Sunday, October 3, 2010

उन्हाळा सरतोय पण आपल्या खाद्य आठवणी मागे ठेऊन

सप्टेंबर हा महिना हवामानाच्या बाबतीत तसा बोनस असतो. म्हणजे, पहिल्या विकांताला एकदा का इथला लेबर डे संपला की उन्हाळा तसा संपलेला असतो, पण लगेच काही थंडी आलेली नसते. पण ऑक्टोबरची तशी काही खात्री देता येत नाही..त्यामुळे थंडीची तयारी करायला सुरुवात होते...म्हणजे तेच ते आपलं कपडे वगैरे झालंच तर हा...उन्हाळ्यात बाहेर काढलेली ग्रील असेल तर तिला कोरडं करुन अंगडं टाकुन ठेवुन द्या. अरे हो ग्रीलवरुन आठवलं, आमच्या फ़िलीच्या घराला मागच्या बाजुच्या ओट्यावर आधीपासुन बसवलेलं ग्रील होतं..त्याला गॅसचं कनेक्शनही होतं, त्यामुळे उन्हाळाभर आम्ही काही न काही भाजुन खात असायचो..मला आवडतं पण शिवाय एक दिवस नेहमीच्या भाजी-पोळी जेवणापासुन सुट्टी असाही स्वार्थ त्यात साधला जातो.पण आता ओरेगावात हे चोचले कसे पुरवायचे किंवा एखादं छोटं ग्रील घेऊया का असा विचार सुरु होताच. ही समस्या आमच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या स्विमिंग पुलवरचं मोठं एकदम शेफ़ ग्रील पाहिलं आणि सुटली...


आता थोडं गार वातावरण सुरु होतंय तर त्यांनीही ते ग्रील बंद करुन ठेवलंय...आणि मला आठवतेय असंच माझ्या शेजारणीबरोबर केलेला ग्रील बेत...तिला एकदा तंदुरीची चव मला चाखवायची होती तर तिला मला सोकाय सामन आणि तोही एका विशिष्ट प्रकारच्या लाकडावर कसा भाजतात ते दाखवायचं होतं..बाकीच्या भाज्या अशाच जे काही त्यादिवशी आणलं होतं ते ग्रीलवर पडत गेलं...म्हणजे अक्षरशः ग्रीलभर झालं असं म्हटलं तर जास्त बरोबर ठरेल...आणि एकेक करुन पोटात कसं गेलं ते कळलंही नाही


खरं तर जास्त काही लिहीण्यापेक्षा मला वाटतं फ़ोटोच काय ते सांगतील. शिवाय मागे फ़ार्मविलेची पोस्ट वाचुन जर या भाज्यांचं तुम्ही काय करता असा कुणाला प्रश्न पडला असेल तर ती शंकाही मिटेल कसं???

मग यंज्वाय...जाता जाता....आपल्याकडे ऑक्टोबरच्या उन्हाळ्यात हा मेन्यु कसा लागेल हे कुणी ट्राय करुन पाहणार असेल तर नक्की कळवा.
आमचा साधा मेन्यु...मका,बटाटा,झुकिनी,तंदुरी तंगडी आणि सोकाय (sockeye) सामन

चीज भरलेली मिरची माझी खासियत

बल्लवाने फ़क्त मध्ये मध्ये पलटी मारली की झालं
इतकं सारं ग्रील होतंय मग तोंडी लावायला एक छोटा पिझा नको का?
झालं! ताटात एकदा का थोडं थोडं आलं की कॅमेर्‍याची आठवण कुणाला?

26 comments:

  1. यात काही नॉनव्हेज दिसत नाही असं म्हणणार तितक्यात तंदूर तंगडी दिसली आणि काल रविवारी तृप्ततेचा कोटा पूर्ण केला असला तरी आज सकाळच णिषेढ करायची पाळी आली...

    ReplyDelete
  2. चीज भरलेली मिरची आणि पिझ्झा?????

    नाचीज का णीशेढ कबुल किया जाय !!!!!!!!!

    ReplyDelete
  3. काट्या चमच्याने मका कसा खाणार?? आणि इतक चविष्ट जेवण बनवताना तुम्ही कॅमेरा सोबतच ठेवता का हो?? :)

    ReplyDelete
  4. भारी एकदम,
    स्टफ्ड भोपळी मिरची, स्टफ्ड वांगं आणि स्टफ्ड झुकीने माझे फेव्हरेट! बेसिकली स्टफ केलेली कुठलीही भाजी!
    आवडलं ग्रिल...
    बाय द वे..तिला देशी हुरडा खायला घातलास की नाही?

    ReplyDelete
  5. aai ga to drumstick cha piece kasala kharpoos bhajala gelay....aamhi pan ya varshi khupda park madhe jaun jaun grill partya kelya....tya kolshyavar bajalelya padarthanchi chav faar faar bhari lagate....tuzi post pahun ajun ekda khavasa vatat aahe sagala....ummmm

    ReplyDelete
  6. चवदार वाटले (मिरची, मका, चीज,)फोटो मस्त वाटले

    ReplyDelete
  7. चला, झाले सगळे वाचून लेख. हा लेख वास्तविक छान आहे, पण तरीही निषेध! कारण, मी आत्ता लंच ब्रेकमध्ये मुगाची उसळ आणि पोळी खाऊन आल्यावर हा रिप्लाय करतोय! ;-) (तुम्ही तिथे काय काय खाताय आणि आम्ही मात्र...) हा वीकेंड फक्त तुझे लेख वाचण्यातच गेला. आता नवीन कमेंट नवीन पोष्टीवर. तोपर्यंत अलविदा... :-)

    ReplyDelete
  8. सिद्धार्थ, अरे इतका मोठा माशाचा तुकडा तिकडे भाजतोय बघ....आणि ग्रील और नॉनवेज नही ऐसा भी कभी हुआ है....

    ReplyDelete
  9. हेरंब, चीज देखके आप तुरंत बोलोगे इसकी इस नाचीज को उम्मीद थी... आपका णीशेढ कुबूल है ....
    BTW त्या मिरच्यांच्या फोटूखाली म्या काय लिवलाय पाहिलं का?? माझी खासियत....कसलं डोक लागत न असली डिश बनवायला?? माझे खादाडी प्रयोग मध्ये सामील करून टाक असले उद्योग....i mean try कर कधीतरी....मस्त लागतं....

    ReplyDelete
  10. प्रसिक, काटे चमचे फक्त माशासाठी....आणि अरे या खादाडी फोटुची पण गम्मत आहे...त्यामागचा बोलावता धनी "माझं धनी" हायती...त्याला जशी खायची आवड आहे तशीच माझ्या आणि त्याच्या पाककौशल्यावर विश्वास(??) त्यामुळे एकदा काही फक्कड बेत असला किंवा बाहेरही चांगली खादाडी केली की तो आठवणीने फोटू काढतो....आजकाल मला हे फोटू ब्लॉगवर टाकायला उपयोगी पडतात ही गोष्ट निराळी पण अगदी २००३ पासूनचे असे हटके खादाडी फोटो आमच्याकडे आहेत....कधी तरी पाहायला मजा येते...

    ReplyDelete
  11. बाबा, भाज्या अश्या भरून आणि भाजून समोर आल्या की बिनबोभाट खाल्या जातात असं माझंही मत....अरे देशी हुरडा खायला एकदा तिला मायदेशी आणावं म्हणते...:)

    ReplyDelete
  12. मेघा अगं ती झुकीनी आहे...आणि हो पार्कमधला बाबेर्क्यू आणखी गम्मत आणतो....तिथे तर किती खाल्लं याचा हिशेब नसतो....आलं पुढ्यात की गेलं घशात...:) आम्ही आरुष नसताना पार्क पार्ट्या भरपूर करायचो...आजकाल घरी आणि पूलवर सोप्पं पडतं...आणि हे फोटो ऑगस्टमधले आहेत....मलाही आता हे सगळं पुन्हा हवंय....

    ReplyDelete
  13. धन्यवाद महेश काका..हेरम्बला सांगितलं तेच, एकदा मिरची मध्ये कुठल आवडीच चीज घालून रोस्ट करून खाऊन बघा...नक्की आवडेल...

    ReplyDelete
  14. संकेत, तुझा काय माझा पण निषेधच कारण मी पण आत्ता कुठे खातेय??हे समर मधल आहे....
    तुझ्या कमेंट्स पहिल्या आहेत आणि त्याबद्दल आभार तर आहेतच.....:) काहीना उत्तर दिलीत आणि राहिलेली सवडीने देईन....:) भेटूया लवकरच...

    ReplyDelete
  15. मस्त दिसत्ये तुमची खादादी.
    मी कधि ओपन ग्रील ट्राय केले/खल्ले नाहीये
    बघितल्यावर खावेसे वाटत आहे.
    सोनाली केळकर

    ReplyDelete
  16. मस्त लागतं सोनाली....कधी तरी ट्राय कर....खर तर आपल्या हवामानाला ग्रील घरी हवंच..मुम्बैइत प्रश्न आहे तो जागेचा...त्यासाठी रोहनच्या घरासारखी गच्ची हवी.....

    ReplyDelete
  17. e kahitarich kay....last fotutala mhanat aahe mi.....tangadi mi kuthunahi olakhu shakate..hi hi...aani malapan 2 mula aahet(4 aani 2 years chi)pan 2,3 families sobat gela ki kunitari mulanchy swings kade laksha detach....besides ajun aamcha ghar zalela nahiye....tyamule park shivay paryay pan nahi....nonveg samor asla ki veggies la bhaav milat nahi pan...asa aapala maza anibhav bara ka...ajun junya khadadi pics var pan vachayala aavdel....

    ReplyDelete
  18. अग हो मेघा...सॉरी मी वाचताना तंद्रीत होते बहुतेक...आणि आता आम्ही जिथे राहतो आहोत तिथे अजून काही मोठा ग्रुप वगैरे नाहीये. त्यामुळे पार्कपेक्षा हा पर्याय चांगला वाटतो...आधी बरीच मित्रमंडळी आसपास होती त्यानुळे तश्या बार्बेक्यू पार्टी व्हायच्या...:)

    ReplyDelete
  19. सही एकदा एका रेसोर्टवर ओपन ग्रील चा बेत केला होता...त्या आठवणी परत ताज्या केल्यास बघ तू..
    खूप आवडत मला हे आणि ह्यात वेरायटी पण करता येते...मस्त मस्त...

    ReplyDelete
  20. ही रिसोर्टची कल्पना छान आहे सुहास...एकदा जमवल पाहिजे...

    ReplyDelete
  21. मका माझा भारीच आवडता... आणि हो ते चीज टोमाटो कसे लागते???

    मी सध्या खादाडी निषेध बंद केलाय... (लिखाण पण बंद केलाय...) तेंव्हा मज्जा करून घ्या... :)

    ReplyDelete
  22. रोहन प्रतिक्रियेसाठी आभारी.....ती लाल भोपळी मिरची आहे...चीज भरून ग्रील केली की एकदम मस्त लागते....तुझा खादाडी ब्लॉग कुठे आहे तेच शोधतोय...खायच्या आठवणी ह्या ब्लॉगवर मध्ये मध्ये येतात रे...शेवटी सार काही पोटासाठी...:)

    ReplyDelete
  23. aparna Bhari........
    mast lihil aahes muli.....
    milind verlekar....

    ReplyDelete
  24. थोडक्यात चुकामुक झाली या सर्वांशी ;)

    ReplyDelete
  25. आनंद पुढच्यावेळी नक्की प्लान कर..तू परत गेलेला दिसतोयस....

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.