Sunday, August 5, 2012

मैत्रीच्या धूसर सीमारेषा


कुठल्या तरी सुट्टीत "मैने प्यार किया" पाहिला होता..वरळीच्या सत्यम, शिवम, सुंदरमला..हे इतकं आठवतंय कारण ती सुट्टी बरेच दिवस परळला राहिले होते आणि मुंबई अंगात भिनली होती..त्यानंतर मग बारावीचं वर्ष चर्नीरोड त्यामुळे ती आणखीच भिनली...राणीच्या नेकलेसला रोज रात्री पाहायची सवय खरं तर चांगली (आणि परवडणारी) नाही...आता जेव्हा जगातल्या आणखी फ़ेमस शहरांना भेटी दिल्या जातात तेव्हाही आठवते ती मुंबईच....अरेच्च्या कुठे हरवले मी?? असं होतं हे मुंबईची आठवण आली की.....:)

हा तर तो "एमपीके", त्यातलं एक वाक्य चांगलं लक्षात आहे कारण मी त्याच्याशी कधीच सहमत नसते..मला वाटतं त्या सिनेमात बहुतेक सलमानचे पिक्चरमधले बाबा (चुभुद्याघ्या) म्हणतात "एक लडका और एक लडकी कभी दोस्त नहीं हो सकते". मला माहित नाही का ते पण मला ते अतिरेक टोकाचं विधान वाटलं होतं...
म्हणजे खरं तर तोवर माझे मित्र म्हणजे माझी मावसभावंडंच होती आणि कॉलेजमध्ये पण अकरावी बारावीला दोस्ती होण्याइतपत मुलांशी संबंध आलाही नाही.पण त्यानंतर मात्र व्यावसायिक शिक्षणक्रमाच्या निमित्ताने डिप्लोमा आणि डिग्रीला मैत्रीणी मिळाल्या तसेच मित्रही मिळाले...अगदी जीवाभावाचे.....त्यांच्याशी ओळख करून घेतानाही कधी काही दुसरे विचार मनात आले नाही...याचा अर्थ मुलं आवडलीच नाहीत असा नाही पण जसं मित्र हा एक वर्ग असतो तसा क्रश हा एक वेगळा वर्ग असतो...नोकरी करतानाही टीममधल्या एखाद्या मुलाबरोबर मैत्री व्हायचे प्रसंगही येतात...या सगळ्या मैत्रींना त्या वर उल्लेखलेल्या वाक्यात टाकलं तर मग काही खरं नाही न?

मैत्री ही कुठल्याही वयात आपल्या आयुष्यात येऊ शकते आणि ती येतानाच तिचं भविष्य घेऊन येते..काही ओळखी होता होता राहतात..म्हणजे आपल्याला ती व्यक्ती आवडत नसते असं नसतं पण ती ओळख मर्यादित स्वरूपात राहणार असेल तर ती तशीच राहते आणि धूसरही होऊन जाते...याउलट एखादी ओळख मग तो मित्र असो वा मैत्रीण जेव्हा पहिल्या भेटीदरम्यान न संपता येणार्‍या गप्पांनी सुरू होते ती काळाच्या ओघात नक्की टिकणार याची खात्री असते...अशा मैत्रीला वय/लिंगाच्या मर्यादा नसतात... 

मला जितकं सहज एखाद्या माझ्या वयाच्या व्यक्तीशी बोलता येतं, त्याच सहजतेने मी माझ्यापेक्षा दशकाने लहान असलेल्या व्यक्तीशीही सूर जुळवू शकते....माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तीला मात्र तसे संस्कार घेऊन आपण लहानपणापासून वाढतो म्हणून मान हा दिलाच जातो. पण एकदा सुरुवातीचे ते एकमेकांचा अंदाज घ्यायचे दिवस संपले की मग मात्र अशा मैत्रीचाही निखळ आनंद उपभोगता येतो...
वेगवेगळ्या वयांशी मैत्री असल्याचा फ़ायदा हा की आपल्याला आपल्यापेक्षा मोठ्या मित्र-मैत्रीणींच्या अनुभवाचा सल्ला उपयोगी पडू शकतो, त्यांच्याकडून आपण काही चांगल्या गोष्टी शिकू शकतो तर आपल्यापेक्षा वयाने लहान असणारे मित्र-मैत्रीणी आपलं लहानपण टिकवून ठेवतात. 

माझ्या भाच्यांना कदाचित म्हणूनच मी नावाने हाक मारायला शिकवलं..आमच्यातल्या मैत्रीमुळे मला अजून माझ्या भाचीबरोबर भातुकली खेळताना लहान होता येतं..माझ्या मुलांबरोबर तर मला उशांनी भांडताही येतं...

तसंच काहीसं मित्रांचं...म्हणजे मी मुलगी आहे त्यामुळे मित्रांशी बोलतानाची एक विशिष्ट मर्यादा आपसूक राखली जाते किंवा अगदी खरं सांगायचं तर ती मित्राकडूनही राखली जाते..कुणी कुणाशी किती मोकळं व्हावं याचे काही अलिखित नियम असतात आणि ते अशा ठिकाणी आपसूक पाळले जातात. फ़क्त तरीही समाजात अशा मैत्रीकडे निकोप दृष्टीने पाहिलं जात नाही...एखादा मुलगा आणि मुलगी एकत्र (आणि तेही जास्त वेळा एकत्र) दिसले, त्यातही ते एकत्र बाहेर खायला, फ़िरायला जाताना दिसले की यांचं जुळलंय अशाच भावनेने सर्वसाधारणपणे पाहिलं जातं.

प्रत्यक्षात ते तसं असायलाच हवं असं नाही. मग कधीतरी त्यापैकी कुणाला तसं सरळ विचारलंही जातं. एखादा बेधडक असेल तर तो अशा प्रश्नांना उडवून लावील पण एखादी साधी अशावेळी अति कॉशस होऊन आपली मैत्रीही कमी करायला सुरुवात करील..आणि मग समाज म्हणून मैत्रीवर संशय घेणारी व्यक्ती कदाचित त्यावेळी नक्कीच खजील होईल..

हे सगळं अशा प्रकारे घडण्यापेक्षा मैत्री दिनाच्या निमित्ताने आपणही निकोप मैत्री जोपासायला शिकुया...."तुमची फ़क्त मैत्री आहे नं? मग तुम्ही कशाला समाजाला घाबरता?" असं बोलणं खूप सोपं आहे पण एक स्त्री म्हणून याकडे पाहताना यातलेही धोके मला जाणवताहेत...आणि केवळ तेवढ्यासाठी अनेक द्राविडी प्राणायाम करून मैत्रीच्या धूसर सीमारेषांची जाणीव करून देण्याच्या समेवर आणण्याचा प्रयत्न करणारी ही एक छोटी पोस्ट...

मैत्रीदिनाच्या खूप खूप शुभेच्छा... :) 

30 comments:

  1. झकास पोस्ट.. "एक लडका और एक लडकी कभी दोस्त नहीं हो सकते" हे सगळे बॉलीवूडने डोक्यात भरवलेले नियम आहेत. तिकडे विशेष लक्ष द्यायची आवश्यकता नाही.

    रच्याक, उपरोल्लेखित संवाद मोहनीश बहल (चित्रपटातला 'जीवन') याच्या तोंडी आहे. (एमपीके शेकडो वेळा पाहिल्याचा परिणाम)

    http://www.youtube.com/watch?v=yH0onUQV9lw (watch at 4:57)

    ReplyDelete
    Replies
    1. आभार रे हेरंब... :)
      खरं तर पोस्ट तुझ्याकडे किवेला पाठवायला हवी होती असं वाटलं होतं पण त्या विचारांचा कंस ठेवला आणि शेवटी तुच क्युसी केल्याबद्दल धन्सं...:)
      दुर्दैवाने बॉलिवूडला बरेचदा नको इतकं सिरियस घेतलं जातं हे कटू असलं तरी सत्य आहे.....पण अर्थात हा तो विषय नाही म्हणा यापेक्षा सिरियस गोष्टी बॉलिवूडला समोर ठेऊन केल्या जातात...

      Delete
  2. Yes! Good Post. Truly said.

    ReplyDelete
  3. हा हेरंब म्हणजे ना हॉलीवूड आणि बॉलीवूड ह्या दोन्हीचा एक चालता बोलता एनसायक्लोपिडीयाच आहे !
    पोस्ट आवडली आणि पटली. गेल्या दोन वर्षांत मला मिळालेले नवे मित्र आणि मैत्रिणी हे सर्व बहुतेक माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. पण मी त्यांच्यात पूर्णपणे रमून गेले आहे. कारण त्या नात्याला कुठलाही इतिहास जोडलेला नाही ! आणि ही सर्व नवी नाती, आयुष्यभर जपण्यासारखीच आहेत. :)
    जरा उशिराच पण तुला मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! :)

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा अनघा. हॉलीवुड/बॉलीवुड माहित नाही पण एमपीकेचा नक्कीच आहे. असंख्य वेळा बघितलाय मी तो. माझा सर्वात लाडका पिच्चर :))

      Delete
    2. सगळ्यात प्रथम उशीराने उत्तर दिल्याबद्दल दिलगिरी आणि हेरंब तुझं एमपीके वेड मला माहिते :)

      अनघा, नाती टिकली की थोडा-फ़ार इतिहास हा जमा होतोच...ही पोस्ट जनरली जे भिन्नलिंगी स्वभावाबद्दल एक मत बनवलं जातं त्याबद्दल लिहायचा एक प्रयत्न...आभार गं.

      Delete
  4. Replies
    1. खूप खूप आभार राज आणि आपलं या ब्लॉगवर स्वागत.

      Delete
  5. Jhakas...Mast...

    Maitri Dinachya Hardik Shubhechha :) :)

    ReplyDelete
  6. हं.. आपण लोकांकडे दुर्लक्ष करावं हे उत्तम .. पण ते सगळ्यांना नेहमीच जमतं असं नाही हे दुर्दैव !

    ReplyDelete
    Replies
    1. सविता भिन्नलिंगी मैत्री हा सहजासहजी दुलर्क्ष करून सोडून देण्याइतका सोप्या मार्गाने सुटण्यासारखा विषय नाही असा माझा अनुभव आहे...आणि समाजाचं भान ठेऊनच अशा मैत्री होत राहतात यावर लोकांची मानसिकता बदललायला वेळ जाणार असं वाटतं...

      Delete
  7. Replies
    1. हे काय होतं तुम्हा दोघांचं?? हेरंब मला चित्रपट पाठ नाहीये हं (म्हणजे हे लक्षात आलं असेलच तुझ्या)

      Delete
    2. >> हे काय होतं तुम्हा दोघांचं?

      अगो काही नाही. BLHFD बोले तो BeLated Happy Friendship Day :D

      Delete
    3. बरं झालं लिहिलंस...मी जराही डोकं चालवलं नाही रे..पण सोपं होतं...:)
      All Z well.. ;)

      Delete
  8. Nice post Aparna. Thanks for a little cautionary advise in the last para.

    ReplyDelete
    Replies
    1. आभार रोहिणी..आणि हो सगळ्या पोस्टमधून ते शेवटाचंच काय ते सांगायचं ठरवलं होतं :)

      Delete
  9. मैत्रीच नातं ना श्वासच असतं. म्हणूनच तर रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ असतं
    कारण रक्त संपलं तरी पुन्हा भरता येत पण श्वास संपला तर भरता येत नाही
    ज्या मैत्रीत कसलही बंधन येत ती मैत्री मैत्री नाहीच मुळी :)
    माझ्यासाठी अभी म्हणजे माझं आयुष्य आहे :)
    मी खुप लकी आहे की माझ्या आई-बाबांनी आमच्या मैत्रीवर संशय घेणार्‍या प्रत्येकाकडे नेहमीच दुर्लक्ष केलं.
    तुझी पोस्ट वाचून पुन्हा "त्या" दिवसांची आठवण आली :)
    धन्स ग!

    ReplyDelete
    Replies
    1. प्रिया तुझे आई-बाबा काय किंवा माझे काय त्यांना साधारणपणे आपल्या मुलांवर विश्वास असतोच पण समाज हा एक वेगळाच मोठा प्रश्न आहे.
      काही महिन्यांपूर्वी एका जवळच्या मित्राबरोबर या विषयावर अशाच काही सोदाहरण चर्चा झाल्यानंतर हे लिहून ठेवलं होतं आणि हे मैत्रीदिनाच्या निमित्ताने ब्लॉगवर टाकलं. खरं तर जे सांगायचं होतं ते सांगितलं गेलंय का माहित नाही पण एक छोटा प्रयत्न..
      आवर्जून लिहिल्याबद्दल खूप आभार गं :)

      Delete
  10. मस्त लिहीली आहेस पोस्ट> मला ब्लॉगर वर कॉमेंट टाकता येत नाही, पण पुन्हा ट्राय करतोय.. आधी पण एकदा प्रयत्न केला होता.

    ReplyDelete
    Replies
    1. आभार काका...मला वाटलं तुम्ही वाचत असालच...:)
      हे कमेंट न टाकता यायचं कारण काय असावं माहित नाहीये..मला वाटतं तुम्ही ऑफ़िस नेटला कनेक्ट होता म्हणून होत असेल तर माहित नाही...पण ब्लॉगर गंडलं असेल...असो....:)

      Delete
  11. मस्त पोस्ट लिहिली आहेस.. खूप आवडली... अर्थात मैने प्यार किया मधला टायपो सोडून ;)

    ReplyDelete
    Replies
    1. आभार्स रे आनंदा...:)
      टायपो म्हणजे अक्षरशः माहितच होतं की टायपो होणार आहे पण संदर्भ (चुकीचा) दिलाच..अर्थात हेरंबने लगोलग खाली चूक दाखवून दिलीय..पोस्टमध्ये बदलू का की राहूदे कंस?? ;)

      Delete
  12. khupach changli post lihili...mnapasun avdli.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आभार सूरज आणि ब्लॉगवर स्वागत :)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.