एका साध्या सोप्या आयुष्यात एक नवी नोकरी येते...येत नाही ती आपण निवडली असते...."आई" व्हायची.....जगात सगळ्यात कठीण काम आई होणं आहे हे आजवर फ़क्त ऐकलेलं असतं....पण त्याचा नक्की अर्थ काय हे आपलं आपल्यालाच अनुभवायचं असतं.....एकदा का पहिलं मूल झालं आणि मनाचे ते हिंदोळे अनुभवले की सारं सहज सोप असावं असं उगीच वाटतं..पण नाही ....ते तसं नसतंच नं मुळी...
आपण पुन्हा एकदा "आई" होतो आणि पुन्हा तेच....यावेळी तर त्याला बाहेर ठेवायचा (कठोर) निर्णय एखाद्या प्रोजेक्ट प्लानप्रमाणे आधीच झालाय....नवव्या महिन्यात तो जायला लागतो..तिथली त्याचा संभाळ करणारी "टोशा" त्याला सहजगत्या आवडू लागते....आपणही आपल्या रोजच्या दैनंदिनीत रूळावतो..मनातली खंत जराही वर न काढता....थोडक्यात निर्ढावतो....हो निर्ढावणंच ते...दुसरं काय म्हणणार??
मग पुन्हा एक वळण येतं...आजाराचं....त्या निमित्ताने माझ्याच मुलाला जास्त वेळ द्यायची संधी मला मिळते...मी पुन्हा माझे जुने, घरी फ़क्त मुलाला सांभाळायचे, दिवस जगते....चार दिवस घड्याळाची चाकं त्याच्या दैनंदिनीप्रमाणे फ़िरू लागतात....कॉन्फ़रन्स कॉलच्या आवाजापेक्षा त्याची बातचीत, बकबक आणि खेळाची सवय होते.....मित्रमंडळांचे फ़ोन घेता घेता निसटून जातात...हातात किबोर्ड ऐवजी छोटी वाटी, चमचा, खणांचं ताट आणि खेळणी येतात...सगळं विसरून पुन्हा हे करताना अजिबात वेगळं वाटत नाही....त्याची तब्येत सुधारावी म्हणून त्याला आवडेल, झेपेल ते सर्व करायची मनाची आपोआप तयारी होऊन जाते..
चार दिवस कसे गेले कळतही नाही आणि तो पाचवा दिवस उगवतो....मागचे कित्येक महिन्यांचं निर्ढावलेपण गळून पडतं..आजचा पाळणाघरातला टाटा जसा त्याला कंफ़्युज करतो त्याहीपेक्षा मला तो जास्त अपराधी करतो, टोचतो....
परत येताना मी सुन्न असते...आज कामात लक्ष लागेल का? माहित नाही.....हे मी सगळं पुन्हा त्याच्यासाठी करू शकेन का? माहीत नाही...आणि हो त्यासाठी मला तो आजारी पडायला नको आहे...
माझ्या बाळाला जसं चांगलं आरोग्य दे असं मला त्या कुठे असेल त्या कर्त्या करवित्याला सांगायचं आहे नं तसंच माझ्याही मनाला पुन्हा एकदा सावरायला माझं मलाच शिकायचं मला बळ दे हेही सांगायचं आहे....
जेव्हा एखाद्या परिस्थितीतून हवा तो मार्ग काढता येणार नसतो तेव्हा सामोरं जाणं इतकंच पालक म्हणून मला करायला हवं...नाही का???
जेव्हा एखाद्या परिस्थितीतून हवा तो मार्ग काढता येणार नसतो तेव्हा सामोरं जाणं इतकंच पालक म्हणून मला करायला हवं...नाही का???
हे "परिस्थितीला सामोरं जाणं" हे बघता बघता कधी "परिस्थितीला शरण जाणं" होतं हे आपलं आपल्यालाच कळत नाही !!
ReplyDeleteखरंय नं हेरंब..बघावं तेव्हा आपण म्हणजे आपली पिढी परिस्थितीला शरण जात असते......प्राक्तन की काय म्हणू...असो..
ReplyDeleteतुही सध्या यातून जातोयस याची कल्पना आहे मला...पण आता आपण काहीच करू शकत नसणार असू तर काय बोलणार सांग....प्रसंग वेगळे पण गोष्ट तीच....
मनोगत आवडलं. तळमळ पोचली मनापर्य़ंत. वर हेरंब म्हणाला ते पटलं..
ReplyDeleteघरी आल्यावर मुलाने पालकाला बिलगणे ह्याच्याएवढं सुख दुसरं कोणत असेल?
अपर्णा, सद्ध्या हे दुसर्या बाजून अनुभवते आहे. एका गावात, दहा - पंधरा मिनिटांच्या अंतरावर असणर्या आईवडलांसाठी दिवसातून एका फोनच्या पलिकडे वळ देता येत नाही, तेंव्हा याला खरंच नाईलाज असतो, का आपल्या प्रायॉरिटीज चुकताहेत हे खरंच कळत नाही मला. :(
ReplyDeleteखरंय अपर्णा,
ReplyDeleteपालक म्हणून आपल्या हातात फक्त 'कर्मण्येSवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' एवढंच आहे नं.
hyaach paristhitun sadhya jatey mee..
ReplyDeletetyamule ekadam manala bhidala.. :)
काय अपर्णा... :) बरेच दिवसांनी इथे वाट चुकलो ना मी.. :D काय चाललंय तुझे सध्या ह्याची लिंक मी घालवून बसलोय. बोलूच ह्या आठवड्यात.. :)
ReplyDeleteएकदम हळवी झालीय पोस्ट... एका आईची तळमळ सार्थ शब्दात वर्णन करून सांगितलीस !!
ReplyDeleteExcellent. And very true.
ReplyDeleteदिपक वेळात वेळ काढून वाचल्याबद्द्ल आभार रे...
ReplyDeleteखरं सांगते त्या दिवशी संपूर्ण दिवस मी इतकं मिस केलं नं त्याला की तो घरी आल्यावर जे काही वाटलं ते तू म्हणतोस तसंच आहे...
या पोस्टकडे वेगळ्या बाजुने पाहिलेलं आवडलं म्हणू शकत नाही कारण तू निदान एका गावात तरी आहेस..
ReplyDeleteमाझं बघ गाव काय देशही सोडून आलोत...आमची कर्तव्य इथे आणि तिथे दोन्ही ठिकाणी नीट करत नाही अशी आणखी एक बोच...
श्रद्धा माझा मुद्दा कर्म तरी नीट करतोय का आम्ही त्याचा आहे.....पण तुझ्या भावना पोचल्या..आभार...
ReplyDeleteयोगिनी ब्लॉगवर स्वागत.
ReplyDeleteकाळजी घे...शेवटची वाक्य जी आपल्यासारख्या पालकांना आहेत ती नक्की वाच कारण आपण आपली काळजी घेणं आपल्या लहानग्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे...
रोहन आभार...लिंकण्यासारखं खरं काही नाहीये..या एका पोस्टमध्येच तुला माझं काय चाल्लंय ते लख्ख कळेल..या आठवड्यात बोलुया तुला जमलं तर....
ReplyDeleteसुहास, आभार...तळमळ तळमळ करून सबंध मार्च गेला आणि एप्रिलनेही डोळ्यात पाणीच आणलं...असो निर्ढावायला हवं नाही का??
ReplyDeleteअपूर्व आभार रे...
ReplyDeleteThis is harsh reality with most of the parents of our generation... But looking at positives, day care gives child, the opportunity to mingle with other small ones of their age and they become more social.. foreign countries madhe gharat fakt aai barobar rahanarya mulanpeksha day care madhli mula jast smart aani interactive hotat :) + there is always a weekend to spend with your lil ones.. So cheer up and be positive when you accept this situation !!
ReplyDeleteखरंय अपर्णा!
ReplyDeleteमाझ्या डोक्यात एक कल्पना आलीये - जर बाळंत होण्याचा पर्याय स्त्रियांसोबत पुरुषांकडे ही असता तर?!
सध्या या गिल्टची साथच आलीय की काय? जिकडे बघावे तिकडे दिसतो आहे, काय वाईट आणि काय चूक याचा हिशोबही मांडता न येण्याचं दु:ख आहे. आपण नाहीच बिचारी तीच आपल्याला ऎड्जेस्ट करून घेतात असं वाटतं:(
ReplyDeleteखूप छान आहे लेख आणि ब्लॉग हि
ReplyDeleteNisha,
ReplyDeleteThank you for your detailed comment. The post is not about if we should keep our kids to day care or not, you can say it might be more about the guilty feeling I get as a mom.. If you ask me frankly there is a lot that I have learnt from the day care where I sendmy kids too. YOu must have seen in other posts especially Simply priceless. So there is more to day care than I might offer to my kids as a parent but the fact still remains that Mother and Home is what a child craves for... Believe it....I have been through it and its something I rather not talk about ... :)
श्रीराज सर्वप्रथम एक वेगळा विचार पुढे केल्याबद्द आभार.. पण तू एक विसरतोयस मी एक आई आहे म्हणून मी आईच्या दृष्टीने ही पोस्ट लिहिली आहे..याचा अर्थ आमच्या घरचा बाबा निर्ढावलाय असा कुठेही होत नाहीये.... माहित नाहीये मला तू बाबा झाला आहेस का पण अरे शेवटी ते आपलं मुल असतं नं..पालक म्हणून आपण तितकेच हळवे असतो... तू "दमलेल्या बाबाची कहाणी" ऐकलंस नं....तसंच थोडंसं.....
ReplyDeleteशिनु,प्रतिक्रियेबद्दल आभारी... गिल्टच्या साथीपेक्षा मी म्हणेन सगळेच एका नावेचे प्रवासी आहेत म्हणून सगळेच तसं म्हणत असतील...
ReplyDeleteआणि हो कदाचित मुलंच आपल्याला अॅडजस्ट करत असावीत...त्यालाच ते एव्होल्युशन का काय म्हणत असावेत...याची पुढची पिढी थोडाही गिल्ट फ़ील करणार नाहीत असंही होईल.....
@मराठी कट्टा व्यवस्थापक, आभारी आणि ब्लॉगवर स्वागत.... :)
ReplyDeleteअवघड होते मनाची अवस्था... :-(
ReplyDeleteहो रे आनंद....नेहमीच होत असं....यावरून फ़क्त निदान याबाबतीत निर्ढावले नाही मी असं मनाचं समाधान करून घेते....
ReplyDelete:(