आजकाल मुलांना शिंगं फ़ुटण्याचं वय बहुधा वय वर्षे दोनवर आलेलं दिसतंय...एक म्हणजे तेव्हा बाळ आपल्या पायावर उभं असतं....(हा शब्दशः अर्थ...उगाच नाहीतर बाळमजुरीचा आरोप या पोस्टवरुन सिद्ध होऊन मी आणि माझा ब्लॉग तुरुंगात नको जायला...) आमच्याकडे तर बाळ (आता खरं तर बाळ नकोच म्हणायला पण...) उभं राहिल्यानंतर नेक्श्टव्या श्टेपला धावायलाच लागलं...(आणि मग त्याच्यामागे धावुन माझं वजन कमी झालं....इति अर्थातच अर्धांग..) हम्म, तर कुठे होतो आपण??हे धावरं किंवा चालणारं बाळ आपल्या पावलांनी जग जरा जास्तच उघड्या डोळ्यांनी पाहायला सुरु करतं..पायासारखंच थोडं-फ़ार तोंडानेही सहकार्य द्यायला सुरु केलं असतं म्हणजे बोबलं बोबलं पण जास्त शब्द असतात आणि नसले तरी अडत नाही कारण नवे जमतील ते शब्द तयार करुन आई-बाबांना "समानार्थी शब्द शोधा"चं कोडं घालुन नाही कळलं तर शेवटचं रडायचं अस्त्र उगारायचं कळलेलं असतंच..
आता शब्दांवरुन विषय निघालाच आहे तर सांगुनच टाकते "चीची" सगळ्यांना आठवत असेलच त्यानंतर नेमकी आवडली ती चपाती (आणि त्याच्या आईला ती येत नाही हे कर्म असो..त्यावर रडण्याची जाहिर पोस्ट झाली आहेच....पण दुखरी नस आहे ती..) आणि नशिबाने जगप्रसिद्ध "पापा" म्हणजे चपाती आणि "ममं" म्हणजे वरण-भात/खिचडी असल्याने आम्हालाही शिकवणं, कळणं कठिण गेली नाही पण दोन शब्द एकदम बोलायची सुरुवात जेव्हा "चीची पापा" ने झाली तेव्हा मात्र हा योगायोग नव्हे असं मला उगाच वाटलं...आता निदान काय हवं हा प्रश्न नव्हता..आणि चीची पापा हे कॉंबिनेशन काही वाईटही नाही...
चीची असताना आमच्या घरी माझी आई होती आणि आईला काचेच्या पेल्यात पाणी प्यायला आवडत नाही म्हणून खास स्टीलचा पेला देते. तो नेहमी दिसला की आजी आजी म्हणताना आजी जेव्हा परत तिच्या घरी गेली तेव्हा लेकाने पाण्यालाच सरळ आजी म्हणायला सुरुवात केली..फ़क्त नुस्तं आजी न म्हणता तो "आ आजी" असं म्हणतो आणि आजीचा फ़ोटो दाखवला की "आजी"..सुरुवातीला मला कळलं नव्हतं ’ये आ आजी क्या है?’ पण ते मला कळेल याची सोय अर्थातच पठ्ठ्याने केली..
आधी आवडलेल्या पापा नंतर ’पा’ या शब्दाचा उपयोग अगदी सढळपणे दिसायला लागला...एकदा मी पापड तळले होते आणि नवर्याला पापड देताना अर्थातच करर्म-कुरर्मचा(र चा पाय कसा मोडतात??? बरहा वालो जागो मेरे लिए) लळा त्यालाही लागणं साहजिकच होतं..मग दोन दिवसांनी स्वतःच फ़र्माइश केली ’पाप्र’ असं काहीतरी बरळून...खरं म्हणजे मला कळलं होतं की पाप"ड" मागतोय पण मी कसली ताकास तूर लागु देते???
पाप्रं झाल्यानंतर दुसरं फ़ेवरिट फ़ुड म्हणजे इथे ज्या त्या बाळांना दिले जाणारे चिरिओज..गोल गोल आकार आणि हातातही पकडता येतात म्हणून सगळ्याच मुलांना आवडतात..(त्यातला अगोड प्रकार दिलेला चांगला कारण ते फ़क्त ओट्सचे असतात..) आणि याचं पाकिट असतं फ़्रिजच्या वरती म्हणून बोलता येत नव्हतं तोवर फ़्रिजकडे नेऊन बोट दाखवता दाखवता एक दिवस त्याच त्या वरच्या ’पा’ चा आधार घेऊन चक्क एक नवाच शब्द ऐकु आला "पापुपा". अरे म्हणजे चिरिओज आणि पापुपा, काही संबंध पण काही नाही आता पापुपा म्हटलं की आम्ही मुकाट्याने चिरिओज देतो नव्हे एकमेकांना सांगतानाही त्याला पापुपा दे असंही म्हणतो...आणि त्यानंतर अर्थातच "चीची पापुपा" हे कॉम्बो मागितलं हे ही गोष्ट चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आली असेलच..
तसंच एक दिवस कधीतरी "पावो" आला..म्हणजे पाव हे माझ्याच काय चा.वा.च्या धेन्यातबी आलं असलच...मला ते पावो ऐकायला इतकं गोड वाटतं नं की त्याला खरं म्हणजे पावो द्यायला आवडत नसला तरी ऐकायला मात्र नेहमीच आवडतं....मग द्यायची वेळ आलीच की पावोला थोडा जॅम लावुन देते..नशीबाने त्यासाठी अजुन नवा शब्द शोधला नाहीये..सरळ फ़्रीज उघडून दारातल्या बाटलीकडे बोट दाखवलं की न बोलता काम होतं...
आज असंच पावो-जॅम दिला आणि त्याचं माझ्याकडे लक्ष नाही म्हणून थोडी इतर कामं केली..
त्याआधी पापुपा पण मागुन घेतले होते म्हणजे खादीच्या चळवळीत बराच वेळ जाणार म्हणून निवांत होते तर साहेब माझ्याकडे ते सॅंडविच घेऊन आले आणि पापुपा पापुपाचा गजर सुरू..खरं तर ताटात पापुपा होते पण नंतर नीट पाहिलं तर साहेबांनी आधीच सॅंडविच उघडून त्यात पापुपा घालुन स्वतःचीच एक नवी डिश बनवुन मला दाखवायला आणली होती..इतके दिवस जेवताना पाण्यात चपाती घाल, दुधात पापुपा किंवा ममं घाल अशा प्रकारचे उद्योग पाहात होते पण आज मात्र त्याचं स्वतःचच कॉम्बो पाहुन मला मात्र कुठेतरी वाटायला लागलंय थोडं मोठं झाल्यावर हे पोरगं माझं स्वयंपाकघरातलं ओझं हलकं करणार बहुधा...

चीची सुपरहिट होतं. ते कोण विसरेल.. :)
ReplyDeleteतुमच्याकडे पकारांभ शब्दांची चलती आहे तर !! सहीये :)
आमच्याकडे बकारांभ शब्दांचं राज्य आहे. बा या शब्दाचा अर्थ बाबा, बस, बाला (बाळ), बिस्कीट वगैरे वगैरे असा प्रसंगानुरूप बदलत असतो.. :)
हेरंब, ही पोस्ट तुझ्या "एकदंता"सारखी आहे. हे अपडेट दोन महिन्यापुर्वीची आहे. आता कामाचे (आणि बिनकामाचेही) बरेचसे शब्द तोंडात आले आहेत...नको त्यावेळी येऊन ते घोळ घालतात म्हणजे जेवणाच्या वेळेस उकी (कुकी)....असो....खरं तर काही शब्द हरवलेही आहेत...मलाच आठवणीत ठेवायचे म्हणून मी हे लिहुन ठेवलं होतं आता जरा nostalgic होऊन शेवटी पोस्टलंय....
ReplyDeleteतू सध्या "ब"कार यंज्व्याय कर....:)
खूप सुंदर झालीये पोस्ट... खूप खूप आवडली...
ReplyDeleteअन शेवट तर मस्तच....
Kitti godd...Mi te cheechee vachale navhate...aatta vachele... sahiye...!!!
ReplyDeleteAarush la bhetayachi ichha hotey mala....Punha ithe yeshil tevha Aarush la bhetav han nakki...!!! :)
त्या चीची वरुन शमीची कशी गंमत झाली लक्ष्यात आहे ना... तिला काहीच माहीत नसल्याने ती आपली त्याला उचलून चिमणी दाखवते आहे आणि हा आपला दूसरीकडेच बोट दाखवतोय... हा..हा.. सर्वच धमाल आहे... :)
ReplyDeleteधन्यवाद सागर...अरे खरं पोस्ट खादाडीवरची असायला हवी होती पण खादाडी शब्दांवर जास्त झालीय असं नंतर वाटलं पण नाव बदलायला कंटाळा आला....आणि तसंही त्याचा शेवटचा खादाडी प्रयोग ब्येश्ट आहे नं???
ReplyDeleteमैथिली पुढच्या वेळी नक्की...तुला चीची पण नक्की आवडली असेल....:)
ReplyDeleteहा हा हा रोहन...बिचारी शमिका...शेवटी मला वाटतं सोनालीला पण कळलं की तो दूध मागतोय....:)
ReplyDeleteबेश्टच...
ReplyDeleteलई भारी....
ReplyDeleteचीची,पापुपा..भारीच..आरुष पुढे जाउन नक्कीच खादाडीच्या राज्यात एखाद महत्वाच पद मिळवेल...
ReplyDeleteधन्यवाद भारत...
ReplyDeleteदेवेंद्र, अरे रोहनने तर त्याची खादाडी झलक पाहिली पण आहे...तुझं म्हणणं नक्की खरं करील तो बघ....:)
ReplyDeleteअपर्णा,
ReplyDeleteशमिकाची मस्तच मजा झालेली, मला पण माहिती होतं चीची म्हणजे काय ते.
’प’ ची बाराखडी चालू आहे सध्या तुझ्याइथे. आमच्याकडे अजुन नुसते हातवारे आणि माना हलवणे चालू आहे. त्यातुन काय हवे ते समजणे म्हणजे धमाल नुसती.
सोनाली
दोन दिवस नुसती धावपळ चाललीये ना गं.आज सकाळच्या चहाबरोबर आरुषचे गोड गोड व थोडेसे कोड्यात पाडणारे बोल वाचून मस्त फ्रेश वाटले. तसे त्याचे पाप्र मी फोनवरही ऐकले होते नं... सही चाललीये तुमची बोली.:)
ReplyDeleteहा हा सोनाली, हातवारे आणि मानानंतर हं हं चा पाढा सुरु होईल आणि मग मात्र एकदा टकळी सुरु झाली की आपलीच बोलती बंद होते बघ....:)
ReplyDeleteतळटीप.... आमच्याकडे बाराखडी संपली आणि वाक्य (उर्फ़ गजर) मागे लागलीत....त्यामुळे बाळराजांचा खरा हट्टी आणि नाही नाही म्हणणारा स्वभाव आता स्पष्ट ऐकु येऊ लागलाय....सो सावधान...
अगं श्रीताई, बोलीमध्ये मायदेश दौर्यापासुन लक्षणीय फ़रक पडलाय...वरच्या प्रतिक्रियेतली तळटीप वाचलीस तर लक्षात येईलच तुझ्या....
ReplyDeleteचिची भारी आहे, आज वाचलं. तुझ्या नि हेरंबच्या पोस्ट्स वाचून मला थिअरी नॉलेज मिळतंय. माझे प्रॅक्टीकल अनुभव वेगळे असतीलच. पावो शब्द कसला गोड वाटतो ऐकायला. आरूषच्या शब्दसंपत्तीपेक्षा तुझ्या शब्दसंपत्तीत किती भर पडतेय बघ!
ReplyDelete<<(र+र=र्र)>>
शुभ संकेत आहे हा! ;)
ReplyDeleteथोड्याच वर्षांत आराम तुला ताई. अपडेट्स देत राहा अश्याच.
धन्यवाद कांचन..थिअरी पक्की केली तरी प्रॅक्टिकलाच खरं शिक्षण होतं असा अनुभव आहे...:)
ReplyDeleteबाबा, तू मला ताई नाही केलंस तरी चालेल...असो....
ReplyDeleteअशाच अपडेट्स देता याव्यात ही इच्छा...:)
ते पापुआ माझ पण सगळ्यात आवडतं आहे. कसला गोड झालाय लेख.. मस्तच
ReplyDeleteधन्यवाद अमृता...
ReplyDeleteछोटा शेफ पण तयार झाला म्हणायचा!
ReplyDeleteनविन नावांसहित नंतर तुला काय काय खाऊ घालेल बघ!
होय मीनल...आता तो मला काय काय खाऊ घालतोय ते पाहायचं...:)
ReplyDeleteहे..हे...लय भारी...खादाडी राज्याच भविष्य उज्वल आहे की!!!
ReplyDeleteyup Yogesh...Welcome back...:)
ReplyDeleteलहान मुलाच असच असत ,आपण नाही का हेच केले आहे, पिढी बदल कि असच सोपं होणार .महेशकाका
ReplyDeleteअगदी बरोबर महेशकाका...प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत.
ReplyDelete