Thursday, September 9, 2010

३०००० +

आज बझवर काहीतरी टाकलं आणि महेंद्रकाकांनी गमतीत म्हटलं "चला म्हणजे आपण यांना पाहिलत का?" चा बोर्ड लावायला नको. त्यामुळे सहज ब्लॉगवर आले..पाहिलं तर आधीची पोस्ट टाकून तसे दहा दिवस होतील. त्यांचंही बरोबर आहे...पण एकंदरितच ब्लॉग लिहिणं, वाचणं सारंच सगळ्या व्यापात कमी झालंय. तरीही काहीतरी लिहायला हवं आणि लक्षात आलं की ब्लॉग वाचक संख्या चक्क ३०००० चा आकडा ओलांडतेय...


योगायोग म्हणजे मागच्या सप्टेंबरमध्येच पाच हजाराबद्दलची पोस्ट टाकली होती आणि एका वर्षात ही संख्या २५००० ने वाढली म्हणजे माझ्यासाठी ही खरंच उत्साह वाढवणारीच गोष्ट आहे....यानिमित्ताने या ब्लॉगला भेट देणारे सारे वाचक (प्रतिक्रिया देणारे आणि मूकपणे या पोस्ट सहन करणारे), फ़ॉलोअर्स सर्वांचेच खूप खूप आभार.

सध्या सगळीकडे गणपतीची धामधुम सुरु आहे त्यापार्श्वभूमीवर इथे मात्र मराठमोळ्या पद्धतीने सण साजरा करायची शक्यता जवळजवळ मावळली आहे. जवळच्या मराठी मंडळाच्या साइटवर अद्याप मेच्या जुन्या कुठल्यातरी कार्यक्रमाचीच वर्णी आहे, त्यांना केलेल्या इ-मेलला रिप्लाय नाही..मागची काही वर्षे साजरे केलेले गणपती उत्सव आता छान वाटायला लागलेत..मजा म्हणजे इतकी वर्षे ते साजरे करताना मायदेशातले गणपती, मुंबईची मजा आठवायचे आणि यावर्षी इथल्या इथलेच गणेशोत्सव आठवतेय...त्यामुळे फ़क्त उदास वाटतंय. त्यात ९/११ जवळ आल्याने टि.व्ही.वर तो इतिहास पुन्हा पुन्हा आठवताना ही उदासी फ़क्त वाढतेय..विचित्र योगायोग, ज्या दिवशी आपल्या इथे वाजत-गाजत गणपती येतील त्याच दिवशी इथे शांततेतले हुंदके वातावरणातली गहिरेपणा वाढवतील...जाउदे....मला वाटतं मी जास्त होमसीक होतेय.... असो...

या सर्वांचाच एकत्रित विचार करता या घडीला ते सारं विसरुन हे तीस-हजार नक्कीच "माझिया मना"ला उभारी देतील...तेव्हा पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतानाच तो शांततेत साजरा होवो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना...

18 comments:

 1. तीस हजारी मनसबदार झाल्याबद्द्ल खुप खुप शुभेच्छा....लवकरच लक्षाधीश मसबदारी मिळो यासाठी बाप्पाच्या चरणी प्रार्थना... :) :)

  ReplyDelete
 2. अभिनंदन अपर्णा!
  आज हरतालिका आहेत, उपास केला आहेस की नाही?
  सोनाली केळकर

  ReplyDelete
 3. अभिनंदन अपर्णा,
  वर्षभरात २५००० बेस्टच!
  तुझी वाचकसंख्या अशीच चक्रवाढ दराने वाढत राहो ही सदिच्छा! :)

  ReplyDelete
 4. 30000 great going.. keep up the blogging and next year you will reach two lacks figure.
  congratulations!

  ReplyDelete
 5. अभिनंदन अभिनंदन.. तीस-वार अभिनंदन..

  बाप्पाच्या कृपेने तुझा ब्लोग लक्षलक्षाधीश होवो ही सदिच्छा !!

  ReplyDelete
 6. अभिनंदन!! :) सहीच. आजचा योगही छान आहे.

  ReplyDelete
 7. प्रतिक्रियांबद्द्ल सर्वांचेच खूप खूप आभार. लोभ आहेच तो असाच राहावा हीच इच्छा...
  आणि हो सगळ्यांनी लक्षाधीश व्हायचा आशीर्वाद दिलाय हे चांगलंय पण सध्या आपली कासवाची गतीच बरी आहे...फ़क्त एकच आहे हा ब्लॉग सुरु ठेवायचा प्रयत्न नेहमी राहिल इतकंच सध्या वाटतंय...बाकी प्रतिक्रिया, वाचकसंख्या इ. गोष्टी निमित्त केवळ...:)

  ReplyDelete
 8. @राजकिरण आभारी..

  ReplyDelete
 9. अभिनंदन ग...
  अशीच उत्तरोत्तर प्रगती होवु दे.लवकरच लक्षाधीश हिटसधारी व्हायच आहे तुला.... :)

  ReplyDelete
 10. लक्षाधीश हिटसधारी हा हा...मस्त शब्द आहे देवेंद्र ....धन्यवाद.

  ReplyDelete
 11. आनंद, आभार. लोभ आहेच तो असाच राहावा हीच इच्छा...

  ReplyDelete
 12. खूप खूप अभिनंदन...अशीच लिहत रहा. पुढल्या वर्षी वाचक संख्या ३ लाख होवो..
  शुभेच्छा

  ReplyDelete
 13. धन्यवाद सुहास...बाकी आपला आशीर्वाद असुद्या...

  ReplyDelete
 14. हार्दिक अभिनंदन...

  ReplyDelete
 15. आभारी सिद्धार्थ.

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.