या वर्षीच्या थंडीचा योगायोग म्हणजे सगळीकडे गरम वातावरणाने आपले पाय रोवायला सुरूवात केली आहे तरीही मी राहते त्या ओरेगावात मात्र थंडीबाई अगदी ठाणच मांडून बसल्या आहेत. म्हणजे ते आपलं फ़ेमस इक्विनॉक्स का काय थोडक्यात ऑफ़िशियली वसंताचं आगमन २० मार्चला झालं आणि २१ मार्चला आमच्याकडे ढीगभर बर्फ़..मुलं आपली सर्दी खोकल्याने हैराण आणि आम्ही त्यांना सांभाळून.
त्यानंतर मात्र वैतागलोच आणि जे आहे त्याच वातावरणाची मजा घ्यायची असं ठरलं...मग एक त्यातल्या त्यात सगळ्यांच्या तब्येती बर्या असलेला रविवार पाहिला आणि बर्फ़ गोळा करायला निघालो.
जायचा रस्ता साफ़ आणि बाजुला भुरभुरलेला बर्फ़ शिवाय गाडीत मुलं संपूर्ण ड्राइव्ह झोपलेली..त्यामुळे रस्त्याचीही मजा लुटता आली....
या खालच्या चित्रात डावीकडे माउंट हुड दिसतोय का? अर्थात अजून तो बराच दूर आहे म्हणा. पण गाडी एकदा का डोंगराळ भागात शिरली की तो अधूनमधून दिसत राहतो..
देवदार वृक्षांनी दाट असलेलं इथलं अरण्य बर्फ़ाने न्हाऊन पाहायचं म्हणजे भूलोकीचा स्वर्ग....
आणि आता जसं आम्ही आमच्या नियोजित जागी जवळ येतो तसा आदल्या आठवड्यात झालेला प्रचंड स्नो आपलं अस्तित्व पावलोपावली दाखवायला सुरूवात करतोय..
या स्की रिसॉर्टचा एक मजला मागचे आठवडाभर असाच आहे....बर्फ़ाने डबडबलेला...
आणि हो हाच तो...याआधी ब्लॉगवर बरेचदा कौतुक करून झालेला माउंट हुड
हे आमचं त्या रविवारचं डेस्टिनेशन....स्नो ट्युबिंग...
या ट्युब्ज हाताने खेचून मग पट्ट्यावरून वर जायचं आणि मग आपल्याला हवं तसं त्यात बसून किंवा रेलून बर्फ़ाच्या टेकडीवरून सोडून द्यायचं....
खरंय की नाही स्नो टाइम इज फ़न टाइम...:)
तो आधीच्या फ़ोटुमध्ये माउंट हुड पाहिलात नं तो या छोट्या बर्फ़ाळ टेकडीच्या बरोबर समोर आहे आणि तिथे दिग्गज लोकांना स्कीइंग करताना पाहाणं म्हणजे मजा असते...
खरं तर अशा प्रकारे विषयाचं बंधन नसणारं ब्लॉगिंग कशाशी खातात हे माहित नसलेली मी आज हे दोनशेवं पोस्ट टाकताना असंही म्हणेन ब्लॉग टाइम इज फ़न टाइम...
फोटू लै भारी. मज्ज्जा मज्जा केलेली दिसते आहे. २०० वे पोस्ट म्हणजे मोठा पल्ला गाठला आहेस. अभिनंदन, आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.. सगळ्या ब्लॉगु ब्लॉगिनींतर्फे..
ReplyDeletewow.. :)
ReplyDeletemastache warnan.. n pics pan
abhinanadan 200 vyaa post baddal.
लयच भारी... स्नो ट्युबिंग !!!! बेस्टे एकदम..
ReplyDeleteजाम धम्माल येते स्नो ट्युबिंगला..
आणि दोनशेव्या पोस्टबद्दल "अभिनंदोनशे" ;) !!
रच्याक, शेवटच्या ओळीतला फाटक्याला दिलेला फटका आवडण्यात आलेला आहे :)) .. जेव्हा जेव्हा जिथे जिथे संधी मिळेल तेव्हा तेव्हा आणि तिथे तिथे :)) चान्स सोडायचा नाय !!! ;)
फोटो पाहून आणि गारेगार वर्णन वाचून इथल्या गर्मीमध्ये प्रचंड जळजळ झाली. लैच ऐश करून राहिले तुम्ही.
ReplyDeleteआणि द्विशतकाबद्दल अभिनंदन... २०१२ मध्ये तर तू पोस्टचा धडाकाच लावला आहेस...एकदम सुस्साट. घर, हाफिस, बच्चे कंपनी, प्रवास असा प्रचंड डोलारा सांभाळून तू तितक्याच जोमाने ब्लॉगिंग देखील करतेस. जबरी. मानलं तुला. तुझा आदर्श ठेवून मला "आपल्याला वेळ का मिळत नाही" यावर आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.
अभिनंदन ग द्विशतकाबद्दल! आणि इथला उन्हाळा, पाणी टंचाई वगैरे वगैरे मुळे तुझे गारेगार फोटू बघून लई जळजळ झाली. ;)
ReplyDeleteअभिनंदन !!! :)
ReplyDeleteमस्त फोटू ! त्या स्नो ट्युब्स म्हणजे रंगीत बग्स वाटतायत ! :) :)
congrats for 200th post...
ReplyDeleteसुपर्ब बॅटींग सुरु आहे तुझी या वर्षी....
शेवटचा षटकार म्हणजे पार स्टेडीयमच्या बाहेरच की.. ;)
congrats for 200th post...
ReplyDeleteसुपर्ब बॅटींग सुरु आहे तुझी या वर्षी....
शेवटचा षटकार म्हणजे पार स्टेडीयमच्या बाहेरच की.. ;)
आभार्स काका.... :)
ReplyDeleteअहो मजा तर येतेच..आरुष परत यायला तयारच नव्हता पण ऋषांकला वर जायला वयामुळे परवानगी नव्हती त्यामुळे घरातल्या दुसर्या दोन मुलांनी मज्जाच मज्जा केलीय....:)
आभार्स अवनी....अगं ते दोनशेव्या पोस्टचं अगदी पोस्ट टाकताना लक्षात आलं म्हणून थोडं शाईन मारून घेतलंय आणि काही नाही....:)
ReplyDeleteहेरंब, वर काकांना म्हटलं तसं मुलांनी जास्त धमाल केलीय...आणि मी एक दोनवेळा जाऊन आले...आणि अरे मला जनरलीच उंचावरून खाली यायचं की थोडी भितीच वाटते म्हणून मी जरा बेतानेच...
ReplyDeleteआणि तू काय फ़ाटक्याला कमेंटमध्ये पण सोडला नाहीयेस....मी त्याला की तिला केव्हाच विसरलेय.....तरी फ़टके मारायला माझी काहीच हरकत नाहीये...
वर अवनीला लिहिलंय बघ...आम्ही कसले फ़टके मारतोय ते डिपार्टमेंट फ़ेकसत्ताने फ़ुल टू आपल्याकडे ठेवलंय असं ऐकते (वाचायचा सोडलाय म्हणून)
सिद्धार्थ लवकरच आमरस पाठवून तू आमचं पण पोट गारेगार करशीलच म्हणून मी थोडीशी संधी साधून घेतली आहे...
ReplyDeleteअरे आणि माझं काय कौतुक करून राहिलास, इथे मला बाकी म्हणजे फ़्यामिली फ़ंक्शन, लग्न, मुंजी, कार्ये इ.इ. सोशल नाहीये नं बस तो वेळ ब्लॉगला देते आणि रच्याकने, या वर्षी तुझ्या चहाचा परीणाम असावा असंही वाटतं..पहिलीच पोस्ट चहावर पडल्यामुळे आता फ़क्त फ़्रेश असं काही होईल असं सध्या तरी वाटतंय...उलट झालं तर चहा पिऊनही झोप लागली असं म्हणायचं...:)
आणि हो आता तुला वेळ असेल तेव्हा लिही....:)
गौरी, तरी अगं मी फ़ोटो पोस्टा कमी टाकते....(आळस आणखी काही नाही)
ReplyDeleteहा भाग जिथे मी सध्या आहे नं खरंच खूप छान आहे..तुम्ही सर्वांनी मेळाव्याचं किंवा कुठलंही निमित्त काढून इथं आलं पाहिजे....
आणि हो ते दोनशेव्यासाठी आभार्स आता तीन वर्ष झाली म्हणजे सरासरी काढली तरी ठिक आहे म्हणेन मी... :)
आभार्स अनघा..ते प्रकरण थोडं बग्ज सारखंच आहे..ऋषांकला वर नेता येत नव्हतं म्हणून त्याला अशा रिकाम्या बगीमध्ये बसवून तिथेच एक दोन चकरा मारल्या मी...:)
ReplyDeleteदीपक, आभार्स... तुझी आणि हेरंबची कमेंट वाचून मला उगाच "फ़टके टू फ़ाटके" क्लब स्थापन होणार की काय अशी शंका येतेय.. :P :D :P
ReplyDeleteरच्याकने, माझ्या वाट्याचे फ़टके मी आधीच देऊन ठेवलेत..एक अख्खी पोस्ट लिहून....:फ)
Wow! Nice!
ReplyDeleteआभार पल्लवी आणि ब्लॉगवर स्वागत... :)
ReplyDeleteद्विशतकाबद्दल महाअभिनंदन.. असेच लिहिते रहा!! अन बर्फात खेळण्याची मजा काही औरच!! फोटू भारी आलेले...
ReplyDeleteमहाअभिनंदन....हाहाहा....आनंद....महा हा शब्दच मला घाबरवतो बरं का...ते काय ते महाअंतिम (न संपणारा) सोहळा असं काहीसं वाटतं...:)
ReplyDeleteहो बर्फ़ात खेळायला धमाल येते..पण तुला माहिते का जसं आपल्याला उन्हात गेल्यावर सूर्याचा त्रास होतो तसा बर्फ़ाच्या ग्लेयरचा पण होतो हे यावेळी मला जाणवलं...म्हणजे बर्फ़ होताच पण त्यादिवशी उनपण होतं त्याचा परिणाम आणि सध्या जास्त उत्तरेला आहोत त्यामुळे सूर्यकिरण जास्त तिरके येतात असंही असू शकेल....असो..तू कधी पुन्हा बे एरियात आलास तर तिथेही दोनेक तासांच्या अंतरावर अशा जागा आहेत हे ध्यानात ठेव....:)