नाही नाही मला तशी कल्पना आहे की आता मल्टिप्लेक्सचा जमाना आल्यामुळे ब्लॅकवाल्यांचा धंदा बसलाय पण ही जी मी आता एक छोटीशी गोष्ट मोठी करुन सांगणार आहे तिचा आणि ब्लॅकच्या तिकिटांचा अजाबात संबंध नाय... ते ब्लॅकने तिकिट घेऊन पिक्चर पाहायचे दिवस वेगळेच होते नाही?? मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही दोघींनी असा ब्लॅकने पाहिलेला पिक्चर म्हणजे "हैदराबाद ब्लुज". त्यात इतकं हसायचं आहे आणि आम्ही दोघी एक-दोन रांगा अलिकडे-पलिकडे. पण काय करणार ऍडव्हान्स बुकिंग फ़ुल्ल झालं होतं आणि मला तर तिकिट घेतानाच धाकधुक. एखाद्या मुलाला बरोबर घेतलं असतं निदान त्या ब्लॅकवाल्याबरोबर डिल करायला तरी बरं झालं असतं असं नंतर वाटलं. असो इतकं विषयांतर पुरे...
तर आज काही कामानिमित्ताने software development estimates या विषयाची जरा अधिक छाननी करत होते तर एक मस्तच template हातात पडलयं. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशनमध्ये छोटा बदल करण्याचं काम करताय आणि त्याला मुळात ५ मिनिटं लागणार आहेत तर त्याला खरा किती वेळ लागेल? म्हणजे थोडक्यात "काय रे, तुम्ही software वाले इतका वेळ काय काम करता?" असं कुणी विचारलं आणि त्याला तुम्हाला समजावायचं असेल तर हे template नक्कीच चांगलं आहे.
म्हणजे पहा पाच मिनिटात तुम्ही कोड बदलला आणि २ मिनिटांत तो कंपाइल केला. मग तुम्हाला काही अभावित आणि अनभावित कंपायलेशन मधल्या चुका मिळतील त्या दुरुस्त करण्यासाठी साधारण १५, १५ अशी ३० मिनिटे पकडा.पण तरी का बर डम्प येतोय हे जरा जास्त डोकं लढवुन करायला हवं मग त्यासाठी अजुन एक तासभर लागेल. आणि हे काम अर्थातच तुम्हाला एकट्याने झेपेलच असं नाही मग तुमच्या आजुबाजुच्या लोकांची डोकी साधारण अर्धा तास खपवा. जाउदे शेवटी सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित लिहुन काढा जास्त नाही आठेक मिनिटांत आता पुन्हा थोड्या पुर्वीसारख्याच कंपायलेशन चुका आणि इतर डम्प इ. भानगडी. पण आता जरा अनुभव गाठीशी आहे त्यामुळे त्याला ४ आणि १० मिनिटं. हुश्श.आता मात्र जरा एकदा स्वतः थोडं एक-एक करुन टेस्ट करा लावा जरा आणखी दहा मिनिटं. चला आता खरा प्रश्न मिळाला त्यामुळे पाचेक मिनिटांत त्यावर उतारा आणि आता मात्र थोडं आधी विचार न केलेले चेक्स इ. टाका विसेक मिनिटं, थोडे नवे फ़िचर्स ३० मिनिटं आणि पुन्हा एकदा कंपायलेशन २ मिनिटं.पुन्हा एकदा टेस्टिंग, प्रोग्राम आणि युजर डॉक्युमेंटेशन प्रत्येकी दहा मिनिटे. मध्येच तुमचे संगणकाचे काही प्रॉब्लेम्स आले असतील आणि पुन्हा काही टाइप करायचं तर त्यालाही असुदेत ना एक पंधरा मिनिटे. चला बदल तर झाले आता एकदा पुर्ण सॉफ़्टवेअर इन्स्टॉल करुन त्याचं टेस्टिंग एक दहा मिनिटं. आता हे काही पहिल्या फ़टक्यात नीट चालणार नाही मग काय लढवा डोकं एक तासभर.आणि मग आलं ना पुन्हा बर्यापैकी नवं चक्र....विश्वास बसतोय ना?? शेवटी हे बस्तान नीट बसवुन आणि पुन्हा एकदा कागदोपत्री (म्हणजे आपलं डॉक्युमेंटेशन इ. हो) करुन जर सगळी गोळाबेरीज केलीत तर किती वेळ लागु शकतो माहितेय? १४ तास आणि ४० मिनिटे. म्हणजे झाले ना पाच का चौदह. नाही विश्वास बसत?? ही लिंक पाहा.
आणि आता कुणा सॉफ़्टवेअर मधल्या माणसाला तुम्ही दिवसभर (किंवा कधी कधी महिनोन महिने) काय करता असं विचारायच्या आधी याचा नक्की विचार करा. आणि तरी हे फ़क्त पाच मिनिटाचं उदाहरण आहे मग मोठमोठी प्रोजेक्टस यशस्वी करायला काय मेहनत घ्यावी लागत असेल याचा अंदाज आला की नाही?? मी मागे एकदा तीन महिन्यांसाठी प्लान केलेल्या प्रोजेक्टवर जवळजवळ सहा महिने खपले त्याचं गणित आता सांगायलाच नको. खरं तर मला वाटतं फ़क्त सॉफ़्टवेअर कशाला घरातलं एखादं पाच मिनिटांचं कामही कधी कधी पाच तास घेतं तेही मला वाटतं याच पद्धतीनं शोधता येईल. सगळीकडे आपलं पाच का चौदह, पाच का चौदह केलं की झालं...
हाहाहा....अगं हे जगजाहीर असले तरी गुपित आहे गं. आता वाजवलेस ना तीनाचे तेरा...:)
ReplyDeleteमस्त गं.
अरे बापरे आता पळायला हवं....नाहीतर माझेच (व्यावसायिक) जातभाई माझं काय करतील काही खरं नाही.....
ReplyDeleteखरं आहे तुझे म्हणणे, ब्लॉग वर येण्याआधी, मी घरी नित्यनेमाने वैतागायची किती वेळ हे दोघेही संगणकावर खूप वेळ असायचे. अजिंक्य प्रोजेक्ट्स करिता साईट शोधतो त्याबरोबर मीही,पटापट आवर आग्रह असायचा.आता सकाळचा खूप वेळ ब्लॉग करिता जातोय.पाचच मिनिटे बघते असे म्हणता म्हणता........ लेख सही झालाय.
ReplyDeleteअगदी खरंय अनुजाताई...संगणक आणि विशेषकरुन मायाजालात तर गुरफ़टल की काही खरं नाही....
ReplyDeletemam jara savadh raha 5mins mhanje kiti he sangay la barya ch loka che hat shiv shivat astil hahahhaha
ReplyDeletebaki lekh mast :)
-ashwini
अगं हो अश्विनी..म्हणून तर मी म्ह्टलं ना वरती का आता पळालं पाहिजे...तूही जातभाई दिसतेस....:)
ReplyDeleteही ट्रेड शिक्रेट्स अशी एकदम चव्हाट्यावर नाही मांडायची बाई ... आधीच मंदीचे दिवस आहेत :)
ReplyDeleteप्रथमच आले तुझ्या (का तुमच्या?) ब्लॉगवर. आवडला.
गौरी स्वागत आणि आभार...अगं तसं हे ट्रेड सिक्रेट बर्यापैकी ओपन आहे..अजुन बरीच आहेत...पण आता तुझा सल्ला मानलाच पाहिजे...मंदीचे दिवस आहेत काय??? :)
ReplyDeleteहे सुटलं होतं वाचायचं..
ReplyDeleteते पाच मिनिटांचं काम.. खरंच कां असं असतं? आम्हाला फक्त सॉफ्ट्वेअर वापरायचं माहिती आहे. Click and Go...... :)
पुर्ण सॉफ़्टवेअरचं टेम्प्लेट अर्थातच वेगळं असतं...आणि टाइमलाईन पण... छोट्या चेंजसाठी कधीकधी अशा अनाहुत कारणांमुळे वेळ लागु शकतो...गाडी दुरुस्त करतानाचं असतं तसंच....
ReplyDeleteHmmm ohhh so that way u guys r billed!! I guess some day HR will also gets this kind of opportunity to be A billable resource! ;)
ReplyDeleteहा हा हा...एच आरवाले काय रे नेहमीच बिलेबल नाही का??? ते आमच्यासारखे बिलेबल बकरे शोधतात ना??
ReplyDeleteHmm r u OL?? can we chat?? what's ur gmail id? u can reach me @ kuldeep1312@gmail.com
ReplyDeleteएच आरवाले काय रे नेहमीच बिलेबल नाही का??>> hmm nahi g maazCH bgh na mi sadhya ekahdee company shodhtoy bill lavnyasathee :)
पॉइंट आहे. सगळे सॉफ्टवेअर इंजिनिअर्स असंच काम करतात. म्हणून तर कोणतंही प्रोजेक्ट महिनोन् महिने चालतं...
ReplyDeleteसंकेत, सॉफ्टवेअरमध्ये काय आणि इतर ठिकाणीही जिथे मोठ्या टीममध्ये कामं असतात तिथ पाचाचे तेरा चौदा व्हायचेच....
ReplyDelete