Thursday, December 29, 2011

मोरगल्लीचा नाताळ....


गेले काही वर्षे अमेरिकेतला नाताळ पाहते पण घरगुती पातळीवर पाहिलं तर मला नेहमी शांत शांत (किंवा अगदी खर सांगायचं तर उदास) वाटतं...म्हणजे तुम्ही अपार्टमेंटमध्ये रहा की घरामध्ये फार फरक पडत नाही..अपार्टमध्ये बाहेरचं डेकोरेशन बाल्कनी असेल तर दिसतं नाही तर मग लिविंग रूमच्या खिडकीतला ख्रिसमस ट्री तरी दिसेल..घरांचा विभाग असेल तर मात्र जरा बाहेरही डेकोरेशन, आतला ख्रिसमस ट्रीही बरेचदा मोठी बे विंडो असेल तर दिसेल आणि लायटिंग थोडी जास्त....पण शांतता म्हणाल तर दोन्हीकडे सारखीच...कधी कधी मला वाटायचं कुणी एल्फ किंवा हिमगौरीचे सात बुटके येऊन सगळा साज-शृंगार करून गायब झालेत..खर तर या घरामध्ये आणि एकंदरीत हा  सण साजरा करायला कुणी माणसं इथे राहातच नाही आहेत...या सर्वांना अगदी दिवाळी नाही पण निदान होळी, गोपाळकाला या सणासाठी तरी मायदेशात घेऊन जावं असं नोव्हेंबर/डिसेंबरमध्ये माझ्या नेहमी मनात येत...
मग मागच्या वर्षी एका लोकल मासिकामध्ये portland शहरातल्या ख्रिसमस लायटिंगचा काही उल्लेख होता..ते पाहून खरं तर जायचं ठरवायचं होतं पण ते काही शक्य होणार नव्हतं. मग या वर्षी जरा आधीच माहिती काढून ठेवली आणि गेलोच...पीकॉक लेन उर्फ आपल्या भाषेत मोरगल्लीत...इथे १९२९ पासून या गल्लीत असणारी सगळी घरं १५ डिसेंबरपासून ते नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येपर्यंत डेकोरेशन करतात...आणि वेळ असते संध्याकाळी ६ ते रात्री ११. झाडून सगळी घरं वेगवेगळ्या देखाव्यांनी सजली असतात...आणि सगळ्यात मुख्य तिथे लोकांची गर्दी, त्यात काही उत्साही  ख्रिसमस कॅरोल गाणारे असा सगळा थोडा गोंधळ पण असतो...मला तर लालबाग परळ मधल्या एकामागून एका गल्लीत पाहिलेले गणपती मंडळाचे देखावे, तिथली गर्दी याचीच आठवण झाली..काळोखात सगळ्या गाड्यांनी आपले दिवे बंद करून गाडीतून मारलेली चक्कर असो किंवा थंडीसाठी मुलाला कानटोपीपासून ग्लवपर्यंतचे सगळे कपडे घालून गर्दीत घुसून साईड वॉकवरून जरा जास्त जवळून पाहिलेल्यामुळे थंडी न लागलेले आम्ही असो....त्या गल्लीतून आणलेली ही मोराची  रंगीबेरंगी  पिसे.......
मेरी  ख्रिसमस .....(हो  बिलेटेड...आम्ही नंतर सियाटलला गेल्यामुळे फोटो धुवायला वेळ लागला आहे याची मंडळ नोंद घेईलच...) 

10 comments:

  1. Surekh. Sandhi aali kadhi tar bhet dyayla hawi 'Mor Galli' la.

    AJ
    http://apurvaoka.blogspot.com

    ReplyDelete
  2. अपर्णा, छानच माहिती. जर्मनीत ख्रिसमसच्या सुमाराला मस्त ख्रिसमस मार्केट असतात. (म्हणजे पुण्यातली तुळशीबाग.) नेहेमीच्या शांततेत त्या वेळी जरा तरी हालचाल असते. या ख्रिसमस मार्केटला भटाकायला मजा येते. तिथे मोठ्ठी ख्रिसमस ट्रीज उभी करतात. सान्ताबाबा असतो. वेगवेगळ्या प्रकारचे पॅनकेक, जॅकेट पोटॅटो, होममेड चॉकलेट मिळतात, ग्लू वाईन नावाचा गरमगरम वाईनचा प्रकार मिळतो. उसगावात असं काही नसतं का?

    ReplyDelete
  3. मोरगल्ली झिंदाबाद ! होळी, गणपती, दिवाळी यातले काहीच नसले तरी सांताक्लॉज - रोषणाई तर दिसतेय. :)

    ReplyDelete
  4. रोषणाई तर मस्तच आहे आणि रात्री अश्या झगमगत्या गल्ल्यांमधून फिरताना जाम धमाल आली असेल नां?

    रच्याक, बाकी समस्त अंग्रेजांना 'शिमगा' कसा करायचा हे शिकवलेच पाहिजे म्हणजे पुढच्या वर्षी मोर गल्लीतून "हाय रे हाय, आणि xyz च्या जीवात काय नाय रे" अश्या आरोळ्या ऐकू येवून वातावरणात जरा 'जान' येईल :D

    ReplyDelete
  5. अपुर्व, मोरगल्लीपासून आम्ही पण जवळच राहातो...कळव कधी दौरा असणारे ते....:)

    ReplyDelete
  6. गौरी, अगं ख्रिसमस मार्केट, ट्री वगैरे प्रकार पोर्टलॅंड डाउनटाउनमध्ये असतात. हे मी म्हणत होते ते घरांच्या विभागात इतरत्र खूप शांत असतं त्याऐवजी आम्हाला मोरगल्लीतली लगबग आवडली...बाकी मी स्वतः ख्रिसमस मार्केट यावेळीपण मिस केलंय..पुन्हा कधी जमलं तर कळवेन तिथले मेन्यु....:)

    ReplyDelete
  7. श्रीताई, मोरगल्ली झिंदाबाद झिंदाबाद....ये रोषणाई पाहायला...

    ReplyDelete
  8. सिद्धार्थ, मला तुझी शिमग्याची आयडिया जाम म्हणजे जाम आवडली...चल तुलाच इम्पोर्ट करूया या शिमग्याला इकडे....मस्त सगळी चांगल्या इंम्पोर्टेड बोंबा ठोकतील....:)

    ReplyDelete
  9. मोरगल्ली... मोर मोर.. आपलं सॉरी लोल लोल ;)

    मोरगल्ली काय ओरेगाव काय सहीये.. ब्लॉगर्सची 'राज ठाकरे' वाटते आहेस तू.. :P

    ReplyDelete
  10. मोरगल्लीला तू मोर म्हणणारच हेरंब...ते तुमच्या कंपनीवाल्यांच नाव आहे...:D मी फक्त पोस्ट निमित्त आहे....म्या कसली नाव ठेवते आधी मूळ नाव नीट वाचते हेच खूप....नाही तर पी चं फी करून माझचं नाव बदलायचं...:)
    रच्याक यावेळी चांगला चानस होता तुला मोरगल्लीत मोर मोर करत हिंडायला पण तो गमावला आहेस.....सिद्धू बरोबर शिमग्याला येणार का?

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.