, गुगल प्लस, फ़ेबु, बझ इ.इ. शी साधर्म्य साधणारं नाहीये म्हणून...

      बोलुच गं.....तू काळजी घे.....मी मस्त मजेत आहे...

      आजकाल ब्लॉगवर जास्त सिरियस असतं नं तेव्हा इथे कुठलं तरी Diversion Theorem वापरून मी नीट असते...
      पण या निमित्ताने तुला ब्लॉगवर बघून बरं वाटतंय....:)

      काळजी नसावी...:)

      Delete
  6. Very True reg. friendship of 3 persons Aparna.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Anonymous....:)
      But I think the 3 is crowd concept goes as we grow..At least for me...isn't it???

      Delete
  7. डेडली. Retrospection. अवघड! :)

    ReplyDelete
    Replies
    1. डेडलीला "अवघड" चांगलं वाटतंय....
      I just hope this whole thing doesn't result in a dead end...:P

      आभार बाबा....:)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.