फॉल म्हणजे आपला हेमंत येतो तो निसर्गातल्या रंगाची उधळण घेऊन. आता नाही म्हटलं तरी त्या पानगळीच्या रंगांची सवय झालीय पण तरी एखादी सांज अशी येते की दिवसाचा देव जाता जाता त्या रंगात आपले काही रंग घालतो आणि एक वेगळं चित्र आकाशाच्या नैसर्गिक कॅनव्हासवर काढून जातो. काल एक छोटा वॉक मुलांबरोबर करताना ही उधळण दिसली. सुरुवातीला त्याने थोडा पिवळा वापरून फराटे काढायला सुरुवात केली.
मध्ये त्याला कॅनव्हासच्या पार उजवीकडे कुणा जाणाऱ्याचे मोठा पंजा का चितारावासा वाटला असेल बरं?
पिवळ्याला विस्तारायचं काम मध्यभागी सुरु होतचं.
आणि मग आगीची धग दिसावी तसा हा केशरी. माझ्या घरची एक भिंत या रंगात अॅक्सेंट केली तेव्हा त्याला फ्लेम कलर म्हणतात हे ठाऊक झालं.
आम्ही चालत घरी पोहोचेस्तो कॅनव्हास पूर्ण भरला होता आणि रविवारची हुरुहूर लावणारी आणखी एक संध्याकाळ रंगमय झाली होती.
कुठेतरी हेच रंग उगवतीचे म्हणूनही खपत असतील. कोण जाणे?
वाह वाह.. :) :)
ReplyDelete:) :)
Delete