मुलं जसजशी शाळेची भाषा शिकायला लागतात तसा त्यांचा मातृभाषेशी संपर्क कमी होतोय असं सध्या जाणवतंय. अर्थात त्यात त्यांचा किंवा आमचा कुणाचाच दोष नाही. त्यांच्या आसपास सध्या घरी सोडून इतरत्र मराठीचं वातावरण नसल्याने यावर फार काही उपाय नाही. घरी फक्त कानीकपाळी "मराठी बोला रे"चा ओरडा करणे हे मात्र आम्ही दोघ मायेने (?) करतो.
त्यादिवशी घरी खेळायला एक मित्र असताना आमच्या संभाषणात थोडा ओरडा खायची वेळ आली तशी उगाच दया येऊन तेवढा एक भाग मी आरुषबरोबर मराठी मध्ये बोलले. शिवाय त्याच्या मित्रासमोर तो ओरडा खातोय हे मित्राला कळू न द्यायची दखल मी घेतेय हे सांगायला मी काही विसरले नाही. तेव्हा त्याला अर्थातच ते मी काही वेगळं किंवा त्याच्या फायद्याचं करतेय असं काही वाटलं नाही.
हा जो त्याचा मित्र आहे त्याची भारतीय वंशाची आई माझ्याच मुलांसारखी इथे वाढलेली आहे आणि बाबा अमेरिकन. या जोडप्याची आणि पर्यायाने त्यांच्या घरचीच भाषा इंग्रजी. त्याची आई केव्हातरी लहानपणी मातृभाषेत रस न दाखवल्याचं दुःख करते. तिला अर्थातच फक्त इंग्रजीच येते.
काल अचानक याच मित्राची आठवण घरी कशावरून तरी निघाली आणि एकदम आरुषला हसायला आलं. मी विचारलं तेव्हाचा आमचा छोटा संवाद.
आरुष: आई मी त्यादिवशी थोरिनच्या घरी गेलो तेव्हा त्याची आई त्याला एकदम जोरदार ओरडली.
मी: बघ म्हणजे सगळे ओरडतात. (मी आपलं त्यातल्या त्यात स्वतःला जस्टीफाय करायचं सोडलं नाही)
आरुष: हो सगळे ओरडतात (हेखिक्ककरून आणि दात दाखवून) पण थांब त्यात एक गम्मत झाली.
मी: काय? (मनातल्या मनात एक धपाटा पण देतात का काय इथले पालक?)
आरुष: ती ओरडली आणि मला सगळं कळलं कारण ती सगळं इंग्लिशमध्ये बोलत होती.
मी: ओह
मी: बघ म्हणजे सगळे ओरडतात. (मी आपलं त्यातल्या त्यात स्वतःला जस्टीफाय करायचं सोडलं नाही)
आरुष: हो सगळे ओरडतात (हेखिक्ककरून आणि दात दाखवून) पण थांब त्यात एक गम्मत झाली.
मी: काय? (मनातल्या मनात एक धपाटा पण देतात का काय इथले पालक?)
आरुष: ती ओरडली आणि मला सगळं कळलं कारण ती सगळं इंग्लिशमध्ये बोलत होती.
मी: ओह
इथे दोघ पण मोठा पॉज.
आरुष: आई तू तिला तिच्या मुलाला त्यांची भाषा शिकवायला सांगशील का? म्हणजे त्यादिवशी तू तो आपल्याकडे आला तेव्हा त्याला कसं कळलं नाही माझी आई मला ओरडते तसं मला पण कळणार नाही.
अर्थात घरी मराठी बोलायला हवं या माझ्या जुन्या कॅम्पेनला मार्केट करण्याची संधी काही मी सोडली नाही. तूर्तास घरी सगळ्यांनी विशेषतः शेंडेनक्षत्राने देखील आपसात मराठी बोलायचा फतवा आपोआप निघाला आहे. अर्थात लहान मूल आईबाबाने रागवलेलं जसं विसरतं तसं आणखी काही दिवसांनी इथल्या उन्हाळाच्या सुट्ट्या संपतील आणि शाळा सुरु झाली की हा फतवा विसरला जाईल हे भय आहेच.
हा हा हा... काही फायदे आहेत आणि त्यांचा योग्य तो वापर योग्यवेळी कसा उपयोगी पडतोय हे कळल्यामुळे आणि त्याची गंमतही वाटल्याने मुले नक्कीच बोलतील :) :)
ReplyDeleteशाळा सुरू झाल्या का ग?
धन्यवाद श्रीताई. शाळा तोंडावर आल्यात. सोमवारपासून सुरु. :)
Deleteतू कशी आहेस?