Sunday, December 18, 2011

भूलबाई आणि भूलबाबा यांच्या सोबत काही जागृत क्षण

एक तर हे भलं मोठं भलतंच शीर्षक आणि शब्दही भलतेच त्यामुळे नमनालाच हा भलता गोंधळ दूर करायचं काम करावंच लागणार असं दिसतंय. भू भू भूलबाईच आहे ते आणि तो भूलबाबाच...भुलाबाई नाही आणि नसलेला भूलाबाबा तर नाहीच नाही...’भूल’.. हो तेच ते सोप्या मराठीत ऍनस्थेशिया..आता भूलबाई आणि भूलबाबा म्हणजे कोण ते तर सांगायला नकोच. हो तेच ते ऍनास्थेशिस्ट. पहिल्यावेळी भूलबाई आणि दुसर्‍यावेळी भूलबाबा यांच्या सोबत काही जागृत क्षण घालवायचं संपूर्ण श्रेय अर्थातच माझ्य दोन (अश्राप बिश्राप....) लेकरांना...

पहिल्यावेळी मी म्हणजे अगदी झाशीच्या राणीसारखं ठरवलं होतं की काही भूल-बिल घेणार नाही. सगळ्या वेदना सहन करुन आई व्हायचा आनंद घेईन. पण कस्सचं काय? हॉस्पिटलमध्ये जाऊन दोनेक तास उलटले असतील..कळा तर सहन होतच नव्हत्या पण मुलानेच आचकायला सुरुवात केली...(म्हणजे आता मी इतकं सहजपणे लिहितेय पण तेव्हा मात्र बोलती बंद झाली होती) हां तर काय सांगत होते मुलाची स्पंदनं कमी व्हायला लागली आणि मग माझ्या डॉक्टरने इमर्जन्सी सीझेरियनचा निर्णय घेतला. सगळी आधीची डॉक्टर मंडळी (योगायोगाने ते सगळे पुरुष डॉक्टर होते) ऑपरेशन थिएटरकडे (बहुधा) गुप्त झाली आणि मी ज्या खोलीत होते तिथे भूलबाई अवतरली.

देवदयेने छोट्या छोट्या आजारांची मला कमी भासत नाही त्यामुळे मुलं-बिलं व्हायच्या आधीच आय.टी.देवीच्या कृपेने लो-बॅक पेनचा दागिना केव्हाचा मिरवतेय आणि आज नेमकं त्या दुखण्यानेही अक्षरशः थैमान घातलं होतं..त्यात या बाई दत्त म्हणून समोर..अरे मी तिथे कळवळतेय आणि ही शांतपणे स्वतःची ओळखपरेड करते आणि मला जे काही सगळं माहित आहेच तीच कॅसेट परत घासतेय.भू.बा:  Hi, my name is Sally and I am going to give you anasthesia today. (इथे नको असताना पॉज..म्हणजे तिने पॉज घेऊनही मला तिचं नाव लक्षात नाहीए..आताही मी ठोकलंय ते सध्या मोठ्या मुलाच्या कार्स चित्रपट पाहायच्या नादामुळे मला तो बर्‍याचदा सॅली म्हणतो म्हणून तेच घुसडलंय आणि ही बया तेव्हा मी कळवळतेय आणि पॉज....) We will be starting the procedure in a short while, meantime following (कुठलेतरी) standards (इथे मला उगीचच FDA standards असं का आठतवतंय...ब्वा) I have to ask you a few questions. How are you feeling today?

मी: ( मनात $%&*@#) प्रगट आधी नवर्‍याला...काय रे इतकी धाड भरलीय ते दिसतंय म्हणून का ही मीठ चोळतेय?? (मराठी किंवा खरं तर मायदेशातली भाषा परदेशात फ़्रस्टेशनचा कळस झाला की खरंच जाम कामाला येते...)

मी प्रगट(तिला): hmm hmm...(ह्म्म ह्म्म याचा अर्थ काय वाट्टेल ते घेता येतो असा इतक्या वर्षांचा अनुभव आहे म्हणून हे ह्म्म हम्म) इथे मात्र लवकर गं बाई हवं तर आधी भूल दे आणि नंतर काय पाहिजे ते विचार गं...

त्यानंतर असेच पॉज घेऊन मला नाव, वय, सोशल सिक्युरिटीचे शेवटचे नंबर आणि एकंदरीत त्या फ़ॉर्मात असलेले कुठले कुठले आकडे विचारून मग ते शांतपणे लिहिणे असा माझ्या वेदनांना न जुमानता जाहीर कार्यक्रम सुरू केला.मी मध्ये मध्ये आशेने नवर्‍याकडे पाहून पाहिले पण तो म्हणजे तुझी परीक्षा तूच दे पेपर...मी कशाला कॉपी करायला मदत करू अशा अविर्भावात टेनिसची मॅच पाहिल्याप्रमाणे एकदा तिच्याकडे (सुहास्य वदनाने) आणि माझ्याकडे (आता मी काय करू अशा नजरेने) पाहात होता...मी मात्र आता या वेदना अशाच टळतील आणि मग शेवटचा प्रश्न तुला भूलेसारखं वाटतं का? होsssssssssssssssssss..असं म्हणून मोकळी होईन असं वाटलं.....

प्रत्यक्षात मात्र मी नवर्‍याला म्हटलं, ’हे काय? माझा क्रेडीट कार्डचा नंबर, त्याच्या मागचे ते तीन नंबर आणि महत्वाचं कार्डची एक्सापायरी तारीख हे आकडे कसे काय विसरली ती गोर्‍यांच्या देशात?"

"काळजी करू नकोस..मी देईन ते तिला..."- इति अर्थातच अर्धांग.....

"कळेल तुला कधीतरी कसं वाटतं ते....’ असं पण बोलायची सोय नाही....

शेवटी ते पेपर्स घेऊन कुठे तरी अगम्य दिशेला (हॉस्पिटलमध्ये सगळ्या दिशा अगम्यच असतात आणि फ़ायनली त्यातल गमायला लागलं की आपण परत जायच्या लिफ़्टात बसलेलो असतो हे उसात(आणि जनरली कुठेही थोड्या मोठ्या) हॉस्पिटलवारी झालेले पेशंट आणि त्यांचे अर्धांग नक्की मान्य करतील....) असो तर तिला अर्थातच दिशा माहित होत्या त्यामुळे ती आणखी बराच वेळ गायब होऊन मला भूल द्यायची सोडून गूल होऊन मी तिच्या नावाने कडाकडा बोटं मोडून हाडांचा चुरा व्हायच्या एक सेकंद आधी (आणखी एका अगम्य दिशेला असणार्‍या) ऑपरेशन थिएटरमध्ये भेटली....

Hope you recognize me. I have everything ready now...Are you ready??

आर यु रेडी?? म्हणजे इतका वेळ काय आपण कबड्डी खेळत होतो?? दे गं बाई दे आता....मी काही बोलणार तितक्यात रात्री बारा वाजताही असणार्‍या इंटर्न्सच्या गराड्यामुळे वाचली ती....इकडे उठसूठ सी-सेक्शन्स करत नाहीत म्हणून ही गर्दी होती की यांच्यात मध्यरात्रीपण अशी गर्दी करणं नॉर्मल आहे देवजाणे..पण वाचली ती आणि मी अर्थातच सुखेनैव तिनेच दिलेल्या गुंगीत जाऊन एकदाची शांत झाले....

you did good....

ही तिची मलमपट्टी होती की पोपटपंची माहित नाही पण त्याच्या विचार करायचा नाही हे बहुधा तिच्याच इंजेक्शनमध्ये होतं...


त्यानंतर माझा या जातीबरोबर पुन्हा सामना व्हायचा तसा काही संबंध नव्हता पण दुसर्‍या बाळंतपणाच्यावेळी पहिल्यावेळच्या अनुभवाने आधीच एपिड्युरल घ्यायचं हे मी जाम ठरवलं होतं.म्हणजे नर्सला सुरूवातीलाच तसं सांगितलं की त्या ऑनकॉल भूल डॉक्टरला बोलावून घेतात. आपल्यालाही जास्त वेळ दर्द नको आणि कदाचित त्यांनाही इतर पेंशंट मॅनेज करायला बरं पडत असेल...असो...

तर यावेळी मी खरं म्हणजे मागचा प्रसंग पूर्ण विसरून गेले होते..थोडी सहनशक्तीही वाढली असावी शिवाय आधी हाय हॅलो करुन तो भूलबाबा गेला त्यानेही मागच्या प्रसंगाची काही आठवण व्हावी असं काही केलं नाही....अरे हो...यावेळी भूलबाबा आय मीन पुरूष डॉक्टर होता. अर्थात त्याने काय फ़रक पडणार होता माहीत नाही...पण मध्ये काय झालं माहीत नाही. नर्सची ड्युटी बदलली, नवी नर्स आणखी प्रसन्न होती. कदाचीत तिच्या सुरूवातीलाच मी भेटले म्हणून असेल शिवाय प्रसूती जवळ आली असेल तर एक नर्स फ़क्त एकच पेशंट पाहते त्यामुळे आठ तास काम करुन दमली नव्हती.आमची मैत्रीच व्हायची पण हाय माझं दर्द मध्येच आलं..मी तिला सांगून ठेवलं की बाई मला प्रचंड लो बॅक पेन आहे त्यामुळे आता हा आला नाही तर काही खरं नाही...हो...तो हाय करून गेला आणि मी हाय हाय करते तरी काही उगवेचना....

"मी त्याच्यापुढे आधी रडायला हवं होतं का रे म्हणजे त्याला कळलं असतं...."

नवरोबाला केव्हा शांत राहायचं ते बरोबर कळतं त्यामुळे तो काही ढिम्म बोलला नाही...

शेवटी माझी नवी मैत्रीण त्याला जाऊन घेऊन आली आणि साहेबांना यकदम मी पण त्यांच्या पेशंटच्या लिस्टवर असण्याचा साक्षात्कार झाला (असावा...) त्याने मला मी अमुक मात्रेचा डोस देऊन पाहातो मग तू मला सांग कसं वाटतंय ते ....वगैरे वगैरेने सुरू केलं....आणि पहिलं इंजेक्शन दिलं....माझं आपलं हाय हूय सुरुच.....माझी मैत्रीण कंफ़्युज...मी (मनातून) वैतागलेली...आणि भूलबाबा सुसंवाद रंगवताहेत...


 
भू.बा.. So tell me on the scale of 1 to 10 how much is the pain??

मी... I think its still 8 or 9

भू.बा.. I gave you blah blah blah dose....and you think its 8 or 9?? OK let me start over...Do you still feel the pain??

मी... ya absolutely.....

भू.बा.. Ok ..Now considering you were in pain before we start, do you think its going down?

मी... Actually its increasing...

भू.बा.. Which side is the pain?

मी... Right side

भू.बा.. ok and you think its still the same or more? I have the epidural in and its suppose to reduce the pain

मी... ya..Actually doctor i have low back pain already on my right hand side...Disc issues...

भू.बा... what do you mean?

मी (वेदनेच्या मार्‍यातही) त्याला व्यवस्थित समजावते....

भू.बा.. This epidural is not for that...i am treating you for the pain you have now..

मी... काय रे हा पण त्यातलाच आहे का?? असा काय हा?

भू.बा.. what was that?/

मी.. oh sorry I was talking to my husband...I mean I know this is a different epidural.

भू.बा.. You are confusing me...Let me ask you again, is the pain going down now?

मी... No its going up...I am in more pain...

भू.बा.. You are the first patient who is saying after giving the injection the pain is going up,,,

मी... I told you I already have low back pain...

भू.बा.. I can't treat you for that now...

मी... I know that but the pain is going up....

भू.बा.. I am going out of this room for five minutes..lets see if I need to increase the dose...

मी... Ok..THANKS....

गेला बिचारा...मला बिचारीला टाकून....हा सुसंवाद जेवढा वाटतो तेवढा सुसंवादी अर्थातच नव्हता..काश अशी कुठली भाषा असती ज्यात मला माझा वैताग,त्याचं कंफ़ुजन कम चिडचिडेपण दिसलं असतं...म्हणजे मला कळतच नव्हतं मी त्याला माझा बॅक प्रॉब्लेम फ़क्त संदर्भ म्हणून सांगत होते आणि त्याचं मात्र....असो....
तो पुन्हा थोड्या वेळाने स्वतःचं भिरभिरलेलं डोकं शांत करून आला...माझ्या नव्या मैत्रीणीने भावनिक आधार आणि नवरोबाने काही न बोलायची मात्रा पुन्हा उगाळून मलाही शांत केलं असावं....मग पुन्हा सुसंवाद रंगवून तो जो गेला तो काही माझ्या नशीबाने माझी नॉर्मल डिलिव्हरी झाल्याने पुन्हा दिसला नाही...

शेवटी काय आहे मला इतकं कळलं की भूल देणा"री असो की "रा"आपल्या वेदनांवर त्यांच्याकडे उतारा असला तरी त्याच्यामार्गे आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग खूप सारी कंफ़ुजन्स, बीप बीपाट, त्रागा, यातूनच जाणार....भूलयोगाचा महिमा दूसरं काय??


फ़ोटू महाजालावरुन साभार...

14 comments:

 1. अपर्णा, मस्तच लिहिलं आहेस तुला भूल कशी पडली ते. :)

  मी पहिल्यांदा पोस्टचं नाव ‘भुलाबाई आणि भुलाबाबा’ असं वाचलं. खानदेशात भोंडल्यासारखा प्रकार असतो त्याला भुलाबाई म्हणतात. आणि भुलाबाईचा नवरा म्हणजे भुलोजी. हिने भुलोजीला भुलाबाबा का बरं केलं असेल असा विचार करतच पोस्ट उघडली तुझी :D:D

  ReplyDelete
 2. अगदी सेम.. मीही आधी भुलाबाई आणि भुलाबाबा असंच वाचलं आणि मग ती भोंडल्याची वगैरे काहीतरी (बायकी) पोस्ट असावी असं वाटलं. (अर्थात सदर पोस्टही बायकीच आहे. पण वेगळ्या अर्थाने. ;) )

  ही पोस्ट वाचल्यावर मला 'चूक' ला हिंदीत 'भूल' असं का म्हणतात ते कळलं. (पुलंच्या 'वीट' वाल्या वाक्याच्या तालात वाचावे)
  तो भूलबाबा तर साफ 'भूल' लाच (हिंदी भूल) होता !!

  ReplyDelete
 3. घरोघर (म्हणजे देशोदेशी) मातीच्या चुली .. किंवा तत्सम काय ते!

  ReplyDelete
 4. गौरी,मिस्टर भुलाभाईना भुलोजी म्हणतात हे कळवल्याबद्दल धन्यवाद....अग तस पण पोस्ट जरा कन्फुजनवाली आहे न म्हणून थोड नावातच गोंधळ घातला बघ....:) मला भोंडल्याची गाणीबिणी मध्ये काडीची गती/माहिती नाही...पण भुलाबाईबद्दल चतुरंग मध्ये वगैरे वाचलंय म्हणून हे अस सुचलं असावं..असो...आवडल न तुला....:)

  ReplyDelete
 5. >>ही पोस्ट वाचल्यावर मला 'चूक' ला हिंदीत 'भूल' असं का म्हणतात ते कळलं.
  हेरंब मला उगाच Take a bow....असं स्वत:ला म्हणावसं वाटतय...:P

  "भूल भुलैया" हे आणखी एक नाव सुचल होतं पण उगाच पिक्चरच नाव वाटेल म्हणून मी भुलाबाईला पकडलं....:D

  तुला वाचायला मजा आली असेल आणि आमचं दु:ख कळलं असेल अशी आशा आहे...

  ReplyDelete
 6. सविता, अगदी अगदी....सगळीकडे मातीच्याच...:)

  ReplyDelete
 7. आई गं ! मला माझ्या बहिणीच्या वेदना आठवल्या ! तिचं झालेलं गं बाई हे सिझेरियन !!! आणि पोटात कापडाचा बोळा राहिला आणि सेप्टिक झालं गं तिला !!! :( खूप त्रास झालेला तिला !
  कस्सलं दुखलं असेल गं बाई तुला ते !!!! :( म्हणजे आता त्याला झालेत ना काही महिने...पण तरीही ! अजून दुखतं का ??

  ReplyDelete
 8. अनघा, या पोस्टमधली वेदना तुला जाणवली म्हणून खरं तर तुझं अभिनंदन केलं पाहिजे....खरंय गं वेदना तर होत्याच...सहा आठवडे वरच्या बेडरुममध्ये अडकले होते मी...पण मला वाटतं बाळाला पाहिलं की कुठलीही आई दुखणं विसरते म्हणतात ना तसं..म्हणून पोस्टमध्ये म्हटलं तसं आता मी हे विनोदाने लिहू शकते....:)

  आभार गं...

  ReplyDelete
 9. इतकं प्रचंड 'पेन'फुल वर्णन की-बोर्ड वापरून टंकायचे आणि वरतून हि पोस्ट 'हलकंफुलकं' ह्या लेबल खाली प्रसिद्ध करायची...

  हे म्हणजे भुलाबाई/बा लोकांनी भूल देण्याच्या नावाखाली वेदना वाढवून दिल्यासारखेच आहे :D

  ReplyDelete
 10. कस्सचं कस्सचं सिद्धार्थ....आता "पेन"गुल झालं म्हणून हलकं-फ़ुलकं पण खाजगीत सांगायचं तर आपण बाबा भूलबाई/बाला ज्याम टरकून आहे...

  ReplyDelete
 11. तुझा भू-बाबा बरोबरचा संवाद वाचून ( कंफुंज कंफुंज...) खुंट्याभोवती गोल गोलची... आठवण आली. :D:D

  किमान या एका भुलाभुलीतून म्या पामर वाचल्यानं पुन्हा एकवार जीव भांड्य़ात पडला. :)

  आता पुन्हा त्याच्या रस्त्याला जाण्याचा विचार नाही ना? ;) हलकं-फुलकी गुंगी भा..व...ली !

  ReplyDelete
 12. श्रीताई तो भू-बाबा खरचं खुंट्याच होता...:)
  आणि भा...व....ली........आता कुठे ग.....तुला काही वेगळं उलटं सांगायचं का? च्यामारिकेत काय देर आये दुरुस्त .....आम्ही आहोतच मदतीला...:D :D

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.