Friday, September 17, 2010

गुणी बाळ

आळस हा माणसाचा शत्रु आहे असं शाळेतल्या सुविचाराच्या फ़ळ्यावर शंभरवेळा लिहिलं तरी कंटाळा हा माणसाचा सगळ्यात जवळचा मित्र आहे हे प्रॅक्टिकली खरं आहे..निदान माझ्या बाबतीत तरी..

गेले काही दिवस एक कंपनीचा आणि एक क्लायन्टचा अशी दोन लॅपटॉपची बाळं घेऊन मी कामाची कसरत करायचा काहीबाही प्रयत्न करत असते.(कंटाळ्यावरुन सुरु केलंय तर क चा भरणाच होणार की काय??) पण गेले काही दिवस रोज सुरु करताना कंपनीचा लॅपटॉप कुरकुरतोय, तर बघुया म्हणून नाही.खरं म्हणजे लगेच ऑफ़िसला सांगायला हवं असं मनात हजारदा येतं कारण मला ओव्हरनाइट डिलिव्हरीने पाठवायचा म्हणून ऑनलाइन ऐवजी बेस्ट बायमध्ये जाऊन त्याने नवाकोरा डेल इंस्पिरॉन, एच डी स्र्कीन, सात नंबरच्या खिडक्या (त्या व्यवस्थित उघडायला शिकायचंही...) आणि थोडक्यात सांगायचं तर एकदम झट्याक पीस पाठवला आणि दोन-तीन महिन्यांत कुरकुर म्हणजे..पण नाही. रोज ती कुरकुर ऐकली न ऐकल्यासारखं करुन पुन्हा येरे माझ्या मागल्या.

त्यादिवशी मात्र जरा विकांताला काम करायला सुरुवात केली आणि नवरा (त्याला इलेक्टॉनिक वस्तुला काही झालेलं खपत नाही एकवेळ बायको-मुलं पडली तर एक तुच्छ कटाक्ष बास...असो...) लगेच म्हणाला”अगं त्यात सीडी टाकुन ठेवलीस का? बघ नं जरा आवाज येतोय तर?’

खरं म्हणजे हा प्रश्न मलाही पडला होता. पण काय आहे मला वाटलं असेल एखादी तर असुदे, बुट होतोय नं आणि तसंही या लॅपटॉपची स्क्रीन, साईड इफ़ेक्ट्स पाहायला जरा होईल हाताशी...म्हणजे आयत्या वेळी उठायला नको (सीडी,रिमोट झालंच तर खारे दाणे, पाणी आणायला उठण्याचा कंटाळा या विषयावर पुन्हा केव्हातरी). त्यामुळे पुनश्चं हम्म्म.आणि दुर्लक्ष उर्फ़ कंटाळा...

आज माहित नाही सकाळी काय झालं होतं ते बहुतेक कंटाळा महाराज दुसरीकडे कुठेतरी गुंतले असावेत आणि नेमकं सीडी ड्राइव्हचं तोंड माझ्याकडे होतं (किंवा लॅपटॉप सुरु करताना त्याची दिशा बदलायचा कंटाळा आणि काय?) पण म्हटलं बघुया कुठली सीडी आहे ती? तर चक्क इजेक्टचं काम होईना. म्हणजे नुस्तं दार किलकिलं होतंय पण प्रत्यक्ष हालचाल शुन्य..तसंही अजुन दोघांपैकी एकही लॅपटॉप संपुर्ण सुरु झाला नव्हता म्हणून शेवटी हातानेच सीडी ड्राइव्ह उघडली आणि त्यात माझा सगळा राग पळवुन लावेल असं एक गोंडस बाळ माझ्या बाळासारखंच नजरेस पडलं...

उर्वरित गोष्ट फ़िनितो करायला फ़क्त फ़ोटो टाकते. बाकी असं काही अकस्मात पाहिलं की कुठल्या आई-बाबाला (किंवा अगदी मावशीपासुन काकापर्यंत सगळ्यांनाच) काय वाटेल हे या फ़ोटोतच आहे असं मला तरी वाटतं..."माझं गुणाचं बाळ ते..........." :)


20 comments:

 1. आज सकाळीच मुलाने बाबाचा बराच ओरडा खाल्ला आणि मग पाळणाघरात गेला..दिवसभर काहीतरी बोचत होतं त्यामुळे काल तो नसताना सिडी प्लेअरमध्ये त्याच्या मते घातलेली ती सीडी पाहून काढलेल्या फ़ोटोवर पोस्ट लिहून त्याच्यावरचं मनातलं प्रेम व्यक्त करण्याचा हा प्रयत्न असं समजायला हरकत नाही.

  ReplyDelete
 2. गुणी?? आता प्रत्येक आईला आपलं बाळ म्हणजे गुणी वाटणार हे तर सत्यच आहे पण मला तरी हे बाळ एकदम मस्त खोडकर, मस्तीखोर आणि डँबिस वाटतंय..

  रच्याक, आज दुपारच्या आपल्या चॅट सेशननंतर तुझी अशीच काहीशी पोस्ट येणार याची मला कल्पना होतीच.. :)

  आरुष मोठा झाल्यावर हे जेव्हा वाचेल तेव्हा त्याला आपल्या आईचं जाम जाम कौतुक वाटेल एवढं नक्की..

  ReplyDelete
 3. हेरंब अरे मी आता दुकान बंद करणार होते...इतक्या तडकाफ़डकी रिप्लाय...पण आज कसंतरी होत होतंच म्हणून तुला म्हटलं नंतर श्रीताईकडेही तेच रडगाणं झालं शेवटी पोस्टेवाटे थोडा माफ़ीनामा...
  on a side note संध्याकाळी पुन्हा वळणाचं पाणी वळणावर आलं आहे...म्हणून तर गुणी बाळ म्हटलंय...गूण उधळणारं असा गर्भितार्थ घ्यायचा...

  ReplyDelete
 4. गुणी बाळाच्या खोड्या आवडल्या...

  ReplyDelete
 5. अपर्णा, खोड्या करण हा लहान मुलांचा जन्मसिद्ध हक्क... ह्याच खोड्या आपण पुढे मिस करतो ग जेव्हा मुल् मोठी होतात..
  असो गुणीच आहे तुझ बाळ...
  God Bless All

  ReplyDelete
 6. अगदी गुणी बाळ आहे हो..:):)

  ReplyDelete
 7. हाहाहा...
  जामच गुणी बाळ आहे!

  ReplyDelete
 8. गुणाचं बाळ ते. अशी सि.डी. पहायला कुणालाही आवडेलच गं!

  ReplyDelete
 9. खरच गुणी बाळ आहे ओ
  आपल्या आईला एक नवी पोस्ट लिहण्यासाठी कारण दिल त्याने ;) हा हा

  ReplyDelete
 10. खरंय सुहास आणि आताच्या पिढीला तर काय खोड्या करायलाही अत्याधुनिक साधनं मिळताहेत मग काय मज्जाच मज्जा...

  ReplyDelete
 11. योगेश आणि बाबा कौतुकाबद्द्ल मंडळ आभारी, गूण गाईन तेवढे कमी या फ़ेज मधुन जातोय सध्या.

  ReplyDelete
 12. कांचन सध्या अशाच सिडी पाहतोय..नाहीतर मग cars,finding nemo, बालगीते हे म्हणजे डोक्यावरुन पाणी...

  ReplyDelete
 13. विक्रम १००% खरं..त्यानिमित्ताने एक पोस्ट आली....खरं नीट डॉक्युमेंटेशन केलं तर महिनाकाठी थोडा रतीब घालता येईल पण वर म्हटलंय नं तो "मित्र" मध्ये आडवा येतो...

  ReplyDelete
 14. गुणी बाळाच्या खोड्या आवडल्या महेशकाका

  ReplyDelete
 15. आभारी महेशकाका.

  ReplyDelete
 16. ठाकु सिद्धार्थ

  ReplyDelete
 17. अपर्णा,
  फोटो पाहिला आणि ह.ह.पु.वा.
  आपली गुणी बाळं कधी, कुठे काय गुण उधळतील सांगता येणार नाही.
  सोनाली केळकर

  ReplyDelete
 18. सोनाली आर्यन पण असच गुण उधळत असेल. लिही तू सुद्धा....

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.