Friday, October 14, 2011

जंबो,मिकी, वन रुकी, कॅलिफ़ोर्निया.....वॅ वॅ वॅ...

आई-बाबा समल हाये समल हाये म्हनुन किती दिवस सांगतात की आपन कॅलिफ़ोर्नियाला जायचं..मला पन ज्यायचं..कॅलिफ़ोर्नियाला जंबोमध्ये जाताता....मला जंबोमध्ये बशायचं..जंबो हॅंगलमध्ये हाये...


किती सकाली उथवलं आईने..ते पन आम्हाला घ्यायला टॅक्सीवाला आला..मला तिथेच उजुन थोला वेल ज्योपायच्यं होतं पन आईने उचललं...जंबो मस्त उलतो पन माज्ये डोले मित्ले वात्तं...

आता दुस्ल्या जंबोमध्ये बशायचं..पन मला पन ती चाकावाली बॅग पायजे बाबा.....बाबा मी तुजा फ़ेंद नाहीये मी आईचा फ़ेंद हाये..ती मला बॅग पकलायला देते....

नाई, हे कॅलिफ़ोर्निया नाहिये...आई आनि बाबा कशाला हसतात? त्यांना माइतेका कॅलिफ़ोर्नियाला वन उकी असते... ती ती लायटनिंग मक्वीन आनि मेटल...ते कुथे हायेत?? ही तर दुसली गाली आनि हॉतेल हाये...

बाबा, तो बघ मिकी....तो मला जवल नको...मला मिनीबलोबल पन फ़ोतो नको...

बाबा मला डम्बोमध्ये बशायचं...बाबा आता आपन ज्यायचं?? कदी येनार नंबर....आई तू पन ये....लुशांकला आजीकले नको.....

मजा आली...मला उजुन बशायचं....आपन हॉतेलमध्ये ज्यायचं का?

बाबा मला पन तुज्याबलोबल ब्लेक फ़ास्टला यायचं....मला वॉफ़ल पायजे....

आई, ती बग वन उकी आनि मेटल पन हाये........बाबा हो आपन कॅलिफ़ोर्नियाला आलो....:) बाबा मला मक्वीनच्या आतमध्ये बशायचं....लेडियेतल स्प्लिंग कुथाय....मग बाबा आपन पलत यायच्यं??आई मला या गालीत नको....ते आपल्याला कुथे नेनार? हॉलिवुल कशाला? आई स्टाल वॉक कशाला कलायचा?

मला ही पापा नको मला वलन भात पायजे...बाबा, आई म्हंते ती आईस्क्लिम गेनार...तुला पन पायजे का? आईने मला चॉकोलेतचं दिलं.. ते फ़क्त माझ्यासाथी...बाबा आनि आई उजुन दुकानात काय कलतात..मी आजोबांकडे जातो...आजोबा कुथे....मला दिशत नाहीत ते...पुले हायेत का? कुथे गेले सगले??? पार्किंग लॉतमध्ये आमची गाली कुथे?? आई कुथे?? मला आई पाहिजे??? वॅ..........वॅ..............

ही बाई कोन?? ती मला पलत दुकानात कशाला नेते?? वॅ...........वॅ..............

’आलुष, आलुष’ आई ओलत्तेय....ती माजी आई हाये...मला दिशली..तिच्याबलोबल तो पोलीसमामा काय कत्तो???त्या बाईकडे आई पन ललते आनि मी पन....ती बाई थुप चांगली होती आई ललत ललत बाबाला सांगते...आजी आनि आजोबापन आईला काय काय सांगत असतात....आता आई मला न सांगता उचलुनच ल्हाते...तो द्रायव्हल काय तरी घलं दाखवतो पन ही लोकं कत्ती घेऊन बसलीत....आज रातली पिजा खायचा का बाबा?

बाबा पलत कशाला जायचं....पलत जंबो येनाल? आपल्याला घ्यायला? मला मिकीचा बलुन जंबोमध्ये न्यायचा होता..पन ते जंबोमध्ये बलुनला नेत न्हाइत....बाबा आपन कॅलिफ़ोर्नियालाच लाहुया का??

15 comments:

 1. तित्ती तित्ती दोद !! :))

  ReplyDelete
 2. तित्ती तित्ती दोद +1111 !!!! :))

  ReplyDelete
 3. कश शांगु कलत नाही.... मज्जा आली :) :)

  ReplyDelete
 4. तो त्वित ...मजा आ गया ...
  आलुश दादा ,पलत कधी अस आईबाबांना अस सोलुन इथे तिथे जाऊ नको ले,हरवतील ते .... :)

  ReplyDelete
 5. वाचता वाचता थोला वेल मी पन तताच बोलायला लादलो.... :)
  मज्जा मज्जा ... :)

  वन उकी माजा पन फेवरेट :):)

  ReplyDelete
 6. तुमी गल्दीत हरवता म्हनून तुमाला कुथे नेत नाही मी :D

  ReplyDelete
 7. So, it is the first post of your kid :-)

  ReplyDelete
 8. एलममामा तुला दोद वात्त ? तू पण येनाल वन उकीकले?

  ReplyDelete
 9. संकेतमामा तू पन ये...

  ReplyDelete
 10. देवेनमामा मी आईला कद्दीच हलवू देनार नाई..आता मला तिचा फोन नंबल पन येतो...

  ReplyDelete
 11. दीपकमामा माज्याकडे Mack पन हाये...तुज Mack पन फेव्लेत हाये का?

  ReplyDelete
 12. आता मी कद्दीच हलवनाल नाईये सिधूमामा...

  ReplyDelete
 13. सविता आरुषच्या गोष्टी या ब्लॉगवर आहेत पण यावेळी त्यानेच लिहिलेय :D

  ReplyDelete
 14. 'वेडं कोकरू' कविता आठवली हे वाचून

  ReplyDelete
  Replies
  1. ए मला ही कविता पूर्ण आठवत नाहीये तुला येत असेल तर पाठव नं प्लीज.

   Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.